- आजची पश्चिमी जीवनधारणा, विज्ञानवाद आणि औद्योगिक संस्कृती इत्यादी आत्मघातकी आहेत. ही जीवनप्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतियांची अस्मिता पायदळी तुडवून भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे, भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिकर्या उडवणारी आहे. समाजधुरीण आणि शासन यांनी पश्चिमी जीवनप्रणालीचा अंगिकार करून आमचे सत्त्व आणि अस्मिता यांचे नरडेच आवळले आहे. ही आत्मघातकी धारणा, अमानुषता, अमानवियतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतनधारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य (emotional integrity)अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखून सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे.
- पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट केला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे.
- जीवनाचा स्तर (Standard of living),, समाजवाद, आर्थिक विकास, कल्याणकारी शासन या सगळ्या बिनबुडाच्या उथळ (Superficial), अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या कल्पना जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत.
- अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे, ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणात, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की, शील, त्याग, तेजस्विता आणि आत्मनिर्भरता उफाळून येईल.
- रामायणाचे हे सामर्थ्य आहे। `हा भारत, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे. याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणिवा ते माझे दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण ही अतूट श्रद्धा, भावना रामायणाने सहस्रशः वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.
- हिंदुस्थान आमच्या पूर्वज ऋषींनी तपस्येतून निर्माण केलेला, ऋषीमुनींचा एक अखंड आणि अभेद्य देश आहे. ही कर्मभूमी, तपोभूमी, वीरभूमी आणि मोक्षभूमी आहे. जगातले अन्य सर्व देश क्रांती आणि युद्धे यांमुळे निर्माण झालेले आहेत.
- १ अब्ज हिंदूंचा हा देश आहे। ही समान वास्तू असून त्याच्या समान आकांक्षा आणि एकात्म प्रेम आहे। ही राष्ट्रीय एकात्मता सहज आहे। वेद-उपनिषदांतून र्विणलेली ही भारतभूमी जंबुद्विपाच्या केंद्रस्थानी आहे। धर्मस्थापना, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या जीवनरहाटीतून, शास्त्राध्ययनातून, अध्यापनातून, तसेच योगी, साधू आणि सज्जन यांच्या चिंतनातून जी प्रकटते, ती शक्ती आज पुन्हा आमच्यात प्रादुर्भूत होत आहे आणि तीच राष्ट्रीयता आहे। ऋषीमुनींचा हा आर्यावर्त आहे. त्याचा वर्तमानकाळ भूतकाळात खोलखोल रुतला आहे. त्याच्यासमोर परमोज्वल भविष्यकाळ आहे. आज हिंदू हिंदु भारतवर्षाच्या गौरवाची ललकारी द्यायला सिद्ध आहे. आमची सनातन धर्म संस्कृती, वेद-उपनिषदादी साहित्य, विश्व व्यापणारे तत्त्वज्ञान अशा सर्व क्षेत्रांत समस्त हिंदुजनांची अंतःकरणे खडबडून जागृत झाली आहेत. क्रांतीकाळातून उज्ज्वल भवितव्यतेकडे मार्गक्रमण करायला निघालेला हिंदु भारताला गौरवशाली करीलच. हिंदु आता जागला आहे. घटनांनी घंटा वाजवली आहे, डिडिंब बडवले आहेत. आता तो सूर्यासारखा तळपेल. जगातली कोणती शक्ती आता १ अब्ज हिंदूंसमोर उभी राहू शकेल ? अब हिंदु मार नही खायेगा !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २६.८.२०१०)
No comments:
Post a Comment