हे जे काही इस्लाम (Religion), ख्रिश्चन (Religion) आहेत, ते आपल्या धर्मप्रसाराकरता अत्याचारी आणि आक्रमक होतात, तसेच खून अन् हत्याकांडे करतात; परंतु 'धर्म हा हत्याकांडे करतो, आततायी असू शकतो', असा पुसटता गंधही हिंदूंना सहन होत नाही.
परम श्रेष्ठ मूल्य असलेल्या हिंदु धर्माला खच्ची करण्याकरीता ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अनुवाद करून 'जसे इस्लाम, ख्रिश्चन धर्म, तसाच हिंदु धर्म आहे', असे प्रतिपादन पाश्चात्त्यांनी केले. उन्नत आशय असलेला हिंदु धर्म बलवान झाला, तर हिंदु धर्मही आपल्या धर्मप्रसाराकरता इतर धर्माचा विध्वंस करील, जगातल्या इतर धर्मियांची हत्याकांडे करील आणि आपला धर्म प्रस्थापित करील, अशी आधुनिकांना भीती वाटते; म्हणून हिंदु धर्माचा उत्कर्ष कधी होऊच नये, असे त्यांना वाटते; म्हणून 'इस्लाम रिलिजन', 'ख्रिश्चन रिलिजन', असे जे काही आहेत, त्या धर्माच्या (रिलिजनच्या) ओळीत ते हिंदु धर्माला बसवतात. ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अर्थ सहेतूक त्यांनी दिला. वास्तविक हिंदु धर्म तसा कधीच नाही, नव्हता आणि असूही शकत नाही.
हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे लिखाण करणारे पाश्चात्त्य !
हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे उपाय या पाश्चात्त्यांनी योजिले. त्याच्याकरता त्यांनी (मनमानी, खोटा) इतिहास लिहिला. 'हिंदूंनी बौद्धांवर आक्रमणे केली, हिंदूंनी बौद्धांची हत्याकांडे केलीत, हिंदूंनी बौद्धांचे आश्रम जाळून टाकलेत', अशा प्रकारचा नवा खोटा मध्ययुगीन इतिहास लिहिला. विशेष असे की, आमचा जो मध्ययुगीन इतिहास आहे, हा सगळा पाश्चात्त्यांनी लिहिला आहे. आजही ते हिंदूंना आक्रमक, आततायी, हत्याकांडे करायला मागेपुढे न पहाणारा हे ठरवण्याकरता नाना क्लृप्त्या योजित आहेत आणि करतही आहेत.
आज जे काही चालले आहे ते असे. हिंदु हा आक्रमक, आततायी आहे, गोडसेवादी, मनुवादी आहे, हे ठरवण्याकरता ते आकांडतांडव करत आहेत. त्या उद्दिष्टाकरता ते एकही संधी जाऊ देत नाही. काही केले, तरी त्यांना काही पुरावे सापडत नाहीत; कारण हिंदु धर्म हा काही धर्म नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.३.२०११)
No comments:
Post a Comment