आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Tuesday, August 19, 2014

लाहोर - लवपूर


  • लाहोरचे प्राचीन नाव लवपूर ! रामायणातील श्रीरामपुत्र ‘'लव' याने रावी नदीतीराजवळ हे नगर वसवले. पुढे ते लोहावर या नावाने प्रसिद्ध झाले, आता 'लाहोर' या नावाने प्रचलित आहे. सर्वश्रेष्ठ संस्कृत व्याकरणकार पाणिनींचे जन्मस्थान लवपूर आहे. दहाव्या शतकातील राजा जयपाल याची ती राजधानी होती. पुढे मोगल आले. रणजित सिंगाने ते शहर जिंकून आणले आणि ती आपली राजधानी बनवली.
  • 'लाहोरला किमान शंभरच्या जवळपास संस्कृत पाठशाळा होत्या. काशीसारखेच ते वेदविद्या आणि शास्त्रविद्या यांचे माहेर होते. तेथे मोठमोठे पंडित होते. त्यांच्या नित्यनैमित्तिक आचरणांत कधी खंड पडत नसे. तेथे सर्वत्र वैदिक ब्राह्मण आणि मीमांसक होते. त्यांचे श्रौत यज्ञ चालू असत. स्मार्त यज्ञ जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात व्हायचे. लाहोर हे शेकडो हिंदु आणि अत्यंत अद्भुत मंदिरांचे नगर !
  • लाहोरमधील शेकडो मंदिरे, सहस्रो वर्षांपासूनची ती मंदिरे जशी पूर्वी होती, तशीच होती. सर्वत्र नित्य नैमित्तिक पूजन वेदमंत्रांनी व्हायचे. लाहोरचे श्रीराम मंदिर तर मुग्ध करणारे होते. त्यांचे प्रवेशद्वार अप्रतिम होते. आर्यावर्ताच्या समृद्ध अशा प्राचीन शिल्पकला आणि रामायणातले अपूर्व प्रसंग चित्रित केलेल्या भिंती, गोपुरे आणि नगारखाना होता. त्रिकाळ वेदमंत्रांनी रामप्रभूचे पूजन व्हायचे. श्रीरामचंद्राच्या काळापासूनच्या सनातन संस्कृतीतील लवपूर येथे शेकडो हिंदु मंदिरे आहेत. प्राचीन सनातन संस्कृतीचे ठिकठिकाणी अवशेष आहेत. सनातन संस्कृतीच्या प्राचीन अवशेषांकरता लाहोर जगभर प्रसिद्ध होते.
  • या राममंदिराचा कळस मुग्ध करणारा होता. त्याच्या सौंदर्यावर नेत्र खिळून जातात. ते महाद्वार, ती गोपुरे, तो कळस आणि त्या सुंदरतम मूर्ती, संपूर्ण लाहोर रामभक्त होते. रामभक्तीत भिजत होते. १९९२ मध्ये हिंदुस्थानात अयोध्येच्या राममंदिराने हलकल्लोळ माजवला. बाबरी ढाचा पडला. त्या सुमारास नवा-ए-वक्तचा संपादक लिहितो, "आमचा देश इस्लामी आहे आणि तरीसुद्धा लाहोरचे प्राचीन श्रीराम मंदिर सुरक्षित आहे. श्रीरामपुत्र लव-कुश यांचे लाहोर सुरक्षित आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो."
  • अयोध्येच्या मंदिराइतकेच ते मंदिर प्राचीन होते. ते लाहोरचे भव्य मंदिर पाकिस्तान शासनाने उद्ध्वस्त केले. कसलेही अवशेष रहाणार नाहीत, अशी दक्षता पाकिस्तानी शासनाने घेतली. आता त्याचा विध्वंस झाला. या मंदिराचे क्षेत्रफळ जवळजवळ १ एकर होते. आता त्या मंदिराचे अवशेषही शिल्लक नाहीत. तिथे कंत्राटदार सहा मजली इमारत बांधणार आहे. तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची शासनाची योजना आहे. तळमजला, बेसमेंट अशी ती योजना आहे. भारत शासनाने पूर्ण उपेक्षा केली. जणू आपला त्या श्रीराम मंदिराशी काहीच संबंध नाही, किंबहुना या नेहरूप्रणीत निधर्मीवादी शासनाला अंतःकरणातून आनंदही झाला असेल.'


- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक 'सनातन चिंतन', २९.९.२०११)