आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Wednesday, May 15, 2013

‘विवाहसंस्कारा’संबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण



अयोग्य विचार

‘सालंकृत कन्यादान म्हणजे हुंडा ! कन्या ही का दान करण्याची वस्तू आहे ? कन्यादान हे रानटीपणाचे आहे. स्त्रीला विनिमयाची वस्तू बनवणार्‍या रानटी संस्कृतीची ही अवस्था आजही टिकून आहे.

खंडण

 ‘संत तुकाराम महाराज सांगतात, `सालंकृत कन्यादान, पृथ्वीदानासमान ।’ संत तुकाराम महाराज रानटी होते का ? प्रेमविवाह हा ‘गांधर्व विवाह’ आहे. गांधर्व विवाहात कन्यादान हा प्रकार नाही.
कन्यादान म्हणजे हुंडा नव्हे ! कन्यादान शुल्क नाही. शुल्क (म्हणजे हुंडा इत्यादी) मिळावे, अशी अपेक्षा नाही. ती बुद्धीच नाही. सालंकृत कन्यादान ! विवाहप्रसंगी तिला तिचे वडील, भाऊ, आप्त इत्यादी सुवर्णादी अलंकार देतात, ते सालंकृत कन्यादान ! शुल्क बुद्धीचा तिथे अभावानेही गंध नाही. `दान’ याचा अर्थ ‘समर्पण’ हे विसरू नका.’
अयोग्य विचार
‘अनुवंश, कुलाचार, परंपरा असा सगळा धर्म आहे. धर्म माणसाला हाता-पायाच्या साखळदंडासारखा आहे’, असे साम्यवादी मानतात. विवाहामुळे मुक्त जीवनाला (स्वैर जीवनाला) प्रतिबंध येत असल्यामुळे, म्हणजेच कामवासनेची तृप्ती होत नसल्यामुळे विवाह हा मार्क्स आणि आजच्या आधुनिकांनी त्याज्य ठरवला. ते Glass-Water Theory अनुसरतात, म्हणजे ‘तहान लागली की, पाणी प्यायचे. त्यासाठी भांडे जवळ बाळगण्याची काय आवश्यकता’, असे साम्यवाद्यांचे मत आहे. तसेच ‘मुलांचे पोषण आणि संगोपन शासन करील’, असे ते म्हणतात.
खंडण
‘संततीचे संगोपन आणि पोषण करण्याला (खाजगी) आई-वडिलांपेक्षा शासन अधिक सक्षम आहे’, असे हे साम्यवादी सांगतात. असा समाज किती वर्षे टिकेल ? साम्यवाद जन्माला आला, तेव्हापासून अवघ्या ६०-७० वर्षांत तो कोलमडला. रशिया छिन्नभिन्न झाला. आमची समाजरचना शास्त्राप्रमाणे आहे. आम्हा हिंदूंच्या विवाहाचे हेतू सुप्रजा निर्माण करणे, धर्म आणि संस्कृती यांचे चिरंजिवित्व राखणे, मानवाचे ऐहिक हित साधणे आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त करून घेणे, हे आहेत. आम्ही जातीधर्म, कुलधर्म आदींचे पालन करून अनुवंशाचे अबाधित्व राखतो. आमच्या विवाहामुळे निर्माण होणारा वंश हा जोवर भूलोकी नद्या, पर्वत, अरण्ये आहेत, तोवर राहिला पाहिजे.’

अयोग्य विचार
‘तो व्यभिचार नव्हे. ते कामसंतर्पण आहे’, असे साम्यवाद्यांचे मानणे आहे. कामतृप्तीसाठी विवाहबाह्य संबंधाला आजचा समाज मान्यता देतो.

खंडण
‘याचा अर्थ आधुनिक समाजाला व्यभिचार मान्य आहे ! ‘कामसंतर्पण’ हे सगळे थोतांड आहे. व्यभिचार हा नेहमी सुडाच्या स्वरूपाचा असतो. व्यभिचार करणार्‍या व्यक्ती प्रेमभावना इत्यादी सांगून आपल्या अनीतीचे नेहमी समर्थन करू पहातात. ज्यांच्यामध्ये अहंगड असतो, त्यांच्यामध्ये भावना अधिक प्रबळ असतात. भावनांमुळे कोणत्याही गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)

Monday, April 29, 2013

श्रीमद्भागवत महापुराण मे राधा जी





विद्वान और पंडित जन कहते हैं की जिस समाधि की अवस्था में भागवत पुराण लिखा गया और जब राधा जी का प्रवेश हुआ तो वेद व्यास जी इतने डूब गए कि राधा चरित लिख ही नहीं सके| और सच्च तो यह है कि जो भागवत के प्रथम श्लोक



"श्री कृष्णाय वासुदेवाय" में "श्री" है...



इसका अर्थ है कि सबसे पहले राधा जी को नमन किया है | 



"श्री कृष्णाय वयं नम:" 



इसमें अकेले कृष्ण को नहीं 
"श्री कृष्ण" को नमन किया है |
सनातन धर्म में शक्ति-विशिष्ट ब्रह्म कि पूजा है | निराकार ब्रह्म कि पूजा नहीं हो सकती | वही ब्रह्म जब शक्ति-विशिष्ट होता है...तभी उसकी पूजा हो सकती है | 
"श्री" का अर्थ है "शक्ति" अर्थात "राधा जी" | 
शुकदेव जी पूर्व जन्म में राधा जी के निकुंज के शुक (तोता) थे| निकुंज में गोपिओं के साथ प्रभु क्रीडा करते थे और
शुकदेव जी सारा दिन राधा-राधा कहते थे| यह देख एक दिन राधा जी ने हाथ उठाकर तोते को अपनी ओर बुलाया | तोता आकर राधा जी के चरणों कि वंदना करता है |वह उसे उठाकर अपने
हाथ में ले लेती हैं और तोता फिर श्री राधे राधे बोलने लगा | तब राधा जी ने कहा, "अब तू राधा राधा नहीं, कृष्ण कृष्ण बोल" | इस प्रकार राधा जी तोते
को समझा ही रही थी कि तभी कृष्ण आ जाते हैं | राधा जी ने उनसे कहा कि यह
तोता कितना मधुर बोलता है और उसे प्रभु के हाथ में दे दिया | इस प्रकार राधा जी ने ब्रह्म के साथ प्रत्यक्ष सम्बन्ध कराया | इसलिए उस जन्म में शुकदेव जी कि सद्गुरु श्री राधा जी हैं और
इसीलिए सद्गुरु होने के कारण भागवत में
राधा जी का नाम नहीं लिया अर्थात अपने गुरु का नाम नहीं लिया | जिस प्रकार यदि पत्नी अपने पति का नाम ले, तो उसकी आयु घटती है, उसी प्रकार सद्गुरु को मन में स्मरण कर 'सद्गुरु कि जय" कहना चाहिए, मर्यादा भंग
नहीं करनी चाहिए |
ऐसा शास्त्रों में वर्णन आता है | और दूसरा कारण राधा शब्द भागवत में ना आने का यह है कि यदि शुकदेव जी राधा नाम ले भी लेते तो वह उसी पल राधा जी के भाव में इतना डूब जाते कि पता नहीं कितने दिनों तक उस भाव से बहार
ही नहीं आ पाते | ऐसे में राजा परीक्षित के पास तो केवल सात ही दिन थे, फिर कथा कैसे पूरी होती| जब प्रभु ने राधा जी से पूछा कि इस साहित्य में तुम्हारी क्या भूमिका होगी? तब राधा जी ने खा कि मुझे कोई भूमिका नहीं चाहिए, में तो आपके पीछे हूँ | 



इसिलए कहा गया है कि 
कृष्ण यदि शब्द हैं तो राधा अर्थ है , कृष्ण गीत हैं तो राधा संगीत ह, 
कृष्ण वंशी हैं तो राधा स्वर हैं , 
कृष्ण समुन्द्र हैं तो राधा तरंग हैं, 
कृष्ण पुष्प हैं तो राधा उस पुष्प कि सुगंध हैं | 
इसीलिए राधा जी इसमें अदृश्य
रही हैं| उनका नाम "गुप्त रीति" से दो तीन स्थानों पर लिया गया है | 



भागवत में महारास के
प्रसंग का यह श्लोक विचारणीय है : 
"तत्रारभत गोविन्दो रास क्रीडा मनु व्रते |
स्त्रीरतनैरविन्तः प्रीतैरन्योन्यबद्धबाहुभि: 



" अर्थात भगवान् श्रीकृष्ण कि प्रेयसी और सेविका गोपिआं बहो में बाहें डाल खड़ी थी | 



श्रीमद्भागवत मे प्रसंग आता है कि वृन्दावन मे रासलीला करते हुए भगवान अंतर्ध्यान हो जाते हैं ...तो गोपियाँ व्याकुल होकर उन्हें खोजने लगती हैं ..मार्ग मे श्रीकृष्ण के साथ साथ एक ब्रजबाला के भी पदचिन्ह दिखाई दिये 
"अनया आराधितो नूनं भगवान् हरिरीश्वर: | 
यन्नो विहाय गोविन्द: प्रीतोयामनयद्रह: ||" 
अर्थात गोपिया आपस में कहती हैं :'अवश्य ही सर्व शक्तिमान कि वह आराधिका होगी, इसीलिए इसपर प्रसन्न होकर हमारे प्राण प्यारे श्यामसुंदर ने हमें छोड़ दिया है और इसे एकांत में ले गए हैं . स्पष्ट है कि यह गोपी और कोई नहीं, राधा जी ही थी | श्लोक में "आराधितो" शब्द में राधा नाम छिपा है

Sunday, March 24, 2013

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने...


१. परदेशातील वेदांताच्या झंझावाती प्रचाराने धर्मांतराला आळा बसणे !
    ‘स्वामी विवेकानंदांच्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी संस्कृती यांचा प्रभाव, खिश्चन धर्मगुरूंचे बुद्धीभेद करणारे डावपेच, तशा प्रकारचे वाङ्मय, यांमुळे हिंदू धर्म अन् संस्कृती अत्यंत हीन, अमानुष, दयनीय आणि रानटी आहे, असा हीनगंड भारतातील श्रेष्ठ लोकांत जोपासला गेला. पुष्कळशा हिंदूंनी बाप्तिस्माच घेतला असता आणि त्यांचे खिश्चनीकरण झाले असते. स्वामी विवेकानंदाच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने त्याला आळा बसला, यात संशय नाही.’
२. जगाला आत्मिक ऐक्याचा संदेश देणे आणि तरुणांमध्ये नवचेतना निर्माण करणे
    खिस्ताब्द १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेमध्ये त्यांनी आत्मिक ऐक्याचा संदेश जगाला दिला. भारताच्या आत्मिक प्रगतीसह ऐहिक प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये नवचेतना आणि उत्साह निर्माण होण्यास साहाय्य झाले.
३. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करणे
    सततची परकीय आक्रमणे, अनाचार, लूटमार, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसा या सर्वांमुळे हिंदु समाज आक्रांत झाला होता. समाजात निर्माण झालेले औदासीन्य आणि पराभूत मानसिकता यांतून हिंदु समाजाला बाहेर काढण्यासाठी रामकृष्णांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी आसेतुहिमाचल प्रवास केला. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदुस्थान यांचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले.
४. ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना
    आपल्या गुरूंचा ‘स्नेहयुक्त बंधुभाव आणि आत्मिक ऐक्य’ हा संदेश जगाला देता यावा, यासाठी स्वामी विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली अन् हिंदु धर्माचे खरे स्वरूप जगाला उलगडून दाखवले. या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून श्री रामकृष्ण परमहंसांचा संदेश जगात पोहोचवण्याचे स्वामी विवेकानंदांनी आरंभलेले कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८ सप्टेंबर २००६, अंक ३७)

Sunday, March 3, 2013

योगी व्हा !


योगावर अनेक ग्रंथ असतातच; तुम्ही नवे काय सांगणार ? 
  • 'मी' जे अनुभवतो तेच सांगतो . माझी प्रतितीच सांगतो .
  • योग (युज) जोडणे , एक संग होणे . एकरसाणे . एकात्म होणे . एक होणे.
  • 'योग' एक करतो तो योग! योग म्हणजे एकाग्रता, एकचित्त, सहसंवेदना. योग म्हणजे आध्यात्मिक संवेदन. योग ही कला आहे. जीवन प्रसन्न, शांत, सुखमय, परमात्म्याशी एक करणारी गुरुकिल्ली आहे.
  • योग जीवाला मन आणि अहंकारापासून अलग करतो. योग व्यक्तीला साक्षीत्व देतो आणि मग मन आणि इंद्रियांचा तो स्वामी होतो. अहंकराचा प्रभू होतो. मन, इंद्रिये आणि अहंकारादि नियंत्रणाखाली ठेवू शकतो. आणि अखेरीस आत्मा परमात्म्याशी जोडतो. जीवास शिव बनवतो. साधक परमात्माच होतो .
माणसाने शक्ती संपादन करायची म्हणजे नेमके काय करायचे? शक्तीची उपासना? कोणती?  कशी? भारत आज दुबळा बनला आहे. त्याला शक्तीशाली कसे बनवायचे? शक्ती संपादायची? कोणती शक्ती?
  • क्षात्रशक्ती - military power ही तर विकसित करायचीच. ही एकच एक शक्ती नाही. आणखी एक शक्ती आहे ती 'ब्रह्मशक्ती !' जशी 'क्षात्रतेज' शक्ती आहे तशी 'ब्रह्मतेज' शक्ती आहेच. ब्रह्मतेज ब्रह्यवर्चसाने, भगवत्तेने, परमात्मदृष्टीने प्रगति ! योगसाधनेने चित्तवृत्ती निर्मल होते, एकाग्र होते आणि मग निराकार होते. समाधी अवस्था हेच ब्राह्मतेज !
  • भगवंताची  योगाची वाट चालायची? तितकी बुद्धी , तितके मनोधैर्य, साहस नसेल तर त्याचे चरण धरा, समर्पण करा. वाटचाल करीत जा. हळूहळू त्याच्या कृपेने धैर्य येते. साहस येते. बळ येते. उणीवा भरून निघतात. (अकूतोभय) निर्भय होतो .
  • विचार करण्याची क्षमता हीच शक्ती ! योगसाधनेने ती क्षमता येते. परिणत प्रज्ञा प्राप्त होते. साधारणत: माणसाला विचार करताच येत नाही . He is incapable of thinking as flying . 'ऊडून जा ' म्हटले तर ते जसे अशक्य, तसच विचार करणेही. त्रिकोणाचा चौकोन बनवणे, वाळूच्या दोरीने आकाश बांधणे तसेच विचार करणे असंभाव्य, अशक्य, विचार करणे म्हणजे चित्ताची एकाग्रता, अव्यग्रता, मनाच्या पलीकडे पलीकडच्या स्तरावर सतत राहण्याची क्षमता. समत्वात राहणे, समत्य सांभाळणे हीच शक्ती. वृत्तीशून्य अवस्था! निराकार आणि ब्रह्माकार स्थिती हीच शक्ती.
  • चित्त एकाग्र करण्याची क्षमता नसणे, हीच दुर्बलता. विचार करण्याची क्षमताच गमावली आहे. इच्छाही नाही. कारण त्याकरता श्रम करावे लागतात. म्हणून तर अध:पतनाच्या गर्तेत खोल खोल तो पडतो आहे.
  • आज सगळे योग-भोग हवे तर आहे, पण फुकट! त्याकरता मोबदला द्यायची तयारी नाही. एकाग्रतेविना, विचाराविना ज्ञान-आत्मा-परमात्मा हवा आहे. साधानेविना सिद्धी  हवी आहे. श्रमाविना, कष्टाविना फळ हवे आहे. ते शक्य नाही. अशाने आळस वाढेल. तमोगुण बळावेल आणि तो हेच जीवन नव्हे, तर जन्म जन्म पशुयोनीत भटकवील. योगाची (म्हणजे शक्तीची) आत्मशक्तीची उपासना न कराल तर शक्ती तुमचा त्याग करील. केवळ भक्तीचंच साधन, नामस्मरणाचं साधन करतो, तिथे काही नेम नकोत.
  •  साधन नको, कष्ट नकोत. त्यांनी काय साधणार? योगाविना, समाधीविना आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान आणि आत्मशक्ती नसेल तर भक्ती काय करणार ? तिला थारा कसा मिळेल? अशाने माणूस संकुचित बनेल, क्षुद्र होईल. क्षुद्र अंत:करणात परमात्मा कसा राहील? भक्ती कशी राहू शकेल ?
  •  लक्षावधी शिष्य काय करायचे ? मेंढरे आहते ती! बुध्दिमान, अहंकारमुक्त, भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणारे, निमित्त बनणारे दहा असले तरी ते दुनिया बदलून टाकतील. 
योगसाधनेला  प्राणायामाची अत्यंत आवश्यकता आहे का ? प्राणायामाविना योगसाधना होऊ शकते का ?
  • प्राणायामाविनाही योगसाधना होऊ शकते, हे खरे. पण प्राणायामाने योगसाधनेला विलक्षण वेगाने गति होते, हेही खरे. 
  • अलिकडचे महायोगी अरविंदांची गोष्ट आहे.प्राणायमानेच ते योगसाधनेला प्रारंभ करतात. सकाळी संध्याकाळी तीन तास. किमान रोज ५/६ तास प्राणायमाचा नेम असतो. अरविंद घोषांनीही काही वर्षे सतत सकाळ संध्याकाळ सहा सहा तास प्राणायाम साधना केलेली होती. प्राणायमाने त्यांची मति विलक्षण वाढते. प्राणायामाआधी ते महिन्याला जेमतेम २०० ओळी कविता लिहीत. स्फुरलेले जरी त्याच क्षणी न लिहीले तरी ते स्मरणांत असे. स्मृति अशी तेजोमय होती की  हवे त्या वेळी ते त्या ओळी स्मरणात आणु शकत आणि लिहू शकत.

"अभिमंत्रित विभूति, मंत्र, तीर्थ, भगवंतावरची श्रद्धा रोग बरे करू शकते का? ही अंधश्रध्दा. आजच्या विज्ञानाच्या युगात औषध न घेता मंत्र, तीर्थ, विभूतीने रोग जातात, म्हणजे हा खुळेपणा आहे. हे सगळे बंद केले पाहिजे."

  • "खरे आहे. कुणी विभुति द्यावी. तीर्थ द्यावे रोगावर! रोग्याने ते औषध न घेता घ्यावे! सगळी अद्यावत वैज्ञानिक चिकित्सा उपलब्ध असतानाही असा समज असूच नये. आजच्या युगांत.
  • पण कुणी जर रोगावरचा उपचार म्हणून भगवंतावरच्या श्रद्धा हाच उपचार, त्याचे तीर्थ, विभूति हाच उपचार करीत असेल, तर त्याच्यवर बंदी घालणे हेही गैरच .कुणी कुणाला का रोकावं? समाजाला कसलाही त्रास न होता जर कुणी काही श्रद्धेने करीत असेल, तर त्याला प्रतिबंध का करावा? तसा अटकाव करणारा समाजच चुकीचा असेल!
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Wednesday, February 13, 2013

धर्मग्रंथांची व्युत्पत्ती, तसेच निर्मिती काळाविषयी केलेला अपप्रचार आणि त्यावरील खंडण भाग - १


म्हणे, धर्मग्रंथ हे कलियुगात लिहिले गेले !

अयोग्य विचार
१. काही धर्मग्रंथांच्या रचनाकाळाच्या संदर्भातील एक मत
अ. वैदिक संहिता, ब्राह्मणग्रंथ अन् काही उपनिषदे (खि.पू. ४००० ते खि.पू. १०००)

आ. काही उपनिषदे, निरुक्त (खि.पू. ८०० ते खि.पू. ५००)

इ. प्रमुख श्रौतसूत्रे आणि काही गृह्यसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ४००)

ई. धर्मसूत्रे, गृह्यसूत्रे, पाणिनीची व्याकरणसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ३००)

उ. जैमिनीचे पूर्वमीमांसासूत्र (खि.पू. ५०० ते खि.पू. २००)

ऊ. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य (खि.पू. ३०० ते खि.पू. १००)

ए. मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति (खि.पू. २०० ते इ.स. ३००)

ऐ. नारदस्मृति, काही पुराणे (इ.स. १०० ते इ.स. ४००)

ओ. इतर स्मृती आणि काही पुराणे (इ.स. ६०० ते इ.स. ९००)

२. स्मृतींच्या रचनाकाळाच्या संदर्भातील दुसरे मत
अ. गौतम, आपस्तंब, बौधायन धर्मसूत्रे आणि मनुस्मृति (सनपूर्व ६०० ते इ.स. १००)

आ. याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादींच्या स्मृती (इ.स. १०० ते इ.स. २००)

इ. इतर स्मृती (इ.स. २०० ते इ.स. ८००)

ई. स्मृतीवरच्या टीका आणि निबंध या स्वरूपाची ग्रंथरचना (इ.स. ८०० ते इ.स. १८००)

टीप - कंसातील वर्षे ही संबंधित ग्रंथांच्या रचनेचा कालखंड दर्शवतात.

         ऐतिहासिक दृष्टीने सर्व स्मृतिकार हे कलियुगातीलच आहेत; पण निबंधकारांनी त्या सर्वांना कलियुगाच्या पूर्वीचे ठरवले आहे.

खंडण
१. वेदोऽखिलो धर्ममूलम् । - मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८

अर्थ : वेदातून सनातन धर्म प्रगटला. (सर्व वेद हे धर्माचे मूळ आहे.)

२. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । - श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १८

अर्थ : परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त असा उत्पन्न करतो आणि प्रसिद्ध आत्मा त्या हिरण्यगर्भाला ऋग्वेदादी महत् शास्त्रे देतो.

         `जो ब्रह्मदेवाला उत्पन्न करून वेद प्रदान करतो, त्याला मी शरण जातो. म्हणजे वेदांचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभी होते. भगवत्पाद शंकर सांगतात, सर्व सृष्टी वेदापासून झाली. सृष्टीच्या आद्यतत्त्वात वेद आहेत. प्राचीन शास्त्रातील कल्पकाळ परिगणन पाहिले, तर सृष्टी उत्पन्न होऊन ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. ‘संपूर्ण वेदराशी (कारण वेद पर्वताप्रमाणे असून अनंत आहेत.) सृष्टीच्या प्रारंभी अस्तित्वात आला’, हा आमचा सिद्धांत आहे. व्यासांनी द्वापराच्या अंती वेदांची कांडे केली, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे विभाग केले आहेत. द्वापरयुगाचा अंत म्हणजे आजच्या कलियुगाचा प्रारंभ अदमासे ५०५० वर्षांपूर्वी झाला. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे विभाग ५,००० वर्षांपूर्वी झाले आहेत.’

टीका
         `याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला.' - आधुनिक

खंडण
         खिलभाग वेदांनंतर रचला इत्यादी खोटे असणे आणि याज्ञवल्क्यांना सूर्याच्या आशीर्वादाने खिल अन् उत्तरभाग यांसह वेद प्राप्त होणे : ‘महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट विवरण आहे,

         प्रतिष्ठास्यति ते वेदः सखिलः सोत्तरो द्विज ।

         कृत्स्नं शतपथं चैव प्रणेष्यसि द्विजर्षभ ।। - महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३०६, श्लोक १०

अर्थ : हे द्विजश्रेष्ठ याज्ञवल्क्य, खिल आणि उत्तरभाग यांसह वेद तुझ्यात प्रतिष्ठित होतील आणि हे द्विजा ! तू संपूर्ण शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे प्रवचन करशील.

         याज्ञवल्क्याच्या तीव्र तपस्येने संतुष्ट होऊन भगवान सूर्यनारायण त्यांना म्हणाले, ``तुझ्या शरिरात वाणी होऊन
श्री सरस्वती प्रवेश करील.’’ त्याप्रमाणे त्यांनी वेदवाणी सरस्वतीला याज्ञवल्क्यामध्ये प्रविष्ट व्हायला प्रेरित केले. तेव्हा याज्ञवल्क्याने आपले मुख उघडले. इथे स्पष्ट आहे की, याज्ञवल्क्याने भगवान भास्कराच्या कृपेने खिल भागासह वेद प्राप्त केले. अशा प्रकारे शंभर अध्याय असलेल्या ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाचे प्रथम प्रवचन याज्ञवल्क्याने केले. महाभारतात हा सर्व प्रसंग आहे. भगवान भास्कराच्या कृपाप्रसादाने याज्ञवल्क्याने शुक्र यजुर्वेदाच्या १५ शाखा प्राप्त करून घेतल्या.’ यामुळे खिलभाग नंतर रचला इत्यादी विधाने खोटी आहेत.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, February 2, 2013

गोवंशरक्षण!

तिलं न धान्यं पशवो न गावः ।’ म्हणजे ‘तीळ हे धान्य नव्हे आणि गाय काही पशू नाही’, ही ज्वलंत भावना वा श्रद्धा चळवळ करणार्‍यांच्या अंतःकरणात आहे का ? चळवळी करणार्‍यांत चळवळ करणार्‍यांचा अभिमान किती क्षीण असतो. त्यामुळे त्या चळवळीशी त्याचे जीवन एकरूप होऊ शकत नाही; म्हणून ती चळवळ पहाता पहाता क्षीण होते. नष्ट होते ! ‘संपूर्ण भारतात, गोहत्याबंदी घोषित न झाली, तर मी ११.९.१९७६ या दिवसापासून आमरण उपवास करीन.’ सर्वोदयाचे मुखपत्र ‘मैत्री’मधून गोहत्या बंदी संदर्भात कडक लेख येऊ लागले आहेत. इंदिरा गांधी विनोबांना भेटायला आल्या आणि विनोबांनी आमरण उपोषणाचा निर्णय मागे घेतला !’

१८५७ चा उठाव किंवा क्रांतीयुद्धाच्या वेळी काडतुसाला गायीची चरबी लावल्याने काडतुसाचे बंद दाताने काढावे लागतात, ही वार्ता सैनिकांत पसरल्यावर ‘इंग्रज आपणाला बाटविणार असून धर्म बुडवत आहेत’, या श्रद्धेने सर्व सैनिक पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिशांना ‘देमाय धरणी ठाय’ केले. १८५७ च्या युद्धाआधी ४ हिंदी शिपायांमागे १ इंग्रज शिपाई असे प्रमाण होते; परंतु ब्रिटिशांना इतकी धास्ती वाटू लागली की, त्यांचा हिंदी शिपायांवरील विश्वासच उडून गेला आणि त्यांनी दोन हिंदी शिपायांमागे १ इंग्रजी शिपाई असे प्रमाण ठेवले.      गोवध बंदी चळवळीने पुन्हा एकदा १८८० ते १८९० या काळात असंतोषाचा भडका उडाला. हिंदू भयंकर प्रक्षुब्ध झाले. उत्तर, मध्य आणि  पश्चिम भारतात लोकक्षोभाला आवर घालणे ब्रिटिशांना जमत नव्हते. १८५७ - ५८ या उठावाच्या वेळी लोकक्षोभाची जी काही तीव्रता व स्फोटकता होती, त्यापेक्षाही अधिक ज्वाळा उफाळत होत्या. ब्रिटिशांच्या भारतातील मंत्र्यांनाच धडकी भरली. त्यांनी महाराणी व्हिक्टोरियाला कळविले, `ही चळवळ वस्तुतः ब्रिटिशांच्या विरोधात आहे. मुसलमान समाजानेही हे ओळखले आहे. हिंदूंना गोहत्या नको असेल, तर आपणही गाय मारायची नाही’, असे मुसलमानांनी जाहीर सभांमधून घोषित केले.
 ('India : The Transfer of Power' या तिसर्‍या खंडात हा सर्व वृत्तांत विस्ताराने दिला आहे.)
 
मुसलमानांना हिंदूंविरुद्ध फोडल्याशिवाय ब्रिटिशांना हिंदुस्थानावर राज्य करता येणार नाही. आताच दोन लाखांच्या जवळपास खडी इंग्रज फौज आहे. इतका खर्च व मनुष्यबळ आपल्याला हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी उपयोगात आणणे असंभव आहे. हिंदुस्थान सोडून आपल्याला जावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले. हिंदु समाज आणि संस्कृती ही रानटी असून इंग्रजी संस्कृतीच एकमेव हिंदूंची तारणहार आहे. गाय हा पशू असून रानटी हिंदू गायीलाच ‘देव’ मानतात.
 
राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक यांना हाताशी धरून हिंदु समाज व संस्कृती यांचा कणा (गाय) मोडण्यास इंग्रजांनी प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी मुसलमानांना पेटविले. त्यांनी गोहत्या चालू केली. ब्रिटिशांना राज्य करण्यासाठी मुसलमानांचा हुकुमी पत्ता मिळाला. पुढे एका नेत्याने ब्रिटिशांना पाठिंबा देऊन दलित समाजाचा दुसरा हुकुमी पत्ता मिळवला आणि हिंदुस्थानवरची आपली पकड घट्ट केली.
 
आज दुर्दैवाने आम्ही ‘गाय’ हा हिंदुस्थानचा कणाच मोडून टाकला. आता पुरुषार्थहीन, क्लिंब असा हिंदु समाज किडा, मुंगीसारखा न जगला तर नवलच.
 
Civil Disobedience and Indian Tradition या धर्म पाल यांच्या ग्रंथात वरील विषयाची पुराव्यानिशी माहिती आहे.
१८५७ : ‘गाईच्या चरबीचा वापर केलेली काडतुसे वापरली; म्हणून हिंदुस्थानी सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले.

सध्याची स्थिती
१. १९४८ मध्ये भारताची राज्यघटना अमलात आली. संपूर्ण हिंदु समाजाइतका नादान समाज पृथ्वीच्या पाठीवर कुणी पाहिला आहे का ? स्थानात गोहत्या बंदी करावी, असे `कलम' आहे. आजवर गोहत्या बंदी झाली नाही. 

२. महाराष्ट्र शासनाने विधीमंडळाने १९९५ मध्ये गोवध बंदीचा कायदा संमत केला आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीकरिता पाठवला. आजपर्यंत तो तसाच धूळ खात आहे. १४ वर्षे होऊन गेल्यानंतरही कायद्याला राष्ट्रपतींची संमतीच नाही. त्यामुळे अजून गोहत्या बंदीचा कायदा नाही.
 
३. केंद्र सरकारने गोहत्या बंदीसंबंधी काहीही केले नाही. केंद्र आणि राज्य शासन गोहत्या बंदीचा कायदा करण्याला नाखूष आहेत. इथे मुसलमानांचे तुष्टीकरण तर आहेच, शिवाय केंद्र आणि राज्य शासनाला गोमांसापासून प्रचंड पैसा मिळतो. प्रचंड प्रमाणात डॉलर्स, युरो, रियाल, दिनार अशा स्वरूपात धन प्राप्त होते. शासनाला केवळ पैसा हवा आहे.हिंदूंचे काही सोयरसुतक नाही.
 
४. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी गोहत्या बंदी कायदा केला. तिथेही गोहत्या होतेच.हिंदुस्थानच्या अनेक राज्यांत गोवध बंदीचा कायदा असूनही गोवध सर्रास चालू आहे. तेव्हा गोवध बंदी नसलेल्या केरळ, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत गोहननाच्या संदर्भात काय सांगावे ?
 
५. ज्या राज्यात गोवध बंदी आहे, त्या राज्यातून मुसलमान जिथे बंदी नाही, त्या राज्यात ट्रक भरभरून गायी आणतात. तिथे गायींच्या कत्तली करतात. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सहस्रो गायी आणतात आणि अन्य नगरातील मोठी गावे, मुंबईतील मुसलमान बहुल भागात कत्तली करतात. नागपूरला एका भागात उघड उघड घराघरांतून मुसलमान गोहत्या करतात. कत्तलखान्याच्या व्यतिरिक्त नागपूर, दिल्ली, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा मोठ्या शहरांतून आणि ग्रामीण भागांतून मुसलमानबहुल स्थानांतून घराघरातून मोठ्या प्रमाणावर उघड उघड कत्तल होते.
 
६. हैद्राबादचा कत्तलखाना मुंबईजवळील देवनारच्या कत्तलखान्यासारखाच प्रचंड आहे. आशिया खंडातले हे दोन्ही कत्तलखाने अद्ययावत असून सर्वांत मोठे कत्तलखाने आहेत.
 
७. खानदेशातील नडोंजा या गावी प्रतिदिन ४०० गायींची कत्तल होते. सहस्रो गोमांसाने भरलेले ट्रक मुंबईत येतात. येथून विदेशात गोमांसाची निर्यात होते. कुवेत, अरब राष्ट्रे, मलेशिया, इजिप्त, मध्य आशियातील देशांना लाखो टन गोमांस विकले जाते.
 
८. मानखुर्द येथे दोन ट्रकमध्ये खच्चून भरलेले सहा टन गोमांस पोलिसांनी जप्त केले. सहा टन गोमांस म्हणजे या सैतानांनी किती गाई मारल्या असतील ?
 
९. बकरी ईद जवळ आली की, महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गाई, बैल, वासरे यांची चोरटी तस्करी होते. मुसलमान बकरी ईदला गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात.हिंदुस्थानात मुसलमान हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायींच्या मुद्दाम कत्तली करतात. 
 
१०. बकरी ईदच्या दिवशी मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान-सहान गावातही गाई-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. सरकार खाटकांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही. कायद्याने गोहत्या बंदी जिथे आहे, तिथेही पोलिसांच्या डोळ्यांसमोर गल्ल्यांमध्ये गोमांसाचा बाजार चालू असतो.
 
११. ५ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या Agriculture Organization ने भारतातल्या पशूंच्या कत्तलीची आकडेवारी दिली. त्यात एकाच वर्षात १ कोटी ६० लक्ष ७० सहस्र गाई-वासरांची कत्तल झाल्याची नोंद आहे. आज वर्षाला अडीच कोटींच्या जवळपास गाई-वासरांची कत्तल होते.
 
१२. एका वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुमार सांगतात, ‘‘अमेरिका आणि युरोप मधील गोमांसविक्री करणार्‍या (जसे फास्ट फूड) बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारत सरकारला भारतभर मांसविक्रीची मोठी योजना दिली आहे. भारताला एक प्रकारे सक्तीने मांसाहारी करण्याची ती योजना आहे. भारत सरकारने ती स्वीकारली. त्यांच्या नियोजनाखाली त्या योजना आता राबवल्या जात आहेत. गोहत्या बंदीची गोष्ट आज फार दूरची असून आता सरकारच गोहत्येच्या विविध योजना राबवील.
 
गाय ही आम्हा हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात ४ सहस्र कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.’
 
१३. ‘आधुनिकांचा बौद्धिक दहशतवाद प्रत्यक्ष पिस्तुल घेऊन मारण्यापेक्षाही महाभयंकर आहे. हे आधुनिक निधर्मी लोक गायी आणि वासरे यांच्या दुर्दशेवर अश्रू ढाळतात. ते गाई वा वासरे यांची दुर्दशा दूर व्हावी; म्हणून अश्रू ढाळत नसून त्यांना समाप्त करून त्याद्वारे डॉलर्स मिळवण्याकरिता आनंदाश्रू ढाळत आहेत.’

 - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (गाय न कटे’ या ग्रंथामधून तसेच साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१.२०१०)  

Monday, January 28, 2013

वैभवशाली भारताची दैन्यावस्था !

आमचा वैभवशाली भारत आज विलक्षण दरिद्री झाला आहे ! 
  • जगातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा शतपटीने अधिक निसर्गसमृद्ध असलेला आमचा भरतखंड जगातल्या एकशे अठ्ठावन्न राष्ट्रांत दारिद्र्याच्या सातव्या क्रमांकावर आहे.
  • एड्ससारख्या परदेशातल्या प्राण घेणार्‍या किळसवाण्या रोगाच्या लागवणीत भारताचा तिसरा क्रमांक आहे.
  • मद्य, सिगारेट, मेंदू जड करणारी मादक द्रव्ये यांच्या सेवनात आमचा देश युरोप आणि अमेरिकेच्या रांगेत आहे.
  • भ्रष्टाचाराच्या संदर्भात तर आमचा क्रमांक पुष्कळच वरचा आहे.
  • आमच्या सैन्यशक्तीविषयी काय सांगावे ? चिमुरडा बांगलादेश आणि लंका हे आमच्या उरावर बिनदिक्कत नाचत आहेत. पाकिस्तान विलक्षण धुडगूस घालत आहे.
  • सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्यात निधर्मीवादी (सेक्युलर) आणि स्वार्थी (मतलबी) सत्ताधिशांचा सर्वांत वरचा क्रमांक आहे.
  • अशोक, महावीर आणि गांधी यांच्या या अहिंसावादी भारतात प्रचंड हिंसाचार उसळला आहे.
  • आमच्या गुप्तहेर खात्यातील हिंदु स्त्रिया पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्यातील अधिकार्‍यांशी विवाहबद्ध होत आहेत. त्यांचा सत्कार होत आहे. आमची मानवतावादी लोकशाही ही अशी आहे.’
‘भागवतात प्रसंग आहे. पृथ्वी ही आदिराजा पृथूची प्रार्थना करते, `या विश्वातले प्रत्येक पाप मी विनासायास सहज सहन करते, करू शकते; परंतु महाभयंकर असे अनृताचे पाप मात्र मला सहन करवत नाही. आधुनिक काळी जगावर जे अनृताचे सुसाट वादळ सतत घोंगावते आहे, त्यामुळे कधीच कुणाचे हित होणे असंभव !’ 
‘राष्ट्र अधोगतीला जाते ते स्थितीशीलता, जातीभिन्नता वा आचारभिन्नतेमुळे नव्हे, तर तेजोहीनतेने, आत्मविस्मृतीने, न्यूनगंडाने इंद्रियलोलुप आणि भोगप्रवण बनल्याने होते !  ज्वलंत तत्त्वनिष्ठेकरताच धैर्याने उभे राहून प्रसंगी आत्मसमर्पण करणारे जितके लोक अधिक, तितका धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष अटळ आहे. गतीभिन्नता, आचारभिन्नता आणि जातीभिन्नता या राष्ट्रोन्नती रोखू शकत नाहीत. तेजोहीनतेमुळे राष्ट्र निःसत्त्व होते. तेजस्विता, आत्मश्रद्धा, अस्मिता ही स्वतंत्र शक्ती आहे. मिथ्याचार, दंभाचार, भ्रष्टाचार, भोगलोलुपता हे सगळे पहाता पहाता तत्त्वनिष्ठा अस्तंगत करून टाकतात. कोणत्याही मताचा, जातीचा, पंथाचा, आचारांचा तो असला, तरी जर प्रखर तत्त्वनिष्ठा असेल, तर त्याचे कर्तृत्व, त्याची तेजस्विता, इच्छाशक्ती, आत्मशक्ती, आत्मसमर्पणाची दृढ भावना अशा सर्वच्या सर्व श्रेष्ठ वृत्ती आणि शक्ती दोन्ही तीर फोडून वहाणार्‍या महानदीसारखे तुफान वेगाने धावतात.’ 

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक  चिंतन’, १३.१०.२०११)  

Sunday, November 18, 2012

अमेरिकेतील स्त्रिया पुनश्च स्त्रीत्वाकडे !


स्त्री आणि पुरुष यांचे धर्म वेगळे असले, तरी या दोहोंत परस्परांचे विलक्षण आकर्षण असते. समाधीतील ब्रह्मदेवाचे शरीर दुभंगून त्याचा डावा भाग पुरुष, तर उजवा भाग स्त्री झाल्यामुळे दोघांना एकमेकांचे आकर्षण असते. त्यालाच `प्रेम’ म्हणतात; म्हणूनच ते एकत्र येण्यासाठी धडपडतात. त्यामुळे मनूने विवाहसंस्था निर्माण केली. विवाहसंस्था हीच समाजाची आधारशिला आहे. कुटुंब नसेल, तर समाज उरणार नाही. तो जमाव किंवा समुदाय असेल. या विवाहालाच अत्यंत उदात्त, अती पवित्र आणि मंगल रूप देण्याकरिता विवाहसंस्कार आहेत. आमच्या वैदिक परंपरेप्रमाणे विवाह झाला, तर आमरण विवाह रहातोच. ते कुटुंब, तो वंश टिकतोच. ‘जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत, अरण्ये आहेत, तोवर तो वंश राहील’, अशी मनूची प्रतिज्ञा आहे.’

‘माता-भगिनींना आमची हात जोडून सर्व विनंती आहे की, त्यांनी स्त्रियांना ‘पुरुष’ बनविणार्‍यांच्या नादी लागू नये. स्त्रीमुक्ती आदी थोतांडे उभी करून आमचा समस्त समाज उद्ध्वस्त करू नये !’
‘अमेरिकेत स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’(Back to Womanhood)  ही स्त्रियांची चळवळ विलक्षण जोरात आहे. स्त्री मुक्तीच्या आत्यंतिक पुरस्कारामुळे अमेरिकेचे, एकूणच जगाचे आणि भारतातील आधुनिक स्त्रियांचे स्त्री-स्वातंत्र्याचे मृगजळ त्यांची तहान भागवू शकत नाही.
स्वातंत्र्याच्या नावाखाली तिथे स्वैराचार सुरू आहे. खरे स्त्री-स्वातंत्र्य तर दूरचे दिवे !’ आज आधुनिक स्त्रिया स्त्री-जीवनाच्या परिपूर्तीकरिता अपरिहार्य अशा प्रसन्न `स्त्री-पुरुष’ संयुक्त जीवनालाही मुकल्या आहेत. स्त्रीमुक्ती आंदोलनातील अग्रणी स्त्रियाच आता भयभीत झाल्या आहेत.  वेडेपणाचा अतिरेक झाल्यावरच शहाणपणा सुचतो, नरकात लोळल्यानंतरच स्वर्गाचे मूल्य कळते. अमेरिकेतील स्त्रिया स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी करत असलेल्या ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) चळवळीमुळे आमच्या स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियाही उलट दिशेने, म्हणजे परंपरागत स्त्रीधर्माकडे, गृहिणीधर्माकडे वळत आहेत, हा आमच्या मनु आदी शास्त्रकारांचा विजय आहे.
आमच्या विवाहादी परंपरा हा निसर्ग आहे. निसर्ग मोडला, तर तो सूड उगवेलच. अनैर्सिगकता किती काळ टिकेल ? आज अमेरिकेत ‘पुन्हा स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) ही चळवळ सुरू आहे. उद्या त्या स्त्रिया कुंकू लावतील. मग आमच्याही स्त्रिया कुंकू लावायला लागतील. यालाच स्त्रीदास्य-विमोचन म्हणायचे का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)
अमेरिकी स्त्रियांना ‘आपण स्त्रीत्वाला मुकत आहोत’, हे लक्षात आल्याने 
त्यांची पुनश्च स्त्रीत्वाकडे वाटचाल
अमेरिकन स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. सत्ताकरण, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांतून स्त्रिया पुरुषांच्या साहाय्याने काम करीत आहेत, बरोबरीने आहेत, कुठेही रतिमात्र मागे नाहीत. स्त्रीमुक्ती आंदोलन तर शिगेला पोहोचले आहेच आणि आता घड्याळाचा लोलक झुकला आहे. ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ हे आंदोलन सामर्थ्यशाली आहे; कारण सगळे मिळूनही स्त्री अतृप्त, असंतुष्ट आहे. आता ती अंतर्मुख होत आहे.  ‘ती स्त्रीत्वाला मुकत आहे’, हे तिच्या ध्यानी येत आहे. तिनेच समान हक्क घटनेत सुधारणा करवून घेतली आहे.
पेनिलोप लोमोव्ह ही श्रेष्ठतम अमेरिकन संपादिका ‘स्त्रीत्व कसे मोहोरेल’, याकरता तळमळून कळवळून आक्रोश करते, ``हे पुरुषीकरण आता पुरे ! आता विराम हवा !’’ असे अमेरिकन स्त्रीहृदयाचे दुःख ती मांडते. समान हक्क मागायचे, स्त्रियांचे पुरुषीकरण अन् लिंगभेदाचे निर्मूलन करायचे आणि स्त्रीत्व नष्ट करून टाकायचे कन्या, पत्नी आणि माता असे जे परंपरेने संरक्षण होते, ते सगळेच नष्ट करायचे ? स्त्रीस्वभावाला, गृहिणीला, मातृत्वाला, तिलांजली देऊनच अर्थार्जनाच्या बाजारात तिला उभे रहावे लागते. आता अमेरिकन स्त्रीला उच्च जागा नकोत. धंद्यातले मालमत्ता हक्काची तिला फारशी कदर नाही. मातृत्व आणि गृहिणी यांकरिता आवश्यक त्या परंपरागत तरतुदी तिला हव्या आहेत ! गृहिणी आणि माता! ‘मातृत्व आधी. मग जर वेळच उरला, तर इतर कामे’, अशी अमेरिकन स्त्रीची धारणा आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Sunday, September 23, 2012

समाजवादाचे भूत मानगुटीवर बसलेले पं. नेहरू आणि समाजवादी विचारसरणीचा परिणाम !

१. सनातन धर्म-संस्कृतीपेक्षा चीन हिंदुस्थानात आल्यास देशाचे नुकसान होणार नाही, अशी श्रद्धा असणारे नेहरू !
    हिंदुस्थानची राज्यघटना आणि शासन समाजवादी, लोकशाही स्वरूपाचे आहे. लोकशाही आणि समाजवाद (socialism) हे दोघे एकत्र कसे असू शकतील ? पंडित नेहरूंना भारताला समाजवादी वळण द्यायचे आहे. समाजवाद, साम्यवाद याकडे त्यांचा कल आहे. सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे नाव काढले की, ते आणि त्यांच्या गुंडांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते अन् कानशिले थाडथाड उडतात.
     चीन तिबेट घेतांना आमच्या तिन्ही दलांचे सरसेनापती (बहुधा ते जनरल थिमय्या असावे) नेहरूंना म्हणाले, ``पहाता पहाता आम्ही चीनची नाकेबंदी करतो. तिबेट जर चीनने घेतला, तर हिदुस्थानला चीनपासून फार मोठा धोका आहे.’’ नेहरू नकार देत उद्गारले, ‘‘हिंदुस्थानात सनातन धर्म संस्कृती येण्यापेक्षा चीन आला, तर हिंदुस्थानची फार काही हानी होणार नाही.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)
२. साम्यवाद्यांनी शांती आणि प्रेम यांचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षण देऊन यंत्रासारखा नवा मानव निर्माण करणे
१. लेनिनने देव नाकारला. आई-वडिलांना रतिमात्र मूल्य दिले नाही. शांतीचा अन् प्रेमाचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षणच दिले. लेनिनने शासनाचे शिक्षणाचे तसे धोरणच जाहीर केले.
२. या साम्यवाद्यांनी देव नाकारला, आत्मा नाकारला. नैतिक मूल्ये अव्हेरली, त्याग नाकारला आणि या भौतिकवादी शासनाने नवा यंत्रासारखा मानव निर्माण केला.
३. दीर्घकाळच्या साम्यवादी शासनप्रणालीचे दुष्परिणाम भयंकर मृत्यू आणि गुलामगिरी आहेत, हे एका रशियन पंडिताच्या लक्षात येणे
    अनेक वर्षांपर्यंत ही वाटचाल केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेता रशियन पंडीत अलेक्झांडर सोलेनित्झ (Alexander Solzhenitsys) याने वस्तूस्थिती ओळखली आणि तो मोठ्या दुःखाने सांगतो, ``दीर्घकालीन साम्यवादी प्रणालीच्या शासनामुळे आम्ही इंद्रियजन्य सुख आणि ऐषाराम यांची पूजा करणारे गुलाम झालो. आम्ही जडाचे पुजारी झालो, वस्तूचे पुजारी झालो. उत्पादनाचे पुजारी झालो. आज आम्ही आमची अस्मिताच गमावली. आम्ही हे भयंकर साम्यवादी  शासन स्वीकारले. त्याचे मूल्य आम्हाला भयंकर मृत्यू आणि गुलामगिरीच्या रूपाने द्यावे लागते अन् आम्ही ते दिलेले आहे. हे साम्यवादाच्या पशुजीवनाचे ओझे, जे आमच्यावर जन्मतःच लादले गेले, ते फेकून द्यायला आम्ही समर्थ होऊ का ?’’ 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक `सनातन चिंतन’, ६.११.२००८)
४. हिंदुस्थानला समाजवादाने दरिद्री बनविले !
    कोलोरॉडोचे विल्यम आर्मस्ट्राँग हे ज्येष्ठ सिनेटर सांगतात, ``हिंदुस्थानात इतकी निसर्ग संपत्ती आहे की, तो देश सर्व जगाला धान्य पुरवू शकतो. लोकसंख्येचे प्रमाणही तसे जास्त नाही. हिंदुस्थान दरिद्री कसा ? समाजवादाने हिंदुस्थानला दरिद्री बनविले. त्यांचे शब्द असे, ‘‘भारताची लोकसंख्या वाजवीपेक्षा जास्त नसून समाजवाद देशाला दरिद्री करत आहे.’’ (The population of India is not in excess. The socialism is keeping the country poor.'') पुढे ते सांगतात, ``जपान, सिंगापूर, हाँगकाँग हे असे देश आहेत की, जिथे कोळसा आणि शेतीजमीन अशी कोणतीही निसर्गसंपत्ती नसतांना अतीदाट लोकसंख्येचे भरण-पोषण करतात; कारण ते देश आधुनिक समाजवादापासून मुक्त आहेत.’ (Japan, Singapore and Hongkong etc. are countries without almost no natural resources in terms of coal and farmland, support a very heavy densities of population, because they are free from modern Socialism.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

Friday, September 14, 2012

आजचा इतिहास हा हिंदूंचा नाही तर देशद्रोह्यांचा आहे!

लक्षावधी वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या भारत राष्ट्राने  हिंदु  पंडितांवर भारताचा प्राचीन इतिहास प्रकाशात आणण्याची टाकलेली जबाबदारी त्याने झुगारून, भारतवर्षाचा विश्वासघात करू नये. पितामह भीष्माप्रमाणे वृद्ध अशा भारताचा हिंदु पंडीत हा 'नोकर' आहे. भित्रेपणाने व आपल्याच बुद्धीने वागायला तो स्वतंत्र नाही. भारताची नेहरूप्रणीत सेक्युलर लोकशाही, समजवादी शासनाने इतिहासाचा मुद्दा पडलाच आहे. आता भावनात्मक ऐक्याच्या ढोंगाखाली धर्माचाही मुडदा पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न होतो आहे! 

आजच्या इतिहासावरून सनातन धर्माचा रतीमात्र बोध होत नाही. कारण हा हिंदु समाजाचा इतिहास नाही. जे नेते आहेत, त्यांचा तो इतिहास आहे. ज्यांनी हिंदूंची कत्तल केली, ज्यांनी हिंदूंना छळले, ज्यांनी हिंदूंचा सनातन धर्म नष्ट करण्याकरिता त्यांची मंदिरे, त्यांच्या अस्मिता धूळीला मिळवल्यात, त्यांचा हा इतिहास आहे.

मुसलमानांचे, ख्रिश्चनांचे हे अनेक शतकांचे सैतानालाही लाजवणारे आक्रमण, हिंदूंच्या अस्मिता नष्ट करून त्यांना पुरुषार्थहीन बनवणारे त्यांचे शासन, यांचा हा इतिहास आहे. तरी देखील सहस्र वर्षे, हिंदुसमाज टिकला. सनातन हिंदु संकृती अजूनही अविच्छिन्न परंपरेने आहे. आशिया, युरोपात जिथे मुसलमान वा ख्रिश्चन नेते होते, शासक होते ते सगळे देश अवघ्या ३०० वर्षांत मुसलमान किंवा ख्रिश्चन झालेत. 'धर्मांतर' हेच उद्दिष्ट असलेल्या कपटी, धूर्त, सैतानी परकीय शासनापासूनही हिंदुसमाज अविच्छिन्न राहिला. याचा विचार कोणीही केला नाही.

सगळे प्राचीन समाज आणि संस्कृती, या आक्रमक व परकीय राज्यकर्त्यांना शरण गेल्यात, वाकल्यात. अपवाद फक्त हिंदु समाजाचा! लंका, ब्रह्मदेश, थायलंड, जपान टिकलेत, असे विधान केले जाते; परंतु ते हिंदूंच्या प्राचीन संस्कृतीचेच अवशेष आहेत. 

हिंदुसमाज अविच्छिन्न कसा राहिला? इथे काहीतरी हिंदु समाजाचे अंत:सामर्थ्य आहे. तेच 'सनातन धर्माचे' सामर्थ्य आहे. ज्यामुळे हिंदुसमाज लढू शकला आणि त्या सगळ्या आक्रमकांवर मात करू शकला. हिंदु समाजाच्या या अपूर्व, अंत:सामर्थ्याच्या संदर्भात, म्हणजे सनातन धर्माच्या संदर्भात प्राचीन इतिहास, वाङमय अभ्यासा. 'Highlights of Hindu History' अशा संकेताने हिंदूंचा इतिहास वाचायला हवा, लिहायला हवा.

आमचा प्राचीन पारिभाषिक शब्द आहे. 'परीसंख्यान।' याचा अर्थ हिंदूंचा आचार व विचार. इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या संदर्भात, हिंदूंच्या सनातन धर्माच्या संदर्भातला परकीयाशी वागतांनाचा जो आचार व विचार! त्या संदर्भात 'Highlights of Hindu History' लिहायला हवी. 

हिंदुधर्म सर्वश्रेष्ठ आहे. सनातन आहे. हे तुमच्या ध्यानी तेव्हांच येईल की जेव्हां तुम्ही सनातन धर्माचे मूळ वाल्मिकी, व्यासांचे अभिजात ग्रंथ 'रामायण', 'महाभारत' तसेच अर्वाचीन अभिजात ग्रंथ अभ्यासाल. जेव्हां 'श्रुती-स्मृती, पुराणे', प्राचीन भाष्यकारांच्या आधारे वाचाल. सनातन धर्माचे तुमचे प्रेम आणि निष्ठा जसे बळावेल, तसे तुम्हीन हिंदु समाजावर व हिंदुस्थानावर विलक्षण प्रेम कराल. 
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३
१)

Tuesday, September 11, 2012

हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला धावायचे?



यज्ञसंस्थेकरिता वेद अवतरलेत. मंत्रमय वेदरक्षणाकरिता चातुर्वर्ण्यं!

यज्ञसंस्था व वेद चातुर्वर्णाचे ह्रदय, वेदांतल्या वेदमंत्राइतके परम सखोल व परमशास्त्रीय चिंतन जगात अन्यत्र नाही. प्रत्येक वेदमंत्राला देवता आहे. द्रष्टा आहे आणि छंद! शिवाय आहे स्वरचना आणि त्यातील विविधता, वैचित्र्य!

कशी होते शब्दनिर्मिती? कोणत्या अंत:शक्तीशी त्याचा कसा संपर्क येतो? मानवाच्या जीवन परिवर्तनाला, उत्क्रांतीला त्यातल्या कोणत्या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सगळे कसे intact आहे. हा सगळा प्रपंच अपूर्व आणि आगळा! 
या सगळ्या श्रेष्ठतम परामोदात्त प्रयोजनाच्या अंतरी शिरून, त्यांचे परीशोधन करून, विश्वकल्याण साधायचे का यज्ञसंस्था, वेद, वर्णव्यवस्था उखडून टाकण्याकरिता सत्ता, शक्ती, संपत्ती, प्रज्ञा वेचायची?

विश्वाचा कणा उखडून टाकायचा?

हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचे? 

वेदमंत्र हे 'मंत्र' आहेत. इतर शब्दांसारखे सामान्य नाहीत. विशेष आहेत. त्यांतील विशेष आनुपूर्वी ही परम मोलाची चीज आहे. वेदमंत्रांनीच सृष्टी निर्मिली, रचली, आणि घडली आहे.

वेद म्हणजे अक्षर ब्रह्म! सगुण परमात्मा! विशिष्ट आनुपूर्वी राखून, परंपरेनुसार केवळ वेदपठणाने, विश्वकल्याण करणारा हा अपूर्व विश्वातला श्रेष्ठतम निधी, रक्षण करण्याकरिता तन, मन, धन पणाला लावणे, हेच आजचे एकमेव कर्तव्य आहे. हा अनमोल निधी रक्षण्याकरिताच विशिष्ट वर्णरचना, वर्णव्यवस्था निर्माण झाली. तेच चातुर्वर्ण्य! इथे कसला उच्च-नीच  भाव? इथे आजचे श्रेष्ठ कानिष्ठतेचे निकष लावणे खुळेपणाचे नाही का? वेदरक्षणाकरिता निर्माण झालेल्या चातुर्वर्ण्याला पर्याय होईल अशी कोणतीच शास्त्रशुध्द रचना आज जगाजवळ नाही. 

मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का धावता? 

-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३०) 

चाणक्य नीतीसूत्र!



सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः

अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते

1. Sukhasya moolam Dharmah
Meaning – The basis of “sukha” or all true pleasantness is “dharma” or righteous conduct.

2. Dharmasya moolam Arthah
Meaning- The basis of all “dharma” is “artha” or wealth.

3. Arthasya moolam Rajyam
Meaning – The basis of all “artha” is “rajya” or the State.

4. Rajyasya moolam Indriya Jayah
Meaning – The basis for the stability of the State lies in control over the “indriya“ or sense faculties providing pleasure.

5. Indriyajayasya moolam Vinayah
Meaning – The basis for control over the sensual faculties is in “vinay” or humility.

6. Vinayasya moolam Vruddhopasevah
Meaning – The basis for humility is devotion to those grown old through wisdom.

7. Vruddhopasevaya Vijnanam
Meaning – Through devotion to the wise, one attains proficiency with the maximum efficiency.

8. Vijnanena atmaanam Sampadyet
Meaning – It is imperative for all the functionaries of the State to perform their duties with the maximum efficiency.

9. Samapaditatma jitatmama Bhavati
Meaning – To perform State duties with the maximum efficiency, the functionaries of the State must learn to control their sensual needs, and maximise their internal potential.

10. Jitatma sarvarthe Sanyujyate
Meaning – Those who have vanquished their baser selves will become prosperous naturally, can retain their prosperity, and (will) be successful in their endeavours.

Saturday, February 18, 2012

विवाह


पाश्चात्य संस्कृति और आधुनिकताके माहौलमें पारम्परिक रीति-रिवाजोंसे विवाह करना भले ही दकियानूसी माना जाता हो; किन्तु वैज्ञानिक दृष्टिसे स्वास्थ्य के लिए यही उचित है. वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह प्रथाको मानव-स्वास्थ्यके लिये हानिकारक बताया है. वैज्ञानिकोंका कहना है की समुदायसे बाहर शादी करनेवालोंकी सन्तानोंके शरीरपर बाल तथा अंगुलियोंमें नाखून नहीं आनेकी शिकायत हो सकती है और मस्तिष्क कैंसरकी सम्भावना बढ़ जाती है.

इण्डियन सायंस कांग्रेसके चौरासीवें वार्षिक सम्मेलनमें वैज्ञानिकोंने उक्त रहस्योद्घाटन किया. वैज्ञानिकों एवं मानवशास्त्रियोंने कहा की भारतकी पारम्परिक वैवाहिक व्यवस्थासे छेडछाड करनेके जनस्वास्थ्यपर प्रतिकूल प्रभाव पड़ेंगे. विशेषज्ञोंने सदियों पुरानी वैवाहिक व्यवस्थाओंको विकृत करनेके जैविक दुष्परिणामोंके लिये आगाह किया. कलकत्ता विश्वविद्यालयमें मानव-विज्ञान-विभागमें मानव-जीन विषयके प्रोफ़ेसर डॉ. देवप्रसाद मुखर्जीने अन्तरजातीय विवाह प्रथाके स्वास्थ्यपर प्रतिकूल प्रभावोंकी चर्चा करते हुए कहा की हमें अपने समुदायके भीतर ही विवाह करनेको प्रोत्साहित करना चाहिए, अन्यथा मानव-जीनकी भयंकर क्षतिके दुष्परिणाम भुगतनें होंगे. उन्होंने कहा की जीन-विकृतिसे शरीरमें सिकल सेल एनीमिया एवं जे-सिक्स पी.डी. की कमी हो जाती है. वैसे सिकल जींस दक्षिण भारतीय कबिलोमें ही पाए जाते थे; किन्तु अब इनका प्रसार चुनिन्दा उत्तरी एवं मध्य भारतके राज्योंतक हो गया है. डॉ. मुखर्जीने कहा की वैज्ञानिक निष्कर्षोंको रूढ़िवादी कहकर उनकी उपेक्षा नहीं की जानी चाहिये....

डॉ. मुखर्जीने बताया की वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह करनेवाले कुछ लोगोंका अध्ययनके आधारपर 'प्रायवेट जींस' के पहचान की है. उन्होंने बताया कि भारतमे इस जींससे पीड़ित व्यक्तियोंके शरीरपर बाल तथा अंगुलियोंमें नाखून नहीं पाये जाते हैं. पश्चिम बंगालके चौबीस परगना क्षेत्रमें वैज्ञानिकोंने अन्तरजातीय विवाह करनेवाले कबिलोमें मस्तिष्क कैंसरकी शिकायत पाई. वैज्ञानिकोंका कहना है कि अध्ययनसे पता चलता है कि एक समुदायमें अहानिकारक रहनेवाले जींसके दूसरे समुदायमें अत्यन्त हानिकारक प्रभाव हो सकते है....

अंग्रेज़ी समाचार-पत्र THE TIMES OF INDIA (07.01.1999) में यह समाचार प्रकाशित हुआ है -

CHENNAI: Noble Laureate James Watson considered to be the father of DNA technique, has provided a shot in the arm of traditionalists. According to him, gene pools get better in arranged marriage. Easily the most sought after participant at the 86th Indian Science Congress currently
on here, Dr.Watson told the Times of India that he supported Indian research on caste based DNA. “Genetics is not the root cause of racism. Racism existed before casteism", he said. He was responding to recent researches in Hyderabad and West Bengal which highlighted patterns of diseases and similar DNA pattern in various caste group in India. These researches have, however been opposed by certain quarters who say that they reinforce the Varna System with genetic evidence. ‘I am excited about the history of India and the study of people with Biotechnology, said Dr. Watson', he said while comparing genes and DNA to caste group," we must recognize that human beings are different. it is interesting to study how similar group adopt to diseases, how isolated group have greater probability of similar disease and what is so unique about such groups."

He said, "There has been so much discrimination against the so called untouchables, but genetics shows that they have differing genes. Let us not have opposition to human diversity in any form." Dr. Watson said that only time will tell, by studying the uniqueness of each caste group, how each 'tackled its particular problems'

[डी. एन. ए. तकनीके जनक कहलानेवाले नोबेल-पुरस्कार -विजेता जेम्स वॉटसनने पारम्परिक विवाह-प्रथक समर्थन करते हुए का है की इससे (अपनी जतिमें विवाह करनेसे) जीन-समूह अधिक लाभप्रद होते हैं.

इण्डियन सायंस कांग्रेसके ८६ वें सम्मेलनमें महत्त्वपूर्ण भाग लेनेवाले डॉ. वॉटसनने 'द टाइम्स ऑफ़ इण्डिया' को बताया की वे जातिपर आधारित डी. एन. ए की भारतीय खोजका समर्थन करते हैं. उन्होंने कहा कि 'जैनेटिक्स (उत्पत्ति विषयक शास्त्र) वंश परम्पराका मूल कारण नहीं है. वंश-परम्परा तो जतिवाद्से भी बहुत पहलेसे विद्यमान थी. उन्होंने भाग्यनगर (हैदराबाद) और पश्चिम बंगालमें हुए उन अनुसन्धानोंका समर्थन किया, जो भारतकी भिन्न भिन्न जातियोंके समूहकी बीमारियों तथा डी. एन. ए. के नमूनोंपर प्रकाश डालते है. डॉ. वॉटसनने कहा कि, 'मैं भारतकी इतिहास एवं भारतीय लोगोंके जीव-विज्ञान-तकनीकके अध्ययनसे प्रभावित हूँ' उन्होंने जीन्स और डी. एन. ए. की विभिन्न जतियोंसे तुलना करते हुए कहा कि, 'हमें यह स्वीकार करना चाहिए कि मनुष्य जातियाँ अलग-अलग हैं. यह अध्ययन रोचक है कि एक जातिके लोगोंपर बीमारीका प्रभाव नहीं पड़ता, जबकी दूसरी जातिके लोगोंपर उस बीमारीकी अधिक सम्भावना रहती है, न जाने उन जातियोंमें ऐसी क्या विशेषता है!

उन्होंने कहा कि, 'अछूत कहे जाने वाले लोगोंके प्रति भेद-भाव रहा है; परन्तु जैनेटिक्स बताता है कि उनमें अलग जीन्स हैं. अत: हमें किसी भी प्रकारसे मनुष्योंकी इस भिन्नताका विरोध नहीं करना चाहिये.']

डॉ. वॉटसनने कहा कि प्रत्येक जातिकी विशेषताओंका अध्ययन करनेपर यह तो समय ही बतायेगा कि प्रतयेक जातिके लोगोंने अपनी विशिष्ट समस्याओंका समाधान कैसे किया.

Monday, January 30, 2012

नीतीशास्त्राला धरून असणारा समाज अभेद्य राहतो.


‘हिंदूंसाठी असलेले सर्वसाधारण नियम आध्यात्मिक स्वरुपाचे आहेत, भौतिक नाहीत; म्हणूनच हिंदू जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्यांना सर्व आचारांवर काही आक्रमण करता येईना; म्हणून हिंदूंनी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि अभिजात आचार मानले, त्यावर आक्रमण होऊ लागले. ‘हिंदूंनी आपली समाजरचना जाती, म्हणजे गटाच्या स्वरूपाची केलेली आहे. त्याप्रमाणे जगात अन्य कोणत्याही समाजात नाही; म्हणून जातीभेदाने हिंदू समाजाचा नाश झाला’, अशी हाकाटी चालू झाली. १. श्रेष्ठ आचारांत विधवा विवाहाचा निषेध आहे; म्हणून विधवा पुर्निववाहाचा दंडक (कायदा) संमत (पास) करून घेतला. हिंदूंच्या काही जातींतही (कनिष्ठ आचारात) विधवा पुर्निववाह होत नव्हते.
२. ‘प्रदानं प्रागृतोः ।’ (गौतमधर्मसूत्र, अध्याय १८, सूत्र २१) म्हणजे ‘कन्येचा विवाह ऋतुकाळ (मासिक पाळी) चालू होण्यापूर्वी करावा’ असे आपले धर्मशास्त्र सांगते. शारीरिक, मानसिक आणि समाजशास्त्रीयदृष्ट्या बाल वय हे अत्यंत हितकारक होय. साहेबांच्या समाजात अशी पद्धत नसल्याने त्यांना ही पद्धत रानटी दिसू लागली !
३. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्त्री हिने जेथे एकांती लोकांशी, परपुरुषांशी संबंध येईल, असे काम करायला घराबाहेर जाऊ नये, असा हिंदूंचा दंडक दिसला, तर स्त्रियांच्या आभासिक हक्काचा आश्रय करून त्याच्यावर आक्रमण केले गेले. अशा प्रकारे ब्राह्मणांची नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी त्याज्य ठरवून शूद्रांची नैतिक मूल्ये प्रधान मानली जाऊ लागली आणि त्याचा हळूहळू प्रसार झाला.
४. स्पर्शास्पर्श, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय एकूण एक संदर्भात शूद्रांचे अनिर्बंध आचार समाजात प्रधान होऊ लागले आहेत. ‘त्यालाच समाज सुधारणा म्हणावे’, असे समाजसुधारक नावाचा प्राणीवर्ग आम्हाला सांगत आहे.

आडदांड मुसलमानांना जे शक्य झाले नाही, ते इंग्रजांनी मायेने हात फिरवून करण्याला प्रारंभ केला. इंग्रज धूर्त आहेत. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, जोवर एखादा समाज आपल्या नीतीशास्त्राला धरून आहे, तोपर्यंत तो अभेद्य रहातो; म्हणून त्याने हिंदु धर्माच्या नैतिक मूल्याविषयीच शंका निर्माण केल्या. अंतःकरण शंकाकुशंकानी व्याकुळले की, मग कोणताही आचार धड राहू शकत नाही. मग विघात आपोआप होईल. तलवारीने शरिरे जिंकता येतील; पण मने जिंकता येत नाहीत. इंग्रज झाला तरी काय ? त्याच्याकडे नीतीच्या ज्या कल्पना प्रचलित असतील, त्याच तो घेऊन येणार ! त्याच प्रगतीच्या कल्पना इकडे आणल्या आणि आमच्या अहंगंड असणार्‍याने, म्हणजे सर्वाधिक आरडाओरडा करणार्‍यांनी त्या मान्य केल्या आणि अजूनही करत आहेत.’

भारतीय नारींनो, गुंड प्रवृत्तीच्या अमेरिकन पतीला सहचर बनवायचा कि नाही, याचा विचार करा !

‘अमेरिकेतील भारतीय नारींचा, ज्यांनी अमेरिकनांशी विवाह केलेला आहे, गोर्‍यांशी लग्न केले आहे, अशा भारतीय अमेरिकन स्त्रियांसंबंधीचा (इंडिअन American Women) सविस्तर अहवाल डॉ. शमिता दासगुप्ता, अध्यक्षा, इंडियन वुमेन्स ऑर्गनायझेशन, न्यू जर्सी ((Indian women'sorganization. New Jersey) यांनी प्रसिद्ध केलेला आहे. काही घटनांचा उल्लेख करतो.
१. इंदिरा २२ वर्षांची मद्रासची भारतीय नारी. तिच्या विवाहाला दोन महिने झाले. तोच तिचा अमेरिकन नवरा तिला घर सोडून जायला खडसावतो; कारण काहीही सांगत नाही. प्रचंड डॉलर्स हुंडा खिशात टाकतो आणि आता म्हणतो, ``तुला अमेरिकेच्या बाहेर घालवून देईन. तुझे इथले वास्तव्य नष्ट करून टाकीन.’’
२. अमेरिकन नवरा असलेल्या शोभा या भारतीय नारीला लग्नानंतर तिचा नवरा विलक्षण मारहाण करतो. ती बेशुद्ध आणि घायाळ होते. वाशिग्टन डी.सी.च्या रुग्णालयात भरती होते. त्या नवर्‍याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदणी होते. पोलीस केस जर पुढे तशीच चालू ठेवली तर.....? थरथरणार्‍या शोभाला भय वाटते की, तिची हत्या होईल !
३. जया एक डॉक्टर, भारतीय नारी ! अमेरिकन पतीची भार्या होते. शिकागोला ती डॉक्टर असते. तिचा शारीरिक आणि मानसिक विलक्षण छळ होतो. ती हताश होण्याच्या मार्गावर होती. (She is on the verge of nervous breakdown.) घटस्फोटाकरता न्यायालयात जायला ती भिते; कारण तिला तिची मुले गमवावी लागतील !
अशा असंख्य घटना आहेत.’ ((Times of India sunday Review ३०.७.१९८९ च्या अंकात प्रिया कुरायन यांचा विस्ताराने लेख आलेला आहे.) - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)
‘एक बिशप म्हणतो, `जनावरांना देवाची कल्पना करायला सांगितली, तर कदाचित करता येणार नाही; पण ‘सैतान कसा असतो ?’ असे विचारले, तर ते गोर्‍यांचा निर्देश करतील.’ - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)

Thursday, January 26, 2012

व्याकरणशुद्ध वाणीमुळे हनुमंताने रामाचे मन लगेच जिंकणे

‘हनुमंताचे भाषण श्रवण करून आनंदित मुद्रेने युक्त झालेला वैभवशाली राम समीपच असलेल्या भ्राता लक्ष्मणाला म्हणाला, “हा वानरराज महात्मा सुग्रीवाचा मंत्री त्याच्याचकरिता येथे माझ्या समीप आला आहे. याकरिता लक्ष्मणा, शत्रूंचे दमन करणारा आणि संभाषणज्ञ अशा त्या सुग्रीवमंत्री वानराशी मधुर शब्दांनी तू काहीतरी प्रेमयुक्त बोल. ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणीत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने संपूर्ण व्याकरण अनेक वेळा ऐकलेले आहे; कारण हा जरी पुष्कळ बोलत होता, तरी याच्या तोंडातून काहीही अशुद्ध निघालेले नाही. मुख, नेत्र, ललाट, भुवया आणि इतरही सर्व अवयव यांपैकी कोठेही दोष दृष्टोत्पत्तीस आला नाही. याच्या भाषणात उगीच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नसून अस्खलित आहे. ऐकणार्‍याला कंटाळा आणण्यासारखे नाही आणि मनामधे उत्कृष्ट रीतीने येऊन नंतर कंठविवरापासून ते श्रोत्यांच्या कानांवर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार मध्यम स्वराने होत आहे. सारांश, त्या त्या वर्णाचे संस्कार क्रमाने अंतःकरणावर ठसविण्यास समर्थ, त्वरारहित, विलंबशून्य आणि म्हणूनच हृदयाला आनंद देणारी अशी शुभ वाणी हा उच्चारीत आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी अभिव्यक्त होणार्‍या या अद्भूत वाणीने खड्ग उपसून सिद्ध असलेला शत्रू झाला, तरी कोणाचे बरे चित्त अनुकूल होणार नाही ?

हे निष्पापा, या प्रकारचा दूत ज्या राजापाशी नसेल, त्याची कृत्ये सिद्धीस कशी जाणार नाहीत ? या प्रकारच्या गुणसमुदायांनी युक्त असलेले कार्यसाधक ज्याच्यापाशी असतील, त्याचे दुतांच्या भाषणाने बोधित केलेले सर्वही मनोरथ सिद्धीस जातील.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी