१. ॐकार:
१. `श्रीमद्भागवत सांगते, ``समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.
२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.
३. त्या ॐ कारापासून सर्व वार्क्ैंापंच अविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `अ, उ, म' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `ॐ' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)
२. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्त झाले !
क्रियांचे मूल्यमापन करण्याचा निकष धर्मवेदाज्ञेनुसार उत्पन्न झाला. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्त झाले. तसे नसते, तर प्रत्येक क्रियेला केवळ अस्तित्वच असते. शुभ-अशुभत्व, सुष्टत्व-दुष्टत्व नसते. याचाच अर्थ धर्माकरिता मानव आहे. धर्म मानवाचा नियंता (म़्दहूीदत्ती) आहे. मानव धर्माचा नियंता नाही. तो धर्माचे सूत्र आहे. `धर्माच्याकरिता आम्हास जगति रामाने धाडियले ।' याचा तोच अर्थ.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २००८)
३. हिंदु धर्माला तुच्छ लेखण्यासाठी वेदांतील शब्दांचा विकृत अर्थ करणारे ख्रिस्ती !
`वेदमहर्षी पंडीत सातवळेकरांनी अथर्ववेदाच्या प्रस्तावनेत विवाह सूक्तातील `देवकामा' या शब्दाचा थोडा इतिहास दिला आहे. `देवकामा' याचा अर्थ `देवांनी जिला वंदन करावे अशी पतिव्रता !' `देवृकामा' शब्दात व्यभिचार आहे. भारतीय परंपरेत देवृकामा असा पाठ कोठेही नाही. सेंट पिटर्सबर्ग या कॅथॉलिक प्रणालीच्या वैदिक शब्दकोशात जबरीने तसा पाठ दिला आहे आणि हिंदुस्थानात ज्यांनी ऋग्वेद प्रकाशित केला त्यांनी तो स्वीकारला आहे. हा कॅथॉलिक ख्रिस्ती परंपरेचा वैदिक शब्दकोश आमच्या सनातन हिंदूंच्या परंपरा तुच्छ करण्याची प्रतिज्ञा करूनच निर्माण झाला आहे. हे आमच्या ध्यानी येऊ नये, हे दुर्दैव !' - गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)
४. वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्यांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते ?
`वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्या या तामसी, हिंस्रक आणि निधर्मी संशोधकांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते, ते आम्ही विचारपूर्वक पाहिले पाहिजे. त्या पातळीवर या अतिरेक्यांची (होय ते अतिरेकीच आहेत.) गाठ घ्यावी लागेल.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २९.५.२००८)
५. वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक
`सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य किल्ल्याला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्न झाला ?
ग्रीस, रोम अशी राष्ट्रे आणि त्यांच्या संस्कृती जगातून केव्हाच नष्ट झाल्या. कालौघात सर्वच्या सर्व प्राचीन राष्ट्रे गुदमरून गतप्राण झाली आणि हिंदु राष्ट्र अजूनही सळसळते आहे. वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली. बौद्ध-जैनांचे हल्ले आम्ही निष्प्रभ केले.' (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)

No comments:
Post a Comment