प्रेम म्हणजे काय ? How will you define? व्याख्या कोणती?
नारद, भक्तिसूत्रांत व्याख्या करतात.
नारद, भक्तिसूत्रांत व्याख्या करतात.
।। अनिवर्चनीयं प्रेमस्वरुपम् मूकास्वादनवत् ।।
- प्रेमाची व्याख्या करता येत नाही. शब्दांनी प्रेम सांगताच येत नाही. मुक्याने गुळाचा स्वाद घेतला, अनुभवला, पण ती गोडी त्या मुक्याला काही सांगता येत नाही.
- प्रेम ही अंत:करणाची वृत्ती आहे. भाव आहे. हृदयी जिव्हाळा आहे. प्रेम ओढून ताणून आणता येत नाही. भग्वत्प्रेम प्रत्येकात निर्माण होईल असेही नाही. ती संवेदना एखाद्याच भाग्यवंताला मिळते. नामस्मरण, जप तर सर्वांनाच करता येईल, पण प्रेम कसे आणायचे?
प्रेम नये सांगता, बोलता, दाविता । अनुभव चित्ता , चित्त जाणे।।
- गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, धातुशिल्प अशा कलांचा अभ्यास करता येतो, पण प्रेमाचा अभ्यास होत नाही. प्रेमात अपेक्षा नसते. कामनेचा पुसटसा स्पर्शही नसतो. प्रेमाला सत्व, राज, तमाचा यत्किंचित गंधही नसतो. त्रिगुणांच्या पलीकडची ती चीज आहे. प्रेम ही पराभक्ती आहे. मीरेचं परमविशुद्ध प्रेम. ती परभक्ती, ते परमप्रेम. वृंदावनातल्या गोपींना भगवंताचं दर्शन घडविले. भग्वदर्शन घडले तोच गोपीच देहभान हरपून जायचे.
मुख डोळा पाहे, तशीच ती उभी राहे।
- भग्वदकृपा ज्याच्यावर होते, त्यालाच भग्वदप्रेमाची प्राप्ती होते. प्रेम हे देवाचे देणे आहे. 'सा परानुरक्ती: ईश्वरे।' परमेश्वरावर परमप्रेम ती पराभक्ती, असे शांडिल्य सांगतात.
- सा त्वस्मित् परम प्रेमस्वरूपा। परमात्म्यावरचं परमप्रेम तीच पराभक्ती, असे नारद सांगतात.
- भगवंत प्रेमामुळे प्लावीत झालेल्या आर्द्र चित्ताचा भगवंताकडे अखंड वाहणारा वृत्तीप्रवाह ती पराभक्ती, असे मधुसूदन सरस्वती सांगतात.
हुतस्य भगवत् धर्मात धारवाहिकतान्गता । सर्वेश मनसौ वृत्ति: भक्तिरित्याभिधीयते ।।
- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी
No comments:
Post a Comment