स्त्री आणि पुरुष यांचे धर्म वेगळे असले, तरी या दोहोंत परस्परांचे विलक्षण
आकर्षण असते. समाधीतील ब्रह्मदेवाचे शरीर दुभंगून त्याचा डावा भाग पुरुष,
तर उजवा भाग स्त्री झाल्यामुळे दोघांना एकमेकांचे आकर्षण असते. त्यालाच
`प्रेम’ म्हणतात; म्हणूनच ते एकत्र येण्यासाठी धडपडतात. त्यामुळे मनूने
विवाहसंस्था निर्माण केली. विवाहसंस्था हीच समाजाची आधारशिला आहे. कुटुंब
नसेल, तर समाज उरणार नाही. तो जमाव किंवा समुदाय असेल. या विवाहालाच अत्यंत
उदात्त, अती पवित्र आणि मंगल रूप देण्याकरिता विवाहसंस्कार आहेत. आमच्या
वैदिक परंपरेप्रमाणे विवाह झाला, तर आमरण विवाह रहातोच. ते कुटुंब, तो वंश
टिकतोच. ‘जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत, अरण्ये आहेत, तोवर तो वंश राहील’,
अशी मनूची प्रतिज्ञा आहे.’
‘माता-भगिनींना आमची हात जोडून सर्व
विनंती आहे की, त्यांनी स्त्रियांना ‘पुरुष’ बनविणार्यांच्या नादी लागू
नये. स्त्रीमुक्ती आदी थोतांडे उभी करून आमचा समस्त समाज उद्ध्वस्त करू नये
!’
‘अमेरिकेत स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’(Back to
Womanhood) ही स्त्रियांची चळवळ विलक्षण जोरात आहे. स्त्री मुक्तीच्या
आत्यंतिक पुरस्कारामुळे अमेरिकेचे, एकूणच जगाचे आणि भारतातील आधुनिक
स्त्रियांचे स्त्री-स्वातंत्र्याचे मृगजळ त्यांची तहान भागवू शकत नाही.
स्वातंत्र्याच्या नावाखाली तिथे स्वैराचार सुरू आहे.
खरे स्त्री-स्वातंत्र्य तर दूरचे दिवे !’ आज आधुनिक स्त्रिया
स्त्री-जीवनाच्या परिपूर्तीकरिता अपरिहार्य अशा प्रसन्न `स्त्री-पुरुष’
संयुक्त जीवनालाही मुकल्या आहेत. स्त्रीमुक्ती आंदोलनातील अग्रणी स्त्रियाच
आता भयभीत झाल्या आहेत. वेडेपणाचा अतिरेक झाल्यावरच शहाणपणा सुचतो, नरकात
लोळल्यानंतरच स्वर्गाचे मूल्य कळते. अमेरिकेतील स्त्रिया स्त्रीत्व परत
मिळवण्यासाठी करत असलेल्या ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood)
चळवळीमुळे आमच्या स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियाही उलट दिशेने, म्हणजे
परंपरागत स्त्रीधर्माकडे, गृहिणीधर्माकडे वळत आहेत, हा आमच्या मनु आदी
शास्त्रकारांचा विजय आहे.
आमच्या विवाहादी परंपरा हा निसर्ग आहे. निसर्ग मोडला, तर तो सूड उगवेलच. अनैर्सिगकता किती काळ टिकेल ? आज अमेरिकेत ‘पुन्हा स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) ही चळवळ सुरू आहे. उद्या त्या स्त्रिया कुंकू लावतील. मग आमच्याही स्त्रिया कुंकू लावायला लागतील. यालाच स्त्रीदास्य-विमोचन म्हणायचे का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)
आमच्या विवाहादी परंपरा हा निसर्ग आहे. निसर्ग मोडला, तर तो सूड उगवेलच. अनैर्सिगकता किती काळ टिकेल ? आज अमेरिकेत ‘पुन्हा स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) ही चळवळ सुरू आहे. उद्या त्या स्त्रिया कुंकू लावतील. मग आमच्याही स्त्रिया कुंकू लावायला लागतील. यालाच स्त्रीदास्य-विमोचन म्हणायचे का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)
अमेरिकी स्त्रियांना ‘आपण स्त्रीत्वाला मुकत आहोत’, हे लक्षात आल्याने
त्यांची पुनश्च स्त्रीत्वाकडे वाटचाल
अमेरिकन स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. सत्ताकरण, अर्थकारण अशा सगळ्या
क्षेत्रांतून स्त्रिया पुरुषांच्या साहाय्याने काम करीत आहेत, बरोबरीने
आहेत, कुठेही रतिमात्र मागे नाहीत. स्त्रीमुक्ती आंदोलन तर शिगेला पोहोचले
आहेच आणि आता घड्याळाचा लोलक झुकला आहे. ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ हे आंदोलन
सामर्थ्यशाली आहे; कारण सगळे मिळूनही स्त्री अतृप्त, असंतुष्ट आहे. आता ती
अंतर्मुख होत आहे. ‘ती स्त्रीत्वाला मुकत आहे’, हे तिच्या ध्यानी येत आहे.
तिनेच समान हक्क घटनेत सुधारणा करवून घेतली आहे.
पेनिलोप लोमोव्ह ही श्रेष्ठतम अमेरिकन संपादिका ‘स्त्रीत्व कसे मोहोरेल’,
याकरता तळमळून कळवळून आक्रोश करते, ``हे पुरुषीकरण आता पुरे ! आता विराम
हवा !’’ असे अमेरिकन स्त्रीहृदयाचे दुःख ती मांडते. समान हक्क मागायचे,
स्त्रियांचे पुरुषीकरण अन् लिंगभेदाचे निर्मूलन करायचे आणि स्त्रीत्व नष्ट
करून टाकायचे कन्या, पत्नी आणि माता असे जे परंपरेने संरक्षण होते, ते
सगळेच नष्ट करायचे ? स्त्रीस्वभावाला, गृहिणीला, मातृत्वाला, तिलांजली
देऊनच अर्थार्जनाच्या बाजारात तिला उभे रहावे लागते. आता अमेरिकन स्त्रीला
उच्च जागा नकोत. धंद्यातले मालमत्ता हक्काची तिला फारशी कदर नाही. मातृत्व
आणि गृहिणी यांकरिता आवश्यक त्या परंपरागत तरतुदी तिला हव्या आहेत ! गृहिणी
आणि माता! ‘मातृत्व आधी. मग जर वेळच उरला, तर इतर कामे’, अशी अमेरिकन
स्त्रीची धारणा आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
No comments:
Post a Comment