आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, June 4, 2011

सनातन हिंदु धर्मियांचा आचार (विधीनिषेध) निसर्गाला समृद्ध करणारा !


  • निसर्गातील प्रत्येक उपलब्धतेविषयी हिंदु धर्म मानवाला कृतज्ञ रहायला शिकवतो। ‘सनातन हिंदु धर्म सांगतो, `आम्ही निसर्गाचे एक अविभाज्य घटक आहोत। निसर्गाशी सहकार्य करूनच आम्हाला आमचा उत्कर्ष साधता येईल. निसर्गावर आक्रमण करण्याचा विचार व्यर्थ आहे.’ यालाच आम्ही `धर्म’ म्हणतो. त्यासाठीच विधीनिषेध आहेत. सनातन हिंदु र्धिमयांचा आचार (विधीनिषेध) निसर्गाला समृद्ध करणारा असतो.’
  • पाणी कधीच केव्हाही प्रदूषित होऊ देऊ नका’, असे धर्मशास्त्र सांगते. पाणी हे नारायणाचे आहे. म्हणूनच नद्यांचे पावित्र्य भारतियांच्या नसानसांतून वहाते आहे. नद्यांत स्नान करतांना साबण लावून आंघोळ करणे वर्ज्य आहे. नदीमध्ये गुळणी टाकणेही वर्ज्य आहे. इतकी दक्षता घेतली जाते. ते पाणीच जर प्रदूषित झाले तर... ? पाणी प्रदूषित करणार्‍याला गोहत्येचे पातक लागणे : स्मृतिकार सांगतात, ‘पाणी प्रदूषित झाले, तर जीवनच संपुष्टात येईल. पाणी प्रदूषित करणारा महापापी होत. जो पाण्यात विष्ठामूत्र सोडतो, सांडपाणी टाकतो आणि गावची गटारगंगा सोडतो, तो अनेक पातकांनी लिप्त होतो. त्याला गोहत्येचे पातक ग्रासते.’
  • पृथ्वीतत्त्व, अग्नीतत्त्व आणि वायूतत्त्व प्रदूषण दूर करतात. विष्ठामूत्रादी जी घाण आहे, ती भूमी आत्मसात करते. उरलेले प्रदूषण अग्नी आणि वायू नष्ट करतात. मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला कसे काय जगता येईल ? निसर्गावर प्रेम करा. त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहयोग करा, अन्यथा पृथ्वीवर माणूसच उरणार नाही. सनातन धर्माची प्रतिष्ठापना करा. धर्मजीवनाला अनुकूल असे वातावरण, कायदे व व्यवस्था करा. मग निसर्ग आणि भारतखंड कसा मोहोरतो, ते बघा !’ अजूनही आमच्या पवित्र देशात गोवंश हत्याबंदी होत नाही. आम्ही निधर्मी भूकंपामागून भूकंप आणि दुष्काळामागून दुष्काळ यांना आमंत्रण देत नाही का ? प्रजेला धर्माचरण करायला भाग पाडा. शासनाचे ते कर्तव्य आहे. भूकंप, रोगराई, दुष्काळ इत्यादी आपत्ती पहाता पहाता काढता पाय घेतील.
  • ‘जशास तसे’ हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. नास्तिक, धर्माचरण न करणार्‍या मानवी पशूची क्रूरताच निसर्गाला सूड घ्यायला भाग पडते. ‘झाडांचे गोपनीय जीवन’ हा पीटर टॉपकिन्स आणि खिस्तोफर वर्ड या शास्त्रज्ञांचा ग्रंथ त्या नियमांचे अत्युत्तम विश्लेषण करून ते सिद्ध करतो. क्रौर्य, आसुरी वृत्ती, कत्तलखाने, हत्याकांड आणि युद्धे यांचा भूकंपाशी अती निकटचा संबंध आहे. हे क्रौर्य, हे कत्तलखाने बंद करा, म्हणजे भूकंप व्हायचे नाहीत.’ आईनस्टाईनची `पिडा तरंग’ थिअरी तसाच निष्कर्ष सांगते. `इटिमॉलॉजी ऑफ अर्थक्वेक्स’ हा ग्रंथही तेच निष्कर्ष देतो. पवित्र भारतभूमीला सहस्त्रशः वर्षांपासून भूकंप ठाऊक नाहीत. क्वचित अपवाद असेल; परंतु या दहा वर्षांत चार प्रलयकारी भूकंप, चार चक्रीवादळे आणि सहा महापूर भारतभूमीने पहिले. दिल्ली विद्यापिठाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक मदनमोहन बज आणि विजयराज सिंह यांनी रशियन कत्तलखान्यात जाऊन तेथील जिवांच्या पिंडांच्या वेदनांचा अभ्यास केला. ते त्यांच्या प्रबंधात सांगतात, कत्तलखान्यातील प्रत्याघातांनी वेदनांच्या तुटक लहरी तेथील दगडांमध्ये उत्पन्न केल्या.
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)

No comments:

Post a Comment