आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Friday, September 14, 2012

आजचा इतिहास हा हिंदूंचा नाही तर देशद्रोह्यांचा आहे!

लक्षावधी वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या भारत राष्ट्राने  हिंदु  पंडितांवर भारताचा प्राचीन इतिहास प्रकाशात आणण्याची टाकलेली जबाबदारी त्याने झुगारून, भारतवर्षाचा विश्वासघात करू नये. पितामह भीष्माप्रमाणे वृद्ध अशा भारताचा हिंदु पंडीत हा 'नोकर' आहे. भित्रेपणाने व आपल्याच बुद्धीने वागायला तो स्वतंत्र नाही. भारताची नेहरूप्रणीत सेक्युलर लोकशाही, समजवादी शासनाने इतिहासाचा मुद्दा पडलाच आहे. आता भावनात्मक ऐक्याच्या ढोंगाखाली धर्माचाही मुडदा पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न होतो आहे! 

आजच्या इतिहासावरून सनातन धर्माचा रतीमात्र बोध होत नाही. कारण हा हिंदु समाजाचा इतिहास नाही. जे नेते आहेत, त्यांचा तो इतिहास आहे. ज्यांनी हिंदूंची कत्तल केली, ज्यांनी हिंदूंना छळले, ज्यांनी हिंदूंचा सनातन धर्म नष्ट करण्याकरिता त्यांची मंदिरे, त्यांच्या अस्मिता धूळीला मिळवल्यात, त्यांचा हा इतिहास आहे.

मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे हे अनेक शतकांचे सैतानालाही लाजवणारे आक्रमण, हिंदूंच्या अस्मिता नष्ट करून त्यांना पुरुषार्थहीन बनवणारे त्यांचे शासन, यांचा हा इतिहास आहे. तरी देखील सहस्र वर्षे, हिंदुसमाज टिकला. सनातन हिंदु संकृती अजूनही अविच्छिन्न परंपरेने आहे. आशिया, युरोपात जिथे मुसलमान वा ख्रिश्चन नेते होते, शासक होते ते सगळे देश अवघ्या ३०० वर्षांत मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेत. 'धर्मांतर' हेच उद्दिष्ट असलेल्या कपटी, धूर्त, सैतानी परकीय शासनापासूनही हिंदुसमाज अविच्छिन्न राहिला. याचा विचार कोणीही केला नाही.

सगळे प्राचीन समाज आणि संस्कृती, या आक्रमक व परकीय राज्यकर्त्यांना शरण गेल्यात, वाकल्यात. अपवाद फक्त हिंदु समाजाचा! लंका, ब्रह्मदेश, थायलंड, जपान टिकलेत, असे विधान केले जाते; परंतु ते हिंदूंच्या प्राचीन संस्कृतीचेच अवशेष आहेत. 

हिंदुसमाज अविच्छिन्न कसा राहिला? इथे काहीतरी हिंदु समाजाचे अंत:सामर्थ्य आहे. तेच 'सनातन धर्माचे' सामर्थ्य आहे. ज्यामुळे हिंदुसमाज लढू शकला आणि त्या सगळ्या आक्रमकांवर मात करू शकला. हिंदु समाजाच्या या अपूर्व, अंत:सामर्थ्याच्या संदर्भात, म्हणजे सनातन धर्माच्या संदर्भात प्राचीन इतिहास, वाङमय अभ्यासा. 'Highlights of Hindu History' अशा संकेताने हिंदूंचा इतिहास वाचायला हवा, लिहायला हवा.

आमचा प्राचीन पारिभाषिक शब्द आहे. 'परीसंख्यान।' याचा अर्थ हिंदूंचा आचार व विचार. इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या संदर्भात, हिंदूंच्या सनातन धर्माच्या संदर्भातला परकीयाशी वागतांनाचा जो आचार व विचार! त्या संदर्भात 'Highlights of Hindu History' लिहायला हवी. 

हिंदुधर्म सर्वश्रेष्ठ आहे. सनातन आहे. हे तुमच्या ध्यानी तेव्हांच येईल की जेव्हां तुम्ही सनातन धर्माचे मूळ वाल्मिकी, व्यासांचे अभिजात ग्रंथ 'रामायण', 'महाभारत' तसेच अर्वाचीन अभिजात ग्रंथ अभ्यासाल. जेव्हां 'श्रुती-स्मृती, पुराणे', प्राचीन भाष्यकारांच्या आधारे वाचाल. सनातन धर्माचे तुमचे प्रेम आणि निष्ठा जसे बळावेल, तसे तुम्हीन हिंदु समाजावर व हिंदुस्थानावर विलक्षण प्रेम कराल. 
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३
१)

No comments:

Post a Comment