आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Thursday, January 26, 2012

व्याकरणशुद्ध वाणीमुळे हनुमंताने रामाचे मन लगेच जिंकणे

‘हनुमंताचे भाषण श्रवण करून आनंदित मुद्रेने युक्त झालेला वैभवशाली राम समीपच असलेल्या भ्राता लक्ष्मणाला म्हणाला, “हा वानरराज महात्मा सुग्रीवाचा मंत्री त्याच्याचकरिता येथे माझ्या समीप आला आहे. याकरिता लक्ष्मणा, शत्रूंचे दमन करणारा आणि संभाषणज्ञ अशा त्या सुग्रीवमंत्री वानराशी मधुर शब्दांनी तू काहीतरी प्रेमयुक्त बोल. ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणीत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने संपूर्ण व्याकरण अनेक वेळा ऐकलेले आहे; कारण हा जरी पुष्कळ बोलत होता, तरी याच्या तोंडातून काहीही अशुद्ध निघालेले नाही. मुख, नेत्र, ललाट, भुवया आणि इतरही सर्व अवयव यांपैकी कोठेही दोष दृष्टोत्पत्तीस आला नाही. याच्या भाषणात उगीच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नसून अस्खलित आहे. ऐकणार्‍याला कंटाळा आणण्यासारखे नाही आणि मनामधे उत्कृष्ट रीतीने येऊन नंतर कंठविवरापासून ते श्रोत्यांच्या कानांवर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार मध्यम स्वराने होत आहे. सारांश, त्या त्या वर्णाचे संस्कार क्रमाने अंतःकरणावर ठसविण्यास समर्थ, त्वरारहित, विलंबशून्य आणि म्हणूनच हृदयाला आनंद देणारी अशी शुभ वाणी हा उच्चारीत आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी अभिव्यक्त होणार्‍या या अद्भूत वाणीने खड्ग उपसून सिद्ध असलेला शत्रू झाला, तरी कोणाचे बरे चित्त अनुकूल होणार नाही ?

हे निष्पापा, या प्रकारचा दूत ज्या राजापाशी नसेल, त्याची कृत्ये सिद्धीस कशी जाणार नाहीत ? या प्रकारच्या गुणसमुदायांनी युक्त असलेले कार्यसाधक ज्याच्यापाशी असतील, त्याचे दुतांच्या भाषणाने बोधित केलेले सर्वही मनोरथ सिद्धीस जातील.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

No comments:

Post a Comment