शब्द पवित्र असतात. आधुनिकतेने ते पवित्र शब्द गावठी दारूच्या गटारात बुडवून, सेक्सच्या रंगाने किळसवाणे केले आहेत. तिथे सूडबुद्धी आहे, द्वेष आहे.
साहित्य हा संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन संस्कृतीचं प्रतिबिंब प्राचीन साहित्यात आहे. तिथे शब्द, भाषा, सागरासारखी घनगंभीर, खोल आहे. शब्दातले ऐश्वर्य, ते सौंदर्य, ते माधुर्य ते प्रकट करतात. तिथे सर्वोच्च तत्त्वांचा स्पर्श आहे. परमोदात्तता आहे. मानवाला पवित्र बनविण्याची शक्ती आहे. ती शक्ती इतकी अपरंपार आहे की शब्द 'मंत्र' होतात. रामायण-महाभारताचे वाचन ही गहन समाधीची उत्तम प्रक्रिया आहे.
शब्दाचे मूळ करण, सत तत्त्व आहे. आम्हांला जो अर्थ कळतो, तो उथळ आहे. वरवरचा आहे. त्याचे जे उदात्त, सर्वोच्च जीवन आहे, ते गुप्त आहे. हिमखंडाचा जसा अल्प असा वरचा भाग दिसतो तसे.
वाणी, व्यासांत महासागरासारखी खोल खोल होती. व्यास त्या शब्दातले लपलेले समस्त ऐश्वर्य प्रगट करतात. व्यासांच्या वाणीचा स्पर्श होताच ते शब्द सर्वोच्च भूमिकेवर जातात. त्या शब्दातील स्वर्ग प्रकटतो. ते प्रकाशात न्हाऊन निघतात. त्या शब्दात परमोदात्तता स्वाभाविक असते. त्या शब्दात सत्त्वाचा उत्कर्ष असतो. ते शब्दच मंत्र बनतात. महाभारताचे वाचन हे गहन ध्यानाचे कर्म आहे.

************************************************
हे धर्मघना, यज्ञ संस्थेकरता वेद आहेत. वेदांत यज्ञ आहेत. मेघांना वाहून आणणारा वायू 'हिंकार' आहे. मेघ हा 'प्रस्ताव' आहे. पर्जन्यवृष्टी हा 'उद्गीथ' आहे. विजेचा लखलखाट व घनगर्जिते हा 'प्रतिहार' आहे. सूर्याद्वारे सागर जल वर नेले जाते. ते 'निधन' आहे. हे रहस्य जाणून वृष्टीदृष्ट्या सामाची उपासना करतो. त्याच्या संकल्पाने वृष्टी होते. ती जगताला जीवन देते. धर्मघना, तू आमचा जीवनदाता आहेस. तुझा जयजयकार असो.
हे धर्मघना, पितृगण, देवांचे संघ, इंद्रादी श्रेष्ठ देव, तसेच ३३ कोट देव, गंधर्व, अंतरिक्षात संचार करणार्या विभूती, ब्रह्मचर्याचे आपल्या शक्तीने संरक्षण करतात. ब्रह्मचर्य हेच मनुष्यादि रूपाने सर्व जगाचे धारण करते. ८०० सहस्र ऋषींनी भृगु महर्षीकडून ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली. हे धर्मघना, ब्राह्मणद्वेष हा हिंदुद्वेष आहे. हे धर्मघना, भोगलोलूप, लिंगपिसाट, पाश्चात्य जीवनरहाटींची आम्ही नावनिशाणी उरू देणार नाही. तुझा विजय असो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित) वर्ष ९, अंक १०