मेगास्थेनिस, स्ट्रॅनो, हुएनत्संग, अज्बेरूणी, मार्कोपोलो, अबुल फाजल, मॅक क्रिंडल, रोमोरोलो, आजचे बनार्ड शाॅ, नोबेल पारितोषक विजेता ऑक्सेस कॅरेल अशा तीन सहस्र वर्षापासून आजवरच्या साक्षी पाहूनही ज्यांच्या अंतरी वैदिकधर्म संस्कृती विद्वेषाची आग उफाळत राहील, तो केवळ दुरात्माच असू शकतो.
- यवनांचा वकील मेगास्थेनिस लिहितो, 'भारतीयांत असलेल्या प्रामाणिकपणाचा, धर्माचरणाचा अल्पांश देखील अन्यत्र आढळायचा नाही.'
- स्ट्रॅनो कौतुकाने, आदराने सांगतो, 'हिंदू दाराला कुलूपे लावत नाहीत आणि देण्या घेण्याचे करार देखील खत-पत्राविनाच करतात.'
- चिनी प्रवासी हुएनत्संग म्हणतो, ' हिंदू अत्यंत कृतज्ञ आहेत. दु:ख दूर करण्याकरता तो स्वत:च्या प्राणांचा प्रसंगी होमही करतो. कुणी अपकार केला तर त्याला शासन देतो. परंतु शत्रूला सावध करून त्यांच्याशी टक्कर देतो. शरणागताला आसरा देतो.'
- अज्बेरूणी असेच प्रशस्तीपत्रक देतो.
- मार्कोपोलो तर चक्क लिहितो, ' इकडची पृथ्वी तिथे झाली तरी ब्राह्मण कधी खोटे बोलायचा नाही.'
- अबुल फाजल लिहितो, ' हिंदु सज्जन आहे, मायाळू, करुणामय आहे. जगातल्या कोणत्याही माणसांशी भांडण करण्याची वृत्तीच त्यांच्यात नाही.'
- खाफीखान हा कमालीचा हिंदुद्वेष्टा! शिव प्रभूंची प्रशंसा करतांना तो सांगतो, ' त्यांनी कधी मशिदीला उपसर्ग दिला नाही. कुराणाचा अवमान केला नाही. कोणत्याही धर्मातील स्त्रीला, वैर्याच्या स्त्रीला देखील सन्मानाने वागवले.'
- मॅक क्रिंडल सांगतो, 'हिंदूंची न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा आणि सरळपणा हे गुण विशेष आहेत.'
- बनार्ड शाॅ नि:संदिग्ध सांगतो, 'भारतीय चेहरे, हे त्यांचे अंत:करण प्रगत करतात. ते सगळे जसे आहेत तसेच असतात. आमच्या चेहर्यावर मुखवटे आहेत.'
Hindu Dharma is ever new and will never cease to exist। It is like a vast and deep ocean. Only one drop of it is sufficient for us !'
प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी
khup amulya mahiti.
ReplyDelete