आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Friday, April 22, 2011

Friday, April 15, 2011

भगवंताची पूजा अशी करा.



  • स्नान करुन, शुचिर्भूत होऊन, देवाच्या मूर्तिसमोर बसावे. प्राणायाम करावा. नंतर न्यास करावेत. म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एकेक देवतेची स्थापना, तो मंत्र म्हणून करावी.
  • नंतर श्रीरामप्रभू पूजनाला आरंभ करावा. गंध अक्षता, फुले, फळ वगैरे उपचार द्रव्याची यथासांग पूजा करावी.
  • पुष्पादिकांत जे जीवजंतु असतील ते काढून टाकावेत. भूमी सारवून घ्यावी. आपण स्वतः शांत, स्थिर चित्त असावे. देवाची मूर्ति, लिंबू, चिंच व पाण्याने धुऊन वस्त्राने स्वच्छ पुसून पूजायोग्य करावी.
  • नंतर हरिमूर्तिचा व आपल्या हृदयातील, हरीची यथासांग पूजा करावी. पाद्य, अर्ध्य पात्रे स्वच्छ धुतलेली असून, ती जवळ असावीत. आपल्या अंतःकरणात ज्या श्रीरामाची आपण पूजा केली, त्या ईश्वराचे ते प्रतिबिंब त्या मूर्तित आहे, असे ध्यान करावे.
  • सांगोपांग पूजन करावे. सांगोपांग म्हणजे अंग व उपांगासहित पूजन करावे. अंग म्हणजे, मूर्तिचे हृदय, मस्तक वगैरे अवयव आणि उपांग म्हणजे श्रीराम प्रभूचे धनुष्य, बाण, किरीट, कुंडल वगैरे, सपार्षद पूजन करावे. सपार्षद म्हणजे, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न व हनुमान या पंच्ययतन परिवारासह पूजन करावे.
  • पाद्य, मधुपर्क, आचमन देवास अर्पण करावे. पाद्य म्हणजे, प्रभूला पाय धुण्यास पाणी द्यावे, म्हणजे रामप्रभूच्या मूर्तिचे चरण धुवावे. मधुपर्क म्हणजे रामप्रभूकरता मधमिश्रित जल द्यावे.
  • नंतर वस्त्रे व भूषणे हे उपचार अर्पण करावीत. प्रभू मूर्तीच्या कपाळावर तिलक करावा.
  • धूप व दीप हे उपचार समर्पण करावेत. नंतर नैवद्य समर्पण करावा. नैवद्यात फळ, शर्करा, मिठाई, वगैरे असावीत. देवाला फुलाच्या माळा द्याव्यात. अक्षता समर्पण कराव्यात. अशाप्रकारे षोडशोपचार पूजा करावी. नंतर आरती करावी. कर्पूर आरती करावी. मंत्रपुष्प अर्पण करावे. देवाची आरती आपाद मस्तक करावी. स्तोत्रे म्हणावी व देवाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार करावा. प्रदक्षिणा स्वतः भोवतीच करावी.
  • श्रीराम प्रभूच्या मूर्तीची पूजा करतांना आपण राममय आहोत, असे अखंड ध्यान करावे. पूजन पूर्ण झाल्यावर देवाचे निर्माल्य मस्तकी धारण करावे. पूजिलेल्या देवाला आपल्या हृदयात व मूर्तिला करंडयात (संपुष्टात) स्थापन करावे.
  • नंतर पूजाविधी समाप्त होतो. अशा प्रकारे आपल्या हृदयात व मूर्तीत जो त्या परमात्म्याचे पूजन करतो, त्याचा अहंकार नष्ट होऊन, तो खात्रीने मुक्त होतो

Saturday, April 2, 2011