का मृतभाषा आहे? ''भारत केवळ त्याला अपवाद आहे.''
जगातला असा कोणता शिक्षणशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ आहे की जो शिशुशिक्षणाकरता इंग्रजी माध्यम पुरस्कारतो?
जगात असा कोणता देश आहे की जिथे शिशुशिक्षणाकरता परकीय भाषा मा
ध्यम म्हणून वापरतात?
''भारत केवळ त्याला अपवाद आहे.''
*****
आजच्या संस्कृतची दुर्दशा
पारंपरिक संस्कृत शिक्षण आता प्राणहीन झालेले आहे. आज या देशात secular लोकशाही आहे. या देशाची राजनीती म्हणजे पक्षनीती आणि पक्षनीती म्हणजे निवडणूक नीति ! निवडणूकनीति म्हणजे काय, हे का सांगायला पाहिजे? मद्य, पैसा, प्रलोभने, सत्तालालासा, दादागिरी, यांचा गदारोळ !
*****
''अशा या भीषण प्रसंगी तुम्ही संस्कृतचा प्रसार कसा करणार?''
संस्कृत भाषा आणि सांस्कृतिक विद्या यांची पुनःप्रतिष्ठापना करण्याकरता आधी आम्ही भाषेत म्हणजे भाषणात, व्यवहारात संस्कृतचा वापर सुरु करू. भारताची प्रत्येक भाषा गुजराथी, बंगाली, असामी, कानडी, तेलगु, तामिळ, मराठी, अशा सगळ्या भारताच्या भाषा संस्कृतनिष्ठ होतील असे प्रयत्न करू. त्यातून संस्कृत शब्दाचे प्रमाण खूप वाढलेले असेल. म्हणजे संभाषण, बोलणे यातून संस्कृत आणायची. व्यवहाराची भाषा संस्कृत !
*****
संस्कृतपासून ज्ञान संपादण्याची आजच्या दार्शनिकांची अहर्निश धडपड सुरु आहे. भारतीयांची अस्मिता भ्रष्ट झाली आहे. आत्मविस्मृतीचा रोगाने भारतीयांना पछाडले आहे. संस्कृत का dead language आहे? संस्कृत तर ज्ञानदीप आहे. ज्ञानाच्या प्रकाशाकरता विख्यात वैज्ञानिक, दार्शनिक तिकडे बघतात. तिला भारतीय करंटे dead म्हणतात.
Is Sanskrit a Dead Language ?
- संस्कृत बोलण्याला अतिशय सोपी आहे. शासनाची भाषा तीच होऊ शकते. पाश्चात्य पौर्वात्य अशा अनेक तज्ञांचे तसे अभिप्राय आहेत.
- संस्कृत भाषा विलक्षण लवचिक आहे. ताणाल तेवढी ताणता येईल. ती तर संजीवनी सारखी आहे. प्रसंगी ती पुन्हा नवीन होऊ शकते.
- पाणिनी, कात्यायन, पतंजली यांच्या पासून तर आजवरचा इतिहास जरा डोळसपणे विरोधकांनी पाहावा. भारताची संस्कृति व इतिहास जरा डोके ठिकाणावर ठेवून वाचा.
*****
''आजच्या वैज्ञानिक व औद्योगिक विषयांची अभिव्यक्ती संस्कृत कशी करू शकेल?'' शिवाय संस्कृत ही अत्यंत कठीण भाषा आहे.''
का बरं ? संस्कृत जशी कठीण आहे, तशीच ती अत्यंत सोपी आहे. हॉलंड मध्ये संस्कृत शिकवतात. तिथे केवळ तीन महिन्यात विद्यार्थी आपापसात संभाषण करू शकतात. जपानमधल्या चौदा विद्यापीठापैकी चार विद्यापीठातून संस्कृत शिकवले जाते. तिथे तर यापेक्षाही कमी अवधी लागतो. आणि आमचाही तसाच अनुभव नाही का? विज्ञान आणि औद्योगिक संस्कृतीशी संबंधित अभिव्यक्ती करायला संस्कृत इतकी अत्यंत साधक भाषा सापडणे कठीण.
*****
''आज इंग्रजी भारताची राज्यभाषा आहे.
इंग्रजीचे उच्चाटन कसे करणार?''
''संस्कृतचे आसन इंग्रजीच्या आसनासोबत आम्ही मांडू. संस्कृतच्या सहाय्यानेच इंग्रजीचे उच्चाटन केले पाहिजे.''
*****
जेव्हा ति आनादि संस्कृतवाणी, ती देववाणी dead language म्हणून घोषित होते,.....
जेव्हा ति Lost Language म्हणून निर्देशिली जाते,......
जेव्हा त्या संस्कृतीचा लय होतो,......
वर्ण, सदाचार, सद्गुण, सत्कर्मे, धर्म, संस्कृति हे असे सगळे dead होतात.
संस्कृत गेले की संस्कार मावळतात।
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी