भारतातल्या
हिंदूंची सर्वाधिक मोठी शोकांतिका ही आहे की, त्यांना
या आधुनिक भ्रष्ट, दुष्ट धर्मनिरपेक्षतेचा जबरीने साक्षी
व्हावे लागत आहे. निधर्मीपणाचा इतका नीच, इतका
निकृष्ट, इतका भ्रष्ट अवतार त्याला पहावा लागत आहे. नेहरूंनी
आणि त्यांच्या अनुयायांनी या निधर्मीपणाचा उदो उदो केला. त्यांनीच
त्या निधर्मीपणाला अत्यंत अधम, अती भ्रष्ट रूप दिले.
या निधर्मी राष्ट्राच्या नावाखालीच हिंदूंचा सनातन धर्म,
ती सनातन संस्कृती, तो हिंदूंचा राष्ट्रीय
वारसा, ती संस्कृत भाषा, या सर्वांचे नरडे आवळून
त्यांना हद्दपार करणे, हे सगळे या निधर्मीपणाच्या बुरख्याखाली
घडत आहे. कनिष्काला त्याच्या गोधडीखाली दाबून गुदमवरून त्याचे प्राण
घेतले, तसे निधर्मीपणाच्या गोधडीखाली हिंदूंचा तो राष्ट्रीय सनातन
वारसा, तो सनातन धर्म, संस्कृती, यांचे
प्राण घेतले जात आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदु विरोध !
भारतातले
हिंदुद्वेष्टे निधर्मी शासन संस्कृतला मृतवत (Dead) ठरवण्याकरता
सर्व सत्ता-संपत्ती पणाला लावत आहे. भारताचा
निधर्मीवाद सिद्ध करण्याकरता संस्कृत शिकवायचे नसेल, तर
काय
शिकवायचे ? अरबी,
चायनी, जपानी ? हिंदूंचे
ग्रंथ, रामायण, महाभारत, पुराणे
शिक्षण संस्थातून शिकवायला बंदी का ? संस्कृतवर बंदी का ?
हिंदूंनी जीवनाशी किती द्रोही आणि विसंगत व्हावे ? ही
का बुद्धीमानी आहे ? निधर्मीवाद्यांनाच या देशाचा कायदा घडवता
यावा ? केवढा हा जुलूम ! हिंदुस्थानात जर
आम्हाला आमच्या श्रुति-स्मृति, पुराणे
अभ्यासता येत नसतील, तर आमचा स्वतःचा वारसा कुठे अभ्यासावा ?
हॉवर्ड ? शिकागो, ऑक्सफर्ड,
केंब्रिज येथे ?
आज इंग्रजी शिकलेल्या (आंग्लाळलेल्या) भारतियांची शरिरे भारतीय आणि मन मात्र पाश्चिमात्य (पाश्चात्त्य विचारसरणीचा
पगडा असलेले) होणे, हे भारताच्या वाढत्या
लोकसंख्येपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याला भारतियांच्या मनाची मृदूता आणि इतरांना सहज
स्वीकारणारी वृत्ती कारणीभूत आहे. या तुलनेत जपान आणि चीन या
देशांतील नागरिकांची मने अधिक सावध अन् कणखर आहेत. त्यांनी इंग्रजी बोलणार्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी असणार्या
जगताला त्यांची हुकूमत त्यांच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक रचनेवर अद्याप चालवू
दिलेली नाही, हे सत्य लक्षात घेणे
महत्त्वाचे आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, एप्रिल २०१०)