आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, January 15, 2011

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..!


शब्द पवित्र असतात. आधुनिकतेने ते पवित्र शब्द गावठी दारूच्या गटारात बुडवून, सेक्सच्या रंगाने किळसवाणे केले आहेत. तिथे सूडबुद्धी आहे, द्वेष आहे.

साहित्य हा संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन संस्कृतीचं प्रतिबिंब प्राचीन साहित्यात आहे. तिथे शब्द, भाषा, सागरासारखी घनगंभीर, खोल आहे. शब्दातले ऐश्वर्य, ते सौंदर्य, ते माधुर्य ते प्रकट करतात. तिथे सर्वोच्च तत्त्वांचा स्पर्श आहे. परमोदात्तता आहे. मानवाला पवित्र बनविण्याची शक्ती आहे. ती शक्ती इतकी अपरंपार आहे की शब्द 'मंत्र' होतात. रामायण-महाभारताचे वाचन ही गहन समाधीची उत्तम प्रक्रिया आहे.

शब्दाचे मूळ करण, सत तत्त्व आहे. आम्हांला जो अर्थ कळतो, तो उथळ आहे. वरवरचा आहे. त्याचे जे उदात्त, सर्वोच्च जीवन आहे, ते गुप्त आहे. हिमखंडाचा जसा अल्प असा वरचा भाग दिसतो तसे.

वाणी, व्यासांत महासागरासारखी खोल खोल होती. व्यास त्या शब्दातले लपलेले समस्त ऐश्वर्य प्रगट करतात. व्यासांच्या वाणीचा स्पर्श होताच ते शब्द सर्वोच्च भूमिकेवर जातात. त्या शब्दातील स्वर्ग प्रकटतो. ते प्रकाशात न्हाऊन निघतात. त्या शब्दात परमोदात्तता स्वाभाविक असते. त्या शब्दात सत्त्वाचा उत्कर्ष असतो. ते शब्दच मंत्र बनतात. महाभारताचे वाचन हे गहन ध्यानाचे कर्म आहे.

************************************************

हे धर्मघना, यज्ञ संस्थेकरता वेद आहेत. वेदांत यज्ञ आहेत. मेघांना वाहून आणणारा वायू 'हिंकार' आहे. मेघ हा 'प्रस्ताव' आहे. पर्जन्यवृष्टी हा 'उद्गीथ' आहे. विजेचा लखलखाट व घनगर्जिते हा 'प्रतिहार' आहे. सूर्याद्वारे सागर जल वर नेले जाते. ते 'निधन' आहे. हे रहस्य जाणून वृष्टीदृष्ट्या सामाची उपासना करतो. त्याच्या संकल्पाने वृष्टी होते. ती जगताला जीवन देते. धर्मघना, तू आमचा जीवनदाता आहेस. तुझा जयजयकार असो.

हे धर्मघना, पितृगण, देवांचे संघ, इंद्रादी श्रेष्ठ देव, तसेच ३३ कोट देव, गंधर्व, अंतरिक्षात संचार करणार्‍या विभूती, ब्रह्मचर्याचे आपल्या शक्तीने संरक्षण करतात. ब्रह्मचर्य हेच मनुष्यादि रूपाने सर्व जगाचे धारण करते. ८०० सहस्र ऋषींनी भृगु महर्षीकडून ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली. हे धर्मघना, ब्राह्मणद्वेष हा हिंदुद्वेष आहे. हे धर्मघना, भोगलोलूप, लिंगपिसाट, पाश्चात्य जीवनरहाटींची आम्ही नावनिशाणी उरू देणार नाही. तुझा विजय असो.

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित) वर्ष ९, अंक १०

Saturday, January 8, 2011

ब्रह्मचर्य!


महाभारतात उद्योगपर्वात सनत्कुमार धृतराष्ट्राला सांगतात,

दर्शनं स्पर्शनं केलि: कीर्तनं गुह्यभाषणम्
संकल्पाध्यवसायश्च क्रिया निवृत्तिरेवच ॥
एतत् मैथुनमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिण:
विपरीतं ब्रह्मचर्य मेत देवाष्टलक्षणम् ॥

(स्त्रीचे दर्शन, स्पर्शन, तिची क्रीडा, गुह्य भाषण, तिचे वर्णन, तिच्याबद्दल संकल्प, तिच्या प्राप्तीकरता खटपट व प्रत्यक्ष संभोग अशी मैथुनाची आठ अंगे आहेत. या आठही अंगांपासून अलिप्त राहणे, याला 'ब्रह्मचर्य' म्हणतात.)

१. स्मरणं- नृत्यनाटक, तमाशा, पुस्तके, चित्ते, दूरदर्शन, अथवा प्रत्यक्ष पाहिलेल्या स्त्रियांचे स्मरण, ध्यान, चिंतन करणे.
२. कीर्तनं- स्त्रियांचे रूप, लावण्य, यौवन, हावभाव, शृंगारादि कौतुक करणे, Sex ची गाणी म्हणणे, ऐकणे, Sex च्याच गोष्टी, दृष्टांत, प्रसंग सांगणे.
३. केलि:- स्त्रियांशी टेनिस, बॅडमिन्टन, पत्ते, सोंगटया खेळणे, लपंडाव, फुगड्या खेळणे, झोपाळ्यावर बसणे, त्यांच्या पुढे-पुढे मिरवणे, श्वानासारख्या चेष्टा करणे.
४. स्त्रियांकडे चोरून, उघड किंवा त्यांनी पाठ वळवल्यावर मागाहून टक लावून पाहणे, गिधाडे, कावळयासारखी, मान उंचावून सहेतुक पाहणे.
५. स्त्रियांशी एकांत करणे.

भगवान मनु सांगतात,

मात्रा, स्वस्त्रा, दुहित्रा वा न विविक्तासनो भवेत्
बलवान इन्द्रियग्रामो विद्वान्समपि कर्षति ॥

(स्वत:ची साक्षात आई, बहिण, मुलगी असली तरी तिच्याशी एकांत करू नये. अभिजात घराण्यातील पुरुष आपली माता, भगिनी वा कन्या असली तरी तिला स्पर्श करत नाहीत. वाताम्बुपर्णशयी अशा विश्वामित्र, पराशरादि ऋषींनाही या बलदंड इंद्रियांनी नरकात लोटले आहे.)

६. संकल्प- कामवासनेने अंकित होऊन नीच वासना तृप्तीकरता पापी संकल्प करणे.
७. अध्यवसाय- पापी संकल्पानुसार खटाटोप करणे.
८. प्रत्यक्ष संभोग.

हे अष्टमैथून कल्याणेच्छूंनी संपूर्णतया टाळावे. भगवान मनूचा हा उपदेश उत्कर्षेच्छूंनी हृदयाशी जपावा.

उपचार: क्रिया केलि: स्पर्शो भूषणवाससाम्
सहखद्सनं चैव सर्वं संग्रहणं स्मृतम् | ८/३५८

(प्रसाधन, वस्तू देणे वा लावणे, थट्टा-विनोद करणे, अलंकार-वस्त्रे (अंगावरची) यांना स्पर्श करणे, एका खाटेवर (आसनावर) बसणे, हे सर्व विनयभंग करणारे अपराध होत).

स्त्रियं स्पृशेददेशेय: स्पृष्टो वा र्षयेत्तया
परस्परस्यानुमते, सर्वं संग्रणं स्मृतम् ॥ ८/३५९

(जो कोणी परक्या स्त्रीला अनुचित स्थानी स्पर्श करील, स्त्री जर तसा (असभ्य) स्पर्श निमूटपणे सहन करील, कदाचित असे स्पर्श एकमेकांच्या अनुतीने झाले असले तरी तो (विनयभंग) धर्माप्रमाणे असभ्याचारच ठरतो.)

अभिषह्य तु य: कन्यां कुर्याद्दर्पे मानव:
तस्याशु कर्स्ये अंगुल्यो दण्डं चार्हति षट्शतम् ॥ ८/३६८

(जो कन्येवर उद्दामपणे बलात्कार करील, त्याची बोटे तोडावीत आणि सहाशे पण दंड करावा).

या तु कन्यां प्रकुर्यात् स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति
अन्गुल्यादेव वा च्छेदं खरणोद्वहनं तथा ॥ ८/३७१

( जी (प्रौढ) स्त्री, कुमारीला (अक्षतयोनी कन्येला बोटांनी) भ्रष्ट करील तर तिचे त्वरीत मुंडन करावे. तिची बोटे तोडावीत, गाढवावरून तिची धिंड काढावी.)

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित) वर्ष ९, अंक ९