आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Friday, December 31, 2010

पाश्चात्त्यांचे उपद्व्याप!

आपलीच संस्कृति श्रेष्ठ असा दुराग्रह असणार्या युरोपियनांना,
''संस्कृत भाषेतूनच अन्य सर्व भाषांचा उद्गम आहे' हे कसे मान्य होईल?
म्हणून या दुष्ट पाश्चात्यांनी कसे भयंकर उपद्व्याप केलेत, पहा !



  • अदमासे २५० वर्षा पूर्वी बंगालवर इंग्रजांचे अधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषात त्यांना कमालीचे साम्य आढळले. त्यांनी तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास सुरु केला.
  • त्यांनी चारही भाषा एकाच पातळीवर ठेवून, या चारही भाषांच्या पूर्वी एक प्राचीनतम भाषा असली पाहिजे, त्या भाषेतून संस्कृत, लॅटिन, ग्रीक व फारशी जन्माला आल्यात' - असे ठोकून दिले. (वास्तविक संस्कृत भाषेतूनच या तिन्ही भाषांचा उद्गम व विकास आहे. संस्कृतानुगामी अशा त्या भाषा आहेत. संस्कृतमुळेच त्या समृद्ध झाल्या आहेत. संस्कृतेत्तर सर्व भाषा संस्कृताचीच विकृत रूपे आहेत.) अस्तित्वातच नसलेल्या या काल्पनिक प्राचीनतम भाषेला 'इंडो-युरोपियन' हे नाव दिले. ती भाषा बोलणार्‍या लोकांना 'आर्य' नाव दिले.
  • मग आर्य, 'मध्य आशियातून भारतात आल्याचे सिद्ध करण्याचा उपद्व्याप झाला. आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत पुष्ट करण्याकरता त्याचा वापर झाला.
  • संस्कृतभाषा केव्हा, कशी निर्माण झाली? म्हणजे उत्पत्तीचा काळ कोणता? हे आधुनिकाला ऐतिहासिक पद्धतिनुसार ठरविणे असंभव आहे. आधुनिक इतकेच सांगतात की जगातले सर्वाधिक प्राचीनतम ऋग्वेदादि वेद हे ग्रंथ संस्कृतात आहेत. यापेक्षा अधिक कुणी काही सांगत नाही. संस्कृत भाषेच्या चिंतनात एवढाच समारोप त्यांनी केला व ते निवृत्त झालेत. संस्कृतेतर सर्व भाषा संस्कृतच्या आश्रयाने वाढल्या, समृद्ध झाल्यात. संस्कृत मात्र इतर निरपेक्ष स्वतंत्र व स्वयंसिद्ध आहे.
  • आधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञान असे सगळे संस्कृतात कसे आणता येईल? ते मॉडेल तर अमेरिका, युरोपने पुरविले आहे.' हा बकवाज आहे.
  • इंजिनिअरिंगला 'शिल्प' म्हणतात. प्राचीन भारतातल्या भृगु, भारद्वाज, अत्रि, मय, भगीरथ अशा असंख्य इंजिनिअरिंगच्या संहिता आजही उपलब्ध आहेत.
  • संस्कृतचे जगातल्या अन्य भाषाहून वैशिष्ट्य आहे. ते असे...... संस्कृतात शब्दाची तीन लिंगे आहेत. तीन वचने आहेत. सात विभक्ती आहेत. समास आहेत. तद्विताचे अनेक भेद आहेत. कृतन्त आहे. नामधातु आहे, सन्नन्त यडन्त आहेत. अशा अगणित शब्द घटना आहेत. तसेच संधिस्वरूप भेद आहेत. दीर्घ भेद आहेत. अस जगातील अन्य कोणत्याही भाषेत नाहीत.
  • जगात जितक्या संस्कृतेतर भाषा आहेत त्या सर्वच भाषा शे-दोनशे वर्षात रुपांतरीत होतात. त्या भाषा इतक्या बदलतात की त्यांच्यातील जुने लेखन दुर्बोध होते. संस्कृतात असे कधीच होत नाही. कारण संस्कृत ही देव व वेद यांच्याशी निगडीत आहे. म्हणून कोणीही मानव तिचे स्वरूप बदलू शकत नाही. अशी ही संस्कृत भाषेच्या वर्ण-पद-वाक्य या त्रिविध स्वरुपाची विशेषता आहे.
  • आज भारतीयांसह जगातले अन्य सर्व आंग्लछायेच्या बुद्धिवादी (वा बुद्धिखोर) लोक इंग्रजी भाषेला विविध प्रकारचे लेखन, प्रकाशन, अनुवाद अशा असंख्य साधनांनी समृद्ध करण्याकरता अविश्रांत धडपडत आहेत. प्राचीन व अर्वाचीन सर्व ज्ञान इंग्रजीत आणण्याकरता त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहे. तथापि एवढे करूनही या म्लेंच्छ (इंग्रजी) भाषेचे जे भयावह अधःपतन होते आहे, ते थांबतच नाही. हे अधःपतन कसे थांबवावे हे युरोप, अमेरिकतील आधुनिक महापंडित, भाषाशास्त्रज्ञांना कळेनासे झाले आहे. त्यांनी हात टेकले आहेत.
  • इंग्रजी म्लेंच्छ भाषा आहे. उच्चारण शक्ती रहित अविकसित वन्य मानवांची भाषा आहे. वन्य मानव 'अ' पासून 'ह' पर्यंतची वर्णामाला शुद्ध स्थितीत कधी तरी उच्चारू शकतो का ?
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Friday, December 24, 2010

॥ प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी महासमाधी ॥

मार्गशीर्ष शुद्ध ९, बुधवार, अर्थात दि. १५.१२.२०१० रोजी,
दुपारी ०१:५० मि.

  • दहावे: शुक्रवार दि. २४.१२.२०१०
  • अकरावे: शनिवार दि. २५.१२.२०१०
  • बारावे: रविवार दि. २६.१२.२०१०
  • तेरावे: सोमवार दि। २७.१२.२०१०
महाराजांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली
चिन्मय ब्रह्ममय झाले. अद्वैती मुरले. कणाकणांत भरून उरले.
घंटा आक्रंदली.... महाराज गेले...
आश्रमातील गाय व्याकुळतेने हंबरली.... महाराज गेले...
आश्रमासमोरील अश्वत्थ थरथरला ... महाराज गेले...
वृक्षावरचे पक्षी निश्चल झाले, वार्‍याची लाट लहरली... महाराज गेले...
कणाकणाने, क्षणाक्षणाने टाहो फोडला... महाराज गेले....
महाराज गेले?...
गेले कसले?
शरीर असून अशरीरी असलेले, शरीर असतांना कणाकणांत असलेले
अशरीरी महाराज जातील कसे?
भरलं आहे त्यांनी चराचर!...
आहेत ते कणाकणांत!...
आहेत ते क्षणाक्षणांत!...

शान्ति: शान्ति:



हे मूत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा!
मला त्याची खंत नाही
मी कुठल्याही मूर्त - अमूर्त शरीराने कार्यरत राहू शकतो.
ह्या शीतल चंद्र किरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करेन...
पर्वतावरून खळखळणारा झरा, ओढा, नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करेन...
समुद्राच्या लाटांच्या रूपाने मी नृत्य करेन...
मंद वार्‍याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पावले असतील...
... अशी ही माझी नित्य नूतन असंख्य रूपे जरा पहा तर.
त्या क्षितीजा पलीकडच्या शिखरावरून मी उतरलो,
आणि मृतांना संजीवन दिले. झोपी गेलेल्यांना जागे केले.
अनेकांचे निराशेचे मुखवटे दूर सारले. अगणित दु:खितांचे अश्रू पुसलेत.
सुंदर फुलांना, मधुर गायन करणार्‍या पक्ष्यांना मी न्याहाळले आणि त्यांचे सांत्वन केले
माझ्या स्पर्शाने सर्व विश्वाला पावन केले.
मूत्यू, तू देखील मला शोधू शकणार नाहीस.
करण मी इतस्त: सर्वत्र, दिशादिशांतून संचार करतो.
आणि तरी देखील मी कुठेच नाही
- गुरुदेव

Wednesday, December 15, 2010

कलियुगातील महायोगी गुरुदेव प.पू. डॉ. काटेस्वामीजी यांचा देहत्याग

कलियुगातील महायोगी गुरुदेव .पू. डॉ. काटेस्वामीजी यांनी आज (१५ डिसेंबर ) दुपारी वाजून ५५ मिनिटांनी त्यांच्या वडाळा महादेव (तालुका श्रीरामपूर, जिल्हा नगर) येथीलश्री गुरुदेव आश्रमा देहत्याग केला. देहत्यागाच्या क्षणी गुरुदेवांच्या समवेत त्यांचे उत्तराधिकारी .पू. भास्करकाका उपस्थित होते. गुरुदेवांच्या पार्थिवावर पू. भास्करकाका यांनी सायंकाळी वाजता आश्रमातच अग्नीसंस्कार केले. या प्रसंगी गुरुदेवांचे शेकडो भक्त आणि शिष्य उपस्थित होते.

यापुढेही आश्रमातील सर्व कार्यक्रम अव्याहतपणे चालू रहातील’, अशी माहिती गुरुदेवांचे शिष्य पू. स्वामी रामानंदनाथ यांनी या वेळी उपस्थितांना दिली.

Saturday, December 11, 2010


स्वातंत्र्याला साठ वर्षे उलटून गेलेल्या या भारत भूमीच्या जनतेकडे आंम्ही पाहातो तेव्हा आंम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. शेकडो आधुनिक कत्तलखान्यातून भारतात सर्रास गोहत्या होते आहे. गाय ही केवळ अर्थव्यवस्थेचा घटक म्हणून कोश वाड्मय व अन्यत्र लिहिल्या जाते. शिकविल्या जाते आहे. मनुस्मृति महामूर्ख म्हणून संबोधणाऱ्या विद्वानांची इथे चलती आहे. श्रीराम, श्रीकृष्णाची निंदा-नालस्ती करणार्‍या विद्वानांची इथे चलती आहे. शाळा कॉलेजातून संस्कृति विद्वेष पोसला जातो आहे. कुणाला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. ही शॉकप्रुफ अवस्था जगातले कोणतही संवेदनाक्षम मन ढवळून काढणारी आहे. अवदसा आहे.

अरे! या देशात शेंडीकरता हजारोंनी प्राणांचा होम केला आहे! गोरक्षणाकरता लक्षावधी माणसांनी आपल्या छातीचे कोट उभे केले आहेत. सोमनाथ मंदिर रक्षणाकरता ऐंशी सहस्त्र हिंदूनी आपल्या रक्ताचे सडे शिंपलेले आहे. जंगलातल्या वाघाला ताज्या रक्ताची चटक असते. त्यामुळे हवे ते करून तो मिळवू, अशी गुर्मी त्यांच्यात असते. प्राणिसंग्रहातल्या पिंजर्‍यात बंदीवान झालेल्या वाघाला मात्र बाहेर पडलो, तर जनावर मिळेल असे वाटतच नाही. त्यामुळे पुढ्यात येईल ते निमुटपणे खाण्याविना त्याला अन्य पर्याय उरत नाही. त्यांची मने मेलेली आणि मांसही मेलेले. मुदीड मनाचे आम्ही, आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. म्हणून तर गोमांस चवीने खाऊन, आमचे पाश्चात्याळलेले हिंदु गोहत्या बंदीची आंदोलने चालवतात. वाघासारखे आंम्ही आज त्यांचे शेळपट लाचार भेकड, झालो आहोत. आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. इंग्रजी छायेच्या पिंजर्‍यात आम्ही बंदीवान झालेले आहोत. पाश्चात्य छापाच्या हिंदु सुधारकाग्रणीनी स्वतः बरोबर आम्हालाही त्या पिंजर्‍यात कोंडले आहे.

विज्ञान व अधिभौतिक शास्त्रे कितीही वाढली तरी मानवाची अमृत तत्वाच्या, ज्ञानाकडील ही स्वाभाविक प्रवृत्ती कधीही कमी होणार नाही. आधिभौतिक शास्त्रे कितीही वृद्धींगत होवोत, सर्व आधिभौतिक सृष्टी विज्ञान, बगलेत मारून तत्वज्ञान नेहमीच त्यांच्या पुढे धाव घेत राहाणार.

***********************************

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा कॉंग्रेसने ठराव केला. १७ आक्टोंबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लीमांच्या भावना दुखवल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला. पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेस वर्किंग कमिटीने वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला. संस्कृतिद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्के पेक्षा अधिक सदस्य वंदेमातरम हे राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून जन गण मन हे राष्ट्रगीत २४ जानेवारी १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन ! त्या आधी दोन दिवस त्यांनी तसे घोषित केले आमच्या राष्ट्रीय चळवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वतंत्र राष्ट्र आहे की पार्लमेंट मध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे? काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.

- गुरुदेव डायरीतून

Sunday, December 5, 2010

अध्यास भाष्य!


ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्या आधी आचार्यांनी अध्यास भाष्य लिहिले. त्यात त्यांनी अध्यासाचे नेमके स्वरूप सांगितले. अध्यास म्हणजे काय? तो अध्यास कसा होतो. ते सांगितले. या अध्यासाचे परिणाम कसे भीषण आहेत, त्याचे विवरण केले. तो दूर का केला पाहिजे. याचे विवरण केले. तो कसा दूर करायचा ते दाखविले सांगितले.
अध्यास म्हणजे काय?
  • अध्यास म्हणजे अविद्या वा अज्ञान. असा अर्थ आहे. आचार्यांनी तोच अर्थ सांगितला आहे. शांकर भाष्यावर लिहिणाऱ्या थोर आचार्यांनी त्यात सूक्ष्म भेद केला आहे. सूक्ष्म छटा तिथे आहेत. शंकरांनी मात्र तसा काही फरक केला नाही. आमच्या बुद्धीचे समाधान होईल असे अध्यास भाष्य आहे.
अध्यासो नाम अनास्मिन तदबुद्धिः l
  • असे अध्यासभाष्यत विवरण आहे.
  • पूर्वी पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची दुस-यावर भ्रांति होणे म्हणजे अध्यास ! असते शिंपी परंतु भ्रांति होते रजताची. असते दोरी परंतु भ्रांति होते सर्पाची (रज्जुसर्प). असते वाळू परंतु भ्रांति होते जलाची (मृगजळ).
  • शिंपी ही वास्तविक शिंपी असताना अज्ञानाने त्यावर चांदीची मिथ्या भ्रांति होते. या भ्रांति वा भ्रमालाच अविद्या म्हणतात.

अविद्या-अज्ञान-माया-अध्यास
  • ही अविद्या वा माया नकारात्मक नाही. अभावस्वरूप नाही. ती भावरूप आहे. तिला अस्तित्व आहे. ती प्रत्यक्ष जाणीव आहे.
  • शंकरांचा केवलाद्वैत सिद्धांत आहे. यात अविद्या अथवा अज्ञान वा अध्यास या संकल्पनेला फार महत्व आहे. शंकरांचा केवलाद्वैत विचार या अध्यासाभोवती फिरतो. अध्यास म्हणजे काय ज्याला नेमके कळते, त्यांना अद्वैत वेदांत कळू शकतो.
  • ही माया (वा अविद्या) परमेश्वराची एक महाशक्ती आहे. ही मायाशक्तीच परमेश्वराला नानाविध रुपात प्रकट करते. या मायेच्या आवरणामुळे जीवाला स्वतःचे आत्मस्वरूप जाणता येत नाही आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो.
  • हा 'अध्यास' दूर करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम आहे.
  • वास्तविक एकमेवाद्वितीय ब्रह्म असताना अध्यासाने वा मायेने भेद दिसतात, नानात्व दिसते. अनेकत्व दिसते.
  • ही जी अविद्या वा माया वा अध्यास आहे. ती अस्तित्व असलेली जाणीव असली तरी ती पूर्ण सत्य नाही इतकेच. तसेच ती पूर्ण असत्यही नाही. कारण अध्यास वा मायेचे परिणाम अनुभवाला येतात म्हणून अध्यास वा माया सत नाही. असत नाही. सद्सत नाही. तर ती अनिर्वचनीय आहे.
  • शंकर या मायेले 'सद्सद अनिर्वचनीया म्हणतात. तिच निरुपण अशक्य आहे.
अध्यास - मायेचे परिणाम काय होतात?
  • सृष्टीतील सर्व पदार्थाचे वर्गीकरण शंकर स्थूलमानाने दोन वर्गात करतात.
१) युष्यद प्रत्यय गोचर आणि २) अस्मद प्रत्यगोचर,
  • दोन्ही वर्गातील पदार्थ परस्पराहून अत्यंत भिन्न असताना अध्यासामुळे आपण त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप करतो आणि त्यातूनच लोकव्यवहार सुरु होतो.
युम्यद - अस्मद - प्रत्यय - गोचरयोः l
तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः l
सत्यानृते मिथुनीकृत्य अहमिदं ममेरम इति l

हा जो सत्यानृताचा लोकव्यवहार आहे, तो मिथ्याप्रत्यय रूप आहे. अध्यासामुळे जीव हा उपाधीशी एकरूप होऊन कर्ता, दुःखी व जन्ममृत्यूच्या फे-यात अडकणारा जीव होतो. द्वैतात अडकतो.
वास्तविक आत्मा निर्गुण निराकार, अकर्ता, अभोक्ता असताना अध्यासामुळे सगुण साकार कर्ता, भोक्ता होतो. तो कसा?
  • अध्यासामुळे ब्राह्मधर्म (पुत्र, पिता, बंधु) इंद्रियधर्म (अंध आणि पंगु) अंतःकरण धर्म (बुद्धि, इच्छा) यांचा निर्गुण निराकार। निष्काम आत्म्यावर अध्यारोप करतो. म्हणून तो जीवात्मा कर्ता, भोक्ता होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Friday, November 19, 2010

विद्या व तपाने सर्व भूतांचा अंतरात्मा तृप्त होतो.


  • पुराणात कसलाहि दोष नाही. ते पूर्णतः निर्दोष आहेत.
  • पुराणात वेदाची प्रतिष्ठा आहे. पुराणातला कोणताही अंश वेदविरुद्ध नाही. वेद जसे परमात्म्याचे निःस्वास आहेत. तसेच पुराणे ही परमात्म्याचे निःश्वास आहेत. फक्त त्यात फरक इतकाच आहे की वेदांची आनुपूर्वी कधीच बदलत नाही. कल्पानुसार पुराणांची आनुपूर्ती बदलते. अर्थाचा आशय जसाच्या तसाच असतो.
योगार्थ
  • वेद, उपनिषदे, महाभारतादि घटना प्रसंगाच्या संदर्भात आधुनिक यौगिक अर्थ प्रतिपादन करतात. तोच अर्थ ग्रहण करावा अस सांगतात. नवे नवे योगिक अर्थ बसवितात. हा प्रमाद आहे.
  • योगापेक्षा रूढी, परंपरा अधिक बलवती असल्याचे शास्त्रे सांगतात. तो लौकिकार्थ वा रुढार्थ आहे. तो मुख्य. त्या रुढार्थाच्या पुष्टीकरता योगिक अर्थ अपेक्षित असतात. आधी रुढार्थ वा लौकिकार्थ, तो ग्रहण करण्याकरताच योगार्थ ! तस नसेल तर अनर्थ होतील 'गो' हा शब्द आहे. गाय शब्द उच्चारताच सास्नादि अशी गाय डोळ्यासमोर उभी राहाते. योगार्थ जर स्वीकारला तर लक्षणावृत्तींचा आश्रय घ्यावा लागतो. ते तर अत्यंत अनुचित आहे. योगिक अर्थ स्वीकारण्यात आणखी अनेक दोष आहेत. 'विश्वामित्र' वगैरे शब्दात यौगिक अर्थ असंभव आहेत.
  • पुराणांचे लक्षण,.....
व्यासादि मुनिप्रणीतं वेदार्थप्रकाशकं पंच लक्षणान्वित शास्त्र l
  • पुराणांची पंच लक्षणे कोणती?
१) प्रवृत्ती,
२) स्थिती,
३) संहार,
४) धर्म व
५) मोक्ष
पुराणे
  • पुराणांचा अभ्यास करूनही आधुनिकांना त्याचे मर्म कळत नाही. ते शंका कुशंकांनी व्याकूळ असतात. ते आस्थाशून्य असतात. स्वतःच्या दोषामुळेच त्यांचे पतन होते.
  • आम्ही सनातनी अद्वैती आहोत. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ची वाटचाल करणाराच्या हातून अधर्म घडतच नाही. घडूच शकत नाही. तो मत्सर ग्रस्त कसा होईल?
  • मनु सांगतात, - सर्वांचा शासक, अणूहूनही अणू, सुवर्णाभ- निर्विकार, बुद्धिगम्य तो परमपुरुष जाणणारा सर्वांना पंचभूतात्मक शरीरांनी व्यापून जन्म, वृद्धि, क्षय द्वारा नेहमी चक्राप्रमाणे फिरवणारा, समाहित होऊन सदस आत्म्यात सर्व काही पाहाणाराचे मन कधीच अधर्म करत नाही. करू शकत नाही.
  • अद्वैती महापुरुषात असुया, ईर्षा असे दोष असूच शकत नाहीत.
  • सर्व भूतात आत्म्याला आणि आत्म्यात सर्वभूतांना समान पाहाणारा, त्या ब्रह्मा वरच इहलोक परलोकादि चिंता सोपवून निश्चिंत असतात त्यामुळे त्यांना दोष स्पर्शूच शकत नाहीत.
  • पुराण श्रवण धर्मराज्याची स्थापना करण्याची पहिली पायरी आहे. धर्मो रक्षति रक्षितः l
  • धर्मानुसार वागताना देखिल विपत्ती का येतात? या विपत्ती देवाकडून येतात, तेव्हा तिच्या सुटण्याचे उपाय प्राप्त होतात. उपासकाला ते समजतात. विपत्तीत उत्साह व गुणांची परीक्षा करायची असते. परमात्मा भक्तांना संकटात आणून नंतर विपत्तीतून त्याचा उद्धार करतो. धर्मो रक्षति रक्षितः l हाच धर्म !
धर्म एव हतो हन्ति l
  • न आचरलेला धर्म त्याचा नाश करतो। असत्य, अशुचि, दुराचारी माणसावर आलेली संकटे, देवाकडून आलेले नाहीत. ते अनाचारामुळे आलेले असते. त्याची ईश्वर उपेक्षा करतो. त्याचे अधःपतन होते. उत्तरोतोत्तर तो खाली जातो. नष्ट होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Friday, November 12, 2010

मेरा देश महान



गुरूदेवांची अमृतवाणी ही चिरंतन टिकणारी आहे.
कारण मानवी जीविताचे रहस्य उकलून दाखविणारी ती आहे.
देशाची मान आणि कणा ताठ नसेल तर हिंदुस्थानला जागतिक महासत्ता बनून काय उपयोग?
ब्रिटीश गुलामगिरीचे जोखड झुगारून आम्ही जे स्वातंत्र्य मिळवले, ते का या स्वकीयांची व परकीय कंपन्यांची आर्थिक गुलामगीरी पत्करण्यासाठी?
मेकॉलेच्या काळापासून ब्रिटिशांचे भारता संबधीचे धोरण हे परकीय (पाखंडी Godless) शिक्षण देऊन हिंदुधर्म व संस्कृतिची हत्या करणे, हिंदूंना परंपरेने प्राप्त झालेला बौद्धिक वारसा नष्ट करणे आणि भारताचे सर्व प्रकारे युरोपियनिकरण करणे हे होते. त्यांत ते विलक्षण यशस्वी झालेत.
सावधान ! सावधान !!
पाश्चात्य संस्कृती व civilization च्या प्रभावाखाली असलेली आधुनिक त्या पाश्चात्य विचारांशी, भावनांशी, जीवन जगण्याच्या पद्धतीशी इतके एकरूप झालेला आहे की, त्यांच्याच अनुरोधाने तो विश्वाचा रचनेचा कार्यपद्धतीचा अर्थ लावीत आहे. आणि आमची सर्वच्या सर्व प्राचीन दर्शन शास्त्रे, तत्त्वप्रणाली, समाजशास्त्रे परंपरा यांना तुच्छ मानतो. त्याला विचार करता येत नाही. तो केवळ संकलन करून अर्थ लावू पाहातो आणि जीवन नरकमय बनवतो.
समाज जातिविना एकसंघ राहूच शकत नाही. हिंदु समाज जाति संघटित आहे. म्हणून बलवान आहे. जातिसंस्थेचा विध्वंस करणे म्हणजे हिंदु समाज रसातळाला नेणेच आहे.
भारताची दुर्दशा कोणी केली?
* भारतातली उदारमतवादी, निधर्मी, समाजवादी लोकशाहीची स्थापना !
* बुद्धीवाद व विज्ञान निष्ठांच प्रबोधन !
* उच्चार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, अभिरुचि स्वातंत्र्य, भ्रष्टाचार स्वातंत्र्य, स्वैराचार स्वातंत्र्य !
* स्वातंत्र्याच्या ६० वर्षाची खंडीत भारताची विश्वातील सर्वाधिक अद्भूत गतिमानता !!
('मेरा देश महान' या पुस्तिकेतून)

Friday, November 5, 2010

आम्ही केव्हा जागणार?

  • १९३६ साली दिनोवास्का ही पोलिश युवती भारतात होती. ती लिहीते, ''कोणत्याही हिंदुच्या चेहेर्‍यावर द्वेषाचे चिन्ह आम्हाला कधीच दिसले नाही वा क्रोधाची पुसटशी रेषाही आढळली नाही. पश्चिमेत ही गोष्ट केवळ अशक्य.
  • आज पश्चिमी संस्कृतीच्या अंगीकरणाने इतिहासात कधी नव्हता इतका वैफल्यग्रस्त आणि दुःखी बनला आहे. नरकयातना देणार्‍या या विज्ञानयुगाच्या, Sophisticated संस्कृतीच्या संकल्पना, भारतीयावर बेगुमानपणे, जबरीने लादल्या गेल्या. विळख्यात अडकले आहे. सगळ्या संकल्पना वैदिकांची समग्र शास्त्रे मनु आदि स्मृतिकार यांच्यावरच मंडनात्मक स्वच्छ. स्पष्ट भाष्यच आहे.
  • आणखी ती सांगते, 'उपजतच करुणा आणि हृदयाची परम ऋजुता त्यांच्यात खरीखुरी बंधुता बंधुभाव निर्मिते. बंधुता, समानता आणि स्वातंत्र्याची बिरुदावली मिरावणार्‍या जगातील अन्य राष्ट्रात त्याचा अल्पांशहि अभावानेही आढळत नाही. हिंदु रक्तातच अखिल मानवाविषयी प्रेम आहे. बंधुता आहे. समानता आहे. परकिय केवळ दंभाचारी आहेत.'
  • प्रेडेरिक पिंकाट छातीठोकपणे निर्भय स्वच्छ वस्तुस्थिती सांगतो, ''समाजाला आणि विश्वाला शांति आणि सुख देणारे जे काही आहे, त्या सर्वांचेच हिंदूंनी एक पद्धतशीर शास्त्रच बनविले आहे. समाजरचना, समाजव्यवस्था वा सामाजिक बाबीसंबंधी हिंदुना काही सांगावे, शिकवावे असे आमच्याजवळ काहीच नाही.''
  • तो पिंकाट पुढे इशारा देतो, ''आज आमच्या पश्चिमी देशात जो काही निर्लज्ज, स्वैराचारी गोंधळ आहे, तसा निलाजरा बेगुमान, आसुरी गोंधळ, या हिंदु समाजातही होईल, जर आम्ही (पश्चिमेने) आमच्या आसुरी ओबडधोबड सुकल्पना या निरागस, निष्पाप हिंदूच्या गळी उतरवल्या तर, पश्चिमी प्रणाली, संकल्पना सरळ हिंदुचे अपरिमित अहित करतील.
  • पश्चिमी जीवनाची धारणी, धारणाच मुळी स्वार्थाची, लोभाची आहे. भोगसाधनाकरता तिथे गळेघोर स्पर्धा आहे. त्यामुळेच उपस्थ, जिव्हेच्या लालसा भडकवणारा (शमवणारा नव्हे) बेगुमान आसुरी गोंधळ आहे. प्रेडेरिक पिंकाट या प्रामाणिक तळमळीच्या शास्त्रज्ञाचा इशारा आम्हाला सावध करायला समर्थ नाही का? आमच्या निलाजरेपणाला तुलना नाही.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Saturday, October 30, 2010

संस्कृत का मृतभाषा आहे?

का मृतभाषा आहे?


''भारत केवळ त्याला अपवाद आहे.''
जगातला असा कोणता शिक्षणशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ आहे की जो शिशुशिक्षणाकरता इंग्रजी माध्यम पुरस्कारतो?
जगात असा कोणता देश आहे की जिथे शिशुशिक्षणाकरता परकीय भाषा माध्यम म्हणून वापरतात?
''भारत केवळ त्याला अपवाद आहे.''
*****
आजच्या संस्कृतची दुर्दशा
पारंपरिक संस्कृत शिक्षण आता प्राणहीन झालेले आहे. आज या देशात secular लोकशाही आहे. या देशाची राजनीती म्हणजे पक्षनीती आणि पक्षनीती म्हणजे निवडणूक नीति ! निवडणूकनीति म्हणजे काय, हे का सांगायला पाहिजे? मद्य, पैसा, प्रलोभने, सत्तालालासा, दादागिरी, यांचा गदारोळ !
*****
''अशा या भीषण प्रसंगी तुम्ही संस्कृतचा प्रसार कसा करणार?''
संस्कृत भाषा आणि सांस्कृतिक विद्या यांची पुनःप्रतिष्ठापना करण्याकरता आधी आम्ही भाषेत म्हणजे भाषणात, व्यवहारात संस्कृतचा वापर सुरु करू. भारताची प्रत्येक भाषा गुजराथी, बंगाली, असामी, कानडी, तेलगु, तामिळ, मराठी, अशा सगळ्या भारताच्या भाषा संस्कृतनिष्ठ होतील असे प्रयत्न करू. त्यातून संस्कृत शब्दाचे प्रमाण खूप वाढलेले असेल. म्हणजे संभाषण, बोलणे यातून संस्कृत आणायची. व्यवहाराची भाषा संस्कृत !
*****
संस्कृतपासून ज्ञान संपादण्याची आजच्या दार्शनिकांची अहर्निश धडपड सुरु आहे. भारतीयांची अस्मिता भ्रष्ट झाली आहे. आत्मविस्मृतीचा रोगाने भारतीयांना पछाडले आहे. संस्कृत का dead language आहे? संस्कृत तर ज्ञानदीप आहे. ज्ञानाच्या प्रकाशाकरता विख्यात वैज्ञानिक, दार्शनिक तिकडे बघतात. तिला भारतीय करंटे dead म्हणतात.
Is Sanskrit a Dead Language ?
  • संस्कृत बोलण्याला अतिशय सोपी आहे. शासनाची भाषा तीच होऊ शकते. पाश्चात्य पौर्वात्य अशा अनेक तज्ञांचे तसे अभिप्राय आहेत.
  • संस्कृत भाषा विलक्षण लवचिक आहे. ताणाल तेवढी ताणता येईल. ती तर संजीवनी सारखी आहे. प्रसंगी ती पुन्हा नवीन होऊ शकते.
  • पाणिनी, कात्यायन, पतंजली यांच्या पासून तर आजवरचा इतिहास जरा डोळसपणे विरोधकांनी पाहावा. भारताची संस्कृति व इतिहास जरा डोके ठिकाणावर ठेवून वाचा.
*****
''आजच्या वैज्ञानिक व औद्योगिक विषयांची अभिव्यक्ती संस्कृत कशी करू शकेल?'' शिवाय संस्कृत ही अत्यंत कठीण भाषा आहे.''
का बरं ? संस्कृत जशी कठीण आहे, तशीच ती अत्यंत सोपी आहे. हॉलंड मध्ये संस्कृत शिकवतात. तिथे केवळ तीन महिन्यात विद्यार्थी आपापसात संभाषण करू शकतात. जपानमधल्या चौदा विद्यापीठापैकी चार विद्यापीठातून संस्कृत शिकवले जाते. तिथे तर यापेक्षाही कमी अवधी लागतो. आणि आमचाही तसाच अनुभव नाही का? विज्ञान आणि औद्योगिक संस्कृतीशी संबंधित अभिव्यक्ती करायला संस्कृत इतकी अत्यंत साधक भाषा सापडणे कठीण.
*****
''आज इंग्रजी भारताची राज्यभाषा आहे.
इंग्रजीचे उच्चाटन कसे करणार?''
''संस्कृतचे आसन इंग्रजीच्या आसनासोबत आम्ही मांडू. संस्कृतच्या सहाय्यानेच इंग्रजीचे उच्चाटन केले पाहिजे.''
*****
जेव्हा ति आनादि संस्कृतवाणी, ती देववाणी dead language म्हणून घोषित होते,.....
जेव्हा ति Lost Language म्हणून निर्देशिली जाते,......
जेव्हा त्या संस्कृतीचा लय होतो,......
वर्ण, सदाचार, सद्गुण, सत्कर्मे, धर्म, संस्कृति हे असे सगळे dead होतात.
संस्कृत गेले की संस्कार मावळतात।
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Sunday, September 26, 2010

जो हिंदुहितपर हात उठायेगा...!


आजची पश्चिमी जीवन धरणी आणि विज्ञानवाद, आजची औद्योगिक संस्कृती आत्मघातकी आहेत. ही जीवन प्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतीयांची अस्मिता पायदळी तुडवणारी आहे. भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे. भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिक-या उडवणारी आहे. आमच्यात धुरीणींनी, शासनाने त्यांचा अंगीकार करून आमच्या सत्वाचे, अस्मितेचे नरडेच आवळले आहे.

ही आत्मघातकी धारणा, ही अमानुषता अमानवीयतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतन धारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य, Emotional Integrity, अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखण्याची, सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे. पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट बनविला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे. Standard of Living, समाजवाद, Economic Development , कल्याणकारी शासन हे सगळे बिनबुडाचे Superficial अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या 'कल्पना' जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत. रशियन, अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणांत, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की शील, त्याग, तेजस्विता, आत्मनिर्भरता उफाळून येईल.

रामायणाची ही ताकद आहे. 'हा भारत माझा देश आहे, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे, याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणीवा तो माझा दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण, ही अतूट श्रद्धा, ही भावना रामायणाने सहस्रश: वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.

रामायण चिंतनाने हीच धारणा, हे श्रद्धा, व्यक्तीत, जाती - जमातीत, समाजात एकत्र विनासायास फोफावते. रामायण असे राष्ट्र ममत्व निर्माण करते, जोपासते, संबधित करते. त्यातच अनुशीलन, अनुमाप होणे, आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे.

भारत अखंड, एकात्म राखणारी सहस्रश: वर्षांपासून गंगा ब्रह्मपुत्रेसारखी अखंड वाहणारी ही रामकथा आमच्या पाठीशी खडी आहे. ही भावना, ही श्रद्धा आमच्या युवकांच्या मानसांत दृढमूल झाली की आपला तरुण शीलवान संयमी, मर्यादा सांभाळणारा आणि कर्तव्यकठोर, प्रज्ञावान, तेज:पूंज, होईल. हां हां म्हणता भारताची अखंडता, तेजस्वीता, गुणवत्ता, प्रज्ञा जगासमोर सूर्यासारखी तळपेल. विश्वाचे गुरुत्व भारताकडे विनासायास येईल.

- .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका (साप्ताहिक सनातन चिंतन वर्ष ५ अंक ३२)

Friday, September 3, 2010

भगवत प्रेम कसे असते!


जयति जयति कृष्ण देवकिनन्दनो य:।
वसति वसति चित्ते मोहनिर्नाशकोऽसौ॥

अवति अवति धर्मं सत्यरूपं परात्मा।

चरणशरण मास्तां वासुदेवं नमामि॥

श्रीकृष्ण एकेकी मृत्यूची घरघर सुरू व्हावी अशा विलक्षण आजाराने ग्रासला. तो बराच वेळ बेशुद्ध होता. भानावर आल्यानंतर अंथरुणावर सारख्या करवटी बदलत मोठ्याने कण्हत होता. त्याचे सर्वांना जीवन व प्रकाश देणारे कांतिमान कमलमुख कोमेजले होते. त्याचे गोपाल सखे, गोपी, नंद, यशोदा, सगळेच दु:खातिशायाने सुस्कारे सोडत होते. वृंदावनातील प्रत्येक जण भीतीने थरथरत होता. त्यांचे सर्वस्व असा श्रीकृष्ण! त्यांच्या अस्तित्वाचा अंत तर होणार नव्हता? सर्वस्व असणा-या श्रीकृष्णाने सत्याच्या समक्ष अशा भयानक यातना सहन कराव्यात? चिकित्सक आलेत आणि गेलेत. हतबुद्ध चित्ताने त्यांनी माना हलवल्या, त्यांना त्या विलक्षण रोगाचे निदान काही होईना.

नंद व यशोदा हतबुद्ध झालेत. अखेरीस त्यांने श्रीकृष्णाला विचारले, "आता तूच तुझ्या आजाराचा उपाय सांग!" दु:खाने कण्हत कण्हत श्रीकृष्ण उद्गारला, "या पवित्र वृंदावनातील माझा एखादा भक्त माझ्या डोक्यावर त्याच्या पायाची धूळ झाडेल, तर तत्क्षणी माझा आजार दूर होईल!" यशोदा नंद तयार झालेत.

श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्ही माझे माता पिता आहात, बलराम थोरला भाऊ! तिघे वर्ज्य करून वृंदावनातील कोणाही भक्ताची चरणधूळ..."

वार्ता वृंदावनात पसरली.

पुतना, अधासूर, धेतकासूर अशा राक्षसांचा वध करणारा, कालीयामर्दन करणारा, गोवर्धन उचलणारा, वणवा गिळून टाकणारा, श्रीकृष्ण हा साक्षात परमात्मा आहे, अशी वृंदावनवासियांची खात्री होती. आपल्या अपवित्र पायाची धूळ साक्षात परमात्म्याच्या माथ्यावर झाडायला कोण तयार होईल? त्यांचा उत्कट भक्तीभाव आड येत होता. वार्ता पसरता पसरता वृंदावनाजवळच्या गांवी असलेल्या राधेच्या कानी गेली. ती ओरडली, "काय? माझा कृष्ण आजारी आहे? त्याला भक्ताची चरणधूळ हवी आहे?"

ती धावत आली, सरळ नंदाच्या वाडयात आली. श्रीकृष्णाच्या अंथरुणाजवळ गेली आणि क्षणार्धात तिने आपला पाय श्रीकृष्णाच्या डोक्यावर ठेवला. श्रीकृष्णाविना मन, जीवन नसलेल्या अतुलनीय, परमोत्कट भक्त अशा राधेच्या चरणस्पर्शाने श्रीकृष्ण तात्काळ बारा झाला.
गुरुदेवांनी सांगितलेल्या कथा (घनगर्जित वर्ष ९, अंक ५)

******************************

गुरुदेव,

तर्केषु कर्कशधियो वयमेव नान्ये
काव्येषु कोमलधियो वयमेव नान्ये ॥
तन्त्रेषु यन्मितधियो वयमेव नान्ये
कृष्णेषु संयतधियो वयमेव नान्ये ॥

(तर्कशास्त्रात आपल्यासारखा कठोर आणि काटेकोर अन्य कोणी नाही। काव्यरचना आणि काव्याच्या आस्वादात आपल्यासारखा कोमलमनी अन्य नाही। तांत्रिक उपासनेत आपल्यासारखा सुनियंत्रित अन्य नाही। ... आणि 'कृष्णाच्या' आराधनेत आपल्यासारखा सयंतचित्त अन्य नाही.)

Saturday, August 28, 2010

देव आहे का?


कितीही मोठे विशाल आणि नियमबद्ध विश्व असू देत, ते 'कार्य' आहे. ही सृष्टी कधी ना कधी झाली आहे. सृष्टी निर्माण कार्य झाले आहे. या (विश्व) कार्याचे मूळ (कारण) असलेच पाहिजे. जसे एका मडक्याचे उपादान कारण 'माती' आहे आणि निमित्त कारण 'कुंभार' आहे. (देश, काल, वगैरे साधारण कारण आहेत). एक मडके करायचे म्हणजे किती अगणित क्रिया कराव्या लागतात. मडकं पाहिलं की त्याच्या निर्मात्याची आठवण होते. तो निर्माता 'मानव' कुंभार असलाच पाहिजे, असं आम्ही अनुमान करतो. कारण मडकं बनविणारा कुंभार आम्ही पाहिलेला असतो. याप्रकारे कोणतेही 'कार्य' पाहून त्याच्या कर्त्याचे अनुमान होणे स्वाभाविक आहे. अशी अगणित कार्ये आहेत, ज्यांची निर्मिती मानवाकडून होणे असंभव आहे.

जसे बीज उगवते, वृक्ष होतो, सूर्य उगवतो, मावळतो. भूकंप होतात, सागर मर्यादा धरतो, वायू वाहतो, मृत्यू धावाधाव करतो, या सर्व कार्यांचा कोणी 'कर्ता' असलाच पाहिजे. नास्तिक हा टेबल-खूर्ची बनवणारा सुतार अवश्य आहे, असे सांगतो. पण, वृक्ष पहाड, महासागर बनविणारा कुणी कर्ता मानलाच पाहिजे असे नाही, असे म्हणतो. त्याची आवश्यकता अपरिहार्य आहे, असे मानत नाही.

विश्वाचे सगळे कार्य दोन प्रकारचे आहे. एक 'मानव कृत' व दुसरे 'अमानवी' दोन्ही प्रकारच्या कार्याचे 'कारण' (Cause) आहेच. अनुमान प्रमाण स्वीकारल्याविना आस्तिक नास्तिकच काय पण पशूंची देखील प्रवृत्ती व्हायची नाही. अनुमान न मानले तर प्रत्यक्षही निरर्थक होते. या अनुमानाच्या आधारावरच मानव करू शकणार नाही, असे अद्भुत विश्व, त्या विश्वातील अनंत चेतन अचेतानांची कर्मे, आदींचा कर्ता असलाच पाहिजे, हे सिद्ध होते. सुताराविना टेबल खुर्च्या होऊ शकत नाहीत, कुंभाराविना मडके होत नाही, तर मग त्या परमात्मशक्तीविना, त्या अनंत चेतन शक्तीविना चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या आदी काहीही होऊ शकत नाही. ज्ञान, इच्छा, आणि क्रियाशक्ती असल्याविना 'कार्य' घडत नाही. ज्ञानाविना इच्छा नाही. इच्छेविना कार्य नाही. जिथे ज्ञान आहे, इच्छा आहे आणि क्रिया आहे, तेथे कर्ता असतोच. प्रत्येक कार्याला कर्त्याची अपेक्षा असतेच. प्रत्यक्ष ज्ञान आणि इच्छा दिसत नाही आणि 'कार्य' दिसते. कमळ पहिले की, विचार येतोच की, हे सुंदर कमळ कुणाच्या तरी ज्ञान व इच्छाक्रियेने निर्माण झाले असले पाहिजे, तसेच या विश्वाचे कारण आहे.

-.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङमय प्रकाशन संवाद पत्रिका क्र. १५ (देव आहे का?)

Saturday, August 21, 2010

सनातन हिंदुधर्म !

आधुनिक हिंदुत्ववाद्यांचा जो हिंदु राष्ट्रवाद आहे , ज्याचा मोठ्या प्रमाणावर हिरिरीने प्रसार करतात त्याचा संबंध सनातन हिंदु धर्म संस्कृतीशी आहे किंवा नाही ? आधुनिक हिंदुत्ववाद्यांच्या सनातन हिंदुधर्माशी सुतराम नाही . तो राष्ट्रवाद नाही . तो हिटलरी पद्धतीचा आहे . त्याला वेदाचे आणि ईश्वराचे अधिष्ठान नाही . आणि हेच या पुण्यभूमी भरतखंडाकरता फार फार खेदजनक आहे . महान दुर्भाग्य आहे .

सांख्य दर्शन सांगते , 'सत्व पुरूषान्यता ख्याति रूप ' विवेकाकरता सत्वगुणाचा उत्कर्ष अटळ आहे . त्या करता निष्काम स्वधर्मानुष्ठान अपरिहार्य आहे . धर्माचे ज्ञान वेदावरूनच होते , असेच 'सांख्य' देखिल सांगते . योगदर्शनानुसार चित्तवृत्ती निरोधरूप योग स्वधर्मानुष्ठानानेच होतो . स्वधर्माचे ज्ञान वेदावारूनच होते . कारण सांख्य योग दोन्ही वेदांचेच प्रामाण्य स्वीकारतात.

जैमिनिचे 'मीमांसा दर्शन ' तर 'धर्ममीमांसा' म्हणूनच प्रसिध्द आहे . भटट्पाद श्री कुमारिल जैमिनि दर्शनाचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत . चोदनालक्षणोर्थो धर्म: / असे धर्माचे लक्षण ते करतात . याचा अर्थ प्रवर्तक ( विधी ) निवर्तक (निषेध ) वेदवचनावरूनच धर्म अधर्माचा बोध होतो .

नवनवोन्येष शालिनी प्रज्ञा म्हणजे 'प्रतिभा !' push button answer च्या प्रभावात असलेल्या Scientific-Temparament वाल्या आधुनिकांना प्राप्त होणे असंभव रामायण , महाभारताच्या तोडीचे ग्रंथ आज निर्माण होणे असंभव . ज्ञानदेव , तुकाराम , रामदासादि संत वा चाणक्यांच्या राजनीतिवरचा ग्रंथ निर्माण होणे असंभव ! ही प्रगती आहे का अधोगती .
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, August 14, 2010

नागपंचमी!


विष्णूपासून निर्माण झालेला शेषनाग : शेषनाग आपल्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, म्हणजे तिचा भार वहातो. तो पाताळात रहातो. तो ज्ञानी आहे. त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली आहे. त्याला सहस्र फणे आहेत. त्याच्या प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. महासागरात या अशा शेषासनावर विष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती शयन करतो.

भगवंताच्या अवतार कार्याशी संबंध : नाग भगवंताच्या अवतार कार्याशीही निगडित आहे. जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो व त्यामुळे देवाच्या भक्‍तांना दुर्जनांकडून जाच होतो व त्यांच्या ईश्‍वरोपासनेत बाधा निर्माण होते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. धर्माची स्थापना करून तो हजारो वर्षांसाठी हा भूलोक साधनेसाठी अनुकूल बनवतो. निर्गुण परंतु सर्वशक्‍तीमान असा ईश्‍वर कोणत्या तरी रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन कार्य करतो, तेव्हा त्या कार्यासाठी `त्याचे सेवक' या नात्याने अन्य देवता वेगवेगळी रूपे धारण करतात व या धर्माच्या कार्यात भाग घेतात. शेषनागाचे स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रेतायुग व द्वापारयुग यांच्या संधीकाळी श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापारयुग व कलीयुग यांच्या संधीकाळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेषनाग बलराम झाला. नागाचे देवत्व सांगतांना गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, ```नागांतील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी !'' `नागातील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी', अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही।'

(संदर्भ : .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक ।)

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने...!

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा ठराव काँग्रेसने ठराव केला. १७ ऑक्टोबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला.
पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेसने वर्किंग कमिटीने 'वंदे मातरम' या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला.

संस्कृतीद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्क्यांहून अधिक सदस्य 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून 'जन गण मन' हे राष्ट्रगीत २४ जानेवारी, १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन. त्या आधी २ दिवस त्यांनी तसे घोषित केले. आमच्या राष्ट्रीय चवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वंतत्र राष्ट्र आहे की पार्लमेंटमध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे?

काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.

Saturday, July 31, 2010

सद्गुरुं तं नमामि!



  • ईश्वराची कृपा झाली की गुरुप्राप्ती होते
  • साक्षात शिव हे मानवी रुपात गुरुरुपणे प्रकटतात.
  • गुरुकृपेनेच अज्ञान मावळते आणि अद्वैतात प्रतिष्ठा होते .
  • ईश्वराचे सत्यस्वरूप अन्य कोणत्याही रूपाने कळू शकत नाही. केवळ गुरुकृपेनेच ते आकळू शकते.
मुमुक्षूला शास्त्रांचे संपूर्ण ज्ञान असून तो गुण संपन्न असला तरी गुरुविना तो ब्रह्मैत्म्यत प्रतिष्ठित होऊ शकत नाही. गुरूकडे जाऊन आणि त्यांच्या नियंत्रणात स्वत:चे व्यक्तिमत्त्व ठेऊनच मुक्ती सिद्ध होते. सद्गुरू ही शर्त अपरिहार्य आहे.

गुरुसेवा करायची?
तिचे चार प्रकार आहेत.

१. आप्त: - गुरूंना रुचतील तीच कर्मे करणे.
२. अंग: - गुरूंच्या सगुण देहाची शुश्रुषा, पाय दाबाने, डोके चोळणे, वगैरे.
३. स्थान: - गुरूंच्या मालकीच्या वस्तूंची काळजी घेणे.
४. सद्भाव: - साक्षात परब्रह्म मानून गुरूंचे ध्यान करणे.

गुरुदेव डायरी -

१. कर्मकांडाचा आनंद फळ, परमशांती, भगवत्प्राप्ती हेच आहे. "अर्थप्राप्तीकरता कर्मकांड आचरण ते गौण फळ आहे. धनाचा मुख्य हेतू धर्मानुष्ठान! धन मिळाले तर यज्ञ करा, दान करा, तप करा, परोपकार करा, इष्ट पुर्त कर्मे करा. राष्ट्रसेवा करा. दीनांना दान द्या.

२. काम हा पुरुषार्थ आहे, जीवनधारणेपुरता काम, म्हणजे खाणे-पिणे! शरीरस्वास्थ्याकरता ते अटळ आहे. शरीरस्वास्थ्य कशाता? भगवंताच्या भजनाकरता, अनुष्ठानादी कर्माता उद्दिष्ट, ध्येयाची पवित्रता अटळ आहे.

३.
गुरुजी: "बेटा, तू लोणी खातोस, बदाम पिस्ते घोटून घोटून पितोस?
पहिला शिष्य: "गुरुजी, आमच्या चाळीत पलीकडे एक गुंड राहतो. तो उन्मत्त झाला की मुलीबाळीची अब्रू देशोधडीला लावेल. तसे घडले तर आम्ही त्याचे मस्तक तोडू. म्हनुउन आम्ही बदाम, पिस्ते खातो."
गुरुजी: "शाब्बास पठ्ठे! खूप बदाम पिस्ते खा! मोठे पुण्य आहे. करण हेतू पवित्र आहे."
गुरुजी दुसर्‍या शिष्याला विचारतात, "तू बदाम पिस्ते का खातोस?"
दुसरा शिष्य: " शेजार्‍याचे मस्तक तोडण्याकरता."
गुरुजी: "दोन बदाम पिस्ते खाणे, हे तुझ्याकरता पापाचे आहे."

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका घनगर्जित (वर्ष ९ अंक ०४ )

Wednesday, July 28, 2010

सहस्रावधी पाश्चात्त्यांना पुरून उरलेला सनातन धर्म !

. अमेरिका आणि युरोप यांची तर विलक्षण वैज्ञानिक प्रगति झाली आहे; परंतु अजूनही शुचितेच्या साध्या गोष्टीही त्यांना ठाऊक नाहीत. ‘सॅनिटेशनच्या बाबतीत ते अशुचि आहेत. त्यांच्या शौचाला पाणी नसते, तर ते कागदाचा वापर करतात आणि सांगतात की, `तो निर्जंतुकीकरण केलेला (sterilized) कागद आहे.'
या विसाव्या शतकात इंग्रजाळलेले पुष्कळसे हिंदू, मात्र आज कागदाने ढुंगण पुसतात. गोर्यांपासून त्यांनी हा रानटीपणा उचलला आणि अभिमानाने सांगतात, `हा कागद रोगजंतूपासून अलिप्त राखणारा आहे।'

. उद्दाम, राक्षसी आणि महामूढ तामसी पाश्चात्त्यांनी आणि त्यांचे बूट चाटणार्या पुरोगाम्यांनी गेली दोन शतके आमच्या सनातन सत्याचा विध्वंस केला, तरीही सहस्रावधी पाश्चात्त्य हिंदु धर्माच्या सनातन तत्त्वांनी आर्किषले गेले.

. ‘उच्च जातीबद्दल इतरांचा मत्सर वाढेल’, हे म्हणणे विचित्र आहे. मत्सर हा मानवी गुण असल्यामुळे जेथे म्हणून कोणत्याही कारणाकरिता कमी-अधिक भाव असेल, तेथे मत्सर उत्पन्न होणारच. आजच्या जातीहीन समाजात `मत्सरहा गुण नष्ट झाला आहे काय ? अन्य राष्ट्रांतून श्रीमंतांनी (भांडवलदारांनी) मिळवलेली संपत्ती आपल्या खिशात कशी जाईल, याची चिंता खालचा वर्ग करतो. त्यात मत्सर नसतो, असे म्हणायचे आहे का ? अंतर्गत भांडणे माजवण्याची भीती घालून राष्ट्राकडून वाटेल तशी खंडणी उकळण्याचे प्रयत्न कामगार संघटना करतात, ते कशाकरिता ?

. मनु धर्मनिष्ठ आचरणाचे नियमच देतो. नैसर्गिक प्रवृत्तींना दडपून टाकायला, दाबून टाकायला मनु िंकवा कोणतेच धर्मशास्त्रकार सांगत नाहीत. कामवासना जबर असेल, त्याने शास्त्राप्रमाणे ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा. वासना नसेल, तर मनु ब्रह्मचर्याश्रमापासून एकदम संन्यास घ्यायलाही संमती देतो.
आश्रमव्यवस्था अशी आहे की, मनुष्य आपल्या नैर्सिगक वृत्तींवर विचारपूर्वक विजय मिळवू शकतो. म्हणूनच मनु सांगतो, ``धर्म सर्वाधिक प्रमाण असावा. विचाराने वागावे आणि धर्ममर्यादांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ मनु सहज प्रवृत्तीचे उदात्तीकरण करायला सांगतो. ‘हळूहळू विचारपूर्वक त्याचे नियंत्रण कमी कमी होईल’, अशा आचरणाचे वळण देतो. मैथुन धर्मसंमत म्हणजे विवाह पद्धतीने स्वीकारायचे. तिथेही धर्मनियम म्हणजे ब्रह्मचर्य आहेच. वासनांतून मुक्ती व्हावी, यांकरिता विवाह आहे. मनु हिंदु समाजाचा नियंत्रक आहे. मनु अशी आचारपद्धती देतो की, गर्भादान संस्कारापासून ते अंत्येष्टीपर्यंतचे जे संस्कार आहेत, ते क्रमाक्रमाने वासनामुक्त करणारे आहेत.
धर्मसंमत मैथुन हे महाफळ देणारे आहे’, असे मनु सांगतोच. धर्माचे नियंत्रण नसेल, तर प्रसंगी मैथुनप्रवृत्ती बलात्कारही घडवील. काम ही तर ईश्वराची विभूती आहे; पण समाजावर धर्माचे नियंत्रण नसेल, तर समाज वासनांच्या आहारी जाईल. स्वैराचारी होईल.
- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

Saturday, July 17, 2010

स्त्री धर्म - १


या आधुनिक आंग्लछायेच्या पुरोगामी स्त्री-पुरुषांना आमच्या पतिव्रतेचे हृदय कसे आकलन होऊ शकेल ? या बुद्धीखोर पुरोगामी साहित्यिकांनी पतिव्रतेचे, सतीचे जीवन-चरित्र भीषण रंगवले आहे। ज्वलज्जहाल पतिव्रतेचे अत्यंत ज्वलंत असे चरित्र, हे तर सतीत्वाच्या काही अंगांचा दिव्य प्रकाश आहे। त्या पतिव्रता, सतीसाध्वी स्त्रीला पेटत्या निखार्‍यांच्या पायघड्यांवरून चालायचे आहे। पाऊल तर वाकडे पडू द्यायचे नाही आणि आव तर असा आणायचा आहे की, जणू गुलाबाच्या कोमल पायघड्यांवरून चालते आहे. डोळ्यांत पेटती आग नव्हे, तर मृदू, मधु, सौम्य अमृताचा वर्षाव करणारी ती दृष्टी आहे.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००९)

नवरा हा प्रतिक असून पातिव्रत्याचा आचार स्वतःच्याच कायिक, वाचिक, मानसिक, आध्यात्मिक सामथ्र्याकरता आणि निःश्रेयसाकरता, म्हणजे मोक्षप्राप्तीकरता करायचा आहे। हे आम्ही ध्यानी घेतले, तर आधुनिक इंग्रजी शिक्षित विद्वान आणि विदुषी स्त्रियांच्या भ्रामक अवनतीच्या आणि शास्त्रकारांच्या खोट्या गोष्टी रंगविण्याचे टाळून कुटुंब संस्था आणि समाजाच्या विध्वंसाच्या पापापासून दूर रहातील।’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ४.१२.२००८)

‘मोडणारे कायदे तुम्ही केले। आता कितीही कायदे केले, तरी स्त्री अधिकाधिक असुरक्षित होईल. `स्त्रीच आपले रक्षण करू शकते. पुरुष तेथे हतबल आहे.’ (मनुस्मृती ९.१२) हिंदु कोडबिलाने स्त्री-जीवन उद्ध्वस्त केले, आमच्या गृहिणींचा, विवाह-संस्था आणि कुटुंब-संस्था यांचा घात करून स्त्रीला रस्त्यावर आणले. मनूवर सगळ्यांचा भयंकर रोष आहे. आधुनिक पुरोगामी या स्त्री-वैफल्याच्या संदर्भात सांगतात की, अजूनही मनूची सत्ता या भरतखंडावर अबाधित आहे.’
- गुरुदेव डॉ। काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ) स्त्री धर्म - ४

*******************************************************************

मीना : आम्हाला प्रवासाचे स्वातंत्र्य हवे, साहस (Adventure) हवे. मी पहाड चढण्याचा सराव (mountaineering) करण्याकरता वेडी झाली आहे. मला मुक्त जीवन हवे.’
गुरुदेव : म्हणजे रानटी (wild) व्हायचे. रानटी जीवन (wild life) जगायचे, असेच ना ?
मीना : हं !
गुरुदेव : बंधनं नकोत, मर्यादा नकोत.
मीना : हं.
गुरुदेव : पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रहमाला, सागर हे सगळेच जंगली (wild) झाले तर ? सागर उधळला, ग्रहमाला पृथ्वीवर सप्ताहशेषा (weekend) करता आली तर ? सागराने अवकाशयाना (Space Craft) सारखे आकाशात उड्डाण केले तर ?’’ (कुणीच बोलत नाही.)
गुरुदेव : जो मर्यादा सांभाळतो, तोच मुक्त जीवन जगू शकतो. मनमानी करणारा स्वैराचारी कधीच स्वतंत्रतेचे सुख भोगू शकत नाहीत. संयम पाळायचा आहे, मर्यादा राखायची आहे, वेशभूषा आणि केशभूषा यांतही मर्यादा राखली पाहिजे. पशूदेखील मर्यादा पाळतात आणि आम्ही.....’’
एक युवती : महाविद्यालयातील मुली आजकाल बांगड्या घालीत नाहीत.’’
गुरुदेव : का बरं ?
एक युवती : आम्ही घालणार नाही.
गुरुदेव : कारण ?
एक युवती : मुले कुठे घालतात बांगड्या ? आम्ही काही मुलांपेक्षा कमी नाही.
गुरुदेव : मुलांना मिशी फुटते. तुम्हालाही ती यावी, असे वाटते का ?
मुली किंचाळतात ``शी ! शी ! अय्या !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००७)

Saturday, July 10, 2010

प्रेम म्हणजे काय ?


प्रेम म्हणजे काय ? How will you define? व्याख्या कोणती?

नारद, भक्तिसूत्रांत व्याख्या करतात.


।। अनिवर्चनीयं प्रेमस्वरुपम् मूकास्वादनवत् ।।
  • प्रेमाची व्याख्या करता येत नाही. शब्दांनी प्रेम सांगताच येत नाही. मुक्याने गुळाचा स्वाद घेतला, अनुभवला, पण ती गोडी त्या मुक्याला काही सांगता येत नाही.
  • प्रेम ही अंत:करणाची वृत्ती आहे. भाव आहे. हृदयी जिव्हाळा आहे. प्रेम ओढून ताणून आणता येत नाही. भग्वत्प्रेम प्रत्येकात निर्माण होईल असेही नाही. ती संवेदना एखाद्याच भाग्यवंताला मिळते. नामस्मरण, जप तर सर्वांनाच करता येईल, पण प्रेम कसे आणायचे?
प्रेम नये सांगता, बोलता, दाविता । अनुभव चित्ता , चित्त जाणे।।
  • गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, धातुशिल्प अशा कलांचा अभ्यास करता येतो, पण प्रेमाचा अभ्यास होत नाही. प्रेमात अपेक्षा नसते. कामनेचा पुसटसा स्पर्शही नसतो. प्रेमाला सत्व, राज, तमाचा यत्किंचित गंधही नसतो. त्रिगुणांच्या पलीकडची ती चीज आहे. प्रेम ही पराभक्ती आहे. मीरेचं परमविशुद्ध प्रेम. ती परभक्ती, ते परमप्रेम. वृंदावनातल्या गोपींना भगवंताचं दर्शन घडविले. भग्वदर्शन घडले तोच गोपीच देहभान हरपून जायचे.
मुख डोळा पाहे, तशीच ती उभी राहे।
  • भग्वदकृपा ज्याच्यावर होते, त्यालाच भग्वदप्रेमाची प्राप्ती होते. प्रेम हे देवाचे देणे आहे. 'सा परानुरक्ती: ईश्वरे।' परमेश्वरावर परमप्रेम ती पराभक्ती, असे शांडिल्य सांगतात.
  • सा त्वस्मित् परम प्रेमस्वरूपा। परमात्म्यावरचं परमप्रेम तीच पराभक्ती, असे नारद सांगतात.
  • भगवंत प्रेमामुळे प्लावीत झालेल्या आर्द्र चित्ताचा भगवंताकडे अखंड वाहणारा वृत्तीप्रवाह ती पराभक्ती, असे मधुसूदन सरस्वती सांगतात.
हुतस्य भगवत् धर्मात धारवाहिकतान्गता । सर्वेश मनसौ वृत्ति: भक्तिरित्याभिधीयते ।।

- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

Saturday, July 3, 2010

आम्ही केव्हा जागणार?




मेगास्थेनिस, स्ट्रॅनो, हुएनत्संग, अज्बेरूणी, मार्कोपोलो, अबुल फाजल, मॅक क्रिंडल, रोमोरोलो, आजचे बनार्ड शाॅ, नोबेल पारितोषक विजेता ऑक्सेस कॅरेल अशा तीन सहस्र वर्षापासून आजवरच्या साक्षी पाहूनही ज्यांच्या अंतरी वैदिकधर्म संस्कृती विद्वेषाची आग उफाळत राहील, तो केवळ दुरात्माच असू शकतो.
  • यवनांचा वकील मेगास्थेनिस लिहितो, 'भारतीयांत असलेल्या प्रामाणिकपणाचा, धर्माचरणाचा अल्पांश देखील अन्यत्र आढळायचा नाही.'
  • स्ट्रॅनो कौतुकाने, आदराने सांगतो, 'हिंदू दाराला कुलूपे लावत नाहीत आणि देण्या घेण्याचे करार देखील खत-पत्राविनाच करतात.'
  • चिनी प्रवासी हुएनत्संग म्हणतो, ' हिंदू अत्यंत कृतज्ञ आहेत. दु:ख दूर करण्याकरता तो स्वत:च्या प्राणांचा प्रसंगी होमही करतो. कुणी अपकार केला तर त्याला शासन देतो. परंतु शत्रूला सावध करून त्यांच्याशी टक्कर देतो. शरणागताला आसरा देतो.'
  • अज्बेरूणी असेच प्रशस्तीपत्रक देतो.
  • मार्कोपोलो तर चक्क लिहितो, ' इकडची पृथ्वी तिथे झाली तरी ब्राह्मण कधी खोटे बोलायचा नाही.'
  • अबुल फाजल लिहितो, ' हिंदु सज्जन आहे, मायाळू, करुणामय आहे. जगातल्या कोणत्याही माणसांशी भांडण करण्याची वृत्तीच त्यांच्यात नाही.'
  • खाफीखान हा कमालीचा हिंदुद्वेष्टा! शिव प्रभूंची प्रशंसा करतांना तो सांगतो, ' त्यांनी कधी मशिदीला उपसर्ग दिला नाही. कुराणाचा अवमान केला नाही. कोणत्याही धर्मातील स्त्रीला, वैर्‍याच्या स्त्रीला देखील सन्मानाने वागवले.'
  • मॅक क्रिंडल सांगतो, 'हिंदूंची न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा आणि सरळपणा हे गुण विशेष आहेत.'
  • बनार्ड शाॅ नि:संदिग्ध सांगतो, 'भारतीय चेहरे, हे त्यांचे अंत:करण प्रगत करतात. ते सगळे जसे आहेत तसेच असतात. आमच्या चेहर्‍यावर मुखवटे आहेत.'
Hindu Dharma is ever new and will never cease to exist। It is like a vast and deep ocean. Only one drop of it is sufficient for us !'

प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

Saturday, June 26, 2010

वेदप्रकटदिनाच्या निमित्ताने!


१. ॐकार:
१. `श्रीमद्‌भागवत सांगते, ``समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्‍त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.
२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.

३. त्या ॐ कारापासून सर्व वार्क्ैंापंच अविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `अ, उ, म' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्‍ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `ॐ' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)

२. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्‍त झाले !
क्रियांचे मूल्यमापन करण्याचा निकष धर्मवेदाज्ञेनुसार उत्पन्न झाला. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्‍त झाले. तसे नसते, तर प्रत्येक क्रियेला केवळ अस्तित्वच असते. शुभ-अशुभत्व, सुष्टत्व-दुष्टत्व नसते. याचाच अर्थ धर्माकरिता मानव आहे. धर्म मानवाचा नियंता (म़्दहूीदत्ती) आहे. मानव धर्माचा नियंता नाही. तो धर्माचे सूत्र आहे. `धर्माच्याकरिता आम्हास जगति रामाने धाडियले ।' याचा तोच अर्थ.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २००८)

३. हिंदु धर्माला तुच्छ लेखण्यासाठी वेदांतील शब्दांचा विकृत अर्थ करणारे ख्रिस्ती !
`वेदमहर्षी पंडीत सातवळेकरांनी अथर्ववेदाच्या प्रस्तावनेत विवाह सूक्‍तातील `देवकामा' या शब्दाचा थोडा इतिहास दिला आहे. `देवकामा' याचा अर्थ `देवांनी जिला वंदन करावे अशी पतिव्रता !' `देवृकामा' शब्दात व्यभिचार आहे. भारतीय परंपरेत देवृकामा असा पाठ कोठेही नाही. सेंट पिटर्सबर्ग या कॅथॉलिक प्रणालीच्या वैदिक शब्दकोशात जबरीने तसा पाठ दिला आहे आणि हिंदुस्थानात ज्यांनी ऋग्वेद प्रकाशित केला त्यांनी तो स्वीकारला आहे. हा कॅथॉलिक ख्रिस्ती परंपरेचा वैदिक शब्दकोश आमच्या सनातन हिंदूंच्या परंपरा तुच्छ करण्याची प्रतिज्ञा करूनच निर्माण झाला आहे. हे आमच्या ध्यानी येऊ नये, हे दुर्दैव !' - गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)

४. वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्‍यांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते ?
`वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्‍या या तामसी, हिंस्रक आणि निधर्मी संशोधकांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते, ते आम्ही विचारपूर्वक पाहिले पाहिजे. त्या पातळीवर या अतिरेक्यांची (होय ते अतिरेकीच आहेत.) गाठ घ्यावी लागेल.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, २९.५.२००८)

५. वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक
`सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य किल्ल्याला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्‍न झाला ?

ग्रीस, रोम अशी राष्ट्रे आणि त्यांच्या संस्कृती जगातून केव्हाच नष्ट झाल्या. कालौघात सर्वच्या सर्व प्राचीन राष्ट्रे गुदमरून गतप्राण झाली आणि हिंदु राष्ट्र अजूनही सळसळते आहे. वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली. बौद्ध-जैनांचे हल्ले आम्ही निष्प्रभ केले.' (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)

Sunday, June 20, 2010

वेदोऽखिलं धर्म मूलम् | (भाग १)



सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षु: |

मानवाचे जे व्यवहार सुरु असतात, ते केवळ सूर्याच्याच प्रकाशाने चालतात. डोळे हे पाहण्याचे साधन आहे. परंतु सूर्य नसेल तर डोळे असूनही दिसणार नाही. पदार्थ प्रकाशित करायला जर डोळे समर्थ असते तर सूर्यप्रकाश जेथे मुळीच नाही, अशा अंधार व्याप्त प्रदेशातील वस्तू आपणांस का दिसत नाहीत? डोळे उत्तम असतानांही घनकीर्र अंधारात आपण सर्व आंधळेच असतो.

संपूर्ण वेद वाङमय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. वेदविहित पवित्र कर्तव्य कर्म हे धर्माचे स्वरूप आहे, जे कालाधीन आहे. 'काल' सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिती, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिती व संहार होतात. म्हणून सूर्यदेव ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप आहेत.

सर्व भुवनांत सूर्याचा प्रकाश जातो. सूर्यच समस्त ग्रहांचा सम्राट आहे. सूर्यदेव रात्री आपली शक्ती अग्नीत ठेवतात. निखील वेदांचे प्रतिपाद्य सूर्यदेव आहेत. सूर्यनारायण हे आकाशमंडलात प्रतिदिन नियमाने सत्यमार्गाने (क्रांतिवृत्त) जातात आणि संसाराचे संचलन करतात. आकाशात दिसणारे नक्षत्र, ग्रह आणि राशीमंडल सूर्यदेवाच्या आकर्षण, विकर्षण शक्तीमुळेच कायम आहेत. थकून गेलेले जीव रात्री गाढ निजतात व सूर्योदयाला उठतात.
  • ऋग्वेद सांगतो, "सूर्यदेव आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात."
  • यजुर्वेद सांगतो, "सूर्य देव समस्त भुवनांना उज्जीवीत करतात."
  • अथर्ववेद सांगतो, " हृद्रोग व श्वास्रोग यांचा उपशमन करतात."
सूर्यकिरणे पृथ्वीवरचे ओले पदार्थ सुकवतात आणि समुद्र जल स्वयं पिऊन पिण्यायोग्य असे पाणी सृष्टीला पुरवतात. सूर्यकिरणांचे उपकार अनंत आहेत. महान आहेत. नैमिषारण्यात प्रदीर्घ यज्ञ प्रसंगी, सूतजींनी शौनकादि ऋषींना सूर्यदेवासंबधी विस्तृत विवरण केले. सूर्योपासनेची सर्व अंगे सांगितली. माहात्म्य सांगितले. सर्वच पुराणांतून ठिकठिकाणी सूर्यमहिमा आहेच. सूर्यपुराण हे सूर्योपासनेचे स्वतंत्र उपपुराण आहे. हे पुराण श्रेष्ठ मानले जाते. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी बृहद्बल राजाला सूर्याचे ऐश्वर्य सांगितले.

चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या साम्ब्पूर नागरी अति प्राचीन काळापासून फार मोठे व सुंदर सूर्यमंदिर आहे. तिथे रथात आरूढ झालेली सूर्याची सर्वोत्कृष्ट अत्यंत मनोहर मूर्ती आहे. श्रीकृष्णपुत्र सांब याने हे सूर्यमंदिर बांधले. श्रीकृष्णाने शाप दिल्याने त्याला भयंकर कुष्ठरोग झाला होता. त्याने कडक सूर्योपासना केली आणि त्याचा रोग बरा झाला. तो शापमुक्त झाला. त्यानेच सूर्योपासनेकरता हे सूर्यमंदिर बांधले.

यज्ञाच्या अग्नीत दिलेली आहुती सूर्यापर्यंत पोहोचते आणि अन्न निर्माण करते. यज्ञाने पर्जन्य आणि पर्जन्याने अन्न होते. हे शास्त्रसिद्ध आहेच आणि लोकप्रसिद्धही! सूर्याचा वर्ण जपाकुसुमसमान लाल आहे. शास्त्रवेत्ते, जाणते लोक आदित्य मंडलातील हिरण्य पुरुषाची उपासना करतात. आदित्यमंडल हजार योजने विस्तारले आहे. सूर्यदेव पूर्वाभिमुख प्रादुर्भत झाले. सूर्यनारायण प्रतिदिन मेरूपर्वतासभोवती (मेरू पर्वताला उत्तर ध्रुव म्हणणे हा क्षुद्रपणा आहे) चोहो बाजूने फिरतात.

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका घनगर्जित (वर्ष ८ अंक ११ )

Monday, June 14, 2010

संस्कृत मृत भाषा आहे का?


संस्कृतचे जे विरोधक आहेत, ते बहुतांशी इंग्रजीचे पुरस्कर्ते आहेत. ते इंग्रजीला 'वर्गीकृत भाषा' असे म्हणायला तयार नाहीत. इंग्रजांनी आमच्यात जातीभेद पोसला, जातीद्वेष वाढवला. इंग्रजी भाषा आणि संस्कृती विषयी भारतीयांत विलक्षण आत्मीयता निर्माण केली. संस्कृत भाषेविषयी अनादर निर्माण केला. परिणामत: युरोप अमेरिकेत उदयाला आलेल्या औद्योगिक संस्कृतीचा भारतात विलक्षण प्रसार व प्रभाव निर्माण झाला.

दुर्दैव असे की स्वार्थाकरता देवधर्म आणि संस्कृतीचेही उपकरण म्हणून वापर करणारे सैतान या आधुनिक औद्योगिक संस्कृतीने निर्माण केले आहेत. मानवतेची बात सर्वत्र हवेवर तरंगते आहे. पण माणसाला माणसाचा आधार, असा व्यवहारही आज केवळ नितीशास्त्रांच्या ग्रंथात उरला नाही. या सर्व वस्तुस्थितीचे सखोल चिंतन करून, अनाग्रही बुद्धीने, विवेक करून आजच्या संस्कृती विद्वेषाला व विस्मरणाला, या धर्मग्लानीला आळा घालण्याचे उपाय आम्ही शोधण्याचे शिकस्त करायला पाहिजे. संस्कृत कमिशन समोर साक्ष देतांना सी.व्ही. रमण या विश्वविख्यात वैज्ञानिकाने संस्कृतची तुफान प्रशंसा केली. त्यांनी नि:संदिग्ध सांगितले, "संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा झाली पाहिजे."

शिक्षणक्षेत्र, शासन क्षेत्र व शास्त्रीय क्षेत्र यांचे ऐश्वर्य संस्कृत या राष्ट्रभाषेतून प्रत्ययाला येते. संस्कृत ही राष्ट्रभाषा अपरिहार्य आहे. तिला पर्याय नाही.
भारताची ज्वलंत अस्मिता, राष्ट्रीयत्व टिकवायचे असेल, विकसीत करायचे असेल, तर संस्कृतला शरण गेल्याविना गति नाही. संस्कृतविना आमचे राष्ट्र, आमचा इतिहास, आमच्या परंपरा जिवंत राहू शकणार नाहीत. संस्कृतमध्ये काही उणीवा असल्या तरी राष्ट्रभाषा म्हणून तिचा स्वीकार करावाच लागेल .

टीका: "संस्कृत ही मृतभाषा आहे. याचा अर्थ तिला आजचे वैज्ञानिक व औद्योगिक प्रगतीशी जुळवून घेता यायचे नाही. तितकी ती व्यापक व परिणत होऊ शकत नाही."
खंडन: "..... हा तुमचा दुराग्रह भारताच्या संस्कृतीचे तुम्हाला रतीमात्र ज्ञान नाही."

इ.स. १८३८ चा विल्यम अडम यांच्या चौकशी समितीचा अहवाल.

बंगालचा शिक्षण विषयक तिसरा अहवाल आहे तो. त्यात स्वच्छ निर्देश आहेत की कलकत्ता, मिथीला, दक्षिण बिहार येथील पंडितांनी गणित यंत्र विज्ञान, ज्योतिर्गणित, नव्यनीतिशास्त्र, शेतकी, वाणिज्य, वास्तुशिल्पे, धरणे, पाटबंधारे, या विषयावरचे काही ग्रंथ संस्कृतात लिहिले आहेत. काही लिहून देण्याचे आश्वासन कमिशनला दिलेले आहे. विज्ञान व Industries यांना धारक व पोषक असे शेकडो संस्कृत ग्रंथ आहेत. भृगुसंहीतेसारखे विज्ञान व Industries वरचे अगणित प्रकाशित व अप्रकाशित ग्रंथ आहेत. भारद्वाजांचा Aeronautics वरचा तुटका फुटका ग्रंथ आज उपलब्ध आहे. तो एकच एक ग्रंथ विज्ञान, वास्तुशिल्प, Industries वगैरे विषयावरचे शास्त्रग्रंथ निर्माण करण्याची संस्कृत भाषेची अनंत आकाशातील झेप दाखवून देईल.

Industry and Science यांच्या अभिव्यक्तीला संस्कृत मारक आहे असे म्हणण्याचे दु:साहस करू नका!

प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिकार्जित (वर्ष ९ अंक ३ )

Saturday, June 5, 2010

दुष्ट युरोपियानांची कारस्थाने!


आमचे विद्वान प्राचार्य आणि यच्चयावत आंग्ल छायेचे पंडित सांगतात, ' मॅक्स्मूलर आदी पाश्चात्यांची वेड वाङ्मयाचे किती चिकाटीने अथक परिश्रम करून संशोधन केले. आमचे प्राचीन वेदादी संस्कृत ग्रंथ अनुवादलेत. प्रस्तावना लिहिल्यात. केवढे उपकार आहेत आमच्यावर?

आर्य आक्रमणांचा कपोलकल्पित सिद्धांत प्रस्थापित करण्याकता या दुष्ट मॅक्स्मूलारादि पाश्चात्यांनी कसे भयंकर
उपद्व्याप केलेत. ठाऊक आहे?

अदमासे २५० वर्षांपूर्वी बंगालवर इंग्रजांचे आधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषांत त्यांना कमालीचे साम्य आढळले.

मग तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास सुरु झाला. या ज्या चार प्राचीन भाषा आहेत, ( त्यात संस्कृत आलेच) त्यांना एकाच पातळीवर ठेवण्यात आले. (वास्तविक संस्कृत भाषेतून या तिन्ही भाषांचा उद्गम विकास आहे. संस्कृतानुगामी अशा त्या भाषा आहेत. संस्कृतमुळेच त्या समृद्ध झाल्या आहेत.

आपलीच संस्कृती श्रेष्ठ असा दुराग्रह असणार्या युरोपियनांना संस्कृतातून सर्व भाषांचा उद्गम आहे, हे कसे मान्य होईल? त्यांने चारही भाषा एकाच पातळीवर ठेऊन "या चारही भाषांच्या पूर्वी एक प्राचीनतम भाषा असली पाहिजे. त्या भाषेतून संस्कृत, लॅटिन, ग्रीक फारशी जन्माला आल्यात" असे ठोकून दिले.

अस्तित्वातच नसलेल्या या काल्पनिक प्राचीनतम भाषेला इंडो-युरोपिअन हे नाव दिले. ती भाषा बोलणार्या लोकांना 'आर्य' हे नाव दिले. आर्यांचे सर्वात प्राचीन साहित्य 'वेड' होय. हे मान्य केले. वेदांची निर्मिती करणारे आर्य मध्य आशियातून भारतात आल्याचे सिद्ध करण्याचा उपद्व्याप केला. आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत पुष्ट करण्यासाठी त्याचा वापर जगभर होऊ लागला.

(संदर्भ: गुरुदेव वाङमय पत्रक 'साप्ताहिक सनातन चिंतन' वर्ष ५ अंक २० )