आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Monday, January 30, 2012

नीतीशास्त्राला धरून असणारा समाज अभेद्य राहतो.


‘हिंदूंसाठी असलेले सर्वसाधारण नियम आध्यात्मिक स्वरुपाचे आहेत, भौतिक नाहीत; म्हणूनच हिंदू जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्यांना सर्व आचारांवर काही आक्रमण करता येईना; म्हणून हिंदूंनी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि अभिजात आचार मानले, त्यावर आक्रमण होऊ लागले. ‘हिंदूंनी आपली समाजरचना जाती, म्हणजे गटाच्या स्वरूपाची केलेली आहे. त्याप्रमाणे जगात अन्य कोणत्याही समाजात नाही; म्हणून जातीभेदाने हिंदू समाजाचा नाश झाला’, अशी हाकाटी चालू झाली. १. श्रेष्ठ आचारांत विधवा विवाहाचा निषेध आहे; म्हणून विधवा पुर्निववाहाचा दंडक (कायदा) संमत (पास) करून घेतला. हिंदूंच्या काही जातींतही (कनिष्ठ आचारात) विधवा पुर्निववाह होत नव्हते.
२. ‘प्रदानं प्रागृतोः ।’ (गौतमधर्मसूत्र, अध्याय १८, सूत्र २१) म्हणजे ‘कन्येचा विवाह ऋतुकाळ (मासिक पाळी) चालू होण्यापूर्वी करावा’ असे आपले धर्मशास्त्र सांगते. शारीरिक, मानसिक आणि समाजशास्त्रीयदृष्ट्या बाल वय हे अत्यंत हितकारक होय. साहेबांच्या समाजात अशी पद्धत नसल्याने त्यांना ही पद्धत रानटी दिसू लागली !
३. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्त्री हिने जेथे एकांती लोकांशी, परपुरुषांशी संबंध येईल, असे काम करायला घराबाहेर जाऊ नये, असा हिंदूंचा दंडक दिसला, तर स्त्रियांच्या आभासिक हक्काचा आश्रय करून त्याच्यावर आक्रमण केले गेले. अशा प्रकारे ब्राह्मणांची नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी त्याज्य ठरवून शूद्रांची नैतिक मूल्ये प्रधान मानली जाऊ लागली आणि त्याचा हळूहळू प्रसार झाला.
४. स्पर्शास्पर्श, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय एकूण एक संदर्भात शूद्रांचे अनिर्बंध आचार समाजात प्रधान होऊ लागले आहेत. ‘त्यालाच समाज सुधारणा म्हणावे’, असे समाजसुधारक नावाचा प्राणीवर्ग आम्हाला सांगत आहे.

आडदांड मुसलमानांना जे शक्य झाले नाही, ते इंग्रजांनी मायेने हात फिरवून करण्याला प्रारंभ केला. इंग्रज धूर्त आहेत. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, जोवर एखादा समाज आपल्या नीतीशास्त्राला धरून आहे, तोपर्यंत तो अभेद्य रहातो; म्हणून त्याने हिंदु धर्माच्या नैतिक मूल्याविषयीच शंका निर्माण केल्या. अंतःकरण शंकाकुशंकानी व्याकुळले की, मग कोणताही आचार धड राहू शकत नाही. मग विघात आपोआप होईल. तलवारीने शरिरे जिंकता येतील; पण मने जिंकता येत नाहीत. इंग्रज झाला तरी काय ? त्याच्याकडे नीतीच्या ज्या कल्पना प्रचलित असतील, त्याच तो घेऊन येणार ! त्याच प्रगतीच्या कल्पना इकडे आणल्या आणि आमच्या अहंगंड असणार्‍याने, म्हणजे सर्वाधिक आरडाओरडा करणार्‍यांनी त्या मान्य केल्या आणि अजूनही करत आहेत.’

भारतीय नारींनो, गुंड प्रवृत्तीच्या अमेरिकन पतीला सहचर बनवायचा कि नाही, याचा विचार करा !

‘अमेरिकेतील भारतीय नारींचा, ज्यांनी अमेरिकनांशी विवाह केलेला आहे, गोर्‍यांशी लग्न केले आहे, अशा भारतीय अमेरिकन स्त्रियांसंबंधीचा (इंडिअन American Women) सविस्तर अहवाल डॉ. शमिता दासगुप्ता, अध्यक्षा, इंडियन वुमेन्स ऑर्गनायझेशन, न्यू जर्सी ((Indian women'sorganization. New Jersey) यांनी प्रसिद्ध केलेला आहे. काही घटनांचा उल्लेख करतो.
१. इंदिरा २२ वर्षांची मद्रासची भारतीय नारी. तिच्या विवाहाला दोन महिने झाले. तोच तिचा अमेरिकन नवरा तिला घर सोडून जायला खडसावतो; कारण काहीही सांगत नाही. प्रचंड डॉलर्स हुंडा खिशात टाकतो आणि आता म्हणतो, ``तुला अमेरिकेच्या बाहेर घालवून देईन. तुझे इथले वास्तव्य नष्ट करून टाकीन.’’
२. अमेरिकन नवरा असलेल्या शोभा या भारतीय नारीला लग्नानंतर तिचा नवरा विलक्षण मारहाण करतो. ती बेशुद्ध आणि घायाळ होते. वाशिग्टन डी.सी.च्या रुग्णालयात भरती होते. त्या नवर्‍याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदणी होते. पोलीस केस जर पुढे तशीच चालू ठेवली तर.....? थरथरणार्‍या शोभाला भय वाटते की, तिची हत्या होईल !
३. जया एक डॉक्टर, भारतीय नारी ! अमेरिकन पतीची भार्या होते. शिकागोला ती डॉक्टर असते. तिचा शारीरिक आणि मानसिक विलक्षण छळ होतो. ती हताश होण्याच्या मार्गावर होती. (She is on the verge of nervous breakdown.) घटस्फोटाकरता न्यायालयात जायला ती भिते; कारण तिला तिची मुले गमवावी लागतील !
अशा असंख्य घटना आहेत.’ ((Times of India sunday Review ३०.७.१९८९ च्या अंकात प्रिया कुरायन यांचा विस्ताराने लेख आलेला आहे.) - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)
‘एक बिशप म्हणतो, `जनावरांना देवाची कल्पना करायला सांगितली, तर कदाचित करता येणार नाही; पण ‘सैतान कसा असतो ?’ असे विचारले, तर ते गोर्‍यांचा निर्देश करतील.’ - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)

Thursday, January 26, 2012

व्याकरणशुद्ध वाणीमुळे हनुमंताने रामाचे मन लगेच जिंकणे

‘हनुमंताचे भाषण श्रवण करून आनंदित मुद्रेने युक्त झालेला वैभवशाली राम समीपच असलेल्या भ्राता लक्ष्मणाला म्हणाला, “हा वानरराज महात्मा सुग्रीवाचा मंत्री त्याच्याचकरिता येथे माझ्या समीप आला आहे. याकरिता लक्ष्मणा, शत्रूंचे दमन करणारा आणि संभाषणज्ञ अशा त्या सुग्रीवमंत्री वानराशी मधुर शब्दांनी तू काहीतरी प्रेमयुक्त बोल. ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणीत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने संपूर्ण व्याकरण अनेक वेळा ऐकलेले आहे; कारण हा जरी पुष्कळ बोलत होता, तरी याच्या तोंडातून काहीही अशुद्ध निघालेले नाही. मुख, नेत्र, ललाट, भुवया आणि इतरही सर्व अवयव यांपैकी कोठेही दोष दृष्टोत्पत्तीस आला नाही. याच्या भाषणात उगीच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नसून अस्खलित आहे. ऐकणार्‍याला कंटाळा आणण्यासारखे नाही आणि मनामधे उत्कृष्ट रीतीने येऊन नंतर कंठविवरापासून ते श्रोत्यांच्या कानांवर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार मध्यम स्वराने होत आहे. सारांश, त्या त्या वर्णाचे संस्कार क्रमाने अंतःकरणावर ठसविण्यास समर्थ, त्वरारहित, विलंबशून्य आणि म्हणूनच हृदयाला आनंद देणारी अशी शुभ वाणी हा उच्चारीत आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी अभिव्यक्त होणार्‍या या अद्भूत वाणीने खड्ग उपसून सिद्ध असलेला शत्रू झाला, तरी कोणाचे बरे चित्त अनुकूल होणार नाही ?

हे निष्पापा, या प्रकारचा दूत ज्या राजापाशी नसेल, त्याची कृत्ये सिद्धीस कशी जाणार नाहीत ? या प्रकारच्या गुणसमुदायांनी युक्त असलेले कार्यसाधक ज्याच्यापाशी असतील, त्याचे दुतांच्या भाषणाने बोधित केलेले सर्वही मनोरथ सिद्धीस जातील.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Sunday, January 15, 2012

लोकशाही नको, तर श्रीरामासारखे राज्यकर्ते हवेत !


१. श्रीरामाला प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता जानकीचाही त्याग करण्याची सिद्धता असणे : स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि । आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा ।। – उत्तररामचरित, अंक १, श्लोक १२
अर्थ : श्रीराम सांगतो, “प्रजारक्षण, संवर्धन, प्रजावत्सलता, प्रजाहित यांकरता मला स्नेह, दया अन् सुखच नव्हे, तर प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करावा लागला, तरी मला व्यथा व्हायची नाही. नव्हे मी तसे करीनच !’’

२. वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीही लोकाभिमुख होऊ न शकणे : प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम् । – कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण १, अध्याय १९, श्लोक ३४
अर्थ : प्रजेचे सुख अन् हित यांमध्येच राजाचे सुख अन् हित असते, असा राजधर्म चाणक्य सांगतो.
अशा धारणांचा चाणक्याचा राजधर्म, हा आजच्या आधुनिक समाजवादी (socialistic) अथवा लोकवादी (democratic) शासनापेक्षा श्रेष्ठ नाही का ? चाणक्य सांगतो तशी गणराज्ये आणि राजकुलांची राज्ये मानली, तर शासन वर्गकलहजन्य होते का ? जातीकलहजन्य होते का ? वर्गकलहाचे शासन वा राजनीती, कधीतरी लोकाभिमुख होऊ शकेल का ?
३. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे आक्रमणे होऊनही लोकजीवन एकसंघ आणि एकरस रहाणे
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति च परस्परम् । – श्रीमहाभारत, शांतीपर्व, अध्याय ५९, श्लोक १४
अर्थ : (सत्ययुगामध्ये) सर्व प्रजा धर्माचरणी असल्याने त्यांचे सदैव रक्षण होत असे. इथे लोकजीवनात एकात्मता आहे आणि स्वत्व आहे.
कृतवर्णाश्रमस्थित (म्हणजे वर्ण अन् आश्रम यांमध्ये स्थिरता आणलेल्या) राजाने प्रजेला धर्ममार्गावर स्थिर करायचे आहे. त्याने केवळ स्वतःच आदर्श होऊन भागणार नाही. कृतवर्णाश्रमस्थितीमुळे राज्य, शासनाचा भार आणि ताण उरतच नव्हता. राज्ये आली आणि गेली. आक्रमणे झाली आणि परतवली गेली; पण आमचे लोकजीवन एकसंघ आणि एकरस राहिले.
४. श्रीरामासारखे शेकडो राजे असलेल्या या देशात बोजड निवडणुका आणि मतदान यांच्यामुळे महाभयंकर हुकूमशहा निर्माण होणे : श्रीरामासारखे शेकडो राजे या भारत वर्षात होऊन गेलेले आहेत. सहस्त्रावधी वर्षांचा हा इतिहास, ही प्रतीती असलेल्या आमच्या या देशाला या भंपक, बोजड निवडणूक आणि मतदान यांच्या चरकात भरडण्यात आले. त्यामुळे निवडणुकीने सत्तेवर येणारे संघटित महाभयंकर हुकूमशहा (elective despot) निर्माण झाले आहेत. निवडणुकीद्वारे येणार्‍या संसदेची सत्ता जर अनियंत्रित असेल, तर ती हुकूमशाही होऊ शकते. (An elective assembly can be despotic or त्य्रानिकॅल as any dictatorship if its powers are unfettered).

५. लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाहीपेक्षा राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (पितृशाही) बरी ! :
‘इथे केवळ लोकशाहीमधील निवडणुकीद्वारे एकाधिकारशाही (एलेक्टीवे despotism) असते असे नव्हे, तर राजसत्तेच्या अधिकाराचाही हुकूमशाही (despotism) असते. खरे आहे. ज्या न्यायाधिशाचे हे उद्गार आहेत, तेच आता आर्त आक्रंदन करतात, आम्ही आधीची स्थिती आणावी काय ? (ज्युडीशीयल रिव्ह्यू (न्यायिक फेरविलोकन) – एस्. एन्. जैन, संचालक, लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली) (“Should वे revert to the old position?” (Judicial Review – S. N. Jain, Director Law Institute – New Delhi.)

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००९)