अयोग्य विचार
‘सालंकृत कन्यादान म्हणजे हुंडा ! कन्या ही का दान करण्याची वस्तू आहे ? कन्यादान हे रानटीपणाचे आहे. स्त्रीला विनिमयाची वस्तू बनवणार्या रानटी संस्कृतीची ही अवस्था आजही टिकून आहे.
खंडण
‘संत तुकाराम महाराज सांगतात, `सालंकृत कन्यादान, पृथ्वीदानासमान ।’ संत तुकाराम महाराज रानटी होते का ? प्रेमविवाह हा ‘गांधर्व विवाह’ आहे. गांधर्व विवाहात कन्यादान हा प्रकार नाही.
कन्यादान म्हणजे हुंडा नव्हे ! कन्यादान शुल्क नाही. शुल्क (म्हणजे हुंडा इत्यादी) मिळावे, अशी अपेक्षा नाही. ती बुद्धीच नाही. सालंकृत कन्यादान ! विवाहप्रसंगी तिला तिचे वडील, भाऊ, आप्त इत्यादी सुवर्णादी अलंकार देतात, ते सालंकृत कन्यादान ! शुल्क बुद्धीचा तिथे अभावानेही गंध नाही. `दान’ याचा अर्थ ‘समर्पण’ हे विसरू नका.’
अयोग्य विचार
‘अनुवंश, कुलाचार, परंपरा असा सगळा धर्म आहे. धर्म माणसाला हाता-पायाच्या साखळदंडासारखा आहे’, असे साम्यवादी मानतात. विवाहामुळे मुक्त जीवनाला (स्वैर जीवनाला) प्रतिबंध येत असल्यामुळे, म्हणजेच कामवासनेची तृप्ती होत नसल्यामुळे विवाह हा मार्क्स आणि आजच्या आधुनिकांनी त्याज्य ठरवला. ते Glass-Water Theory अनुसरतात, म्हणजे ‘तहान लागली की, पाणी प्यायचे. त्यासाठी भांडे जवळ बाळगण्याची काय आवश्यकता’, असे साम्यवाद्यांचे मत आहे. तसेच ‘मुलांचे पोषण आणि संगोपन शासन करील’, असे ते म्हणतात.
खंडण
‘संततीचे संगोपन आणि पोषण करण्याला (खाजगी) आई-वडिलांपेक्षा शासन अधिक सक्षम आहे’, असे हे साम्यवादी सांगतात. असा समाज किती वर्षे टिकेल ? साम्यवाद जन्माला आला, तेव्हापासून अवघ्या ६०-७० वर्षांत तो कोलमडला. रशिया छिन्नभिन्न झाला. आमची समाजरचना शास्त्राप्रमाणे आहे. आम्हा हिंदूंच्या विवाहाचे हेतू सुप्रजा निर्माण करणे, धर्म आणि संस्कृती यांचे चिरंजिवित्व राखणे, मानवाचे ऐहिक हित साधणे आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त करून घेणे, हे आहेत. आम्ही जातीधर्म, कुलधर्म आदींचे पालन करून अनुवंशाचे अबाधित्व राखतो. आमच्या विवाहामुळे निर्माण होणारा वंश हा जोवर भूलोकी नद्या, पर्वत, अरण्ये आहेत, तोवर राहिला पाहिजे.’
अयोग्य विचार
‘तो व्यभिचार नव्हे. ते कामसंतर्पण आहे’, असे साम्यवाद्यांचे मानणे आहे. कामतृप्तीसाठी विवाहबाह्य संबंधाला आजचा समाज मान्यता देतो.
खंडण
‘याचा अर्थ आधुनिक समाजाला व्यभिचार मान्य आहे ! ‘कामसंतर्पण’ हे सगळे थोतांड आहे. व्यभिचार हा नेहमी सुडाच्या स्वरूपाचा असतो. व्यभिचार करणार्या व्यक्ती प्रेमभावना इत्यादी सांगून आपल्या अनीतीचे नेहमी समर्थन करू पहातात. ज्यांच्यामध्ये अहंगड असतो, त्यांच्यामध्ये भावना अधिक प्रबळ असतात. भावनांमुळे कोणत्याही गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही.’