||Achar Prathamo Dharmah || We are here for revealing the faded knowledge of our very own ‘Eternal Dharma’ known in the name of ‘SANATAN DHARMA’ itself.That may be also called as Hinduism or Hindu philosophy. We – discuss, study and practice the SANATAN DHARMA as it is. || Shata - yojanam vistaram yagnya roop dharam dev prasida ||
आमची भूमिका !
Saturday, September 3, 2011
Sunday, August 21, 2011
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी !
श्रीकृष्ण हा पूर्णावतार असल्याची उदाहरणे !
१. ‘या श्रीकृष्णस्वरूपी परमात्म्याने तान्हेपणी पूतनेचे स्तनपान करून प्राण ओढले.
२. तिसर्या मासात पादघाताने शकटासूर नष्ट केला.
३. पुढे रांगत रांगत यमलार्जुन वृक्षांच्या मध्ये शिरून ते दोन्ही वृक्ष उन्मळून पाडले.
४. कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनाजल पिऊन गतप्राण झालेले गोपबालक, गाई-वासरे यांना आपल्या दृष्टीतून कृपेचा अमृतवर्षाव करून जिवंत केले.
५. विषमय झालेला यमुनेचा डोह त्यात स्वच्छंद जलविहार करून निर्विष केला.
६. यमुनातिरावर झोपलेल्या व्रजवासी गोपालांना वणव्यातून वाचवले.
७. माता यशोदा त्या कृष्णाला उखळाशी बांधण्यास जितके दोर घेऊन गेली, ते सर्व दोन बोटे थिटेच पडत गेले.
८. त्याने जांभईसाठी उघडलेल्या मुखकमलात चौदा लोक (स्वर्ग-पातालादी) दाखवून यशोदेला भयभीत केले.
९. नंद गोपाला अजगराच्या विळख्यातून आणि वरुणाच्या पाशातून मुक्त केले.
१०. व्यामासुराने गोपबालांना गिरिगुहेत बंद केले असता त्यातून त्यांची सुटका केली.
११. वयाच्या सातव्या वर्षी, घोर पर्जन्य वृष्टीतून व्रजवासी गोपसमाजाचे आणि त्यांच्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी सात दिवसपर्यंत गोवर्धन पर्वताला शिलीन्ध्रपुष्पाप्रमाणे त्या श्रीकृष्णाने लीलया उचलून धरले.
१२. याच बालवयात वृंदावनामध्ये चांदण्या रात्री गोपींसह रासलीला चालू असता कुबेरदूत शंकचूडाने गोपींचे अपहरण करण्याचे धार्ष्ट्य केले असता त्याचा शिरच्छेद केला.
१३. या व्यतिरीक्त प्रलम्बासुर, धेनुकासुर, बकासुर, केशी, अरिष्टासुर यासारख्या दैत्यांचा बालवयात संहार केला.
१४. मथुरेमध्ये जाऊन चाणूर, मुष्टिक, कवल्यापीड हत्ती आणि मामा कंस यांचा निःपात केला.
१५. पुढे तरुणपणी कालयवन, भौमासुर, मिथ्या वासुदेव, शाल्व, दिविदवानर, बल्वल, दन्तवस्त्र, नग्नजित राजाचे सात सांड, शंबरासुर, विदुरथ इत्यादी दुष्टांचा संहार करून त्यांना उत्तम गती दिली.
१६. गोकुळातले प्रिय गोप-गोपी हे साधनाहीन पामर जन असूनही त्यांच्या निर्व्याज पे्रमाने त्यांना अंती वैकुण्ठपदी उत्तमगती दिली.
१७. अर्जुनाला गीता सांगितली.
श्रीकृष्णाच्या या सर्व उल्लिखित आणि अनुल्लिखित अगम्य लीलांची संगती त्याला पूर्णावतार मानले, तरच लागू शकते.’
`श्रीकृष्ण धर्मनिरपेक्ष होता’, असे मानणारे अज्ञानी आणि हिंदु धर्माचे कडवे पुरस्कर्ते एक हिंदुत्ववादी थोर नेते !
विचार : `भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारले. त्यानंतर त्याने अप्रवृत्त केलेल्या सहस्रो स्त्रियांना त्याच्या कारावासातून सोडवले. या सहस्रो स्त्रियांसमोर गंभीर समस्या होती. अशा आपत्काली प्रसंगात श्रीकृष्ण स्वतः पुढे आला आणि औपचारिक रूपाने त्यांनी त्या सर्व स्त्रियांना आपली धर्मपत्नी म्हणून घोषित केले. नरकासुराच्या कारावासातल्या सहस्रशः स्त्रियांशी श्रीकृष्णाने विवाह केला आणि त्यांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून दिले. म्हणूनच त्याची अपूर्व प्रज्ञा आणि अनुपमेय अंतःकरणाचे गुण या कारणामुळे सगळा संसार त्यांना महान धर्मनिरपेक्ष मानतो.
खंडण : हे सगळे साफ खोटे अन् निराधार आहे. श्रीमद्भागवतात स्पष्ट वर्णन आहे की, नरकासुर अथवा भौमासुर याच्या मृत्यूनंतर भगवंताने सहनीतीमत भवनात प्रवेश केला आणि १६ सहस्र क्षत्रिय कन्यांना पाहिले, ज्यांना भौमासुराने जिंकून राजस्त्रियांचे नव्हे, तर राजकन्यांचे हरण केले आणि आपल्या कारावासात डांबले. त्या सगळ्या क्षत्रिय राजकन्या होत्या. त्यात कुणीही विवाहित स्त्री नव्हती. या सगळ्या राजकन्यांच्या अब्रूला कुठेही स्पर्श झाला नव्हता; म्हणूनच कृष्णाने त्या राजकन्यांशी धर्मशास्त्राप्रमाणे विवाह केला.
भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३३
अर्थ : ज्यांना भौमासुराने कोंडून ठेवले होते, त्या १६ सहस्र क्षत्रिय कन्यांना भगवंताने जेव्हा सहनीतीमत भवनात प्रवेश केला, तेव्हा पाहिले.
मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३४
अर्थ : जेव्हा त्या राजकन्यांनी श्रीकृष्णाला अंतःपुरात प्रवेश करतांना पाहिले, तेव्हा त्या त्याच्यावर मोहित झाल्या आणि त्याचे इष्ट पती म्हणून मनोमन वरण केले.
इति सर्वाः पृथक्कृष्णे भावेन हृदयं दधुः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३५
अर्थ : सर्व राजकन्यांपैकी प्रत्येक राजकन्येने ‘आपल्या मनात श्रीकृष्णच माझा पति होवो’, असा निश्चय केला आणि ‘विधाताने माझी इच्छा पूर्ण करो’, अशी प्रार्थना करून आपले हृदय प्रेमभावाने श्रीकृष्णाला अर्पण केले.
त्यांचे हृद्गत जाणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांना वस्त्राभूषण देऊन पालखीतून द्वारकेला पाठवून दिले. (श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ३६) आणि द्वारकेत एका शुभमुहूर्तावर श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला. याचाही निर्देश भागवतात आहे.
यथोपयेमे भगवान्तावद्रूपधरोऽव्ययः ।। - श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ५९, श्लोक ४२
अर्थ : भगवान श्रीकृष्णाने तितकीच रूपे धारण करून एकाच मुहूर्तावर विविध भवनांत असलेल्या त्या राजकन्यांचे शास्त्रोक्त पाणीग्रहण केले.
या वरील सर्व श्लोकांवरून स्पष्ट होते की, त्या राजकन्या होत्या, तसेच भौमासुराने त्यांचा कोणत्याही प्रकारे विनयभंग केलेला नव्हता. त्यामुळे समाजाच्या नेत्यांच्या समोर याविषयी कोणतीही समस्या नव्हती. तसेच त्या राजकन्यांनी मनोमन श्रीकृष्णाला आपला पती मानून वरलेले असल्यामुळे श्रीकृष्णाने तितकीच रूपे घेऊन प्रत्येकीशी शास्त्रोक्त पद्धतीने विवाह केला. असे असतांना `भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून त्याच्या नंतर त्याने अप्रवृत्त केलेल्या सहस्रो स्त्रियांना त्याच्या कारावासातून सोडवले. या सहस्रो स्त्रियांसमोर गंभीर समस्या होती. अशा आपत्काली श्रीकृष्ण स्वतः पुढे आला आणि औपचारिक रूपाने त्यांनी त्या सर्व स्त्रियांना आपली धर्मपत्नी म्हणून घोषित केले’, असे हिंदु धर्माचे कडवे पुरस्कर्ते असलेल्या थोर हिंदुत्ववादी नेत्यांनी म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, (घनगर्जित, एप्रिल २०११)
Sunday, July 31, 2011
सूर्यासारखा तळपणारा हिंदु, क्रांतीकाळातून उज्ज्वल भवितव्यतेकडे मार्गक्रमण करायला निघालेला हिंदु भारताला गौरवशाली करील !
- आजची पश्चिमी जीवनधारणा, विज्ञानवाद आणि औद्योगिक संस्कृती इत्यादी आत्मघातकी आहेत. ही जीवनप्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतियांची अस्मिता पायदळी तुडवून भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे, भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिकर्या उडवणारी आहे. समाजधुरीण आणि शासन यांनी पश्चिमी जीवनप्रणालीचा अंगिकार करून आमचे सत्त्व आणि अस्मिता यांचे नरडेच आवळले आहे. ही आत्मघातकी धारणा, अमानुषता, अमानवियतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतनधारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य (emotional integrity)अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखून सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे.
- पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट केला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे.
- जीवनाचा स्तर (Standard of living),, समाजवाद, आर्थिक विकास, कल्याणकारी शासन या सगळ्या बिनबुडाच्या उथळ (Superficial), अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या कल्पना जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत.
- अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे, ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणात, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की, शील, त्याग, तेजस्विता आणि आत्मनिर्भरता उफाळून येईल.
- रामायणाचे हे सामर्थ्य आहे। `हा भारत, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे. याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणिवा ते माझे दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण ही अतूट श्रद्धा, भावना रामायणाने सहस्रशः वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.
- हिंदुस्थान आमच्या पूर्वज ऋषींनी तपस्येतून निर्माण केलेला, ऋषीमुनींचा एक अखंड आणि अभेद्य देश आहे. ही कर्मभूमी, तपोभूमी, वीरभूमी आणि मोक्षभूमी आहे. जगातले अन्य सर्व देश क्रांती आणि युद्धे यांमुळे निर्माण झालेले आहेत.
- १ अब्ज हिंदूंचा हा देश आहे। ही समान वास्तू असून त्याच्या समान आकांक्षा आणि एकात्म प्रेम आहे। ही राष्ट्रीय एकात्मता सहज आहे। वेद-उपनिषदांतून र्विणलेली ही भारतभूमी जंबुद्विपाच्या केंद्रस्थानी आहे। धर्मस्थापना, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या जीवनरहाटीतून, शास्त्राध्ययनातून, अध्यापनातून, तसेच योगी, साधू आणि सज्जन यांच्या चिंतनातून जी प्रकटते, ती शक्ती आज पुन्हा आमच्यात प्रादुर्भूत होत आहे आणि तीच राष्ट्रीयता आहे। ऋषीमुनींचा हा आर्यावर्त आहे. त्याचा वर्तमानकाळ भूतकाळात खोलखोल रुतला आहे. त्याच्यासमोर परमोज्वल भविष्यकाळ आहे. आज हिंदू हिंदु भारतवर्षाच्या गौरवाची ललकारी द्यायला सिद्ध आहे. आमची सनातन धर्म संस्कृती, वेद-उपनिषदादी साहित्य, विश्व व्यापणारे तत्त्वज्ञान अशा सर्व क्षेत्रांत समस्त हिंदुजनांची अंतःकरणे खडबडून जागृत झाली आहेत. क्रांतीकाळातून उज्ज्वल भवितव्यतेकडे मार्गक्रमण करायला निघालेला हिंदु भारताला गौरवशाली करीलच. हिंदु आता जागला आहे. घटनांनी घंटा वाजवली आहे, डिडिंब बडवले आहेत. आता तो सूर्यासारखा तळपेल. जगातली कोणती शक्ती आता १ अब्ज हिंदूंसमोर उभी राहू शकेल ? अब हिंदु मार नही खायेगा !’
Saturday, July 16, 2011
चारही युगांतील धर्मस्थापना आणि आताच्या काळात ती करण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न
कलियुग संपून आज पाच सहस्त्र वर्षे संपून गेलीत; म्हणून आज आपल्याला जे धर्मस्थापनेचे कार्य करायचे आहे, त्याकरता विचार तर करावाच लागेल. तसेच तो लोकांमध्ये टिकवावा लागेल. आपला ‘सनातन धर्म’ लोकांना समजावून सांगावा लागेल. अखंड मारा करावा लागेल. नाटके, काव्य, कथा-कादंबर्या, चित्रपट, काही दूरचित्रवाहिन्या इत्यादी जी काही प्रसारमाध्यमे आहेत, त्यांचा उपयोग करावा लागेल. सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा, तसेच प्रसारमाध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन, धन वेचावे लागेल आणि सनातन हिंदु धर्माची जी यथार्थ बाजू आहे, यथार्थ धर्म आहे, तो लोकांना सांगावा लागेल. म्हणजे सतत ‘सनातन धर्म’ लोकांच्या कानावर जाईल, असे काही करावे लागेल. सहस्त्रो वृत्तपत्रे, नियतकालिके, चित्रपट आणि याव्यतिरिक्त व्याख्याने, प्रवचने अशा सगळ्या साधनांचा अवलंब करावा लागेल, तरच आपल्या धर्मस्थापनेचे कार्य होईल.’
‘या प्रचाराने काम कसे होते, ते बघा. एक उदाहरण सांगतो. ट रॉबर्टसन हा एक अमेरिकेतला माणूस आहे. याने तिथे दूरदर्शनवर एक मोठे व्याख्यान दिले. त्यात सांगितले, `‘सनातन हिंदु धर्म हा रानटी, जंगली आहे. बदमाष लोकांचा आहे. हे परलोक मानतात. ३३ कोटी देवांची पूजा करतात. पशू, पक्षी, साप यांची पूजा करतात इत्यादी. या लोकांना आपण इथे ठेवता कामा नये. आपल्या देशात हिंदू असतील, हिंदु धर्माचे आचरण करणारे असतील त्यांना बंदी घालावी.’ त्याने असे मोठे प्रभावी भाषण केले. गंमत अशी की `Hinduism Today’ म्हणून अमेरिकेत एक मोठे मासिक छापले जाते. हे मासिक आमचा ‘सनातन हिंदु धर्म’ यथार्थपणे दणदणीत सांगते. त्यांच्याद्वारे सनातन हिंदु धर्माची बाजू मांडली जाते. ते संमेलने भरवतात, प्रसार करतात. अमेरिकेत या मासिकाचा प्रचंड खप आहे. अमेरिकेत ते प्रभावी आहे. आम्हाला सांगायचे असे आहे की, या `Hinduism Today’ च्या प्रचारामुळे त्यांचा असा प्रभाव पडला की, या पॅट रॉबर्टसन साहेबाच्या भाषणाची लोकांनी उपेक्षा केली. समजा हे मासिक नसते, तर या अमेरिकेच्या जनतेने त्या रॉबर्टसनचे म्हणणे ग्राह्य धरले असते. मान्य केले असते. हिंदूंना निष्कारण बाहेर जावे लागले असते.’
Sunday, July 10, 2011
कौटिलीय अर्थशास्त्र!
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १’
अर्थ : ‘मानवाची जीविका’ हाच ‘अर्थ’ आहे.
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १
कौटिल्य अर्थशास्त्रात सांगतो, ``ज्यामुळे माणसाचे माणूसपण सतत र्विधष्णू असावे, अशी त्याची अर्थनीती आहे.’’ आर्य चाणक्याचा (कौटिल्याचा) `अर्थशास्त्र’ ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो. ‘प्राचीन भारतीय अर्थशास्त्रच अपूर्ण आहे. तिथे सैद्धांतिक अपूर्णता आहे. ते केवळ धार्मिक, जुनाट व टाकाऊ आहे’, असे हे दुष्ट सैतान आवर्जुन सांगतात. केवढे आश्चर्य ! कौटिल्याचे अर्थशास्त्र आजच्या अर्थयुगाचा मुकूट, संस्कृत साहित्याचा अद्भुत कोश आहे, ज्यात दैहिक आणि पारलौकिक दोन्ही दृष्टींचा समन्वय आहे. आजपर्यंत असा कोणता पाश्चिमात्य लेखक आहे, ज्याने इहलोक म्हणजे सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक बाबींचा आणि परलोक म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक आणि नैतिक बाबींचा समन्वय साधून विशाल दृष्टीकोन मांडला आहे ? केवळ आचार्य कौटिल्यच तो समन्वय साधतात. भारतीय आर्थिक चिंतकांच्या परंपरेतील, विश्वातील एकमेव कौटिल्य आहेत. त्यांनीच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या संदर्भात धर्माचे महत्त्व प्रतिपादिले आहे. कौटिल्यांचे चरणी आमचे सहस्त्र प्रणाम !
Saturday, July 2, 2011
महाकवी कालीदास दिनाच्या निमित्ताने ....!
त्यांनी एका महामूर्ख तरुणाला हाती धरले. त्याला विपुल, उत्तम अन्न आणि सुंदर वस्त्रे देण्याचे प्रलोभन दाखवले. राजकुमारीसमोर त्याला केवळ उभे रहायचे होते. राजकुमारी जे प्रश्न विचारील, त्याचे उत्तर न देता त्याने मौन रहायचे, अवाक रहायचे. त्या महामुर्खाला सुंदर वेशभूषा करून नटवण्यात आले. अलंकार घातले आणि अत्यंत बुद्धीमान, प्रतिभावान असा दार्शनिक म्हणून त्याला राजकुमारीसमोर उभे केले.
जेव्हा राजकुमारीने कूट प्रश्न विचारले, त्या वेळी तो मान हलवायचा आणि चमत्कारिक नजरेने राजकन्येकडे पहायचा. त्या चतुर लोकांनी ‘अत्यंत प्रतिभासंपन्न आणि शहाणपणाचा कळस’, अशी त्याची उत्तरे त्या मौनातून अभिव्यक्त होत असल्याचे सांगितले. त्याच्या दृष्टीक्षेपाचे निर्वचन असे केले की, त्या राजकुमारीचे समाधान झाले. राजकुमारीचे त्याच्याशी लग्न झाले आणि काही दिवसांतच तिच्या लक्षात आले की, तो महामूर्ख आहे. तिने त्या महामुर्खाची भयंकर निंदा केली आणि त्याला राजवाड्याबाहेर काढले. त्याला सांगितले की, जोवर तू पंडित होत नाहीस, तोवर इकडे फिरकू नकोस.
तो तरुण प्रामाणिक, निष्कपट आणि साधाभोळा होता. ‘त्या दुष्टांनी आपला उपयोग राजकुमारीला फसवण्याकरता केला’, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपला प्रमाद ओळखला. तो तडक देवीच्या देवळात गेला. रात्री देवळातच राहिला. काय घडले, कसे घडले, ते त्याला काहीच कळेना. पुजार्याने त्याला देवीची आराधना करायला सांगितले. नंतर त्याने त्या देवळात राहून महाकालीची उपासना केली. जसे पुजार्याने सांगितले, तसेच कडक व्रत केले. एका रात्री त्याला अकस्मात त्या मूर्तीतून महाकाली प्रगटलेली दिसली. ती दिव्य देवी त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या जिभेवर मातृका लिहिल्या आणि त्याला आशीर्वाद दिला, `तू महापंडित, महाकवी होशील.’ त्याचे नाव कालीदास ठेवले.
नंतर तो कालीदास राजवाड्यात आला. राजकुमारीने विचारले, `अस्ति कश्चित् वग्विशेषः। ...तू परत का आलास ? काही पांडित्य संपादिले का ?’ कालीदासाने चार महाकाव्यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रत्येक महाकाव्याचा प्रारंभ राजकुमारीने विचारलेल्या प्रश्नाच्या एकेका शब्दापासून होता आणि त्याने ती चार शब्दांनी प्रारंभ होणारी चार महाकाव्ये धडाधड म्हणून दाखवली.
१. कुमारसंभव महाकाव्याची प्रारंभीची ओळ अशी,...
`अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य
स्थित: पृथिव्या इव मानदण्ड: ।।’
अर्थ : उत्तर दिशेला देवतांचा निवास असलेला ‘हिमालय’ नावाचा पर्वतांचा स्वामी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या समुद्रमध्ये पृथ्वीचा मानदंड म्हणून उभा आहे.
२. मेघदूत या महाकाव्याचा प्रारंभ असा,
कश्चित् कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ।
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु ।
स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।
अर्थ : स्वकर्तव्यापासून ढळलेला, प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ झालेला, कुबेराच्या शापामुळे महती अल्प झालेला एक यक्ष सीतेच्या डुंबण्याने जेथील नदी पवित्र झाली आहे आणि जिथे घनदाट सावली आहे, अशा रामगिरीनामक पर्वतावर राहू लागला.
३. रघुवंशाचा प्रारंभ असा,...
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।।
अर्थ : शब्द आणि अर्थ यांप्रमाणे एकरूप असलेल्या जगत्पालक शिवपार्वतींना शब्द अन् अर्थ यांचे आकलन होण्यासाठी मी वंदन करतो.
४. ऋतुसंहार महाकाव्याच्या प्रारंभी ग्रीष्माचे वर्णन याप्रमाणे आहे.
`विशेषसूर्यः स्पृहणीयचंद्रमाः ।’
अर्थ : उग्र असा सूर्य आणि मनोरम्य चंद्र असणारा ग्रीष्म ऋतू (आला आहे)’