आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, March 24, 2013

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने...


१. परदेशातील वेदांताच्या झंझावाती प्रचाराने धर्मांतराला आळा बसणे !
    ‘स्वामी विवेकानंदांच्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी संस्कृती यांचा प्रभाव, खिश्चन धर्मगुरूंचे बुद्धीभेद करणारे डावपेच, तशा प्रकारचे वाङ्मय, यांमुळे हिंदू धर्म अन् संस्कृती अत्यंत हीन, अमानुष, दयनीय आणि रानटी आहे, असा हीनगंड भारतातील श्रेष्ठ लोकांत जोपासला गेला. पुष्कळशा हिंदूंनी बाप्तिस्माच घेतला असता आणि त्यांचे खिश्चनीकरण झाले असते. स्वामी विवेकानंदाच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने त्याला आळा बसला, यात संशय नाही.’
२. जगाला आत्मिक ऐक्याचा संदेश देणे आणि तरुणांमध्ये नवचेतना निर्माण करणे
    खिस्ताब्द १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेमध्ये त्यांनी आत्मिक ऐक्याचा संदेश जगाला दिला. भारताच्या आत्मिक प्रगतीसह ऐहिक प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये नवचेतना आणि उत्साह निर्माण होण्यास साहाय्य झाले.
३. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करणे
    सततची परकीय आक्रमणे, अनाचार, लूटमार, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसा या सर्वांमुळे हिंदु समाज आक्रांत झाला होता. समाजात निर्माण झालेले औदासीन्य आणि पराभूत मानसिकता यांतून हिंदु समाजाला बाहेर काढण्यासाठी रामकृष्णांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी आसेतुहिमाचल प्रवास केला. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदुस्थान यांचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले.
४. ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना
    आपल्या गुरूंचा ‘स्नेहयुक्त बंधुभाव आणि आत्मिक ऐक्य’ हा संदेश जगाला देता यावा, यासाठी स्वामी विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली अन् हिंदु धर्माचे खरे स्वरूप जगाला उलगडून दाखवले. या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून श्री रामकृष्ण परमहंसांचा संदेश जगात पोहोचवण्याचे स्वामी विवेकानंदांनी आरंभलेले कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८ सप्टेंबर २००६, अंक ३७)

Sunday, March 3, 2013

योगी व्हा !


योगावर अनेक ग्रंथ असतातच; तुम्ही नवे काय सांगणार ? 
  • 'मी' जे अनुभवतो तेच सांगतो . माझी प्रतितीच सांगतो .
  • योग (युज) जोडणे , एक संग होणे . एकरसाणे . एकात्म होणे . एक होणे.
  • 'योग' एक करतो तो योग! योग म्हणजे एकाग्रता, एकचित्त, सहसंवेदना. योग म्हणजे आध्यात्मिक संवेदन. योग ही कला आहे. जीवन प्रसन्न, शांत, सुखमय, परमात्म्याशी एक करणारी गुरुकिल्ली आहे.
  • योग जीवाला मन आणि अहंकारापासून अलग करतो. योग व्यक्तीला साक्षीत्व देतो आणि मग मन आणि इंद्रियांचा तो स्वामी होतो. अहंकराचा प्रभू होतो. मन, इंद्रिये आणि अहंकारादि नियंत्रणाखाली ठेवू शकतो. आणि अखेरीस आत्मा परमात्म्याशी जोडतो. जीवास शिव बनवतो. साधक परमात्माच होतो .
माणसाने शक्ती संपादन करायची म्हणजे नेमके काय करायचे? शक्तीची उपासना? कोणती?  कशी? भारत आज दुबळा बनला आहे. त्याला शक्तीशाली कसे बनवायचे? शक्ती संपादायची? कोणती शक्ती?
  • क्षात्रशक्ती - military power ही तर विकसित करायचीच. ही एकच एक शक्ती नाही. आणखी एक शक्ती आहे ती 'ब्रह्मशक्ती !' जशी 'क्षात्रतेज' शक्ती आहे तशी 'ब्रह्मतेज' शक्ती आहेच. ब्रह्मतेज ब्रह्यवर्चसाने, भगवत्तेने, परमात्मदृष्टीने प्रगति ! योगसाधनेने चित्तवृत्ती निर्मल होते, एकाग्र होते आणि मग निराकार होते. समाधी अवस्था हेच ब्राह्मतेज !
  • भगवंताची  योगाची वाट चालायची? तितकी बुद्धी , तितके मनोधैर्य, साहस नसेल तर त्याचे चरण धरा, समर्पण करा. वाटचाल करीत जा. हळूहळू त्याच्या कृपेने धैर्य येते. साहस येते. बळ येते. उणीवा भरून निघतात. (अकूतोभय) निर्भय होतो .
  • विचार करण्याची क्षमता हीच शक्ती ! योगसाधनेने ती क्षमता येते. परिणत प्रज्ञा प्राप्त होते. साधारणत: माणसाला विचार करताच येत नाही . He is incapable of thinking as flying . 'ऊडून जा ' म्हटले तर ते जसे अशक्य, तसच विचार करणेही. त्रिकोणाचा चौकोन बनवणे, वाळूच्या दोरीने आकाश बांधणे तसेच विचार करणे असंभाव्य, अशक्य, विचार करणे म्हणजे चित्ताची एकाग्रता, अव्यग्रता, मनाच्या पलीकडे पलीकडच्या स्तरावर सतत राहण्याची क्षमता. समत्वात राहणे, समत्य सांभाळणे हीच शक्ती. वृत्तीशून्य अवस्था! निराकार आणि ब्रह्माकार स्थिती हीच शक्ती.
  • चित्त एकाग्र करण्याची क्षमता नसणे, हीच दुर्बलता. विचार करण्याची क्षमताच गमावली आहे. इच्छाही नाही. कारण त्याकरता श्रम करावे लागतात. म्हणून तर अध:पतनाच्या गर्तेत खोल खोल तो पडतो आहे.
  • आज सगळे योग-भोग हवे तर आहे, पण फुकट! त्याकरता मोबदला द्यायची तयारी नाही. एकाग्रतेविना, विचाराविना ज्ञान-आत्मा-परमात्मा हवा आहे. साधानेविना सिद्धी  हवी आहे. श्रमाविना, कष्टाविना फळ हवे आहे. ते शक्य नाही. अशाने आळस वाढेल. तमोगुण बळावेल आणि तो हेच जीवन नव्हे, तर जन्म जन्म पशुयोनीत भटकवील. योगाची (म्हणजे शक्तीची) आत्मशक्तीची उपासना न कराल तर शक्ती तुमचा त्याग करील. केवळ भक्तीचंच साधन, नामस्मरणाचं साधन करतो, तिथे काही नेम नकोत.
  •  साधन नको, कष्ट नकोत. त्यांनी काय साधणार? योगाविना, समाधीविना आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान आणि आत्मशक्ती नसेल तर भक्ती काय करणार ? तिला थारा कसा मिळेल? अशाने माणूस संकुचित बनेल, क्षुद्र होईल. क्षुद्र अंत:करणात परमात्मा कसा राहील? भक्ती कशी राहू शकेल ?
  •  लक्षावधी शिष्य काय करायचे ? मेंढरे आहते ती! बुध्दिमान, अहंकारमुक्त, भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणारे, निमित्त बनणारे दहा असले तरी ते दुनिया बदलून टाकतील. 
योगसाधनेला  प्राणायामाची अत्यंत आवश्यकता आहे का ? प्राणायामाविना योगसाधना होऊ शकते का ?
  • प्राणायामाविनाही योगसाधना होऊ शकते, हे खरे. पण प्राणायामाने योगसाधनेला विलक्षण वेगाने गति होते, हेही खरे. 
  • अलिकडचे महायोगी अरविंदांची गोष्ट आहे.प्राणायमानेच ते योगसाधनेला प्रारंभ करतात. सकाळी संध्याकाळी तीन तास. किमान रोज ५/६ तास प्राणायमाचा नेम असतो. अरविंद घोषांनीही काही वर्षे सतत सकाळ संध्याकाळ सहा सहा तास प्राणायाम साधना केलेली होती. प्राणायमाने त्यांची मति विलक्षण वाढते. प्राणायामाआधी ते महिन्याला जेमतेम २०० ओळी कविता लिहीत. स्फुरलेले जरी त्याच क्षणी न लिहीले तरी ते स्मरणांत असे. स्मृति अशी तेजोमय होती की  हवे त्या वेळी ते त्या ओळी स्मरणात आणु शकत आणि लिहू शकत.

"अभिमंत्रित विभूति, मंत्र, तीर्थ, भगवंतावरची श्रद्धा रोग बरे करू शकते का? ही अंधश्रध्दा. आजच्या विज्ञानाच्या युगात औषध न घेता मंत्र, तीर्थ, विभूतीने रोग जातात, म्हणजे हा खुळेपणा आहे. हे सगळे बंद केले पाहिजे."

  • "खरे आहे. कुणी विभुति द्यावी. तीर्थ द्यावे रोगावर! रोग्याने ते औषध न घेता घ्यावे! सगळी अद्यावत वैज्ञानिक चिकित्सा उपलब्ध असतानाही असा समज असूच नये. आजच्या युगांत.
  • पण कुणी जर रोगावरचा उपचार म्हणून भगवंतावरच्या श्रद्धा हाच उपचार, त्याचे तीर्थ, विभूति हाच उपचार करीत असेल, तर त्याच्यवर बंदी घालणे हेही गैरच .कुणी कुणाला का रोकावं? समाजाला कसलाही त्रास न होता जर कुणी काही श्रद्धेने करीत असेल, तर त्याला प्रतिबंध का करावा? तसा अटकाव करणारा समाजच चुकीचा असेल!
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी