आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, September 23, 2012

समाजवादाचे भूत मानगुटीवर बसलेले पं. नेहरू आणि समाजवादी विचारसरणीचा परिणाम !

१. सनातन धर्म-संस्कृतीपेक्षा चीन हिंदुस्थानात आल्यास देशाचे नुकसान होणार नाही, अशी श्रद्धा असणारे नेहरू !
    हिंदुस्थानची राज्यघटना आणि शासन समाजवादी, लोकशाही स्वरूपाचे आहे. लोकशाही आणि समाजवाद (socialism) हे दोघे एकत्र कसे असू शकतील ? पंडित नेहरूंना भारताला समाजवादी वळण द्यायचे आहे. समाजवाद, साम्यवाद याकडे त्यांचा कल आहे. सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे नाव काढले की, ते आणि त्यांच्या गुंडांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते अन् कानशिले थाडथाड उडतात.
     चीन तिबेट घेतांना आमच्या तिन्ही दलांचे सरसेनापती (बहुधा ते जनरल थिमय्या असावे) नेहरूंना म्हणाले, ``पहाता पहाता आम्ही चीनची नाकेबंदी करतो. तिबेट जर चीनने घेतला, तर हिदुस्थानला चीनपासून फार मोठा धोका आहे.’’ नेहरू नकार देत उद्गारले, ‘‘हिंदुस्थानात सनातन धर्म संस्कृती येण्यापेक्षा चीन आला, तर हिंदुस्थानची फार काही हानी होणार नाही.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)
२. साम्यवाद्यांनी शांती आणि प्रेम यांचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षण देऊन यंत्रासारखा नवा मानव निर्माण करणे
१. लेनिनने देव नाकारला. आई-वडिलांना रतिमात्र मूल्य दिले नाही. शांतीचा अन् प्रेमाचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षणच दिले. लेनिनने शासनाचे शिक्षणाचे तसे धोरणच जाहीर केले.
२. या साम्यवाद्यांनी देव नाकारला, आत्मा नाकारला. नैतिक मूल्ये अव्हेरली, त्याग नाकारला आणि या भौतिकवादी शासनाने नवा यंत्रासारखा मानव निर्माण केला.
३. दीर्घकाळच्या साम्यवादी शासनप्रणालीचे दुष्परिणाम भयंकर मृत्यू आणि गुलामगिरी आहेत, हे एका रशियन पंडिताच्या लक्षात येणे
    अनेक वर्षांपर्यंत ही वाटचाल केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेता रशियन पंडीत अलेक्झांडर सोलेनित्झ (Alexander Solzhenitsys) याने वस्तूस्थिती ओळखली आणि तो मोठ्या दुःखाने सांगतो, ``दीर्घकालीन साम्यवादी प्रणालीच्या शासनामुळे आम्ही इंद्रियजन्य सुख आणि ऐषाराम यांची पूजा करणारे गुलाम झालो. आम्ही जडाचे पुजारी झालो, वस्तूचे पुजारी झालो. उत्पादनाचे पुजारी झालो. आज आम्ही आमची अस्मिताच गमावली. आम्ही हे भयंकर साम्यवादी  शासन स्वीकारले. त्याचे मूल्य आम्हाला भयंकर मृत्यू आणि गुलामगिरीच्या रूपाने द्यावे लागते अन् आम्ही ते दिलेले आहे. हे साम्यवादाच्या पशुजीवनाचे ओझे, जे आमच्यावर जन्मतःच लादले गेले, ते फेकून द्यायला आम्ही समर्थ होऊ का ?’’ 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक `सनातन चिंतन’, ६.११.२००८)
४. हिंदुस्थानला समाजवादाने दरिद्री बनविले !
    कोलोरॉडोचे विल्यम आर्मस्ट्राँग हे ज्येष्ठ सिनेटर सांगतात, ``हिंदुस्थानात इतकी निसर्ग संपत्ती आहे की, तो देश सर्व जगाला धान्य पुरवू शकतो. लोकसंख्येचे प्रमाणही तसे जास्त नाही. हिंदुस्थान दरिद्री कसा ? समाजवादाने हिंदुस्थानला दरिद्री बनविले. त्यांचे शब्द असे, ‘‘भारताची लोकसंख्या वाजवीपेक्षा जास्त नसून समाजवाद देशाला दरिद्री करत आहे.’’ (The population of India is not in excess. The socialism is keeping the country poor.'') पुढे ते सांगतात, ``जपान, सिंगापूर, हाँगकाँग हे असे देश आहेत की, जिथे कोळसा आणि शेतीजमीन अशी कोणतीही निसर्गसंपत्ती नसतांना अतीदाट लोकसंख्येचे भरण-पोषण करतात; कारण ते देश आधुनिक समाजवादापासून मुक्त आहेत.’ (Japan, Singapore and Hongkong etc. are countries without almost no natural resources in terms of coal and farmland, support a very heavy densities of population, because they are free from modern Socialism.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

Friday, September 14, 2012

आजचा इतिहास हा हिंदूंचा नाही तर देशद्रोह्यांचा आहे!

लक्षावधी वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या भारत राष्ट्राने  हिंदु  पंडितांवर भारताचा प्राचीन इतिहास प्रकाशात आणण्याची टाकलेली जबाबदारी त्याने झुगारून, भारतवर्षाचा विश्वासघात करू नये. पितामह भीष्माप्रमाणे वृद्ध अशा भारताचा हिंदु पंडीत हा 'नोकर' आहे. भित्रेपणाने व आपल्याच बुद्धीने वागायला तो स्वतंत्र नाही. भारताची नेहरूप्रणीत सेक्युलर लोकशाही, समजवादी शासनाने इतिहासाचा मुद्दा पडलाच आहे. आता भावनात्मक ऐक्याच्या ढोंगाखाली धर्माचाही मुडदा पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न होतो आहे! 

आजच्या इतिहासावरून सनातन धर्माचा रतीमात्र बोध होत नाही. कारण हा हिंदु समाजाचा इतिहास नाही. जे नेते आहेत, त्यांचा तो इतिहास आहे. ज्यांनी हिंदूंची कत्तल केली, ज्यांनी हिंदूंना छळले, ज्यांनी हिंदूंचा सनातन धर्म नष्ट करण्याकरिता त्यांची मंदिरे, त्यांच्या अस्मिता धूळीला मिळवल्यात, त्यांचा हा इतिहास आहे.

मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे हे अनेक शतकांचे सैतानालाही लाजवणारे आक्रमण, हिंदूंच्या अस्मिता नष्ट करून त्यांना पुरुषार्थहीन बनवणारे त्यांचे शासन, यांचा हा इतिहास आहे. तरी देखील सहस्र वर्षे, हिंदुसमाज टिकला. सनातन हिंदु संकृती अजूनही अविच्छिन्न परंपरेने आहे. आशिया, युरोपात जिथे मुसलमान वा ख्रिश्चन नेते होते, शासक होते ते सगळे देश अवघ्या ३०० वर्षांत मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेत. 'धर्मांतर' हेच उद्दिष्ट असलेल्या कपटी, धूर्त, सैतानी परकीय शासनापासूनही हिंदुसमाज अविच्छिन्न राहिला. याचा विचार कोणीही केला नाही.

सगळे प्राचीन समाज आणि संस्कृती, या आक्रमक व परकीय राज्यकर्त्यांना शरण गेल्यात, वाकल्यात. अपवाद फक्त हिंदु समाजाचा! लंका, ब्रह्मदेश, थायलंड, जपान टिकलेत, असे विधान केले जाते; परंतु ते हिंदूंच्या प्राचीन संस्कृतीचेच अवशेष आहेत. 

हिंदुसमाज अविच्छिन्न कसा राहिला? इथे काहीतरी हिंदु समाजाचे अंत:सामर्थ्य आहे. तेच 'सनातन धर्माचे' सामर्थ्य आहे. ज्यामुळे हिंदुसमाज लढू शकला आणि त्या सगळ्या आक्रमकांवर मात करू शकला. हिंदु समाजाच्या या अपूर्व, अंत:सामर्थ्याच्या संदर्भात, म्हणजे सनातन धर्माच्या संदर्भात प्राचीन इतिहास, वाङमय अभ्यासा. 'Highlights of Hindu History' अशा संकेताने हिंदूंचा इतिहास वाचायला हवा, लिहायला हवा.

आमचा प्राचीन पारिभाषिक शब्द आहे. 'परीसंख्यान।' याचा अर्थ हिंदूंचा आचार व विचार. इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या संदर्भात, हिंदूंच्या सनातन धर्माच्या संदर्भातला परकीयाशी वागतांनाचा जो आचार व विचार! त्या संदर्भात 'Highlights of Hindu History' लिहायला हवी. 

हिंदुधर्म सर्वश्रेष्ठ आहे. सनातन आहे. हे तुमच्या ध्यानी तेव्हांच येईल की जेव्हां तुम्ही सनातन धर्माचे मूळ वाल्मिकी, व्यासांचे अभिजात ग्रंथ 'रामायण', 'महाभारत' तसेच अर्वाचीन अभिजात ग्रंथ अभ्यासाल. जेव्हां 'श्रुती-स्मृती, पुराणे', प्राचीन भाष्यकारांच्या आधारे वाचाल. सनातन धर्माचे तुमचे प्रेम आणि निष्ठा जसे बळावेल, तसे तुम्हीन हिंदु समाजावर व हिंदुस्थानावर विलक्षण प्रेम कराल. 
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३
१)

Tuesday, September 11, 2012

हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला धावायचे?



यज्ञसंस्थेकरिता वेद अवतरलेत. मंत्रमय वेदरक्षणाकरिता चातुर्वर्ण्यं!

यज्ञसंस्था व वेद चातुर्वर्णाचे ह्रदय, वेदांतल्या वेदमंत्राइतके परम सखोल व परमशास्त्रीय चिंतन जगात अन्यत्र नाही. प्रत्येक वेदमंत्राला देवता आहे. द्रष्टा आहे आणि छंद! शिवाय आहे स्वरचना आणि त्यातील विविधता, वैचित्र्य!

कशी होते शब्दनिर्मिती? कोणत्या अंत:शक्तीशी त्याचा कसा संपर्क येतो? मानवाच्या जीवन परिवर्तनाला, उत्क्रांतीला त्यातल्या कोणत्या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सगळे कसे intact आहे. हा सगळा प्रपंच अपूर्व आणि आगळा! 
या सगळ्या श्रेष्ठतम परामोदात्त प्रयोजनाच्या अंतरी शिरून, त्यांचे परीशोधन करून, विश्वकल्याण साधायचे का यज्ञसंस्था, वेद, वर्णव्यवस्था उखडून टाकण्याकरिता सत्ता, शक्ती, संपत्ती, प्रज्ञा वेचायची?

विश्वाचा कणा उखडून टाकायचा?

हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचे? 

वेदमंत्र हे 'मंत्र' आहेत. इतर शब्दांसारखे सामान्य नाहीत. विशेष आहेत. त्यांतील विशेष आनुपूर्वी ही परम मोलाची चीज आहे. वेदमंत्रांनीच सृष्टी निर्मिली, रचली, आणि घडली आहे.

वेद म्हणजे अक्षर ब्रह्म! सगुण परमात्मा! विशिष्ट आनुपूर्वी राखून, परंपरेनुसार केवळ वेदपठणाने, विश्वकल्याण करणारा हा अपूर्व विश्वातला श्रेष्ठतम निधी, रक्षण करण्याकरिता तन, मन, धन पणाला लावणे, हेच आजचे एकमेव कर्तव्य आहे. हा अनमोल निधी रक्षण्याकरिताच विशिष्ट वर्णरचना, वर्णव्यवस्था निर्माण झाली. तेच चातुर्वर्ण्य! इथे कसला उच्च-नीच  भाव? इथे आजचे श्रेष्ठ कानिष्ठतेचे निकष लावणे खुळेपणाचे नाही का? वेदरक्षणाकरिता निर्माण झालेल्या चातुर्वर्ण्याला पर्याय होईल अशी कोणतीच शास्त्रशुध्द रचना आज जगाजवळ नाही. 

मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का धावता? 

-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३०) 

चाणक्य नीतीसूत्र!



सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः

अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते

1. Sukhasya moolam Dharmah
Meaning – The basis of “sukha” or all true pleasantness is “dharma” or righteous conduct.

2. Dharmasya moolam Arthah
Meaning- The basis of all “dharma” is “artha” or wealth.

3. Arthasya moolam Rajyam
Meaning – The basis of all “artha” is “rajya” or the State.

4. Rajyasya moolam Indriya Jayah
Meaning – The basis for the stability of the State lies in control over the “indriya“ or sense faculties providing pleasure.

5. Indriyajayasya moolam Vinayah
Meaning – The basis for control over the sensual faculties is in “vinay” or humility.

6. Vinayasya moolam Vruddhopasevah
Meaning – The basis for humility is devotion to those grown old through wisdom.

7. Vruddhopasevaya Vijnanam
Meaning – Through devotion to the wise, one attains proficiency with the maximum efficiency.

8. Vijnanena atmaanam Sampadyet
Meaning – It is imperative for all the functionaries of the State to perform their duties with the maximum efficiency.

9. Samapaditatma jitatmama Bhavati
Meaning – To perform State duties with the maximum efficiency, the functionaries of the State must learn to control their sensual needs, and maximise their internal potential.

10. Jitatma sarvarthe Sanyujyate
Meaning – Those who have vanquished their baser selves will become prosperous naturally, can retain their prosperity, and (will) be successful in their endeavours.