आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Wednesday, February 13, 2013

धर्मग्रंथांची व्युत्पत्ती, तसेच निर्मिती काळाविषयी केलेला अपप्रचार आणि त्यावरील खंडण भाग - १


म्हणे, धर्मग्रंथ हे कलियुगात लिहिले गेले !

अयोग्य विचार
१. काही धर्मग्रंथांच्या रचनाकाळाच्या संदर्भातील एक मत
अ. वैदिक संहिता, ब्राह्मणग्रंथ अन् काही उपनिषदे (खि.पू. ४००० ते खि.पू. १०००)

आ. काही उपनिषदे, निरुक्त (खि.पू. ८०० ते खि.पू. ५००)

इ. प्रमुख श्रौतसूत्रे आणि काही गृह्यसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ४००)

ई. धर्मसूत्रे, गृह्यसूत्रे, पाणिनीची व्याकरणसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ३००)

उ. जैमिनीचे पूर्वमीमांसासूत्र (खि.पू. ५०० ते खि.पू. २००)

ऊ. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य (खि.पू. ३०० ते खि.पू. १००)

ए. मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति (खि.पू. २०० ते इ.स. ३००)

ऐ. नारदस्मृति, काही पुराणे (इ.स. १०० ते इ.स. ४००)

ओ. इतर स्मृती आणि काही पुराणे (इ.स. ६०० ते इ.स. ९००)

२. स्मृतींच्या रचनाकाळाच्या संदर्भातील दुसरे मत
अ. गौतम, आपस्तंब, बौधायन धर्मसूत्रे आणि मनुस्मृति (सनपूर्व ६०० ते इ.स. १००)

आ. याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादींच्या स्मृती (इ.स. १०० ते इ.स. २००)

इ. इतर स्मृती (इ.स. २०० ते इ.स. ८००)

ई. स्मृतीवरच्या टीका आणि निबंध या स्वरूपाची ग्रंथरचना (इ.स. ८०० ते इ.स. १८००)

टीप - कंसातील वर्षे ही संबंधित ग्रंथांच्या रचनेचा कालखंड दर्शवतात.

         ऐतिहासिक दृष्टीने सर्व स्मृतिकार हे कलियुगातीलच आहेत; पण निबंधकारांनी त्या सर्वांना कलियुगाच्या पूर्वीचे ठरवले आहे.

खंडण
१. वेदोऽखिलो धर्ममूलम् । - मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८

अर्थ : वेदातून सनातन धर्म प्रगटला. (सर्व वेद हे धर्माचे मूळ आहे.)

२. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । - श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १८

अर्थ : परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त असा उत्पन्न करतो आणि प्रसिद्ध आत्मा त्या हिरण्यगर्भाला ऋग्वेदादी महत् शास्त्रे देतो.

         `जो ब्रह्मदेवाला उत्पन्न करून वेद प्रदान करतो, त्याला मी शरण जातो. म्हणजे वेदांचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभी होते. भगवत्पाद शंकर सांगतात, सर्व सृष्टी वेदापासून झाली. सृष्टीच्या आद्यतत्त्वात वेद आहेत. प्राचीन शास्त्रातील कल्पकाळ परिगणन पाहिले, तर सृष्टी उत्पन्न होऊन ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. ‘संपूर्ण वेदराशी (कारण वेद पर्वताप्रमाणे असून अनंत आहेत.) सृष्टीच्या प्रारंभी अस्तित्वात आला’, हा आमचा सिद्धांत आहे. व्यासांनी द्वापराच्या अंती वेदांची कांडे केली, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे विभाग केले आहेत. द्वापरयुगाचा अंत म्हणजे आजच्या कलियुगाचा प्रारंभ अदमासे ५०५० वर्षांपूर्वी झाला. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे विभाग ५,००० वर्षांपूर्वी झाले आहेत.’

टीका
         `याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला.' - आधुनिक

खंडण
         खिलभाग वेदांनंतर रचला इत्यादी खोटे असणे आणि याज्ञवल्क्यांना सूर्याच्या आशीर्वादाने खिल अन् उत्तरभाग यांसह वेद प्राप्त होणे : ‘महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट विवरण आहे,

         प्रतिष्ठास्यति ते वेदः सखिलः सोत्तरो द्विज ।

         कृत्स्नं शतपथं चैव प्रणेष्यसि द्विजर्षभ ।। - महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३०६, श्लोक १०

अर्थ : हे द्विजश्रेष्ठ याज्ञवल्क्य, खिल आणि उत्तरभाग यांसह वेद तुझ्यात प्रतिष्ठित होतील आणि हे द्विजा ! तू संपूर्ण शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे प्रवचन करशील.

         याज्ञवल्क्याच्या तीव्र तपस्येने संतुष्ट होऊन भगवान सूर्यनारायण त्यांना म्हणाले, ``तुझ्या शरिरात वाणी होऊन
श्री सरस्वती प्रवेश करील.’’ त्याप्रमाणे त्यांनी वेदवाणी सरस्वतीला याज्ञवल्क्यामध्ये प्रविष्ट व्हायला प्रेरित केले. तेव्हा याज्ञवल्क्याने आपले मुख उघडले. इथे स्पष्ट आहे की, याज्ञवल्क्याने भगवान भास्कराच्या कृपेने खिल भागासह वेद प्राप्त केले. अशा प्रकारे शंभर अध्याय असलेल्या ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाचे प्रथम प्रवचन याज्ञवल्क्याने केले. महाभारतात हा सर्व प्रसंग आहे. भगवान भास्कराच्या कृपाप्रसादाने याज्ञवल्क्याने शुक्र यजुर्वेदाच्या १५ शाखा प्राप्त करून घेतल्या.’ यामुळे खिलभाग नंतर रचला इत्यादी विधाने खोटी आहेत.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

No comments:

Post a Comment