टीका : जिवंत पिता, लौकिक पितामह, प्रपितामह प्रभुतींचा सत्कार करणे हेच श्राद्ध !
- आर्य समाजाचे संस्थापक दयानंद स्वामी
खंडण अ. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होत असणे : जीवित पिता, पितामह यांचा सत्कार म्हणजे श्राद्ध, यासाठी स्वामी दयानंद मनूच्या ज्या श्लोकांचा संदर्भ देतात, त्यातून उलट हेच स्पष्ट केले आहे की, पिता जीवित असतांना त्याचे श्राद्ध होऊच शकत नाही. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होते.
आ. धर्मशास्त्रात श्राद्ध केल्यामुळे होत असलेले परिणाम : पृथ्वीवर (दक्षिण दिशेला भूमी उकरून तिथे दर्भ पसरवून तीन पिंड ठेवायचे) तीन पिंड दान केले की, नरकस्थित पितरांचा उद्धार होतो. पुत्राने हरप्रयत्नाने मृत पित्याचे श्राद्ध करावे. त्यांचे नाव आणि गोत्र विधीवत् उच्चारून पिंडदानादी करण्याने त्यांना हव्य-कव्याची प्राप्ती होते. यामुळे त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण झाल्याने ते तृप्तात्मे साहजिकच त्या कुटुंबाला त्रास देत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना गती मिळून ते पुढील लोकात जातात. श्राद्ध केल्याने त्याचे परिणाम चांगले होतात, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
यामुळे आर्य समाजी दयानंद आणि आधुनिक यांचे वरील वक्तव्य चुकीचे आहे, हे दिसून येते; कारण तसे असते, तर श्राद्धात जे मोठे विधी-विधान आहे, त्याची काय आवश्यकता राहिली असती ?
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंबर २००८ आणि जानेवारी २००९)
(म्हणे) संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करा !
साधक : गुरुदेव,
बिहार शासनाचे उपमुख्यमंत्री धार्मिक आणि हिंदु धर्म अन् संस्कृतीचे मोठे
अभिमानी आहेत. प्रत्यक्षात तसे संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान त्यांनी
चालू केले आहे. विदेशातील हिंदूंकरता व्ही.डी.ओ. कॉन्फरन्सिंगद्वारे
पिंडदान करण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी घोषित केले आहे की, आमच्या
पर्यटन विभागाने विदेशात रहाणार्याक हिंदूंकरता गतवर्षापासून
संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदानाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या
उपक्रमाचे विदेशात सर्वत्र स्वागत होत आहे. वर्णधर्म, जाती इत्यादींचे
निर्मूलन करू पहाणार्या ईश्वराचे अधिष्ठान न मानणार्या, अंत्येष्ठी
श्राद्धाचा प्रखर तिरस्कार करणार्या , ज्यांना श्राद्धविधी नष्ट करायचा आहे
अशा नवहिंदुत्ववाद्यांनी ऑनलाईन पिंडदानाचे स्वागत केले आहे.
गुरुदेव : हे
उलट्या खोपडीचे आमचेच आंग्लछायेचे हिंदू काय काय उपद्व्याप करतील कोण जाणे
? हे सगळे हिंदु समाजाचे कडवे शत्रू आहेत. लक्षावधी वर्षांपासून कोटी कोटी
लोकांनी पितरांना मुक्ती देणार्या ‘गया या परमपवित्र क्षेत्री आता
पितरमुक्तीकरता पिंडदान करायला येण्याची आवश्यकता नाही !
पितरमुक्तीकरता पिंडदान करणार्या गया क्षेत्राचे महिमान, असे सगळे
श्रुती-स्मृति पुराणांतून सर्वत्र आहे. लक्षावधी हिंदू पितरमुक्तीकरता
प्रत्यक्ष गयेला येऊन पिंडदान करतात आणि पितरांचे आशीर्वाद घेतात. ज्यांना
पिंडदान करायचे त्यांचे जे आप्त-स्वकीय आहेत, त्यांना प्रत्यक्ष गयेला येणे
अपरिहार्य आहे. साक्षात भगवान रामप्रभु यांनी दशरथाची श्राद्धक्रिया
प्रत्यक्ष गयेला येऊनच केली.
शास्त्रप्रामाण्य हीच तर आम्हा हिंदु
जीवनाची कवच कुंडले आहेत. शास्त्रमर्यादा उल्लंघणारा दांभिक आहे.
संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान शास्त्रविरुद्ध ढोंग आहे. लक्षावधी
वर्षांच्या आमच्या परंपरेवर आतंकवादापेक्षाही क्रूर आघात आहे.
संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करणारा शास्त्र उल्लंघून कुकर्म करतो.
यः शास्त्रकिधिमुत्सृज्य कर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमकाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोनक २३
अर्थ : अशा स्वैराचारी मानवाला सुख, यश आणि परलोक तर नाहीच नाही. अशा दांभिकांना मी (भगवान) सर्प, विंचू, वाघादी क्रूर योनीत घालतो.
भगवान सांगतात,.....
तानहं द्विषतः क्रुरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्केक योनिषु ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोपक १९
अर्थ : त्या द्वेष आणि क्रूर कर्मे करणार्या् पापी नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीत टाकतो.
ही जी आधुनिक तांत्रिक पद्धत (technology) आहे, ती आतंकवादापेक्षाही क्रूर
आणि दुर्दैवी अशी अवदसा आहे. (Every advance in technology is the greatest
misfortune.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १६.१२.२०१०)
No comments:
Post a Comment