१. श्रीरामाला प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता जानकीचाही त्याग करण्याची सिद्धता असणे : स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि । आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा ।। – उत्तररामचरित, अंक १, श्लोक १२
अर्थ : श्रीराम सांगतो, “प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता मला स्नेह, दया अन् सुखच नव्हे, तर प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करावा लागला, तरी मला व्यथा व्हायची नाही. नव्हे मी तसे करीनच !’’
अर्थ : श्रीराम सांगतो, “प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता मला स्नेह, दया अन् सुखच नव्हे, तर प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करावा लागला, तरी मला व्यथा व्हायची नाही. नव्हे मी तसे करीनच !’’
२. वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीही लोकाभिमुख होऊ न शकणे : प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम् । – कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण १, अध्याय १९, श्लोक ३४
अर्थ : प्रजेचे सुख अन् हित यांमध्येच राजाचे सुख अन् हित असते, असा राजधर्म चाणक्य सांगतो.
अशा धारणांचा चाणक्याचा राजधर्म, हा आजच्या आधुनिक समाजवादी (socialistic) अथवा लोकवादी (democratic) शासनापेक्षा श्रेष्ठ नाही का ? चाणक्य सांगतो तशी गणराज्ये आणि राजकुलांची राज्ये मानली, तर शासन वर्गकलहजन्य होते का ? जातीकलहजन्य होते का ? वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीतरी लोकाभिमुख होऊ शकेल का ?

३. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे आक्रमणे होऊनही लोकजीवन एकसंघ आणि एकरस रहाणे
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति च परस्परम् । – श्रीमहाभारत, शांतीपर्व, अध्याय ५९, श्लोक १४
अर्थ : (सत्ययुगामध्ये) सर्व प्रजा धर्माचरणी असल्याने त्यांचे सदैव रक्षण होत असे. इथे लोकजीवनात एकात्मता आहे आणि स्वत्व आहे.
कृतवर्णाश्रमस्थित (म्हणजे वर्ण अन् आश्रम यांमध्ये स्थिरता आणलेल्या) राजाने प्रजेला धर्ममार्गावर स्थिर करायचे आहे. त्याने केवळ स्वतःच आदर्श होऊन भागणार नाही. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे राज्य, शासनाचा भार आणि ताण उरतच नव्हता. राज्ये आली आणि गेली. आक्रमणे झाली आणि परतवली गेली; पण आमचे लोकजीवन एकसंघ आणि एकरस राहिले.

४. श्रीरामासारखे शेकडो राजे असलेल्या या देशात बोजड निवडणुका आणि मतदान यांच्यामुळे महाभयंकर हुकूमशहा निर्माण होणे : श्रीरामासारखे शेकडो राजे या भारत वर्षात होऊन गेलेले आहेत. सहस्त्रावधी वर्षांचा हा इतिहास, ही प्रतीती असलेल्या आमच्या या देशाला या भंपक, बोजड निवडणूक आणि मतदान यांच्या चरकात भरडण्यात आले. त्यामुळे निवडणुकीने सत्तेवर येणारे संघटित महाभयंकर हुकूमशहा (elective despot) निर्माण झाले आहेत. निवडणुकीद्वारे येणार्या संसदेची सत्ता जर अनियंत्रित असेल, तर ती हुकूमशाही होऊ शकते. (An elective assembly can be despotic or त्य्रानिकॅल as any dictatorship if its powers are unfettered).
५. लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाहीपेक्षा राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (पितृशाही) बरी ! : ‘इथे केवळ लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाही (एलेक्टीवे despotism) असते असे नव्हे, तर राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (despotism) असते. खरे आहे. ज्या न्यायाधिशाचे हे उद्गार आहेत, तेच आता आर्त आक्रंदन करतात, आम्ही आधीची स्थिती आणावी काय ? (ज्युडीशीयल रिव्ह्यू (न्यायिक फेरविलोकन) – एस्. एन्. जैन, संचालक, लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली) (“Should वे revert to the old position?” (Judicial Review – S. N. Jain, Director Law Institute – New Delhi.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)
No comments:
Post a Comment