आमचा वैभवशाली भारत आज विलक्षण दरिद्री झाला आहे !
- जगातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा शतपटीने अधिक निसर्गसमृद्ध असलेला आमचा भरतखंड जगातल्या एकशे अठ्ठावन्न राष्ट्रांत दारिद्र्याच्या सातव्या क्रमांकावर आहे.
- एड्ससारख्या परदेशातल्या प्राण घेणार्या किळसवाण्या रोगाच्या लागवणीत भारताचा तिसरा क्रमांक आहे.
- मद्य, सिगारेट, मेंदू जड करणारी मादक द्रव्ये यांच्या सेवनात आमचा देश युरोप आणि अमेरिकेच्या रांगेत आहे.
- भ्रष्टाचाराच्या संदर्भात तर आमचा क्रमांक पुष्कळच वरचा आहे.
- आमच्या सैन्यशक्तीविषयी काय सांगावे ? चिमुरडा बांगलादेश आणि लंका हे आमच्या उरावर बिनदिक्कत नाचत आहेत. पाकिस्तान विलक्षण धुडगूस घालत आहे.
- सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्यात निधर्मीवादी (सेक्युलर) आणि स्वार्थी (मतलबी) सत्ताधिशांचा सर्वांत वरचा क्रमांक आहे.
- अशोक, महावीर आणि गांधी यांच्या या अहिंसावादी भारतात प्रचंड हिंसाचार उसळला आहे.
- आमच्या
गुप्तहेर खात्यातील हिंदु स्त्रिया पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्यातील
अधिकार्यांशी विवाहबद्ध होत आहेत. त्यांचा सत्कार होत आहे. आमची
मानवतावादी लोकशाही ही अशी आहे.’
‘भागवतात प्रसंग आहे. पृथ्वी ही आदिराजा पृथूची प्रार्थना करते, `या
विश्वातले प्रत्येक पाप मी विनासायास सहज सहन करते, करू शकते; परंतु
महाभयंकर असे अनृताचे पाप मात्र मला सहन करवत नाही. आधुनिक काळी जगावर जे
अनृताचे सुसाट वादळ सतत घोंगावते आहे, त्यामुळे कधीच कुणाचे हित होणे असंभव
!’
‘राष्ट्र अधोगतीला जाते ते स्थितीशीलता, जातीभिन्नता वा आचारभिन्नतेमुळे
नव्हे, तर तेजोहीनतेने, आत्मविस्मृतीने, न्यूनगंडाने इंद्रियलोलुप आणि
भोगप्रवण बनल्याने होते ! ज्वलंत तत्त्वनिष्ठेकरताच धैर्याने उभे राहून
प्रसंगी आत्मसमर्पण करणारे जितके लोक अधिक, तितका धर्म, संस्कृती आणि
राष्ट्र यांचा उत्कर्ष अटळ आहे. गतीभिन्नता, आचारभिन्नता आणि जातीभिन्नता
या राष्ट्रोन्नती रोखू शकत नाहीत. तेजोहीनतेमुळे राष्ट्र निःसत्त्व होते.
तेजस्विता, आत्मश्रद्धा, अस्मिता ही स्वतंत्र शक्ती आहे. मिथ्याचार,
दंभाचार, भ्रष्टाचार, भोगलोलुपता हे सगळे पहाता पहाता तत्त्वनिष्ठा अस्तंगत
करून टाकतात. कोणत्याही मताचा, जातीचा, पंथाचा, आचारांचा तो असला, तरी जर
प्रखर तत्त्वनिष्ठा असेल, तर त्याचे कर्तृत्व, त्याची तेजस्विता,
इच्छाशक्ती, आत्मशक्ती, आत्मसमर्पणाची दृढ भावना अशा सर्वच्या सर्व श्रेष्ठ
वृत्ती आणि शक्ती दोन्ही तीर फोडून वहाणार्या महानदीसारखे तुफान वेगाने
धावतात.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक चिंतन’, १३.१०.२०११)
No comments:
Post a Comment