आधुनिक हिंदुत्ववाद्यांचा जो हिंदु राष्ट्रवाद आहे , ज्याचा मोठ्या प्रमाणावर हिरिरीने प्रसार करतात त्याचा संबंध सनातन हिंदु धर्म व संस्कृतीशी आहे किंवा नाही ? आधुनिक हिंदुत्ववाद्यांच्या सनातन हिंदुधर्माशी सुतराम नाही . तो राष्ट्रवाद नाही . तो हिटलरी पद्धतीचा आहे . त्याला वेदाचे आणि ईश्वराचे अधिष्ठान नाही . आणि हेच या पुण्यभूमी भरतखंडाकरता फार फार खेदजनक आहे . महान दुर्भाग्य आहे .
सांख्य दर्शन सांगते , 'सत्व पुरूषान्यता ख्याति रूप ' विवेकाकरता सत्वगुणाचा उत्कर्ष अटळ आहे . त्या करता निष्काम स्वधर्मानुष्ठान अपरिहार्य आहे . धर्माचे ज्ञान वेदावरूनच होते , असेच 'सांख्य' देखिल सांगते . योगदर्शनानुसार चित्तवृत्ती निरोधरूप योग स्वधर्मानुष्ठानानेच होतो . स्वधर्माचे ज्ञान वेदावारूनच होते . कारण सांख्य व योग दोन्ही वेदांचेच प्रामाण्य स्वीकारतात.
जैमिनिचे 'मीमांसा दर्शन ' तर 'धर्ममीमांसा' म्हणूनच प्रसिध्द आहे . भटट्पाद श्री कुमारिल जैमिनि दर्शनाचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत . चोदनालक्षणोऽर्थो धर्म: / असे धर्माचे लक्षण ते करतात . याचा अर्थ प्रवर्तक ( विधी ) व निवर्तक (निषेध ) वेदवचनावरूनच धर्म व अधर्माचा बोध होतो .
नवनवोन्येष शालिनी प्रज्ञा म्हणजे 'प्रतिभा !' push button answer च्या प्रभावात असलेल्या Scientific-Temparament वाल्या आधुनिकांना प्राप्त होणे असंभव । रामायण , महाभारताच्या तोडीचे ग्रंथ आज निर्माण होणे असंभव . ज्ञानदेव , तुकाराम , रामदासादि संत वा चाणक्यांच्या राजनीतिवरचा ग्रंथ निर्माण होणे असंभव ! ही प्रगती आहे का अधोगती .

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
No comments:
Post a Comment