आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, August 21, 2011

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी !


श्रीकृष्ण हा पूर्णावतार असल्याची उदाहरणे !

१. या श्रीकृष्णस्वरूपी परमात्म्याने तान्हेपणी पूतनेचे स्तनपान करून प्राण ओढले.
२. तिसर्‍या मासात पादघाताने शकटासूर नष्ट केला.
३. पुढे रांगत रांगत यमलार्जुन वृक्षांच्या मध्ये शिरून ते दोन्ही वृक्ष उन्मळून पाडले.

४. कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनाजल पिऊन गतप्राण झालेले गोपबालक, गाई-वासरे यांना आपल्या दृष्टीतून कृपेचा अमृतवर्षाव करून जिवंत केले.
५. विषमय झालेला यमुनेचा डोह त्यात स्वच्छंद जलविहार करून निर्विष केला.
६. यमुनातिरावर झोपलेल्या व्रजवासी गोपालांना वणव्यातून वाचवले.
७. माता यशोदा त्या कृष्णाला उखळाशी बांधण्यास जितके दोर घेऊन गेली, ते सर्व दोन बोटे थिटेच पडत गेले.
८. त्याने जांभईसाठी उघडलेल्या मुखकमलात चौदा लोक (स्वर्ग-पातालादी) दाखवून यशोदेला भयभीत केले.
९. नंद गोपाला अजगराच्या विळख्यातून आणि वरुणाच्या पाशातून मुक्त केले.
१०. व्यामासुराने गोपबालांना गिरिगुहेत बंद केले असता त्यातून त्यांची सुटका केली.
११. वयाच्या सातव्या वर्षी, घोर पर्जन्य वृष्टीतून व्रजवासी गोपसमाजाचे आणि त्यांच्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी सात दिवसपर्यंत गोवर्धन पर्वताला शिलीन्ध्रपुष्पाप्रमाणे त्या श्रीकृष्णाने लीलया उचलून धरले.
१२. याच बालवयात वृंदावनामध्ये चांदण्या रात्री गोपींसह रासलीला चालू असता कुबेरदूत शंकचूडाने गोपींचे अपहरण करण्याचे धार्ष्ट्य केले असता त्याचा शिरच्छेद केला.
१३. या व्यतिरीक्त प्रलम्बासुर, धेनुकासुर, बकासुर, केशी, अरिष्टासुर यासारख्या दैत्यांचा बालवयात संहार केला.
१४. मथुरेमध्ये जाऊन चाणूर, मुष्टिक, कवल्यापीड हत्ती आणि मामा कंस यांचा निःपात केला.
१५. पुढे तरुणपणी कालयवन, भौमासुर, मिथ्या वासुदेव, शाल्व, दिविदवानर, बल्वल, दन्तवस्त्र, नग्नजित राजाचे सात सांड, शंबरासुर, विदुरथ इत्यादी दुष्टांचा संहार करून त्यांना उत्तम गती दिली.
१६. गोकुळातले प्रिय गोप-गोपी हे साधनाहीन पामर जन असूनही त्यांच्या निर्व्याज पे्रमाने त्यांना अंती वैकुण्ठपदी उत्तमगती दिली.
१७. अर्जुनाला गीता सांगितली.
श्रीकृष्णाच्या या सर्व उल्लिखित आणि अनुल्लिखित अगम्य लीलांची संगती त्याला पूर्णावतार मानले, तरच लागू शकते.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २०१०)

`श्रीकृष्ण धर्मनिरपेक्ष होता’, असे मानणारे अज्ञानी आणि हिंदु धर्माचे कडवे पुरस्कर्ते एक हिंदुत्ववादी थोर नेते !

विचार : `भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारले. त्यानंतर त्याने अप्रवृत्त केलेल्या सहस्रो स्त्रियांना त्याच्या कारावासातून सोडवले. या सहस्रो स्त्रियांसमोर गंभीर समस्या होती. अशा आपत्काली प्रसंगात श्रीकृष्ण स्वतः पुढे आला आणि औपचारिक रूपाने त्यांनी त्या सर्व स्त्रियांना आपली धर्मपत्नी म्हणून घोषित केले. नरकासुराच्या कारावासातल्या सहस्रशः स्त्रियांशी श्रीकृष्णाने विवाह केला आणि त्यांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून दिले. म्हणूनच त्याची अपूर्व प्रज्ञा आणि अनुपमेय अंतःकरणाचे गुण या कारणामुळे सगळा संसार त्यांना महान धर्मनिरपेक्ष मानतो.

खंडण : हे सगळे साफ खोटे अन् निराधार आहे. श्रीमद्भागवतात स्पष्ट वर्णन आहे की, नरकासुर अथवा भौमासुर याच्या मृत्यूनंतर भगवंताने सहनीतीमत भवनात प्रवेश केला आणि १६ सहस्र क्षत्रिय कन्यांना पाहिले, ज्यांना भौमासुराने जिंकून राजस्त्रियांचे नव्हे, तर राजकन्यांचे हरण केले आणि आपल्या कारावासात डांबले. त्या सगळ्या क्षत्रिय राजकन्या होत्या. त्यात कुणीही विवाहित स्त्री नव्हती. या सगळ्या राजकन्यांच्या अब्रूला कुठेही स्पर्श झाला नव्हता; म्हणूनच कृष्णाने त्या राजकन्यांशी धर्मशास्त्राप्रमाणे विवाह केला.


तत्र राजन्यकन्यानां षट्सहस्राधिकायुतम् ।
भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३३

अर्थ : ज्यांना भौमासुराने कोंडून ठेवले होते, त्या १६ सहस्र क्षत्रिय कन्यांना भगवंताने जेव्हा सहनीतीमत भवनात प्रवेश केला, तेव्हा पाहिले.

तम्प्रविष्टं स्त्रियो वीक्ष्य नरवर्यं विमोहिताः ।
मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३४

अर्थ : जेव्हा त्या राजकन्यांनी श्रीकृष्णाला अंतःपुरात प्रवेश करतांना पाहिले, तेव्हा त्या त्याच्यावर मोहित झाल्या आणि त्याचे इष्ट पती म्हणून मनोमन वरण केले.

भूयात्पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम् ।
इति सर्वाः पृथक्कृष्णे भावेन हृदयं दधुः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३५

अर्थ : सर्व राजकन्यांपैकी प्रत्येक राजकन्येने आपल्या मनात श्रीकृष्णच माझा पति होवो’, असा निश्चय केला आणि विधाताने माझी इच्छा पूर्ण करो’, अशी प्रार्थना करून आपले हृदय प्रेमभावाने श्रीकृष्णाला अर्पण केले.
त्यांचे हृद्गत जाणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांना वस्त्राभूषण देऊन पालखीतून द्वारकेला पाठवून दिले. (श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३६) आणि द्वारकेत एका शुभमुहूर्तावर श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला. याचाही निर्देश भागवतात आहे.

अथो मुहूर्त एकस्मिन्नानागारेषु ताः स्त्रियः ।
यथोपयेमे भगवान्तावद्रूपधरोऽव्ययः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ४२

अर्थ : भगवान श्रीकृष्णाने तितकीच रूपे धारण करून एकाच मुहूर्तावर विविध भवनांत असलेल्या त्या राजकन्यांचे शास्त्रोक्त पाणीग्रहण केले.

या वरील सर्व श्लोकांवरून स्पष्ट होते की, त्या राजकन्या होत्या, तसेच भौमासुराने त्यांचा कोणत्याही प्रकारे विनयभंग केलेला नव्हता. त्यामुळे समाजाच्या नेत्यांच्या समोर याविषयी कोणतीही समस्या नव्हती. तसेच त्या राजकन्यांनी मनोमन श्रीकृष्णाला आपला पती मानून वरलेले असल्यामुळे श्रीकृष्णाने तितकीच रूपे घेऊन प्रत्येकीशी शास्त्रोक्त पद्धतीने विवाह केला. असे असतांना `भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून त्याच्या नंतर त्याने अप्रवृत्त केलेल्या सहस्रो स्त्रियांना त्याच्या कारावासातून सोडवले. या सहस्रो स्त्रियांसमोर गंभीर समस्या होती. अशा आपत्काली श्रीकृष्ण स्वतः पुढे आला आणि औपचारिक रूपाने त्यांनी त्या सर्व स्त्रियांना आपली धर्मपत्नी म्हणून घोषित केले’, असे हिंदु धर्माचे कडवे पुरस्कर्ते असलेल्या थोर हिंदुत्ववादी नेत्यांनी म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, (घनगर्जित, एप्रिल २०११)