||Achar Prathamo Dharmah || We are here for revealing the faded knowledge of our very own ‘Eternal Dharma’ known in the name of ‘SANATAN DHARMA’ itself.That may be also called as Hinduism or Hindu philosophy. We – discuss, study and practice the SANATAN DHARMA as it is. || Shata - yojanam vistaram yagnya roop dharam dev prasida ||
आमची भूमिका !
Friday, April 22, 2011
Friday, April 15, 2011
भगवंताची पूजा अशी करा.

- स्नान करुन, शुचिर्भूत होऊन, देवाच्या मूर्तिसमोर बसावे. प्राणायाम करावा. नंतर न्यास करावेत. म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एकेक देवतेची स्थापना, तो मंत्र म्हणून करावी.
- नंतर श्रीरामप्रभू पूजनाला आरंभ करावा. गंध अक्षता, फुले, फळ वगैरे उपचार द्रव्याची यथासांग पूजा करावी.
- पुष्पादिकांत जे जीवजंतु असतील ते काढून टाकावेत. भूमी सारवून घ्यावी. आपण स्वतः शांत, स्थिर चित्त असावे. देवाची मूर्ति, लिंबू, चिंच व पाण्याने धुऊन वस्त्राने स्वच्छ पुसून पूजायोग्य करावी.
- नंतर हरिमूर्तिचा व आपल्या हृदयातील, हरीची यथासांग पूजा करावी. पाद्य, अर्ध्य पात्रे स्वच्छ धुतलेली असून, ती जवळ असावीत. आपल्या अंतःकरणात ज्या श्रीरामाची आपण पूजा केली, त्या ईश्वराचे ते प्रतिबिंब त्या मूर्तित आहे, असे ध्यान करावे.
- सांगोपांग पूजन करावे. सांगोपांग म्हणजे अंग व उपांगासहित पूजन करावे. अंग म्हणजे, मूर्तिचे हृदय, मस्तक वगैरे अवयव आणि उपांग म्हणजे श्रीराम प्रभूचे धनुष्य, बाण, किरीट, कुंडल वगैरे, सपार्षद पूजन करावे. सपार्षद म्हणजे, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न व हनुमान या पंच्ययतन परिवारासह पूजन करावे.
- पाद्य, मधुपर्क, आचमन देवास अर्पण करावे. पाद्य म्हणजे, प्रभूला पाय धुण्यास पाणी द्यावे, म्हणजे रामप्रभूच्या मूर्तिचे चरण धुवावे. मधुपर्क म्हणजे रामप्रभूकरता मधमिश्रित जल द्यावे.
- नंतर वस्त्रे व भूषणे हे उपचार अर्पण करावीत. प्रभू मूर्तीच्या कपाळावर तिलक करावा.
- धूप व दीप हे उपचार समर्पण करावेत. नंतर नैवद्य समर्पण करावा. नैवद्यात फळ, शर्करा, मिठाई, वगैरे असावीत. देवाला फुलाच्या माळा द्याव्यात. अक्षता समर्पण कराव्यात. अशाप्रकारे षोडशोपचार पूजा करावी. नंतर आरती करावी. कर्पूर आरती करावी. मंत्रपुष्प अर्पण करावे. देवाची आरती आपाद मस्तक करावी. स्तोत्रे म्हणावी व देवाला प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार करावा. प्रदक्षिणा स्वतः भोवतीच करावी.
- श्रीराम प्रभूच्या मूर्तीची पूजा करतांना आपण राममय आहोत, असे अखंड ध्यान करावे. पूजन पूर्ण झाल्यावर देवाचे निर्माल्य मस्तकी धारण करावे. पूजिलेल्या देवाला आपल्या हृदयात व मूर्तिला करंडयात (संपुष्टात) स्थापन करावे.
- नंतर पूजाविधी समाप्त होतो. अशा प्रकारे आपल्या हृदयात व मूर्तीत जो त्या परमात्म्याचे पूजन करतो, त्याचा अहंकार नष्ट होऊन, तो खात्रीने मुक्त होतो
Saturday, April 2, 2011
Saturday, January 15, 2011
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..!

साहित्य हा संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन संस्कृतीचं प्रतिबिंब प्राचीन साहित्यात आहे. तिथे शब्द, भाषा, सागरासारखी घनगंभीर, खोल आहे. शब्दातले ऐश्वर्य, ते सौंदर्य, ते माधुर्य ते प्रकट करतात. तिथे सर्वोच्च तत्त्वांचा स्पर्श आहे. परमोदात्तता आहे. मानवाला पवित्र बनविण्याची शक्ती आहे. ती शक्ती इतकी अपरंपार आहे की शब्द 'मंत्र' होतात. रामायण-महाभारताचे वाचन ही गहन समाधीची उत्तम प्रक्रिया आहे.
शब्दाचे मूळ करण, सत तत्त्व आहे. आम्हांला जो अर्थ कळतो, तो उथळ आहे. वरवरचा आहे. त्याचे जे उदात्त, सर्वोच्च जीवन आहे, ते गुप्त आहे. हिमखंडाचा जसा अल्प असा वरचा भाग दिसतो तसे.
वाणी, व्यासांत महासागरासारखी खोल खोल होती. व्यास त्या शब्दातले लपलेले समस्त ऐश्वर्य प्रगट करतात. व्यासांच्या वाणीचा स्पर्श होताच ते शब्द सर्वोच्च भूमिकेवर जातात. त्या शब्दातील स्वर्ग प्रकटतो. ते प्रकाशात न्हाऊन निघतात. त्या शब्दात परमोदात्तता स्वाभाविक असते. त्या शब्दात सत्त्वाचा उत्कर्ष असतो. ते शब्दच मंत्र बनतात. महाभारताचे वाचन हे गहन ध्यानाचे कर्म आहे.
हे धर्मघना, यज्ञ संस्थेकरता वेद आहेत. वेदांत यज्ञ आहेत. मेघांना वाहून आणणारा वायू 'हिंकार' आहे. मेघ हा 'प्रस्ताव' आहे. पर्जन्यवृष्टी हा 'उद्गीथ' आहे. विजेचा लखलखाट व घनगर्जिते हा 'प्रतिहार' आहे. सूर्याद्वारे सागर जल वर नेले जाते. ते 'निधन' आहे. हे रहस्य जाणून वृष्टीदृष्ट्या सामाची उपासना करतो. त्याच्या संकल्पाने वृष्टी होते. ती जगताला जीवन देते. धर्मघना, तू आमचा जीवनदाता आहेस. तुझा जयजयकार असो.
हे धर्मघना, पितृगण, देवांचे संघ, इंद्रादी श्रेष्ठ देव, तसेच ३३ कोट देव, गंधर्व, अंतरिक्षात संचार करणार्या विभूती, ब्रह्मचर्याचे आपल्या शक्तीने संरक्षण करतात. ब्रह्मचर्य हेच मनुष्यादि रूपाने सर्व जगाचे धारण करते. ८०० सहस्र ऋषींनी भृगु महर्षीकडून ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली. हे धर्मघना, ब्राह्मणद्वेष हा हिंदुद्वेष आहे. हे धर्मघना, भोगलोलूप, लिंगपिसाट, पाश्चात्य जीवनरहाटींची आम्ही नावनिशाणी उरू देणार नाही. तुझा विजय असो.
Saturday, January 8, 2011
ब्रह्मचर्य!

संकल्पाऽध्यवसायश्च क्रिया निवृत्तिरेवच ॥
एतत् मैथुनमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिण:
विपरीतं ब्रह्मचर्य मेत देवाष्टलक्षणम् ॥
(स्त्रीचे दर्शन, स्पर्शन, तिची क्रीडा, गुह्य भाषण, तिचे वर्णन, तिच्याबद्दल संकल्प, तिच्या प्राप्तीकरता खटपट व प्रत्यक्ष संभोग अशी मैथुनाची आठ अंगे आहेत. या आठही अंगांपासून अलिप्त राहणे, याला 'ब्रह्मचर्य' म्हणतात.)
१. स्मरणं- नृत्यनाटक, तमाशा, पुस्तके, चित्ते, दूरदर्शन, अथवा प्रत्यक्ष पाहिलेल्या स्त्रियांचे स्मरण, ध्यान, चिंतन करणे.
२. कीर्तनं- स्त्रियांचे रूप, लावण्य, यौवन, हावभाव, शृंगारादि कौतुक करणे, Sex ची गाणी म्हणणे, ऐकणे, Sex च्याच गोष्टी, दृष्टांत, प्रसंग सांगणे.
३. केलि:- स्त्रियांशी टेनिस, बॅडमिन्टन, पत्ते, सोंगटया खेळणे, लपंडाव, फुगड्या खेळणे, झोपाळ्यावर बसणे, त्यांच्या पुढे-पुढे मिरवणे, श्वानासारख्या चेष्टा करणे.
४. स्त्रियांकडे चोरून, उघड किंवा त्यांनी पाठ वळवल्यावर मागाहून टक लावून पाहणे, गिधाडे, कावळयासारखी, मान उंचावून सहेतुक पाहणे.
५. स्त्रियांशी एकांत करणे.
भगवान मनु सांगतात,
बलवान इन्द्रियग्रामो विद्वान्समपि कर्षति ॥
(स्वत:ची साक्षात आई, बहिण, मुलगी असली तरी तिच्याशी एकांत करू नये. अभिजात घराण्यातील पुरुष आपली माता, भगिनी वा कन्या असली तरी तिला स्पर्श करत नाहीत. वाताम्बुपर्णशयी अशा विश्वामित्र, पराशरादि ऋषींनाही या बलदंड इंद्रियांनी नरकात लोटले आहे.)
६. संकल्प- कामवासनेने अंकित होऊन नीच वासना तृप्तीकरता पापी संकल्प करणे.
७. अध्यवसाय- पापी संकल्पानुसार खटाटोप करणे.
८. प्रत्यक्ष संभोग.
हे अष्टमैथून कल्याणेच्छूंनी संपूर्णतया टाळावे. भगवान मनूचा हा उपदेश उत्कर्षेच्छूंनी हृदयाशी जपावा.
सहखद्सनं चैव सर्वं संग्रहणं स्मृतम् | ८/३५८
(प्रसाधन, वस्तू देणे वा लावणे, थट्टा-विनोद करणे, अलंकार-वस्त्रे (अंगावरची) यांना स्पर्श करणे, एका खाटेवर (आसनावर) बसणे, हे सर्व विनयभंग करणारे अपराध होत).
परस्परस्यानुमते, सर्वं संग्रहणं स्मृतम् ॥ ८/३५९
अभिषह्य तु य: कन्यां कुर्याद्दर्पेण मानव:
तस्याशु कर्स्ये अंगुल्यो दण्डं चाऽर्हति षट्शतम् ॥ ८/३६८
(जो कन्येवर उद्दामपणे बलात्कार करील, त्याची बोटे तोडावीत आणि सहाशे पण दंड करावा).
अन्गुल्यादेव वा च्छेदं खरणोद्वहनं तथा ॥ ८/३७१
( जी (प्रौढ) स्त्री, कुमारीला (अक्षतयोनी कन्येला बोटांनी) भ्रष्ट करील तर तिचे त्वरीत मुंडन करावे. तिची बोटे तोडावीत, गाढवावरून तिची धिंड काढावी.)
Friday, December 31, 2010
पाश्चात्त्यांचे उपद्व्याप!
''संस्कृत भाषेतूनच अन्य सर्व भाषांचा उद्गम आहे' हे कसे मान्य होईल?
म्हणून या दुष्ट पाश्चात्यांनी कसे भयंकर उपद्व्याप केलेत, पहा !

- अदमासे २५० वर्षा पूर्वी बंगालवर इंग्रजांचे अधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी व संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषात त्यांना कमालीचे साम्य आढळले. त्यांनी तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास सुरु केला.
- त्यांनी चारही भाषा एकाच पातळीवर ठेवून, या चारही भाषांच्या पूर्वी एक प्राचीनतम भाषा असली पाहिजे, त्या भाषेतून संस्कृत, लॅटिन, ग्रीक व फारशी जन्माला आल्यात' - असे ठोकून दिले. (वास्तविक संस्कृत भाषेतूनच या तिन्ही भाषांचा उद्गम व विकास आहे. संस्कृतानुगामी अशा त्या भाषा आहेत. संस्कृतमुळेच त्या समृद्ध झाल्या आहेत. संस्कृतेत्तर सर्व भाषा संस्कृताचीच विकृत रूपे आहेत.) अस्तित्वातच नसलेल्या या काल्पनिक प्राचीनतम भाषेला 'इंडो-युरोपियन' हे नाव दिले. ती भाषा बोलणार्या लोकांना 'आर्य' नाव दिले.
- मग आर्य, 'मध्य आशियातून भारतात आल्याचे सिद्ध करण्याचा उपद्व्याप झाला. आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत पुष्ट करण्याकरता त्याचा वापर झाला.
- संस्कृतभाषा केव्हा, कशी निर्माण झाली? म्हणजे उत्पत्तीचा काळ कोणता? हे आधुनिकाला ऐतिहासिक पद्धतिनुसार ठरविणे असंभव आहे. आधुनिक इतकेच सांगतात की जगातले सर्वाधिक प्राचीनतम ऋग्वेदादि वेद हे ग्रंथ संस्कृतात आहेत. यापेक्षा अधिक कुणी काही सांगत नाही. संस्कृत भाषेच्या चिंतनात एवढाच समारोप त्यांनी केला व ते निवृत्त झालेत. संस्कृतेतर सर्व भाषा संस्कृतच्या आश्रयाने वाढल्या, समृद्ध झाल्यात. संस्कृत मात्र इतर निरपेक्ष स्वतंत्र व स्वयंसिद्ध आहे.
- आधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञान असे सगळे संस्कृतात कसे आणता येईल? ते मॉडेल तर अमेरिका, युरोपने पुरविले आहे.' हा बकवाज आहे.
- इंजिनिअरिंगला 'शिल्प' म्हणतात. प्राचीन भारतातल्या भृगु, भारद्वाज, अत्रि, मय, भगीरथ अशा असंख्य इंजिनिअरिंगच्या संहिता आजही उपलब्ध आहेत.
- संस्कृतचे जगातल्या अन्य भाषाहून वैशिष्ट्य आहे. ते असे...... संस्कृतात शब्दाची तीन लिंगे आहेत. तीन वचने आहेत. सात विभक्ती आहेत. समास आहेत. तद्विताचे अनेक भेद आहेत. कृतन्त आहे. नामधातु आहे, सन्नन्त यडन्त आहेत. अशा अगणित शब्द घटना आहेत. तसेच संधिस्वरूप भेद आहेत. दीर्घ भेद आहेत. अस जगातील अन्य कोणत्याही भाषेत नाहीत.
- जगात जितक्या संस्कृतेतर भाषा आहेत त्या सर्वच भाषा शे-दोनशे वर्षात रुपांतरीत होतात. त्या भाषा इतक्या बदलतात की त्यांच्यातील जुने लेखन दुर्बोध होते. संस्कृतात असे कधीच होत नाही. कारण संस्कृत ही देव व वेद यांच्याशी निगडीत आहे. म्हणून कोणीही मानव तिचे स्वरूप बदलू शकत नाही. अशी ही संस्कृत भाषेच्या वर्ण-पद-वाक्य या त्रिविध स्वरुपाची विशेषता आहे.
- आज भारतीयांसह जगातले अन्य सर्व आंग्लछायेच्या बुद्धिवादी (वा बुद्धिखोर) लोक इंग्रजी भाषेला विविध प्रकारचे लेखन, प्रकाशन, अनुवाद अशा असंख्य साधनांनी समृद्ध करण्याकरता अविश्रांत धडपडत आहेत. प्राचीन व अर्वाचीन सर्व ज्ञान इंग्रजीत आणण्याकरता त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहे. तथापि एवढे करूनही या म्लेंच्छ (इंग्रजी) भाषेचे जे भयावह अधःपतन होते आहे, ते थांबतच नाही. हे अधःपतन कसे थांबवावे हे युरोप, अमेरिकतील आधुनिक महापंडित, भाषाशास्त्रज्ञांना
कळेनासे झाले आहे. त्यांनी हात टेकले आहेत. - इंग्रजी म्लेंच्छ भाषा आहे. उच्चारण शक्ती रहित अविकसित वन्य मानवांची भाषा आहे. वन्य मानव 'अ' पासून 'ह' पर्यंतची वर्णामाला शुद्ध स्थितीत कधी तरी उच्चारू शकतो का ?
Friday, December 24, 2010
॥ प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी महासमाधी ॥
दुपारी ०१:५० मि.
- दहावे: शुक्रवार दि. २४.१२.२०१०
- अकरावे: शनिवार दि. २५.१२.२०१०
- बारावे: रविवार दि. २६.१२.२०१०
- तेरावे: सोमवार दि। २७.१२.२०१०
चिन्मय ब्रह्ममय झाले. अद्वैती मुरले. कणाकणांत भरून उरले.
घंटा आक्रंदली.... महाराज गेले...
आश्रमातील गाय व्याकुळतेने हंबरली.... महाराज गेले...
आश्रमासमोरील अश्वत्थ थरथरला ... महाराज गेले...
वृक्षावरचे पक्षी निश्चल झाले, वार्याची लाट लहरली... महाराज गेले...
कणाकणाने, क्षणाक्षणाने टाहो फोडला... महाराज गेले....
महाराज गेले?...
गेले कसले?
शरीर असून अशरीरी असलेले, शरीर असतांना कणाकणांत असलेले
अशरीरी महाराज जातील कसे?
भरलं आहे त्यांनी चराचर!...
आहेत ते कणाकणांत!...
आहेत ते क्षणाक्षणांत!...

मला त्याची खंत नाही
मी कुठल्याही मूर्त - अमूर्त शरीराने कार्यरत राहू शकतो.
ह्या शीतल चंद्र किरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करेन...
पर्वतावरून खळखळणारा झरा, ओढा, नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करेन...
समुद्राच्या लाटांच्या रूपाने मी नृत्य करेन...
मंद वार्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पावले असतील...
... अशी ही माझी नित्य नूतन असंख्य रूपे जरा पहा तर.
त्या क्षितीजा पलीकडच्या शिखरावरून मी उतरलो,
आणि मृतांना संजीवन दिले. झोपी गेलेल्यांना जागे केले.
अनेकांचे निराशेचे मुखवटे दूर सारले. अगणित दु:खितांचे अश्रू पुसलेत.
सुंदर फुलांना, मधुर गायन करणार्या पक्ष्यांना मी न्याहाळले आणि त्यांचे सांत्वन केले
माझ्या स्पर्शाने सर्व विश्वाला पावन केले.
मूत्यू, तू देखील मला शोधू शकणार नाहीस.
करण मी इतस्त: सर्वत्र, दिशादिशांतून संचार करतो.
आणि तरी देखील मी कुठेच नाही
- गुरुदेव
Wednesday, December 15, 2010
कलियुगातील महायोगी गुरुदेव प.पू. डॉ. काटेस्वामीजी यांचा देहत्याग
‘यापुढेही आश्रमातील सर्व कार्यक्रम अव्याहतपणे चालू रहातील’, अशी माहिती गुरुदेवांचे शिष्य पू. स्वामी रामानंदनाथ यांनी या वेळी उपस्थितांना दिली.
Saturday, December 11, 2010

अरे! या देशात शेंडीकरता हजारोंनी प्राणांचा होम केला आहे! गोरक्षणाकरता लक्षावधी माणसांनी आपल्या छातीचे कोट उभे केले आहेत. सोमनाथ मंदिर रक्षणाकरता ऐंशी सहस्त्र हिंदूनी आपल्या रक्ताचे सडे शिंपलेले आहे. जंगलातल्या वाघाला ताज्या रक्ताची चटक असते. त्यामुळे हवे ते करून तो मिळवू, अशी गुर्मी त्यांच्यात असते. प्राणिसंग्रहातल्या पिंजर्यात बंदीवान झालेल्या वाघाला मात्र बाहेर पडलो, तर जनावर मिळेल असे वाटतच नाही. त्यामुळे पुढ्यात येईल ते निमुटपणे खाण्याविना त्याला अन्य पर्याय उरत नाही. त्यांची मने मेलेली आणि मांसही मेलेले. मुदीड मनाचे आम्ही, आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. म्हणून तर गोमांस चवीने खाऊन, आमचे पाश्चात्याळलेले हिंदु गोहत्या बंदीची आंदोलने चालवतात. वाघासा
विज्ञान व अधिभौतिक शास्त्रे कितीही वाढली तरी मानवाची अमृत तत्वाच्या, ज्ञानाकडील ही स्वाभाविक प्रवृत्ती कधीही कमी होणार नाही. आधिभौतिक शास्त्रे कितीही वृद्धींगत होवोत, सर्व आधिभौतिक सृष्टी विज्ञान, बगलेत मारून तत्वज्ञान नेहमीच त्यांच्या पुढे धाव घेत राहाणार.
'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा कॉंग्रेसने ठराव केला. १७ आक्टोंबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लीमांच्या भावना दुखवल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला. पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेस वर्किंग कमिटीने वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला. संस्कृतिद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्के पेक्षा अधिक सदस्य वं
Sunday, December 5, 2010
अध्यास भाष्य!

- अध्यास म्हणजे अविद्या वा अज्ञान. असा अर्थ आहे. आचार्यांनी तोच अर्थ सांगितला आहे. शांकर भाष्यावर लिहिणाऱ्या थोर आचार्यांनी त्यात सूक्ष्म भेद केला आहे. सूक्ष्म छटा तिथे आहेत. शंकरांनी मात्र तसा काही फरक केला नाही. आमच्या बुद्धीचे समाधान होईल असे अध्यास भाष्य आहे.
- असे अध्यासभाष्यत विवरण आहे.
- पूर्वी पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची दुस-यावर भ्रांति होणे म्हणजे अध्यास ! असते शिंपी परंतु भ्रांति होते रजताची. असते दोरी परंतु भ्रांति होते सर्पाची (रज्जुसर्प). असते वाळू परंतु भ्रांति होते जलाची (मृगजळ).
- शिंपी ही वास्तविक शिंपी असताना अज्ञानाने त्यावर चांदीची मिथ्या भ्रांति होते. या भ्रांति वा भ्रमालाच अविद्या म्हणतात.
- ही अविद्या वा माया नकारात्मक नाही. अभावस्वरूप नाही. ती भावरूप आहे. तिला अस्तित्व आहे. ती प्रत्यक्ष जाणीव आहे.
- शंकरांचा केवलाद्वैत सिद्धांत आहे. यात अविद्या अथवा अज्ञान वा अध्यास या संकल्पनेला फार महत्व आहे. शंकरांचा केवलाद्वैत विचार या अध्यासाभोवती फिरतो. अध्यास म्हणजे काय ज्याला नेमके कळते, त्यांना अद्वैत वेदांत कळू शकतो.
- ही माया (वा अविद्या) परमेश्वराची एक महाशक्ती आहे. ही मायाशक्तीच परमेश्वराला नानाविध रुपात प्रकट करते. या मायेच्या आवरणामुळे जीवाला स्वतःचे आत्मस्वरूप जा
णता येत नाही आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. - हा 'अध्यास' दूर करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम आहे.
- वास्तविक एकमेवाद्वितीय ब्रह्म असताना अध्यासाने वा मायेने भेद दिसतात, नानात्व दिसते. अनेकत्व दिसते.
- ही जी अविद्या वा माया वा अध्यास आहे. ती अस्तित्व असलेली जाणीव असली तरी ती पूर्ण सत्य नाही इतकेच. तसेच ती पूर्ण असत्यही नाही. कारण अध्यास वा मायेचे परिणाम अनुभवाला येतात म्हणून अध्यास वा माया सत नाही. असत नाही. सद्सत नाही. तर ती अनिर्वचनीय आहे.
- शंकर या मायेले 'सद्सद अनिर्वचनीया म्हणतात. तिच निरुपण अशक्य आहे.
- सृष्टीतील सर्व पदार्थाचे वर्गीकरण शंकर स्थूलमानाने दोन वर्गात करतात.
- दोन्ही वर्गातील पदार्थ परस्पराहून अत्यंत भिन्न असताना अध्यासामुळे आपण त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप करतो आणि त्यातूनच लोकव्यवहार सुरु होतो.
हा जो सत्यानृताचा लोकव्यवहार आहे, तो मिथ्याप्रत्यय रूप आहे. अध्यासामुळे जीव हा उपाधीशी एकरूप होऊन कर्ता, दुःखी व जन्ममृत्यूच्या फे-यात अडकणारा जीव होतो. द्वैतात अडकतो.
- अध्यासामुळे ब्राह्मधर्म (पुत्र, पिता, बंधु) इंद्रियधर्म (अंध आणि पंगु) अंतःकरण धर्म (बुद्धि, इच्छा) यांचा निर्गुण निराकार। निष्काम आत्म्यावर अध्यारोप करतो. म्हणून तो जीवात्मा कर्ता, भोक्ता होतो.
Friday, November 19, 2010
विद्या व तपाने सर्व भूतांचा अंतरात्मा तृप्त होतो.

- पुराणात कसलाहि दोष नाही. ते पूर्णतः निर्दोष आहेत.
- पुराणात वेदाची प्रतिष्ठा आहे. पुराणातला कोणता
ही अंश वेदविरुद्ध नाही. वेद जसे परमात्म्याचे निःस्वास आहेत. तसेच पुराणे ही परमात्म्याचे निःश्वास आहेत. फक्त त्यात फरक इतकाच आहे की वेदांची आनुपूर्वी कधीच बदलत नाही. कल्पानुसार पुराणांची आनुपूर्ती बदलते. अर्थाचा आशय जसाच्या तसाच असतो.
- वेद, उपनिषदे, महाभारतादि घटना प्रसंगाच्या संदर्भात आधुनिक यौगिक अर्थ प्रतिपादन करतात. तोच अर्थ ग्रहण करावा अस सांगतात. नवे नवे योगिक अर्थ बसवितात. हा प्रमाद आहे.
- योगापेक्षा रूढी, परंपरा अधिक बलवती असल्याचे शास्त्रे सांगतात. तो लौकिकार्थ वा रुढार्थ आहे. तो मुख्य. त्या रुढार्थाच्या पुष्टीकरता योगिक अर्थ अपेक्षित असतात. आधी रुढार्थ वा लौकिकार्थ, तो ग्रहण करण्याकरताच योगार्थ ! तस नसेल तर अनर्थ होतील 'गो' हा शब्द आहे. गाय शब्द उच्चारताच सास्नादि अशी गाय डोळ्यासमोर उभी राहाते. योगार्थ जर स्वीकारला तर लक्षणावृत्तींचा आश्रय घ्यावा लागतो. ते तर अत्यंत अनुचित आहे. योगिक अर्थ स्वीकारण्यात आणखी अनेक दोष आहेत. 'विश्वामित्र' वगैरे शब्दात यौगिक अर्थ असंभव आहेत.
- पुराणांचे लक्षण,.....
- पुराणांची पंच लक्षणे कोणती?
२) स्थिती,
४) धर्म व
५) मोक्ष
- पुराणांचा अभ्यास करूनही आधुनिकांना त्याचे मर्म कळत नाही. ते शंका कुशंकांनी व्याकूळ असतात. ते आस्थाशून्य असतात. स्वतःच्या दोषामुळेच त्यांचे पतन होते.
- आम्ही सनातनी अद्वैती आहोत. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ची वाटचाल करणाराच्या हातून
अधर्म घडतच नाही. घडूच शकत नाही. तो मत्सर ग्रस्त कसा होईल? - मनु सांगतात, - सर्वांचा शासक, अणूहूनही अणू, सुवर्णाभ- निर्विकार, बुद्धिगम्य तो परमपुरुष जाणणारा सर्वांना पं
चभूतात्मक शरीरांनी व्यापून जन्म, वृद्धि, क्षय द्वारा नेहमी चक्राप्रमाणे फिरवणारा, समाहित होऊन सदसत आत्म्यात सर्व काही पाहाणाराचे मन कधीच अधर्म करत नाही. करू शकत नाही. - अद्वैती महापुरुषात असुया, ईर्षा असे दोष असूच शकत नाहीत.
- सर्व भूतात आत्म्याला आणि आत्म्यात सर्वभूतांना समान पाहाणारा, त्या ब्रह्मा वरच इहलोक परलोकादि चिंता सोपवून निश्चिंत असतात त्यामुळे त्यांना दोष स्पर्शूच शकत नाहीत.
- पुराण श्रवण धर्मराज्याची स्थापना करण्याची पहिली पायरी आहे. धर्मो रक्षति रक्षितः l
- धर्मानुसार वागताना देखिल विपत्ती का येतात? या विपत्ती देवाकडून येतात, तेव्हा तिच्या सुटण्याचे उपाय प्राप्त होतात. उपासकाला ते समजतात. विपत्तीत उत्साह व गुणांची परीक्षा करायची असते. परमात्मा भक्तांना संकटात आणून नंतर विपत्तीतून त्याचा उद्धार करतो. धर्मो रक्षति रक्षितः l हाच धर्म !
- न आचरलेला धर्म त्याचा नाश करतो। असत्य, अशुचि, दुराचारी माणसावर आलेली संकटे, देवाकडून आलेले नाहीत. ते अनाचारामुळे आलेले असते. त्याची ईश्वर उपेक्षा करतो. त्याचे अधःपतन होते. उत्तरोतोत्तर तो खाली जातो. नष्ट होतो.
Friday, November 12, 2010
मेरा देश महान

कारण मानवी जीविताचे रहस्य उकलून दाखविणारी ती आहे.
Friday, November 5, 2010
आम्ही केव्हा जागणार?

- १९३६ साली दिनोवास्का ही पोलिश युवती भारतात होती. ती लिहीते, ''कोणत्याही हिंदुच्या चेहेर्यावर द्वेषाचे चिन्ह आम्हाला कधीच दिसले नाही वा क्रोधाची पुसटशी रेषाही आढळली नाही. पश्चिमेत ही गोष्ट केवळ अशक्य.
- आज पश्चिमी संस्कृतीच्या अंगीकरणाने इतिहासात कधी नव्हता इतका वैफल्यग्रस्त आणि दुःखी बनला आहे. नरकयातना देणार्या या विज्ञानयुगाच्या, Sophisticated संस्कृतीच्या संकल्पना, भारतीयावर बेगुमानपणे, जबरीने लादल्या गेल्या. विळख्यात अडकले आहे. सगळ्या संकल्पना वैदिकांची समग्र शास्त्रे मनु आदि स्मृतिकार यांच्यावरच मंडनात्मक स्वच्छ. स्पष्ट भाष्यच आहे.
- आणखी ती सांगते, 'उपजतच करुणा आणि हृदयाची परम ऋजुता त्यांच्यात खरीखुरी बंधुता बंधुभाव निर्मिते. बंधुता, समानता आणि स्वातंत्र्याची बिरुदावली मिरावणार्या जगातील अन्य राष्ट्रात त्याचा अल्पांशहि अभावानेही आढळत नाही. हिंदु रक्तातच अखिल मानवाविषयी प्रेम आहे. बंधुता आहे. समानता आहे. परकिय केवळ दंभाचारी आहेत.'
- प्रेडेरिक पिंकाट छातीठोकपणे निर्भय स्वच्छ वस्तुस्थिती सांगतो, ''समाजाला
आणि विश्वाला शांति आणि सुख देणारे जे काही आहे, त्या सर्वांचेच हिंदूंनी एक पद्धतशीर शास्त्रच बनविले आहे. समाजरचना, समाजव्यवस्था वा सामाजिक बाबीसंबंधी हिंदुना का ही सांगावे, शिकवावे असे आमच्या जवळ काहीच नाही.''
- तो पिंकाट पुढे इशारा देतो, ''आज आमच्या पश्चिमी देशात जो काही निर्लज्ज, स्वैराचारी गोंधळ आहे, तसा निलाजरा बेगुमान, आसुरी गोंधळ, या हिंदु समाजातही होईल, जर आम्ही (पश्चिमेने) आमच्या आसुरी ओबडधोबड सुकल्पना या निरागस, निष्पाप हिंदूच्या गळी उतरवल्या तर, पश्चिमी प्रणाली, संकल्पना सरळ हिंदुचे अपरिमित अहित करतील.
- पश्चिमी जीवनाची धारणी, धारणाच मुळी स्वार्थाची, लोभाची आहे. भोगसाधनाकरता तिथे गळेघोर स्पर्धा आहे. त्यामुळेच उपस्थ, जिव्हेच्या लालसा भडकवणारा (शमवणारा नव्हे) बेगुमान आसुरी गोंधळ आहे. प्रेडेरिक पिंकाट या प्रामाणिक तळमळीच्या शास्त्रज्ञाचा इशारा आम्हाला सावध करायला समर्थ नाही का? आमच्या निलाजरेपणाला तुलना नाही.
Saturday, October 30, 2010
संस्कृत का मृतभाषा आहे?
जगात असा कोणता देश आहे की जिथे शिशुशिक्षणाकरता परकीय भाषा मा
- संस्कृत बोलण्याला अतिशय सोपी आहे. शासनाची भाषा तीच होऊ शकते. पाश्चात्य पौर्वात्य अशा
अनेक तज्ञांचे तसे अभिप्राय आहे त. - संस्कृत भाषा विलक्षण लवचिक आहे. ताणाल तेवढी ताणता येईल. ती तर संजीवनी सारखी आहे. प्रसंगी ती पुन्हा नवीन होऊ शकते.
- पाणिनी, कात्यायन, पतंजली यांच्या पासून तर आजवरचा इतिहास जरा डोळसपणे विरोधकांनी पाहावा. भारताची संस्कृति व इतिहास जरा डोके ठिकाणावर ठेवून वाचा.
Sunday, September 26, 2010
जो हिंदुहितपर हात उठायेगा...!

आजची पश्चिमी जीवन धरणी आणि विज्ञानवाद, आजची औद्योगिक संस्कृती आत्मघातकी आहेत. ही जीवन प्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतीयांची अस्मिता पायदळी तुडवणारी आहे. भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे. भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिक-या उडवणारी आहे. आमच्यात धुरीणींनी, शासनाने त्यांचा अंगीकार करून आमच्या सत्वाचे, अस्मितेचे नरडेच आवळले आहे.ही आत्मघातकी धारणा, ही अमानुषता अमानवीयतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतन धारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य, Emotional Integrity, अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखण्याची, सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे. पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट बनविला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे. Standard of Living, समाजवाद, Economic Development , कल्याणकारी शासन हे सगळे बिनबुडाचे Superficial अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या 'कल्पना' जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत. रशियन, अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणांत, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की शील, त्याग, तेजस्विता, आत्मनिर्भरता उफाळून येईल.
रामायणाची ही ताकद आहे. 'हा भारत माझा देश आहे, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे, याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणीवा तो माझा दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण, ही अतूट श्रद्धा, ही भावना रामायणाने सहस्रश: वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.
रामायण चिंतनाने हीच धारणा, हे श्रद्धा, व्यक्तीत, जाती - जमातीत, समाजात एकत्र विनासायास फोफावते. रामायण असे राष्ट्र ममत्व निर्माण करते, जोपासते, संबधित करते. त्यातच अनुशीलन, अनुमाप होणे, आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे.
भारत अखंड, एकात्म राखणारी सहस्रश: वर्षांपासून गंगा ब्रह्मपुत्रेसारखी अखंड वाहणारी ही रामकथा आमच्या पाठीशी खडी आहे. ही भावना, ही श्रद्धा आमच्या युवकांच्या मानसांत दृढमूल झाली की आपला तरुण शीलवान संयमी, मर्यादा सांभाळणारा आणि कर्तव्यकठोर, प्रज्ञावान, तेज:पूंज, होईल. हां हां म्हणता भारताची अखंडता, तेजस्वीता, गुणवत्ता, प्रज्ञा जगासमोर सूर्यासारखी तळपेल. विश्वाचे गुरुत्व भारताकडे विनासायास येईल.
Friday, September 3, 2010
भगवत प्रेम कसे असते!

वसति वसति चित्ते मोहनिर्नाशकोऽसौ॥
अवति अवति धर्मं सत्यरूपं परात्मा।
चरणशरण मास्तां वासुदेवं नमामि॥
नंद व यशोदा हतबुद्ध झालेत. अखेरीस त्यांने श्रीकृष्णाला विचारले, "आता तूच तुझ्या आजाराचा उपाय सांग!" दु:खाने कण्हत कण्हत श्रीकृष्ण उद्गारला, "या पवित्र वृंदावनातील माझा एखादा भक्त माझ्या डोक्यावर त्याच्या पायाची धूळ झाडेल, तर तत्क्षणी माझा आजार दूर होईल!" यशोदा नंद तयार झालेत.
श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्ही माझे माता पिता आहात, बलराम थोरला भाऊ! तिघे वर्ज्य करून वृंदावनातील कोणाही भक्ताची चरणधूळ..."
वार्ता वृंदावनात पसरली.
पुतना, अधासूर, धेतकासूर अशा राक्षसांचा वध करणारा, कालीयामर्दन करणारा, गोवर्धन उचलणारा, वणवा गिळून टाकणारा, श्रीकृष्ण हा साक्षात परमात्मा आहे, अशी वृंदावनवासियांची खात्री होती. आपल्या अपवित्र पायाची धूळ साक्षात परमात्म्याच्या माथ्यावर झाडायला कोण तयार होईल? त्यांचा उत्कट भक्तीभाव आड येत होता. वार्ता पसरता पसरता वृंदावनाजवळच्या गांवी असलेल्या राधेच्या कानी गेली. ती ओरडली, "काय? माझा कृष्ण आजारी आहे? त्याला भक्ताची चरणधूळ हवी आहे?"
ती धावत आली, सरळ नंदाच्या वाडयात आली. श्रीकृष्णाच्या अंथरुणाजवळ गेली आणि क्षणार्धात तिने आपला पाय श्रीकृष्णाच्या डोक्यावर ठेवला. श्रीकृष्णाविना मन, जीवन नसलेल्या अतुलनीय, परमोत्कट भक्त अशा राधेच्या चरणस्पर्शाने श्रीकृष्ण तात्काळ बारा झाला.
गुरुदेव,
तर्केषु कर्कशधियो वयमेव नान्ये ।
काव्येषु कोमलधियो वयमेव नान्ये ॥
तन्त्रेषु यन्मितधियो वयमेव नान्ये ।
कृष्णेषु संयतधियो वयमेव नान्ये ॥
Saturday, August 28, 2010
देव आहे का?

जसे बीज उगवते, वृक्ष होतो, सूर्य उगवतो, मावळतो. भूकंप होतात, सागर मर्यादा धरतो, वायू वाहतो, मृत्यू धावाधाव करतो, या सर्व कार्यांचा कोणी 'कर्ता' असलाच पाहिजे. नास्तिक हा टेबल-खूर्ची बनवणारा सुतार अवश्य आहे, असे सांगतो. पण, वृक्ष पहाड, महासागर बनविणारा कुणी कर्ता मानलाच पाहिजे असे नाही, असे म्हणतो. त्याची आवश्यकता अपरिहार्य आहे, असे मानत नाही.
विश्वाचे सगळे कार्य दोन प्रकारचे आहे. एक 'मानव कृत' व दुसरे 'अमानवी' दोन्ही प्रकारच्या कार्याचे 'कारण' (Cause) आहेच. अनुमान प्रमाण स्वीकारल्याविना आस्तिक नास्तिकच काय पण पशूंची देखील प्रवृत्ती व्हायची नाही. अनुमान न मानले तर प्रत्यक्षही निरर्थक होते. या अनुमानाच्या आधारावरच मानव करू शकणार नाही, असे अद्भुत विश्व, त्या विश्वातील अनंत चेतन अचेतानांची कर्मे, आदींचा कर्ता असलाच पाहिजे, हे सिद्ध होते. सुताराविना टेबल खुर्च्या होऊ शकत नाहीत, कुंभाराविना मडके होत नाही, तर मग त्या परमात्मशक्तीविना, त्या अनंत चेतन शक्तीविना चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या आदी काहीही होऊ शकत नाही. ज्ञान, इच्छा, आणि क्रियाशक्ती असल्याविना 'कार्य' घडत नाही. ज्ञानाविना इच्छा नाही. इच्छेविना कार्य नाही. जिथे ज्ञान आहे, इच्छा आहे आणि क्रिया आहे, तेथे कर्ता असतोच. प्रत्येक कार्याला कर्त्याची अपेक्षा असतेच. प्रत्यक्ष ज्ञान आणि इच्छा दिसत नाही आणि 'कार्य' दिसते. कमळ पहिले की, विचार येतोच की, हे सुंदर कमळ कुणाच्या तरी ज्ञान व इच्छाक्रियेने निर्माण झाले असले पाहिजे, तसेच या विश्वाचे कारण आहे.
Saturday, August 21, 2010
सनातन हिंदुधर्म !
आधुनिक हिंदुत्ववाद्यांचा जो हिंदु राष्ट्रवाद आहे , ज्याचा मोठ्या प्रमाणावर हिरिरीने प्रसार करतात त्याचा संबंध सनातन हिंदु धर्म व संस्कृतीशी आहे किंवा नाही ? आधुनिक हिंदुत्ववाद्यांच्या सनातन हिंदुधर्माशी सुतराम नाही . तो राष्ट्रवाद नाही . तो हिटलरी पद्धतीचा आहे . त्याला वेदाचे आणि ईश्वराचे अधिष्ठान नाही . आणि हेच या पुण्यभूमी भरतखंडाकरता फार फार खेदजनक आहे . महान दुर्भाग्य आहे .सांख्य दर्शन सांगते , 'सत्व पुरूषान्यता ख्याति रूप ' विवेकाकरता सत्वगुणाचा उत्कर्ष अटळ आहे . त्या करता निष्काम स्वधर्मानुष्ठान अपरिहार्य आहे . धर्माचे ज्ञान वेदावरूनच होते , असेच 'सांख्य' देखिल सांगते . योगदर्शनानुसार चित्तवृत्ती निरोधरूप योग स्वधर्मानुष्ठानानेच होतो . स्वधर्माचे ज्ञान वेदावारूनच होते . कारण सांख्य व योग दोन्ही वेदांचेच प्रामाण्य स्वीकारतात.
जैमिनिचे 'मीमांसा दर्शन ' तर 'धर्ममीमांसा' म्हणूनच प्रसिध्द आहे . भटट्पाद श्री कुमारिल जैमिनि दर्शनाचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत . चोदनालक्षणोऽर्थो धर्म: / असे धर्माचे लक्षण ते करतात . याचा अर्थ प्रवर्तक ( विधी ) व निवर्तक (निषेध ) वेदवचनावरूनच धर्म व अधर्माचा बोध होतो .
नवनवोन्येष शालिनी प्रज्ञा म्हणजे 'प्रतिभा !' push button answer च्या प्रभावात असलेल्या Scientific-Temparament वाल्या आधुनिकांना प्राप्त होणे असंभव । रामायण , महाभारताच्या तोडीचे ग्रंथ आज निर्माण होणे असंभव . ज्ञानदेव , तुकाराम , रामदासादि संत वा चाणक्यांच्या राजनीतिवरचा ग्रंथ निर्माण होणे असंभव ! ही प्रगती आहे का अधोगती .
Saturday, August 14, 2010
नागपंचमी!

विष्णूपासून निर्माण झालेला शेषनाग : शेषनाग आपल्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, म्हणजे तिचा भार वहातो. तो पाताळात रहातो. तो ज्ञानी आहे. त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली आहे. त्याला सहस्र फणे आहेत. त्याच्या प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. महासागरात या अशा शेषासनावर विष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती शयन करतो.
भगवंताच्या अवतार कार्याशी संबंध : नाग भगवंताच्या अवतार कार्याशीही निगडित आहे. जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो व त्यामुळे देवाच्या भक्तांना दुर्जनांकडून जाच होतो व त्यांच्या ईश्वरोपासनेत बाधा निर्माण होते, तेव्हा ईश्वर अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. धर्माची स्थापना करून तो हजारो वर्षांसाठी हा भूलोक साधनेसाठी अनुकूल बनवतो. निर्गुण परंतु सर्वशक्तीमान असा ईश्वर कोणत्या तरी रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन कार्य करतो, तेव्हा त्या कार्यासाठी `त्याचे सेवक' या नात्याने अन्य देवता वेगवेगळी रूपे धारण करतात व या धर्माच्या कार्यात भाग घेतात. शेषनागाचे स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रेतायुग व द्वापारयुग यांच्या संधीकाळी श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापारयुग व कलीयुग यांच्या संधीकाळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेषनाग बलराम झाला. नागाचे देवत्व सांगतांना गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, ```नागांतील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी !'' `नागातील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी', अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही।'
(संदर्भ : प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक ५।)
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने...!
'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा ठराव काँग्रेसने ठराव केला. १७ ऑक्टोबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला.
पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेसने वर्किंग कमिटीने 'वंदे मातरम' या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला.
संस्कृतीद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्क्यांहून अधिक सदस्य 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून 'जन गण मन' हे राष्ट्रगीत २४ जानेवारी, १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन. त्या आधी २ दिवस त्यांनी तसे घोषित केले. आमच्या राष्ट्रीय चवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वंतत्र राष्ट्र आहे की पार्लमेंटमध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे?
काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.
Saturday, July 31, 2010
सद्गुरुं तं नमामि!

- ईश्वराची कृपा झाली की गुरुप्राप्ती होते
- साक्षात शिव हे मानवी रुपात गुरुरुपणे प्रकटतात.
- गुरुकृपेनेच अज्ञान मावळते आणि अद्वैतात प्रतिष्ठा होते .
- ईश्वराचे सत्यस्वरूप अन्य कोणत्याही रूपाने कळू शकत नाही. केवळ गुरुकृपेनेच ते आकळू शकते.
गुरुसेवा करायची?
तिचे चार प्रकार आहेत.
१. आप्त: - गुरूंना रुचतील तीच कर्मे करणे.
२. अंग: - गुरूंच्या सगुण देहाची शुश्रुषा, पाय दाबाने, डोके चोळणे, वगैरे.
३. स्थान: - गुरूंच्या मालकीच्या वस्तूंची काळजी घेणे.
४. सद्भाव: - साक्षात परब्रह्म मानून गुरूंचे ध्यान करणे.
गुरुदेव डायरी -
१. कर्मकांडाचा आनंद फळ, परमशांती, भगवत्प्राप्ती हेच आहे. "अर्थप्राप्तीकरता कर्मकांड आचरण ते गौण फळ आहे. धनाचा मुख्य हेतू धर्मानुष्ठान! धन मिळाले तर यज्ञ करा, दान करा, तप करा, परोपकार करा, इष्ट पुर्त कर्मे करा. राष्ट्रसेवा करा. दीनांना दान द्या.
२. काम हा पुरुषार्थ आहे, जीवनधारणेपुरता काम, म्हणजे खाणे-पिणे! शरीरस्वास्थ्याकरता ते अटळ आहे. शरीरस्वास्थ्य कशाकरता? भगवंताच्या भजनाकरता, अनुष्ठानादी कर्माकरता उद्दिष्ट, ध्येयाची पवित्रता अटळ आहे.
३.
गुरुजी: "बेटा, तू लोणी खातोस, बदाम पिस्ते घोटून घोटून पितोस?
पहिला शिष्य: "गुरुजी, आमच्या चाळीत पलीकडे एक गुंड राहतो. तो उन्मत्त झाला की मुलीबाळीची अब्रू देशोधडीला लावेल. तसे घडले तर आम्ही त्याचे मस्तक तोडू. म्हनुउन आम्ही बदाम, पिस्ते खातो."
गुरुजी: "शाब्बास पठ्ठे! खूप बदाम पिस्ते खा! मोठे पुण्य आहे. करण हेतू पवित्र आहे."
गुरुजी दुसर्या शिष्याला विचारतात, "तू बदाम पिस्ते का खातोस?"
दुसरा शिष्य: " शेजार्याचे मस्तक तोडण्याकरता."
गुरुजी: "दोन बदाम पिस्ते खाणे, हे तुझ्याकरता पापाचे आहे."

