आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.
Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts
Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts

Sunday, October 6, 2013

सनातन हिंदु धर्म हा काही Religion नाही !


हे जे काही इस्लाम (Religion), ख्रिश्‍चन (Religion) आहेत, ते आपल्या धर्मप्रसाराकरता अत्याचारी आणि आक्रमक होतात, तसेच खून अन् हत्याकांडे करतात; परंतु 'धर्म हा हत्याकांडे करतो, आततायी असू शकतो', असा पुसटता गंधही हिंदूंना सहन होत नाही.
     परम श्रेष्ठ मूल्य असलेल्या हिंदु धर्माला खच्ची करण्याकरीता ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अनुवाद करून 'जसे इस्लाम, ख्रिश्‍चन धर्म, तसाच हिंदु धर्म आहे', असे प्रतिपादन पाश्‍चात्त्यांनी केले. उन्नत आशय असलेला हिंदु धर्म बलवान झाला, तर हिंदु धर्मही आपल्या धर्मप्रसाराकरता इतर धर्माचा विध्वंस करील, जगातल्या इतर धर्मियांची हत्याकांडे करील आणि आपला धर्म प्रस्थापित करील, अशी आधुनिकांना भीती वाटते; म्हणून हिंदु धर्माचा उत्कर्ष कधी होऊच नये, असे त्यांना वाटते; म्हणून 'इस्लाम रिलिजन', 'ख्रिश्‍चन रिलिजन', असे जे काही आहेत, त्या धर्माच्या (रिलिजनच्या) ओळीत ते हिंदु धर्माला बसवतात. ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अर्थ सहेतूक त्यांनी दिला. वास्तविक हिंदु धर्म तसा कधीच नाही, नव्हता आणि असूही शकत नाही.

हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे लिखाण करणारे पाश्‍चात्त्य !
    हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे उपाय या पाश्‍चात्त्यांनी योजिले. त्याच्याकरता त्यांनी (मनमानी, खोटा) इतिहास लिहिला. 'हिंदूंनी बौद्धांवर आक्रमणे केली, हिंदूंनी बौद्धांची हत्याकांडे केलीत, हिंदूंनी बौद्धांचे आश्रम जाळून टाकलेत', अशा प्रकारचा नवा खोटा मध्ययुगीन इतिहास लिहिला. विशेष असे की, आमचा जो मध्ययुगीन इतिहास आहे, हा सगळा पाश्‍चात्त्यांनी लिहिला आहे. आजही ते हिंदूंना आक्रमक, आततायी, हत्याकांडे करायला मागेपुढे न पहाणारा हे ठरवण्याकरता नाना क्लृप्त्या योजित आहेत आणि करतही आहेत.
     आज जे काही चालले आहे ते असे. हिंदु हा आक्रमक, आततायी आहे, गोडसेवादी, मनुवादी आहे, हे ठरवण्याकरता ते आकांडतांडव करत आहेत. त्या उद्दिष्टाकरता ते एकही संधी जाऊ देत नाही. काही केले, तरी त्यांना काही पुरावे सापडत नाहीत; कारण हिंदु धर्म हा काही धर्म नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.३.२०११)

Tuesday, August 6, 2013

कोटी कोटी प्रणाम !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज जयंती
हिंदूंचे भीषण अधःपतन होण्यामागचे कारण
     यामागे सनातन धर्माचा काहीच दोष नाही; किंबहुना सनातन धर्माचे अनुसरण करत नसल्यामुळे हिंदूंचे भीषण अधःपतन झाले आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १०.३.२०११)

हिंदु संस्कृतीची अद्वितीयता

एतद्देशप्रसूतस्य सकाशात् अग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥ - मनुस्मृति २.२०
 अर्थ : या ब्रह्मवर्तादी देशात जन्माला येणारे जे चारित्र्यसंपन्न आणि विद्वान लोक असतील त्यांच्यापासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी सदाचाराचे, सद्वर्तनाचे धडे घ्यावेत. आमच्या चरणाशी बसून विश्‍वातील यच्चयावत मानवांनी आचरणाचे वळण गिरवावे. 
आक्रमणाच्या उद्देशाने हिंदुस्थानात आलेल्यांनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु संस्कृतीशी एकरूप होणे 
१. तक्षशिलेच्या यवनराजाचा दूत हेलिओडरस याने तिथे गरुडध्वज उभारला आहे. त्यावरील लेखात तो भगवान विष्णूचा उपासक ‘भागवत असा स्वतःचा निर्देश करतो.
२. कांबोज, यवन, पल्हव, दरर, खश इत्यादी लोक पूर्वी क्षत्रिय होते; पण संस्कार न झाल्याने त्यांना वृषलत्व (शूद्रत्व) प्राप्त झाले. धार्मिक संस्कार न झाल्यामुळे मूळचे क्षत्रिय असूनही त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले; म्हणूनच ते क्षत्रियत्वाचे संस्कार त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांना क्षत्रियत्वाचा अधिकार दिला गेला.

३. परकीय आक्रमणात हूण हे प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला. हूण राजा मिहिरकुल हा शिवोपासक होता. हुणांनी भारतात राज्य स्थापिले. हळूहळू ते हिंदु संस्कृतीशी एक होऊन गेले. फुढे त्यांची गणना राजपुतांच्या श्रेष्ठ कुळात होऊ लागली. इथे जात्युत्कर्ष आहे.
४. कुलचुरी हे स्वतःला चंद्रवंशी म्हणवतात. त्या कुलातील महाप्रतापी कर्णनृपतीचा विवाह हूण राजकन्या आवल्लदेवीशी झाला होता. त्यांचा पुत्र यशःकर्ण हा पित्यानंतर गादीवर आला. राजपूत राजे कडवे हिंदु धर्माभिमानी होते. त्यांनी हिंदु धर्म व संस्कृती यांच्या रक्षणाकरता वेळप्रसंगी प्राणार्पण करायलाही मागे पुढे पाहिलेले नाही.
कर्मफल आणि पुनर्जन्म यांवरील श्रद्धेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर असणे 
    प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सुख-दुःख प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आफल्याला आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा कायम होती. स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली आणि आता जवळजवळ नष्ट झाली आहे.
भारतभूमीची सहस्रो वर्षांची तेजःपुंज परंपरा तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील 
    स्वामी विवेकानंद अमेरिकेला खडसावतात, तुमचे ज्ञान, तुमची संस्कृती आणि तुमची जीवनशैली ही केवळ वरवरची आहे. थोडेसे घासले की, त्या कातडीखालचा हिंस्त्र पशू उसळून वर येतो. आपल्या थोर व पावन भारतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा आपल्या पाठीशी उभी आहे. त्याची लाज कशाकरिता ? ही तर आमची तेजःपुंज ज्वलंत अस्मिता आहे. जगाला ही वैशिष्ट्येच शिकवायची आहेत. भारताने नेतृत्व करायचे आहे. ही जी ज्वलज्जहाल अस्मिता आहे, तीच आमच्या तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी