आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, July 31, 2011

सूर्यासारखा तळपणारा हिंदु, क्रांतीकाळातून उज्ज्वल भवितव्यतेकडे मार्गक्रमण करायला निघालेला हिंदु भारताला गौरवशाली करील !



  • आजची पश्चिमी जीवनधारणा, विज्ञानवाद आणि औद्योगिक संस्कृती इत्यादी आत्मघातकी आहेत. ही जीवनप्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतियांची अस्मिता पायदळी तुडवून भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे, भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिकर्या उडवणारी आहे. समाजधुरीण आणि शासन यांनी पश्चिमी जीवनप्रणालीचा अंगिकार करून आमचे सत्त्व आणि अस्मिता यांचे नरडेच आवळले आहे. ही आत्मघातकी धारणा, अमानुषता, अमानवियतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतनधारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य (emotional integrity)अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखून सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे.
  • पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट केला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे.
  • जीवनाचा स्तर (Standard of living),, समाजवाद, आर्थिक विकास, कल्याणकारी शासन या सगळ्या बिनबुडाच्या उथळ (Superficial), अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या कल्पना जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत.
  • अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे, ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणात, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की, शील, त्याग, तेजस्विता आणि आत्मनिर्भरता उफाळून येईल.
  • रामायणाचे हे सामर्थ्य आहे। `हा भारत, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे. याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणिवा ते माझे दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण ही अतूट श्रद्धा, भावना रामायणाने सहस्रशः वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.
  • हिंदुस्थान आमच्या पूर्वज ऋषींनी तपस्येतून निर्माण केलेला, ऋषीमुनींचा एक अखंड आणि अभेद्य देश आहे. ही कर्मभूमी, तपोभूमी, वीरभूमी आणि मोक्षभूमी आहे. जगातले अन्य सर्व देश क्रांती आणि युद्धे यांमुळे निर्माण झालेले आहेत.
  • १ अब्ज हिंदूंचा हा देश आहे। ही समान वास्तू असून त्याच्या समान आकांक्षा आणि एकात्म प्रेम आहे। ही राष्ट्रीय एकात्मता सहज आहे। वेद-उपनिषदांतून र्विणलेली ही भारतभूमी जंबुद्विपाच्या केंद्रस्थानी आहे। धर्मस्थापना, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या जीवनरहाटीतून, शास्त्राध्ययनातून, अध्यापनातून, तसेच योगी, साधू आणि सज्जन यांच्या चिंतनातून जी प्रकटते, ती शक्ती आज पुन्हा आमच्यात प्रादुर्भूत होत आहे आणि तीच राष्ट्रीयता आहे। ऋषीमुनींचा हा आर्यावर्त आहे. त्याचा वर्तमानकाळ भूतकाळात खोलखोल रुतला आहे. त्याच्यासमोर परमोज्वल भविष्यकाळ आहे. आज हिंदू हिंदु भारतवर्षाच्या गौरवाची ललकारी द्यायला सिद्ध आहे. आमची सनातन धर्म संस्कृती, वेद-उपनिषदादी साहित्य, विश्व व्यापणारे तत्त्वज्ञान अशा सर्व क्षेत्रांत समस्त हिंदुजनांची अंतःकरणे खडबडून जागृत झाली आहेत. क्रांतीकाळातून उज्ज्वल भवितव्यतेकडे मार्गक्रमण करायला निघालेला हिंदु भारताला गौरवशाली करीलच. हिंदु आता जागला आहे. घटनांनी घंटा वाजवली आहे, डिडिंब बडवले आहेत. आता तो सूर्यासारखा तळपेल. जगातली कोणती शक्ती आता १ अब्ज हिंदूंसमोर उभी राहू शकेल ? अब हिंदु मार नही खायेगा !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २६.८.२०१०)

Saturday, July 16, 2011

चारही युगांतील धर्मस्थापना आणि आताच्या काळात ती करण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न


कृतयुग
कृतयुगामध्ये दक्षिणामूर्तींनी धर्मस्थापना केली. ती कशी केली ? गुरोस्तु मौनं व्याख्यानम्, शिष्यास्तु छिन्नसंशयः ।। गुरूंचे मौनच व्याख्यान होते. त्यांच्या मौनानेच शिष्यांच्या शंकांचे निवारण होत असे आणि ते धर्माप्रमाणे वागायचे.

त्रेतायुग
पुढे त्रेतायुगात धर्मस्थापनेकरता भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला. इथे दत्तात्रेयांना उपदेश करावा लागला. मौनाने काम भागेना; म्हणून दत्तात्रेयांनी उपदेश केला. त्या उपदेशाचा प्रभाव असा की, ती धर्मस्थापना झाली.
द्वापरयुग
पुढे द्वापरयुग आले. या युगामध्ये व्यासांनी धर्मस्थापनेकरता अवतार घेतला. आता या युगात व्यासांना ग्रंथरचना करावी लागली आणि उपदेशही करावा लागला. व्यासांनी ग्रंथरचना केली, वेदांची कांडे केली, महाभारत लिहिले, पुराणे लिहिली. त्यांनी ग्रंथरचना करून धर्मस्थापना केली.
कलियुग
पुढे कलियुग आले. मग शंकराचार्यांचा अवतार झाला. शंकराचार्यांना धर्मस्थापनेकरता ग्रंथ लिहावेच लागले. त्यांचे प्रस्थानत्रयी आहे, देवतांची स्तुती इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत; पण एवढ्याने भागले नाही. त्यांना समाजात जाऊन प्रचार आणि प्रसार करावा लागला. तीन वेळा पायी भारतभ्रमण करावे लागले. सगळ्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागल्या. साम, दाम, दंड, भेद, उपेक्षा इत्यादी सगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागला. या सगळ्या महान खटाटोपीनंतर निरनिराळी पिठे स्थापन करावी लागली. नंतरच धर्मस्थापना झाली.

कलियुग संपून आज पाच सहस्त्र वर्षे संपून गेलीत; म्हणून आज आपल्याला जे धर्मस्थापनेचे कार्य करायचे आहे, त्याकरता विचार तर करावाच लागेल. तसेच तो लोकांमध्ये टिकवावा लागेल. आपला ‘सनातन धर्म’ लोकांना समजावून सांगावा लागेल. अखंड मारा करावा लागेल. नाटके, काव्य, कथा-कादंबर्‍या, चित्रपट, काही दूरचित्रवाहिन्या इत्यादी जी काही प्रसारमाध्यमे आहेत, त्यांचा उपयोग करावा लागेल. सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा, तसेच प्रसारमाध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन, धन वेचावे लागेल आणि सनातन हिंदु धर्माची जी यथार्थ बाजू आहे, यथार्थ धर्म आहे, तो लोकांना सांगावा लागेल. म्हणजे सतत ‘सनातन धर्म’ लोकांच्या कानावर जाईल, असे काही करावे लागेल. सहस्त्रो वृत्तपत्रे, नियतकालिके, चित्रपट आणि याव्यतिरिक्त व्याख्याने, प्रवचने अशा सगळ्या साधनांचा अवलंब करावा लागेल, तरच आपल्या धर्मस्थापनेचे कार्य होईल.’

‘या प्रचाराने काम कसे होते, ते बघा. एक उदाहरण सांगतो. ट रॉबर्टसन हा एक अमेरिकेतला माणूस आहे. याने तिथे दूरदर्शनवर एक मोठे व्याख्यान दिले. त्यात सांगितले, `‘सनातन हिंदु धर्म हा रानटी, जंगली आहे. बदमाष लोकांचा आहे. हे परलोक मानतात. ३३ कोटी देवांची पूजा करतात. पशू, पक्षी, साप यांची पूजा करतात इत्यादी. या लोकांना आपण इथे ठेवता कामा नये. आपल्या देशात हिंदू असतील, हिंदु धर्माचे आचरण करणारे असतील त्यांना बंदी घालावी.’ त्याने असे मोठे प्रभावी भाषण केले. गंमत अशी की `Hinduism Today’ म्हणून अमेरिकेत एक मोठे मासिक छापले जाते. हे मासिक आमचा ‘सनातन हिंदु धर्म’ यथार्थपणे दणदणीत सांगते. त्यांच्याद्वारे सनातन हिंदु धर्माची बाजू मांडली जाते. ते संमेलने भरवतात, प्रसार करतात. अमेरिकेत या मासिकाचा प्रचंड खप आहे. अमेरिकेत ते प्रभावी आहे. आम्हाला सांगायचे असे आहे की, या `Hinduism Today’ च्या प्रचारामुळे त्यांचा असा प्रभाव पडला की, या पॅट रॉबर्टसन साहेबाच्या भाषणाची लोकांनी उपेक्षा केली. समजा हे मासिक नसते, तर या अमेरिकेच्या जनतेने त्या रॉबर्टसनचे म्हणणे ग्राह्य धरले असते. मान्य केले असते. हिंदूंना निष्कारण बाहेर जावे लागले असते.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, २८.४.२०११)

Sunday, July 10, 2011

कौटिलीय अर्थशास्त्र!


अर्थ’ म्हणजे काय ? ‘मनुष्याणां वृत्तिरर्थः ।’
- कौटिलीय अर्थशास्त्र,
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १’
अर्थ : ‘मानवाची जीविका’ हाच ‘अर्थ’ आहे.

‘मनुष्यवती भूमिरित्यर्थः ।’
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १
अर्थ : ‘जिथे मानव रहातो, ती भूमी ‘अर्थ’ आहे’

म्हणजे जीविका आणि भूमी हे दोन अर्थ झाले. अर्थ आणि भूमी दोनच मानवाला उपयोगी आहेत आणि त्याचाच उपभोग त्याला घेता येतो. वास्तविक उपजिविका आणि जगाचा व्यवहार अर्थाविना चालू शकतो का ? वास्तविक अर्थप्राप्तीकरता भारताचे ‘भूमी’ हेच प्रमुख साधन आहे. ‘भूमी’ म्हणजे ‘शेती’ अथवा ‘कृषी.’ श्रम करून धान्य पिकवण्याकरता भूमीचा उपयोग करायचा, हीच जीविका. शेती हीच जीविका. ‘भूमी म्हणजे कृषी’ हाच अर्थ झाला. मानवाची वसाहत असेल, तरच ती भूमी ‘अर्थ’ होऊन मनुष्यवती होईल. मानव श्रम करेल, तरच ती भोगवती होईल. प्राचीन, अर्वाचिन अर्थशास्त्री तेच सांगतात, म्हणजे भूमीला प्राधान्य देतात. ती भूमी कशी संपादन करायची ? तिचे पालन-पोषण कसे करायचे ? हे उपाय, ही साधने सांगणारे, जे शास्त्र तेच अर्थशास्त्र. चाणक्य (कौटिल्य) त्याला ‘अर्थशास्त्र’ म्हणतो.

कौटिल्य अर्थशास्त्रात सांगतो, ``ज्यामुळे माणसाचे माणूसपण सतत र्विधष्णू असावे, अशी त्याची अर्थनीती आहे.’’ आर्य चाणक्याचा (कौटिल्याचा) `अर्थशास्त्र’ ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो. ‘प्राचीन भारतीय अर्थशास्त्रच अपूर्ण आहे. तिथे सैद्धांतिक अपूर्णता आहे. ते केवळ धार्मिक, जुनाट व टाकाऊ आहे’, असे हे दुष्ट सैतान आवर्जुन सांगतात. केवढे आश्चर्य ! कौटिल्याचे अर्थशास्त्र आजच्या अर्थयुगाचा मुकूट, संस्कृत साहित्याचा अद्भुत कोश आहे, ज्यात दैहिक आणि पारलौकिक दोन्ही दृष्टींचा समन्वय आहे. आजपर्यंत असा कोणता पाश्चिमात्य लेखक आहे, ज्याने इहलोक म्हणजे सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक बाबींचा आणि परलोक म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक आणि नैतिक बाबींचा समन्वय साधून विशाल दृष्टीकोन मांडला आहे ? केवळ आचार्य कौटिल्यच तो समन्वय साधतात. भारतीय आर्थिक चिंतकांच्या परंपरेतील, विश्वातील एकमेव कौटिल्य आहेत. त्यांनीच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या संदर्भात धर्माचे महत्त्व प्रतिपादिले आहे. कौटिल्यांचे चरणी आमचे सहस्त्र प्रणाम !
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, July 2, 2011

महाकवी कालीदास दिनाच्या निमित्ताने ....!


‘उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य याच्या दरबारातल्या नवरत्नातील एक रत्न म्हणजे कालीदास. कालीदास ब्राह्मण कुटुंबात जन्मला. तो शिवाचा उपासक होता. प्रारंभीस कालीदास अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख होता. त्यामुळे कुणीही त्याची मस्करी करायचे; परंतु त्याच्या जीवनाचा कायापालट काशीच्या राजकन्येमुळे झाला. ती विलक्षण बुद्धीमान आणि प्रतिभावान अशी पंडिता होती. वाङ्मय, कला आदी विद्यांत ती अग्रणी होती. तिच्याशी विवाह करायला आलेल्या अनेक तरुणांना तिने बुद्धीच्या तेजाने पराभूत केले. त्या सगळ्या असंतुष्टांनी त्या राजकन्येचा सूड घ्यायचे ठरवले.

त्यांनी एका महामूर्ख तरुणाला हाती धरले. त्याला विपुल, उत्तम अन्न आणि सुंदर वस्त्रे देण्याचे प्रलोभन दाखवले. राजकुमारीसमोर त्याला केवळ उभे रहायचे होते. राजकुमारी जे प्रश्न विचारील, त्याचे उत्तर न देता त्याने मौन रहायचे, अवाक रहायचे. त्या महामुर्खाला सुंदर वेशभूषा करून नटवण्यात आले. अलंकार घातले आणि अत्यंत बुद्धीमान, प्रतिभावान असा दार्शनिक म्हणून त्याला राजकुमारीसमोर उभे केले.

जेव्हा राजकुमारीने कूट प्रश्न विचारले, त्या वेळी तो मान हलवायचा आणि चमत्कारिक नजरेने राजकन्येकडे पहायचा. त्या चतुर लोकांनी ‘अत्यंत प्रतिभासंपन्न आणि शहाणपणाचा कळस’, अशी त्याची उत्तरे त्या मौनातून अभिव्यक्त होत असल्याचे सांगितले. त्याच्या दृष्टीक्षेपाचे निर्वचन असे केले की, त्या राजकुमारीचे समाधान झाले. राजकुमारीचे त्याच्याशी लग्न झाले आणि काही दिवसांतच तिच्या लक्षात आले की, तो महामूर्ख आहे. तिने त्या महामुर्खाची भयंकर निंदा केली आणि त्याला राजवाड्याबाहेर काढले. त्याला सांगितले की, जोवर तू पंडित होत नाहीस, तोवर इकडे फिरकू नकोस.

तो तरुण प्रामाणिक, निष्कपट आणि साधाभोळा होता. ‘त्या दुष्टांनी आपला उपयोग राजकुमारीला फसवण्याकरता केला’, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपला प्रमाद ओळखला. तो तडक देवीच्या देवळात गेला. रात्री देवळातच राहिला. काय घडले, कसे घडले, ते त्याला काहीच कळेना. पुजार्‍याने त्याला देवीची आराधना करायला सांगितले. नंतर त्याने त्या देवळात राहून महाकालीची उपासना केली. जसे पुजार्‍याने सांगितले, तसेच कडक व्रत केले. एका रात्री त्याला अकस्मात त्या मूर्तीतून महाकाली प्रगटलेली दिसली. ती दिव्य देवी त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या जिभेवर मातृका लिहिल्या आणि त्याला आशीर्वाद दिला, `तू महापंडित, महाकवी होशील.’ त्याचे नाव कालीदास ठेवले.

नंतर तो कालीदास राजवाड्यात आला. राजकुमारीने विचारले, `अस्ति कश्चित् वग्विशेषः। ...तू परत का आलास ? काही पांडित्य संपादिले का ?’ कालीदासाने चार महाकाव्यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रत्येक महाकाव्याचा प्रारंभ राजकुमारीने विचारलेल्या प्रश्नाच्या एकेका शब्दापासून होता आणि त्याने ती चार शब्दांनी प्रारंभ होणारी चार महाकाव्ये धडाधड म्हणून दाखवली.

१. कुमारसंभव महाकाव्याची प्रारंभीची ओळ अशी,...

`अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य
स्थित: पृथिव्या इव मानदण्ड: ।।’

अर्थ : उत्तर दिशेला देवतांचा निवास असलेला ‘हिमालय’ नावाचा पर्वतांचा स्वामी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या समुद्रमध्ये पृथ्वीचा मानदंड म्हणून उभा आहे.

२. मेघदूत या महाकाव्याचा प्रारंभ असा,

कश्चित् कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ।
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु ।
स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।

अर्थ : स्वकर्तव्यापासून ढळलेला, प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ झालेला, कुबेराच्या शापामुळे महती अल्प झालेला एक यक्ष सीतेच्या डुंबण्याने जेथील नदी पवित्र झाली आहे आणि जिथे घनदाट सावली आहे, अशा रामगिरीनामक पर्वतावर राहू लागला.

३. रघुवंशाचा प्रारंभ असा,...

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।।

अर्थ : शब्द आणि अर्थ यांप्रमाणे एकरूप असलेल्या जगत्पालक शिवपार्वतींना शब्द अन् अर्थ यांचे आकलन होण्यासाठी मी वंदन करतो.

४. ऋतुसंहार महाकाव्याच्या प्रारंभी ग्रीष्माचे वर्णन याप्रमाणे आहे.
`विशेषसूर्यः स्पृहणीयचंद्रमाः ।’

अर्थ : उग्र असा सूर्य आणि मनोरम्य चंद्र असणारा ग्रीष्म ऋतू (आला आहे)’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००५)