- पुराणात कसलाहि दोष नाही. ते पूर्णतः निर्दोष आहेत.
- पुराणात वेदाची प्रतिष्ठा आहे. पुराणातला कोणता
ही अंश वेदविरुद्ध नाही. वेद जसे परमात्म्याचे निःस्वास आहेत. तसेच पुराणे ही परमात्म्याचे निःश्वास आहेत. फक्त त्यात फरक इतकाच आहे की वेदांची आनुपूर्वी कधीच बदलत नाही. कल्पानुसार पुराणांची आनुपूर्ती बदलते. अर्थाचा आशय जसाच्या तसाच असतो.
योगार्थ
- वेद, उपनिषदे, महाभारतादि घटना प्रसंगाच्या संदर्भात आधुनिक यौगिक अर्थ प्रतिपादन करतात. तोच अर्थ ग्रहण करावा अस सांगतात. नवे नवे योगिक अर्थ बसवितात. हा प्रमाद आहे.
- योगापेक्षा रूढी, परंपरा अधिक बलवती असल्याचे शास्त्रे सांगतात. तो लौकिकार्थ वा रुढार्थ आहे. तो मुख्य. त्या रुढार्थाच्या पुष्टीकरता योगिक अर्थ अपेक्षित असतात. आधी रुढार्थ वा लौकिकार्थ, तो ग्रहण करण्याकरताच योगार्थ ! तस नसेल तर अनर्थ होतील 'गो' हा शब्द आहे. गाय शब्द उच्चारताच सास्नादि अशी गाय डोळ्यासमोर उभी राहाते. योगार्थ जर स्वीकारला तर लक्षणावृत्तींचा आश्रय घ्यावा लागतो. ते तर अत्यंत अनुचित आहे. योगिक अर्थ स्वीकारण्यात आणखी अनेक दोष आहेत. 'विश्वामित्र' वगैरे शब्दात यौगिक अर्थ असंभव आहेत.
- पुराणांचे लक्षण,.....
व्यासादि मुनिप्रणीतं वेदार्थप्रकाशकं पंच लक्षणान्वित शास्त्रम l
- पुराणांची पंच लक्षणे कोणती?
१) प्रवृत्ती,
२) स्थिती,
२) स्थिती,
३) संहार,
४) धर्म व
५) मोक्ष
४) धर्म व
५) मोक्ष
पुराणे
- पुराणांचा अभ्यास करूनही आधुनिकांना त्याचे मर्म कळत नाही. ते शंका कुशंकांनी व्याकूळ असतात. ते आस्थाशून्य असतात. स्वतःच्या दोषामुळेच त्यांचे पतन होते.
- आम्ही सनातनी अद्वैती आहोत. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ची वाटचाल करणाराच्या हातून
अधर्म घडतच नाही. घडूच शकत नाही. तो मत्सर ग्रस्त कसा होईल? - मनु सांगतात, - सर्वांचा शासक, अणूहूनही अणू, सुवर्णाभ- निर्विकार, बुद्धिगम्य तो परमपुरुष जाणणारा सर्वांना पं
चभूतात्मक शरीरांनी व्यापून जन्म, वृद्धि, क्षय द्वारा नेहमी चक्राप्रमाणे फिरवणारा, समाहित होऊन सदसत आत्म्यात सर्व काही पाहाणाराचे मन कधीच अधर्म करत नाही. करू शकत नाही. - अद्वैती महापुरुषात असुया, ईर्षा असे दोष असूच शकत नाहीत.
- सर्व भूतात आत्म्याला आणि आत्म्यात सर्वभूतांना समान पाहाणारा, त्या ब्रह्मा वरच इहलोक परलोकादि चिंता सोपवून निश्चिंत असतात त्यामुळे त्यांना दोष स्पर्शूच शकत नाहीत.
- पुराण श्रवण धर्मराज्याची स्थापना करण्याची पहिली पायरी आहे. धर्मो रक्षति रक्षितः l
- धर्मानुसार वागताना देखिल विपत्ती का येतात? या विपत्ती देवाकडून येतात, तेव्हा तिच्या सुटण्याचे उपाय प्राप्त होतात. उपासकाला ते समजतात. विपत्तीत उत्साह व गुणांची परीक्षा करायची असते. परमात्मा भक्तांना संकटात आणून नंतर विपत्तीतून त्याचा उद्धार करतो. धर्मो रक्षति रक्षितः l हाच धर्म !
धर्म एव हतो हन्ति l
- न आचरलेला धर्म त्याचा नाश करतो। असत्य, अशुचि, दुराचारी माणसावर आलेली संकटे, देवाकडून आलेले नाहीत. ते अनाचारामुळे आलेले असते. त्याची ईश्वर उपेक्षा करतो. त्याचे अधःपतन होते. उत्तरोतोत्तर तो खाली जातो. नष्ट होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)