- १९३६ साली दिनोवास्का ही पोलिश युवती भारतात होती. ती लिहीते, ''कोणत्याही हिंदुच्या चेहेर्यावर द्वेषाचे चिन्ह आम्हाला कधीच दिसले नाही वा क्रोधाची पुसटशी रेषाही आढळली नाही. पश्चिमेत ही गोष्ट केवळ अशक्य.
- आज पश्चिमी संस्कृतीच्या अंगीकरणाने इतिहासात कधी नव्हता इतका वैफल्यग्रस्त आणि दुःखी बनला आहे. नरकयातना देणार्या या विज्ञानयुगाच्या, Sophisticated संस्कृतीच्या संकल्पना, भारतीयावर बेगुमानपणे, जबरीने लादल्या गेल्या. विळख्यात अडकले आहे. सगळ्या संकल्पना वैदिकांची समग्र शास्त्रे मनु आदि स्मृतिकार यांच्यावरच मंडनात्मक स्वच्छ. स्पष्ट भाष्यच आहे.
- आणखी ती सांगते, 'उपजतच करुणा आणि हृदयाची परम ऋजुता त्यांच्यात खरीखुरी बंधुता बंधुभाव निर्मिते. बंधुता, समानता आणि स्वातंत्र्याची बिरुदावली मिरावणार्या जगातील अन्य राष्ट्रात त्याचा अल्पांशहि अभावानेही आढळत नाही. हिंदु रक्तातच अखिल मानवाविषयी प्रेम आहे. बंधुता आहे. समानता आहे. परकिय केवळ दंभाचारी आहेत.'
- प्रेडेरिक पिंकाट छातीठोकपणे निर्भय स्वच्छ वस्तुस्थिती सांगतो, ''समाजाला
आणि विश्वाला शांति आणि सुख देणारे जे काही आहे, त्या सर्वांचेच हिंदूंनी एक पद्धतशीर शास्त्रच बनविले आहे. समाजरचना, समाजव्यवस्था वा सामाजिक बाबीसंबंधी हिंदुना का ही सांगावे, शिकवावे असे आमच्या जवळ काहीच नाही.''
- तो पिंकाट पुढे इशारा देतो, ''आज आमच्या पश्चिमी देशात जो काही निर्लज्ज, स्वैराचारी गोंधळ आहे, तसा निलाजरा बेगुमान, आसुरी गोंधळ, या हिंदु समाजातही होईल, जर आम्ही (पश्चिमेने) आमच्या आसुरी ओबडधोबड सुकल्पना या निरागस, निष्पाप हिंदूच्या गळी उतरवल्या तर, पश्चिमी प्रणाली, संकल्पना सरळ हिंदुचे अपरिमित अहित करतील.
- पश्चिमी जीवनाची धारणी, धारणाच मुळी स्वार्थाची, लोभाची आहे. भोगसाधनाकरता तिथे गळेघोर स्पर्धा आहे. त्यामुळेच उपस्थ, जिव्हेच्या लालसा भडकवणारा (शमवणारा नव्हे) बेगुमान आसुरी गोंधळ आहे. प्रेडेरिक पिंकाट या प्रामाणिक तळमळीच्या शास्त्रज्ञाचा इशारा आम्हाला सावध करायला समर्थ नाही का? आमच्या निलाजरेपणाला तुलना नाही.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)
No comments:
Post a Comment