आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, May 29, 2010

मनूला नावे ठेवणार्‍या बुद्धीवाद्यांनो, त्याचे श्रेष्ठत्व जाणा !


१. श्रेष्ठ तत्त्वाच्या विचारांमुळे मनु मोठा नाही, तर मनूमुळे ती तत्त्वे, ते विचार श्रेष्ठतम आहेत आणि मनूने सांगितलेले आचार वेदप्रमाण असल्याने ते श्रेष्ठतम आहेत !

* `मनूला सगळेच मानतात, विरोधकही मानतात. मात्र त्यांना मनु सांगतो तो आचार रुचत नाही. तिथे ते तर्क, बुद्धी प्रमाण मानतात आणि आचार मात्र वगळतात. पूर्वग्रहाला, धारणेला अनुकूल तेवढेच घेतात. बाकीचे त्याज्य ठरवतात. मनु अनुसरणारे जुने दार्शनिक सांगतात, `मनु स्वत: प्रमाण आहेत. स्वर्यंप्रकाशी आहे. मनूला अन्य साक्षी, प्रमाण किंवा पुरावे यांची गरज नाही.' जी तत्त्वे जे विचार श्रेष्ठ मानले जातात, ते मनु सांगतो. श्रेष्ठ तत्त्वांमुळे मनु आदरणीय आहे, असे नसून ती तत्त्वे, ते विचार मनु स्पर्शित आहेत. ते मनु सांगतो; म्हणून श्रेष्ठतम आहेत. मनु ज्याला स्पर्श करतो, ते श्रेष्ठतम बनते. श्रेष्ठ तत्त्वाच्या विचारांमुळे मनु मोठा नाही. मनुमुळे ती तत्त्वे, ते विचार श्रेष्ठतम आहेत. मनु जे सांगतो तेच वेद सांगतात. वेदातील विचारच मनु सांगतो. वेदतत्त्वाच्या साक्षात्काराची पात्रता देणारे आचार सांगतो, धर्म सांगतो. उत्तुंग विचार, श्रेष्ठतम तत्त्वे आहेत; म्हणून वेदांचे प्रामाण्य नव्हे. वेद सांगतात; म्हणून ते विचार श्रेष्ठ मानले जातात. वेदाचा स्पर्शच त्यांना श्रेष्ठता देतो. मनुचे आचार श्रेष्ठतम आहेत; कारण ते मनु सांगतो म्हणून ! आणि मनु वेद जे सांगतात, तेच विशद करतो.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामी, (साप्‍ताहिक सनातन चिंतन, ६ डिसेंबर २००७, अंक ४३)

स्त्रियांचा कैवारी मनु !

* `मनु आणि स्त्री' या विषयावर अ.भा. महिला परिषदेच्या परिसंवादाला तरुण गुरुदेव उपस्थित होते. मनूने स्त्रीलापुरुषाची दासी केले आहे. स्त्रीची भयंकर पिळवणूक करणारा मनु..... वगैरे वगैरे, अशी आधुनिक विदुषींची भाषणेझाली. अध्यक्षांनी गुरुदेवांना विनंतीनुसार बोलण्याची परवानगी दिली.
* गुरुदेव गंभीर वाणीने म्हणाले, ``मनुसारखा स्त्रीवर परम प्रम करणारा, परम कनवाळू महापुरुष जगात अन्यकोणीही नाही', असे हक्ल्से, नित्से, ऑपेन्सी व अन्य पाश्चात्त्य चिंतक सांगतात. मनु आणि अन्य सर्व स्मृतीकारपंचमहापापे सांगतात, त्यातील पाचवे महापाप, महापातकी संसर्ग म्हणजे चार प्रकारची महापापे करणार्याशीसंसर्ग ठेवणारा त्यांच्यासारखाच महापापी होतो. चारही प्रकारची महापातके करणारा असा महापातकी आहे. त्याचीवयात आलेली कन्या आहे. तिचे भवितव्य काय ? तिने आजन्म अविवाहितच रहायचे का ?
* स्मृतीकार सांगतात, ``महापातक्याच्या मुलीशी कुणालाही विवाह करता येईल; मात्र तिने विवाहाआधी तीनदिवस उपवास केला पाहिजे व पित्याकडून कोणतीही संपत्ती किंवा वस्त्रही स्वीकारू नये. तिने ब्राह्मणसभेत जाहीरकरावे की, तिचा यापुढे पितृकुलाशी कोणताही संबंध रहाणार नाही. (मनु. ३/२६१)
* `पतित व्यक्तीची कन्या कधीही पतित मानली जाऊ नये', असे स्मृतीकार नि:संदिग्ध सांगतात; कारण तीपरगामिनी, म्हणजे दुसर् कुळात जाणारी आहे.
* स्त्री सद्भावना, मनूचा अतीउदार दृष्टीकोन असलेली आणखी कितीतरी वचने गुरुदेवांनी सांगितली. त्यांना पाचमिनिटे वेळ दिला होता; परंतु ते पंचवीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोललेत, हे कुणाच्याही ध्यानी आले नाही.'

- (घनगर्जित, जानेवारी २००७)