आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Monday, December 23, 2013

धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदु विरोध !



 
भारतातल्या हिंदूंची सर्वाधिक मोठी शोकांतिका ही आहे की, त्यांना या आधुनिक भ्रष्ट, दुष्ट धर्मनिरपेक्षतेचा जबरीने साक्षी व्हावे लागत आहे. निधर्मीपणाचा इतका नीच, इतका निकृष्ट, इतका भ्रष्ट अवतार त्याला पहावा लागत आहे. नेहरूंनी आणि त्यांच्या अनुयायांनी या निधर्मीपणाचा उदो उदो केला. त्यांनीच त्या निधर्मीपणाला अत्यंत अधम, अती भ्रष्ट रूप दिले. या निधर्मी राष्ट्राच्या नावाखालीच हिंदूंचा सनातन धर्म, ती सनातन संस्कृती, तो हिंदूंचा राष्ट्रीय वारसा, ती संस्कृत भाषा, या सर्वांचे नरडे आवळून त्यांना हद्दपार करणे, हे सगळे या निधर्मीपणाच्या बुरख्याखाली घडत आहे. कनिष्काला त्याच्या गोधडीखाली दाबून गुदमवरून त्याचे प्राण घेतले, तसे निधर्मीपणाच्या गोधडीखाली हिंदूंचा तो राष्ट्रीय सनातन वारसा, तो सनातन धर्म, संस्कृती, यांचे प्राण घेतले जात आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदु विरोध !
    भारतातले हिंदुद्वेष्टे निधर्मी शासन संस्कृतला मृतवत (Dead) ठरवण्याकरता सर्व सत्ता-संपत्ती पणाला लावत आहे. भारताचा निधर्मीवाद सिद्ध करण्याकरता संस्कृत शिकवायचे नसेल, तर काय
शिकवायचे ? अरबी, चायनी, जपानी ? हिंदूंचे ग्रंथ, रामायण, महाभारत, पुराणे शिक्षण संस्थातून शिकवायला बंदी का ? संस्कृतवर बंदी का ? हिंदूंनी जीवनाशी किती द्रोही आणि विसंगत व्हावे ? ही का बुद्धीमानी आहे ? निधर्मीवाद्यांनाच या देशाचा कायदा घडवता यावा ? केवढा हा जुलूम ! हिंदुस्थानात जर आम्हाला आमच्या श्रुति-स्मृति, पुराणे अभ्यासता येत नसतील, तर आमचा स्वतःचा वारसा कुठे अभ्यासावा ? हॉवर्ड ? शिकागो, ऑक्सफर्ड, केंब्रिज येथे
   आज इंग्रजी शिकलेल्या (आंग्लाळलेल्या) भारतियांची शरिरे भारतीय आणि मन मात्र पाश्‍चिमात्य (पाश्‍चात्त्य विचारसरणीचा पगडा असलेले) होणे, हे भारताच्या वाढत्या लोकसंख्येपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याला भारतियांच्या मनाची मृदूता आणि इतरांना सहज स्वीकारणारी वृत्ती कारणीभूत आहे. या तुलनेत जपान आणि चीन या देशांतील नागरिकांची मने अधिक सावध अन् कणखर आहेत. त्यांनी इंग्रजी बोलणार्‍या विज्ञाननिष्ठ विचारसरणी असणार्‍या जगताला त्यांची हुकूमत त्यांच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक रचनेवर अद्याप चालवू दिलेली नाही, हे सत्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

गुरुदेव डॉकाटेस्वामीजी (घनगर्जितएप्रिल २०१०)

Sunday, December 1, 2013

तुम्ही गुन्हेगार आहात !

सर्व धर्म समान आहे का ? सर्वधर्मसमभाव हिंदु समाजावर का लादता ? सर्व धर्म समान आहेत, असे सांगता ? या विश्वात कोणत्याही दोन गोष्टी पूर्णपणे समान नाहीत. दोन वस्तू वा माणसांत भेद असायलाच हवा. त्याविना त्यांचे वेगळे अस्तित्व कसे असू शकेल ? कोणतीही दोन माणसे पूर्णतः एक असूच शकत नाहीत. मग सर्व धर्म समान कसे असू शकतील ? हा प्रश्नच मस्तकात मेंदू नसल्याचे लक्षण आहे'.

मॅट्रिकच्या (पूर्वीच्या दहावीच्या) मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘दोन शब्दांत दोन संस्कृती', असा एक पाठ आम्ही पाहिला. श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही एक संस्कृती आणि विज्ञाननिष्ठ प्रणाली (up-to-date) ही दुसरी संस्कृती. बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ प्रणालीचे अनुसरण केले पाहिजे. श्रुति-स्मृति पुराणोक्त धर्माचे आता दफन झाले पाहिजे, असा त्या विधानाचा आशय या पाठातून व्यक्त होतो. श्रुति-स्मृति पुराणोक्त ही संस्कृती अबुद्धीवादी आहे का ? विज्ञानविरोधी आहे का ? 

आमचे राष्ट्र आणि समाज यांचे लक्षावधी वर्षांपासून मंतरलेल्या अभेद्य कवचासारखे संरक्षण करणार्या भारतीय वेशभूषा, केशभूषा, खाणे, पिणे, चालणे, फिरणे, उत्सव, महोत्सव, चालीरीती, परंपरा इत्यादी गोष्टी आज आम्हाला तिरस्करणीय आणि हीन वाटू लागल्या आहेत. आमचे शासन, नेते, समाजकल्याणकर्ते, मानवहिताकरता झटणारे सुधारक, अशा यच्चयावत् उद्धारकर्त्यांना (?) जे जे आमचे सनातन आहे, ते ते नष्ट-भ्रष्ट करण्याची एकच एक घोर चिंता लागली आहे. या एकाच ध्येयाकरता ते सत्ता, संपत्ती, बुद्धी, सूक्त-असूक्त (चांगले-वाईट) यांची बाजी लावत आहेत. हिंदु समाजातील प्रत्येक गट आणि व्यक्ती यांच्यात स्वाभिमानाचा रतिमात्र अंश, अगदी केसाएवढासुद्धा शेष राहू नये, याकरता एक प्रचंड षड्यंत्र उभे ठाकले आहे. 

अस्पृश्यांना दलित, पिळले गेलेले (oppressed), असे म्हणून त्यांचे स्वत्व, स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांचा विनाश करायचा का ? 

श्रेष्ठ वर्ग जो सवर्ण आहे, त्याला सांगायचे, 'तुम्ही गुन्हेगार आहात. तुमच्या बापजाद्यांनी, पूर्वजांनी घोर पातके केलेली आहेत, त्याची फळे आता भोगा'. अशाप्रकारे सवर्णांचे (श्रेष्ठवर्गाचे) स्वत्व, स्वाभिमान नष्ट करायचा का ? त्यांच्यात अपराधभाव (guilty conscious) निर्माण करायचा का ? हीनगंड पोसायचा का ? 
आज आमच्या संवेदनाही पश्चिमी बनल्या आहेत. केवढा दुर्विलास ! 

अशा स्वाभिमानशून्य, स्वत्वशून्य भ्याडांच्या सहकार्याने राष्ट्ररक्षण कसे होईल ?

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)

Sunday, November 24, 2013

हिंदु संस्कृती

रामराज्य परिषदेचे संस्थापक प.पू. करपात्रीस्वामी हे पहाटे तीन वाजता उठून प्रातर्विधी उरकत. दंतधावन केल्यावर ते विहिरीच्या गार पाण्याने स्नान करत. नंतर त्यांचे नित्य उपासनेचे कर्म करत. सायंकाळी ५ वाजता ते भोजन करत. त्यांचा ब्रह्मचारी शिष्य स्नान करून सोवळ्यात त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा. हाताने दळलेल्या गव्हाची पोळी, भात, मुगाच्या डाळीचे वरण, लिंबू, आले, गायीचे दूध आणि तूप. मीठ, मिरची, तिखट, साखर वर्ज्य ! ते अन्न कोळशाच्या शेगडीवर शिजवायचे. रात्री निजतांना ते गायीचे दूध घ्यायचे ! जेवणात फळे असायची. रासायनिक खतांचे धान्य आणि भाज्या वर्ज्य असत. रॉकेल किंवा गॅसवर शिजवलेले अन्नही वर्ज्य ! जेवणाच्या आधी ते पाण्याचा एक थेंबही तोंडात टाकत नसत. ते अखंड प्रवासात असायचे. त्यांच्या चारचाकी वाहनामध्ये कोळसे, शेगडी, गंगाजल, पूजासाहित्य अशी सर्व सामुग्रींची सिद्धता असायची. अखेरच्या श्‍वासापर्ंयत त्यांच्या नित्यकर्मात, योगक्षेमात रतीमात्र अंतर पडले नाही. हा त्यांचा दिनक्रम अखंड ६० वर्षें अव्याहत चालू होता. त्यांना कधी रोग (आजार) किंवा  दुखणे झाले नाही, त्यामुळे डॉक्टरकडे जावे लागले नाही ! शास्त्रकार सांगतात त्याप्रमाणे आहाराचे, खाण्यापिण्याचे नियम आणि धर्मशास्त्रानुसार आहार त्यांनी कठोरपणे अन् कटाक्षाने अखेरच्या श्‍वासापर्ंयत सांभाळला.
  

 आमचे प्राध्यापक मित्र सांगतात, ही अंधश्रद्धा आहे.

  • या अंधश्रद्धेच्या थयथयाटाने जग हादरले आहे. सावध होत आहे. आमच्या सनातन धर्माकडे हे सुसंस्कृत (sophisticated)  वैज्ञानिक प्रगत जग खेचले जात आहे. आम्ही मात्र डोळे उघडायला सिद्ध नाही.
  • आधुनिक जागतिक समाजाची आज कोठेही श्रद्धा नाही, कोणतेही तत्त्व नाही, आलो कोठून, जाणार कोठे यांचा त्यांना पत्ता नाही. अशाही परिस्थितीत स्वत:ला 'प्रगत' म्हणवणारा समाज, आम्हां हिंदूंना 'सनातनी' अशी शिवी देतो. 

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( साप्ताहिक सनातन चिंतन, १५.०४.२०१३)

Saturday, October 26, 2013

ऋषिस्मृति


पर्जन्यमापनासाठी आपण आज जशी साधने वापरतो, तशी पूर्वी काही योजना होती. सृष्टीज्ञानाच्या नानाविध शाखांवर ग्रंथलेखन करणारे ६ व्या शतकातील महान शास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी पुढील प्रयोग सांगितला आहे. (बृहद्संहिता २३/२) एक अरत्नी मानाचे, म्हणजे १८ इंच व्यासाचे एक कुंड ठेवायचे. त्या कुंडाला ‘मागधमान म्हणतात. हे कुंड आंब्याच्या झाडाचे करतात. हे कुंड १२ अंगुले, म्हणजे ९ इंच उंच, लांब आणि रुंद असे असते.
 चाणक्यानेदेखील त्याच्या ग्रंथात विशिष्ट ढगांची माहिती दिली आहे. ढगांचे प्रकार, पाऊस पाडणारे ढग, सूर्य, गुरु आणि शुक्र यांचे स्थान अन् गती यांवरून कोणते ढग वर्षाव करतील, ते दिले आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात १४३ प्रकारच्या ढगांचा निर्देश आहे. त्यांतील तीन प्रकारचे ढग हत्तीच्या सोंडेसारखे आणि मुसळधार पावसाचा वर्षाव सतत ७ दिवसांपर्यंत करतात. ८० प्रकारचे ढग केवळ सिंचन करतात आणि ६० प्रकारचे ढग केवळ सूर्यप्रकाशातच प्रकटतात.  
यांच्या बृहत्संहितेतील २१ ते २८ या अध्यायांत वर्षाकालाविषयी शास्त्रीय माहिती आहे. प्रारंभी वराहमिहिर म्हणतात, ‘अन्न हे वर्षाकालावर अवलंबून असून ते जगताचा प्राण आहे. त्यासाठी वर्षाकालाविषयी प्रयत्नपूर्वक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी काही महिने मेघ उत्पन्न होण्याची प्रक्रिया चालू होते. तिला ‘गर्भधारणा म्हणतात. चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रांत प्रविष्ट झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात गर्भधारणेची लक्षणे स्पष्ट दिसतात. गर्भधारणेनंतर साडे सहा महिन्यांनी प्रसव होतो, म्हणजे मेघ जलवर्षाव करतात. (बृहद्संहिता २१-७) उत्तर किंवा पूर्व दिशांकडून शीतल वायू, निर्मळ आकाश, विविध रंगांचे ढग, मंद मेघगर्जना आणि पक्ष्यांचा मधुर ध्वनी अशी गर्भपुष्टीची लक्षणे आचार्य वराहमिहिराने सांगितली आहेत. 
विपुल वृष्टी करणारे मेघ कोणते आणि ते कसे असतात, हे वराहमिहिर यांनी बृहद्संहितेत सांगितले आहे. त्याने आवर्तमेघ, संवर्तमेघ, पुष्करमेघ आणि द्रोणमेघ, असे मेघाचे चार प्रकार सांगितले.
१. आवर्तमेघ : हे एखाद्या विशिष्ट स्थळी वृष्टी करतात.
२. संवर्तमेघ : हे सर्वत्र वृष्टी करतात.
३. पुष्करमेघ : हे अल्पवृष्टी करतात.
४. द्रोणमेघ : हे अती विपुलवृष्टी करतात.
    उल्कापात, अग्नीपात, धुलीवर्षाव, भूकंप व इंद्रधनुष, असे उत्पात आणि ते दिसले, तर ‘गर्भाचा उपघात होतो, असे त्याने बृहद्संहितेत सांगितले आहे. (बृहद्संहिता २१/ २५-२७)
    वराहमिहिराने पावसाच्या संदर्भात एक प्रयोग सांगितला आहे. आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षात चंद्राने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की, एक ब्राह्मण गावाच्या उत्तरेला वा पूर्वेला जात असे. तो तीन दिवस उपवास करून विराट श्रीविष्णूची प्रार्थना करीत असे. तो जमिनीवर ग्रह-नक्षत्रांच्या आकृत्या काढून श्रीविष्णूची पूजा करीत असे. नंतर चार दिशांना चार कलश मांडून ठेवीत असे. उत्तरेचा कलश श्रावण महिन्याचे, पूर्वेचा कलश भाद्रपद महिन्याचे, दक्षिणेचा कलश आश्‍विन महिन्याचे आणि पश्‍चिमेचा कलश कार्तिक महिन्याचे प्रतीक होत. जो कलश पाण्याने भरून जाईल, त्या महिन्यात हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडेल, असे समजले जायचे. हे संकेत खरे ठरायचे आणि अशा पुरुषांचा समाजात नेहमी गौरव होत असे.
ऋषिस्मृति - २, आचार्य वराहमिहिर, प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

Sunday, October 6, 2013

सनातन हिंदु धर्म हा काही Religion नाही !


हे जे काही इस्लाम (Religion), ख्रिश्‍चन (Religion) आहेत, ते आपल्या धर्मप्रसाराकरता अत्याचारी आणि आक्रमक होतात, तसेच खून अन् हत्याकांडे करतात; परंतु 'धर्म हा हत्याकांडे करतो, आततायी असू शकतो', असा पुसटता गंधही हिंदूंना सहन होत नाही.
     परम श्रेष्ठ मूल्य असलेल्या हिंदु धर्माला खच्ची करण्याकरीता ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अनुवाद करून 'जसे इस्लाम, ख्रिश्‍चन धर्म, तसाच हिंदु धर्म आहे', असे प्रतिपादन पाश्‍चात्त्यांनी केले. उन्नत आशय असलेला हिंदु धर्म बलवान झाला, तर हिंदु धर्मही आपल्या धर्मप्रसाराकरता इतर धर्माचा विध्वंस करील, जगातल्या इतर धर्मियांची हत्याकांडे करील आणि आपला धर्म प्रस्थापित करील, अशी आधुनिकांना भीती वाटते; म्हणून हिंदु धर्माचा उत्कर्ष कधी होऊच नये, असे त्यांना वाटते; म्हणून 'इस्लाम रिलिजन', 'ख्रिश्‍चन रिलिजन', असे जे काही आहेत, त्या धर्माच्या (रिलिजनच्या) ओळीत ते हिंदु धर्माला बसवतात. ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अर्थ सहेतूक त्यांनी दिला. वास्तविक हिंदु धर्म तसा कधीच नाही, नव्हता आणि असूही शकत नाही.

हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे लिखाण करणारे पाश्‍चात्त्य !
    हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे उपाय या पाश्‍चात्त्यांनी योजिले. त्याच्याकरता त्यांनी (मनमानी, खोटा) इतिहास लिहिला. 'हिंदूंनी बौद्धांवर आक्रमणे केली, हिंदूंनी बौद्धांची हत्याकांडे केलीत, हिंदूंनी बौद्धांचे आश्रम जाळून टाकलेत', अशा प्रकारचा नवा खोटा मध्ययुगीन इतिहास लिहिला. विशेष असे की, आमचा जो मध्ययुगीन इतिहास आहे, हा सगळा पाश्‍चात्त्यांनी लिहिला आहे. आजही ते हिंदूंना आक्रमक, आततायी, हत्याकांडे करायला मागेपुढे न पहाणारा हे ठरवण्याकरता नाना क्लृप्त्या योजित आहेत आणि करतही आहेत.
     आज जे काही चालले आहे ते असे. हिंदु हा आक्रमक, आततायी आहे, गोडसेवादी, मनुवादी आहे, हे ठरवण्याकरता ते आकांडतांडव करत आहेत. त्या उद्दिष्टाकरता ते एकही संधी जाऊ देत नाही. काही केले, तरी त्यांना काही पुरावे सापडत नाहीत; कारण हिंदु धर्म हा काही धर्म नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.३.२०११)

Tuesday, October 1, 2013

श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण


टीका : जिवंत पिता, लौकिक पितामह, प्रपितामह प्रभुतींचा सत्कार करणे हेच श्राद्ध !
- आर्य समाजाचे संस्थापक दयानंद स्वामी 
खंडण 
अ. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होत असणे : जीवित पिता, पितामह यांचा सत्कार म्हणजे श्राद्ध, यासाठी स्वामी दयानंद मनूच्या ज्या श्‍लोकांचा संदर्भ देतात, त्यातून उलट हेच स्पष्ट केले आहे की, पिता जीवित असतांना त्याचे श्राद्ध होऊच शकत नाही. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होते.
आ. धर्मशास्त्रात श्राद्ध केल्यामुळे होत असलेले परिणाम : पृथ्वीवर (दक्षिण दिशेला भूमी उकरून तिथे दर्भ पसरवून तीन पिंड ठेवायचे) तीन पिंड दान केले की, नरकस्थित पितरांचा उद्धार होतो. पुत्राने हरप्रयत्नाने मृत पित्याचे श्राद्ध करावे. त्यांचे नाव आणि गोत्र विधीवत् उच्चारून पिंडदानादी करण्याने त्यांना हव्य-कव्याची प्राप्ती होते. यामुळे त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण झाल्याने ते तृप्तात्मे साहजिकच त्या कुटुंबाला त्रास देत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना गती मिळून ते पुढील लोकात जातात. श्राद्ध केल्याने त्याचे परिणाम चांगले होतात, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
    यामुळे आर्य समाजी दयानंद आणि आधुनिक यांचे वरील वक्तव्य चुकीचे आहे, हे दिसून येते; कारण तसे असते, तर श्राद्धात जे मोठे विधी-विधान आहे, त्याची काय आवश्यकता राहिली असती ?
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंबर २००८ आणि जानेवारी २००९)

(म्हणे) संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करा ! 
साधक : गुरुदेव, बिहार शासनाचे उपमुख्यमंत्री धार्मिक आणि हिंदु धर्म अन् संस्कृतीचे मोठे अभिमानी आहेत. प्रत्यक्षात तसे संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान त्यांनी चालू केले आहे. विदेशातील हिंदूंकरता व्ही.डी.ओ. कॉन्फरन्सिंगद्वारे पिंडदान करण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी घोषित केले आहे की, आमच्या पर्यटन विभागाने विदेशात रहाणार्याक हिंदूंकरता गतवर्षापासून संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदानाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विदेशात सर्वत्र स्वागत होत आहे. वर्णधर्म, जाती इत्यादींचे निर्मूलन करू पहाणार्या ईश्वराचे अधिष्ठान न मानणार्या, अंत्येष्ठी श्राद्धाचा प्रखर तिरस्कार करणार्या , ज्यांना श्राद्धविधी नष्ट करायचा आहे अशा नवहिंदुत्ववाद्यांनी ऑनलाईन पिंडदानाचे स्वागत केले आहे.
गुरुदेव : हे उलट्या खोपडीचे आमचेच आंग्लछायेचे हिंदू काय काय उपद्व्याप करतील कोण जाणे ? हे सगळे हिंदु समाजाचे कडवे शत्रू आहेत. लक्षावधी वर्षांपासून कोटी कोटी लोकांनी पितरांना मुक्ती देणार्या ‘गया या परमपवित्र क्षेत्री आता पितरमुक्तीकरता पिंडदान करायला येण्याची आवश्यकता नाही !
  पितरमुक्तीकरता पिंडदान करणार्या गया क्षेत्राचे महिमान, असे सगळे श्रुती-स्मृति पुराणांतून सर्वत्र आहे. लक्षावधी हिंदू पितरमुक्तीकरता प्रत्यक्ष गयेला येऊन पिंडदान करतात आणि पितरांचे आशीर्वाद घेतात. ज्यांना पिंडदान करायचे त्यांचे जे आप्त-स्वकीय आहेत, त्यांना प्रत्यक्ष गयेला येणे अपरिहार्य आहे. साक्षात भगवान रामप्रभु यांनी दशरथाची श्राद्धक्रिया प्रत्यक्ष गयेला येऊनच केली.
     शास्त्रप्रामाण्य हीच तर आम्हा हिंदु जीवनाची कवच कुंडले आहेत. शास्त्रमर्यादा उल्लंघणारा दांभिक आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान शास्त्रविरुद्ध ढोंग आहे. लक्षावधी वर्षांच्या आमच्या परंपरेवर आतंकवादापेक्षाही क्रूर आघात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करणारा शास्त्र उल्लंघून कुकर्म करतो.
    यः शास्त्रकिधिमुत्सृज्य कर्तते कामकारतः ।
     न स सिद्धिमकाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोनक २३
अर्थ : अशा स्वैराचारी मानवाला सुख, यश आणि परलोक तर नाहीच नाही. अशा दांभिकांना मी (भगवान) सर्प, विंचू, वाघादी क्रूर योनीत घालतो.
भगवान सांगतात,.....
    तानहं द्विषतः क्रुरान्संसारेषु नराधमान् ।
    क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्केक योनिषु ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोपक १९
अर्थ : त्या द्वेष आणि क्रूर कर्मे करणार्या् पापी नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीत टाकतो.
     ही जी आधुनिक तांत्रिक पद्धत (technology) आहे, ती आतंकवादापेक्षाही क्रूर आणि दुर्दैवी अशी अवदसा आहे. (Every advance in technology is the greatest misfortune.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १६.१२.२०१०)

Tuesday, August 6, 2013

कोटी कोटी प्रणाम !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज जयंती
हिंदूंचे भीषण अधःपतन होण्यामागचे कारण
     यामागे सनातन धर्माचा काहीच दोष नाही; किंबहुना सनातन धर्माचे अनुसरण करत नसल्यामुळे हिंदूंचे भीषण अधःपतन झाले आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १०.३.२०११)

हिंदु संस्कृतीची अद्वितीयता

एतद्देशप्रसूतस्य सकाशात् अग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥ - मनुस्मृति २.२०
 अर्थ : या ब्रह्मवर्तादी देशात जन्माला येणारे जे चारित्र्यसंपन्न आणि विद्वान लोक असतील त्यांच्यापासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी सदाचाराचे, सद्वर्तनाचे धडे घ्यावेत. आमच्या चरणाशी बसून विश्‍वातील यच्चयावत मानवांनी आचरणाचे वळण गिरवावे. 
आक्रमणाच्या उद्देशाने हिंदुस्थानात आलेल्यांनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु संस्कृतीशी एकरूप होणे 
१. तक्षशिलेच्या यवनराजाचा दूत हेलिओडरस याने तिथे गरुडध्वज उभारला आहे. त्यावरील लेखात तो भगवान विष्णूचा उपासक ‘भागवत असा स्वतःचा निर्देश करतो.
२. कांबोज, यवन, पल्हव, दरर, खश इत्यादी लोक पूर्वी क्षत्रिय होते; पण संस्कार न झाल्याने त्यांना वृषलत्व (शूद्रत्व) प्राप्त झाले. धार्मिक संस्कार न झाल्यामुळे मूळचे क्षत्रिय असूनही त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले; म्हणूनच ते क्षत्रियत्वाचे संस्कार त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांना क्षत्रियत्वाचा अधिकार दिला गेला.

३. परकीय आक्रमणात हूण हे प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला. हूण राजा मिहिरकुल हा शिवोपासक होता. हुणांनी भारतात राज्य स्थापिले. हळूहळू ते हिंदु संस्कृतीशी एक होऊन गेले. फुढे त्यांची गणना राजपुतांच्या श्रेष्ठ कुळात होऊ लागली. इथे जात्युत्कर्ष आहे.
४. कुलचुरी हे स्वतःला चंद्रवंशी म्हणवतात. त्या कुलातील महाप्रतापी कर्णनृपतीचा विवाह हूण राजकन्या आवल्लदेवीशी झाला होता. त्यांचा पुत्र यशःकर्ण हा पित्यानंतर गादीवर आला. राजपूत राजे कडवे हिंदु धर्माभिमानी होते. त्यांनी हिंदु धर्म व संस्कृती यांच्या रक्षणाकरता वेळप्रसंगी प्राणार्पण करायलाही मागे पुढे पाहिलेले नाही.
कर्मफल आणि पुनर्जन्म यांवरील श्रद्धेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर असणे 
    प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सुख-दुःख प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आफल्याला आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा कायम होती. स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली आणि आता जवळजवळ नष्ट झाली आहे.
भारतभूमीची सहस्रो वर्षांची तेजःपुंज परंपरा तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील 
    स्वामी विवेकानंद अमेरिकेला खडसावतात, तुमचे ज्ञान, तुमची संस्कृती आणि तुमची जीवनशैली ही केवळ वरवरची आहे. थोडेसे घासले की, त्या कातडीखालचा हिंस्त्र पशू उसळून वर येतो. आपल्या थोर व पावन भारतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा आपल्या पाठीशी उभी आहे. त्याची लाज कशाकरिता ? ही तर आमची तेजःपुंज ज्वलंत अस्मिता आहे. जगाला ही वैशिष्ट्येच शिकवायची आहेत. भारताने नेतृत्व करायचे आहे. ही जी ज्वलज्जहाल अस्मिता आहे, तीच आमच्या तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Tuesday, July 23, 2013

गोरक्षणासाठी सिंहासमोर स्वतःला झोकून देणारा हिंदूंचा रघुवंशातील पराक्रमी राजा दिलीप !



         श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा विख्यात आहे. रघुवंशातील तो थोर राजा दिलीप ! चक्रवर्ती सम्राट दिलीप गोव्रत आचरतो. त्याच्या पूजनीय अशा नंदीनी गाईला कोवळे गवत खायला देतो. तिची पाठ व मान खाजवितो. तिच्या अंगावर बसलेले डास उडवून लावतो. कुलगुरु वसिष्ठांच्या न थांबणार्‍या त्या नंदिनी गायीच्या पाठोपाठ छायेसारखा असतो. गाय बसली की, तो बसतो. गाय चालायला लागली की, तो चालू लागतो. एक दिवस त्या अरण्यात एक महाकाय, महाक्रूर सिंह राजासमोर उभा रहातो. त्या नंदिनी गायीला खायला तो सिद्ध असतो. राजा धनुष्य सज्ज करतो. सिंह म्हणतो, `तुझा देह दिलास, तरच मी गायीला सोडीन! ही एकच शर्थ आहे.’ राजा दिलीप सम्राट आहे तरुण, सुंदर, शक्तीमान व कांतीमान आहे. प्रजेचा पालनकर्ता, रक्षणकर्ता आहे. प्रजेचा आधार आहे. गोरक्षणाकरिता स्वदेह तृणवत् मानून सिंहाला द्यायला तयार होऊन उद्गारतो, `गोरक्षा हेच माझ जीवितकार्य! गाय सोडून का परत जाऊ ? अपकीर्तीने लडबडलेला देह राजधानीला परत नेण्यापेक्षा मृत्यू फार फार चांगला. मी क्षत्रिय आहे. क्षतांचे तारण करणारा तोच क्षत्रिय !’
          राजा सिंहाला पुढे सांगतो, `सिंहराज, तुला माझी कणव येते. ‘क्षुद्र गायीच्या मोबदल्यात सम्राटाचा देह ! हा राजा मूर्ख असला पाहिजे’, असे तू म्हणतोस. माझ्या शरीराचा व माझ्या जीवनाचा तुला कळवळा येतो. त्यापेक्षा माझ्या यशरूपी शरीराचे रक्षण का करत नाहीस ? कृपाच करायची, तर माझ्या यशरूपी कायेवर कर. या दृश्य, अन्नमय, जड व क्षुद्र देहाची करुणा करायचे  कारण नाही. माझ्या साक्षीने व माझ्या डोळ्यांदेखत नंदिनीची हत्या झाली, तर रघुवंशाची कीर्ती कलंकित होईल. माझ्यावर करुणाच करायची असेल, तर माझा देह भक्षण कर आणि नंदिनीला मुक्त कर. त्यामुळे माझी यशरूपी काया चिरंतन राहील.’’
          रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, गायीकरिता तारुण्याने मुसमुसलेल्या स्वशरीराची आहुती द्यायला तत्पर असतो ! सागरापर्यंतच्या सर्व भूमीचा एकमात्र स्वामी, सार्वभौम, हाती घेतलेले कार्य  तडीला नेणारा, स्वर्गापर्यंत रथातून यात्रा करणारा, देवराज इंद्राचा सहकारी, क्षत्रियाला योग्य असे विधीनुसार अग्नीहोत्र करणारा, याचकांचे मनोरथ आदरपूर्वक पुरवणारा, अपराध्याला योग्य शासन करणारा, वेळेवर निजणारा, वेळेवर उठणारा, देण्याकरिता-त्यागाकरिताच धन संपादन करणारा, मुखातून असत्य बाहेर पडू नये; म्हणून अत्यंत मोजकेच बोलणारा, विजयेच्छू, ततीकरिताच विवाह करणारा, उत्तरायुष्यात मुनीसारखे वानप्रस्थी जीवन जगणारा आणि अखेरीला योगाभ्यासाने शरीराची खोळ बाजूला सारणारा असा हा भारताचा सार्वभौम सम्राट दिलीप !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २६.१.२००६, वर्ष पहिले, अंक ८)

Wednesday, May 15, 2013

‘विवाहसंस्कारा’संबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण



अयोग्य विचार

‘सालंकृत कन्यादान म्हणजे हुंडा ! कन्या ही का दान करण्याची वस्तू आहे ? कन्यादान हे रानटीपणाचे आहे. स्त्रीला विनिमयाची वस्तू बनवणार्‍या रानटी संस्कृतीची ही अवस्था आजही टिकून आहे.

खंडण

 ‘संत तुकाराम महाराज सांगतात, `सालंकृत कन्यादान, पृथ्वीदानासमान ।’ संत तुकाराम महाराज रानटी होते का ? प्रेमविवाह हा ‘गांधर्व विवाह’ आहे. गांधर्व विवाहात कन्यादान हा प्रकार नाही.
कन्यादान म्हणजे हुंडा नव्हे ! कन्यादान शुल्क नाही. शुल्क (म्हणजे हुंडा इत्यादी) मिळावे, अशी अपेक्षा नाही. ती बुद्धीच नाही. सालंकृत कन्यादान ! विवाहप्रसंगी तिला तिचे वडील, भाऊ, आप्त इत्यादी सुवर्णादी अलंकार देतात, ते सालंकृत कन्यादान ! शुल्क बुद्धीचा तिथे अभावानेही गंध नाही. `दान’ याचा अर्थ ‘समर्पण’ हे विसरू नका.’
अयोग्य विचार
‘अनुवंश, कुलाचार, परंपरा असा सगळा धर्म आहे. धर्म माणसाला हाता-पायाच्या साखळदंडासारखा आहे’, असे साम्यवादी मानतात. विवाहामुळे मुक्त जीवनाला (स्वैर जीवनाला) प्रतिबंध येत असल्यामुळे, म्हणजेच कामवासनेची तृप्ती होत नसल्यामुळे विवाह हा मार्क्स आणि आजच्या आधुनिकांनी त्याज्य ठरवला. ते Glass-Water Theory अनुसरतात, म्हणजे ‘तहान लागली की, पाणी प्यायचे. त्यासाठी भांडे जवळ बाळगण्याची काय आवश्यकता’, असे साम्यवाद्यांचे मत आहे. तसेच ‘मुलांचे पोषण आणि संगोपन शासन करील’, असे ते म्हणतात.
खंडण
‘संततीचे संगोपन आणि पोषण करण्याला (खाजगी) आई-वडिलांपेक्षा शासन अधिक सक्षम आहे’, असे हे साम्यवादी सांगतात. असा समाज किती वर्षे टिकेल ? साम्यवाद जन्माला आला, तेव्हापासून अवघ्या ६०-७० वर्षांत तो कोलमडला. रशिया छिन्नभिन्न झाला. आमची समाजरचना शास्त्राप्रमाणे आहे. आम्हा हिंदूंच्या विवाहाचे हेतू सुप्रजा निर्माण करणे, धर्म आणि संस्कृती यांचे चिरंजिवित्व राखणे, मानवाचे ऐहिक हित साधणे आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त करून घेणे, हे आहेत. आम्ही जातीधर्म, कुलधर्म आदींचे पालन करून अनुवंशाचे अबाधित्व राखतो. आमच्या विवाहामुळे निर्माण होणारा वंश हा जोवर भूलोकी नद्या, पर्वत, अरण्ये आहेत, तोवर राहिला पाहिजे.’

अयोग्य विचार
‘तो व्यभिचार नव्हे. ते कामसंतर्पण आहे’, असे साम्यवाद्यांचे मानणे आहे. कामतृप्तीसाठी विवाहबाह्य संबंधाला आजचा समाज मान्यता देतो.

खंडण
‘याचा अर्थ आधुनिक समाजाला व्यभिचार मान्य आहे ! ‘कामसंतर्पण’ हे सगळे थोतांड आहे. व्यभिचार हा नेहमी सुडाच्या स्वरूपाचा असतो. व्यभिचार करणार्‍या व्यक्ती प्रेमभावना इत्यादी सांगून आपल्या अनीतीचे नेहमी समर्थन करू पहातात. ज्यांच्यामध्ये अहंगड असतो, त्यांच्यामध्ये भावना अधिक प्रबळ असतात. भावनांमुळे कोणत्याही गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)

Monday, April 29, 2013

श्रीमद्भागवत महापुराण मे राधा जी





विद्वान और पंडित जन कहते हैं की जिस समाधि की अवस्था में भागवत पुराण लिखा गया और जब राधा जी का प्रवेश हुआ तो वेद व्यास जी इतने डूब गए कि राधा चरित लिख ही नहीं सके| और सच्च तो यह है कि जो भागवत के प्रथम श्लोक



"श्री कृष्णाय वासुदेवाय" में "श्री" है...



इसका अर्थ है कि सबसे पहले राधा जी को नमन किया है | 



"श्री कृष्णाय वयं नम:" 



इसमें अकेले कृष्ण को नहीं 
"श्री कृष्ण" को नमन किया है |
सनातन धर्म में शक्ति-विशिष्ट ब्रह्म कि पूजा है | निराकार ब्रह्म कि पूजा नहीं हो सकती | वही ब्रह्म जब शक्ति-विशिष्ट होता है...तभी उसकी पूजा हो सकती है | 
"श्री" का अर्थ है "शक्ति" अर्थात "राधा जी" | 
शुकदेव जी पूर्व जन्म में राधा जी के निकुंज के शुक (तोता) थे| निकुंज में गोपिओं के साथ प्रभु क्रीडा करते थे और
शुकदेव जी सारा दिन राधा-राधा कहते थे| यह देख एक दिन राधा जी ने हाथ उठाकर तोते को अपनी ओर बुलाया | तोता आकर राधा जी के चरणों कि वंदना करता है |वह उसे उठाकर अपने
हाथ में ले लेती हैं और तोता फिर श्री राधे राधे बोलने लगा | तब राधा जी ने कहा, "अब तू राधा राधा नहीं, कृष्ण कृष्ण बोल" | इस प्रकार राधा जी तोते
को समझा ही रही थी कि तभी कृष्ण आ जाते हैं | राधा जी ने उनसे कहा कि यह
तोता कितना मधुर बोलता है और उसे प्रभु के हाथ में दे दिया | इस प्रकार राधा जी ने ब्रह्म के साथ प्रत्यक्ष सम्बन्ध कराया | इसलिए उस जन्म में शुकदेव जी कि सद्गुरु श्री राधा जी हैं और
इसीलिए सद्गुरु होने के कारण भागवत में
राधा जी का नाम नहीं लिया अर्थात अपने गुरु का नाम नहीं लिया | जिस प्रकार यदि पत्नी अपने पति का नाम ले, तो उसकी आयु घटती है, उसी प्रकार सद्गुरु को मन में स्मरण कर 'सद्गुरु कि जय" कहना चाहिए, मर्यादा भंग
नहीं करनी चाहिए |
ऐसा शास्त्रों में वर्णन आता है | और दूसरा कारण राधा शब्द भागवत में ना आने का यह है कि यदि शुकदेव जी राधा नाम ले भी लेते तो वह उसी पल राधा जी के भाव में इतना डूब जाते कि पता नहीं कितने दिनों तक उस भाव से बहार
ही नहीं आ पाते | ऐसे में राजा परीक्षित के पास तो केवल सात ही दिन थे, फिर कथा कैसे पूरी होती| जब प्रभु ने राधा जी से पूछा कि इस साहित्य में तुम्हारी क्या भूमिका होगी? तब राधा जी ने खा कि मुझे कोई भूमिका नहीं चाहिए, में तो आपके पीछे हूँ | 



इसिलए कहा गया है कि 
कृष्ण यदि शब्द हैं तो राधा अर्थ है , कृष्ण गीत हैं तो राधा संगीत ह, 
कृष्ण वंशी हैं तो राधा स्वर हैं , 
कृष्ण समुन्द्र हैं तो राधा तरंग हैं, 
कृष्ण पुष्प हैं तो राधा उस पुष्प कि सुगंध हैं | 
इसीलिए राधा जी इसमें अदृश्य
रही हैं| उनका नाम "गुप्त रीति" से दो तीन स्थानों पर लिया गया है | 



भागवत में महारास के
प्रसंग का यह श्लोक विचारणीय है : 
"तत्रारभत गोविन्दो रास क्रीडा मनु व्रते |
स्त्रीरतनैरविन्तः प्रीतैरन्योन्यबद्धबाहुभि: 



" अर्थात भगवान् श्रीकृष्ण कि प्रेयसी और सेविका गोपिआं बहो में बाहें डाल खड़ी थी | 



श्रीमद्भागवत मे प्रसंग आता है कि वृन्दावन मे रासलीला करते हुए भगवान अंतर्ध्यान हो जाते हैं ...तो गोपियाँ व्याकुल होकर उन्हें खोजने लगती हैं ..मार्ग मे श्रीकृष्ण के साथ साथ एक ब्रजबाला के भी पदचिन्ह दिखाई दिये 
"अनया आराधितो नूनं भगवान् हरिरीश्वर: | 
यन्नो विहाय गोविन्द: प्रीतोयामनयद्रह: ||" 
अर्थात गोपिया आपस में कहती हैं :'अवश्य ही सर्व शक्तिमान कि वह आराधिका होगी, इसीलिए इसपर प्रसन्न होकर हमारे प्राण प्यारे श्यामसुंदर ने हमें छोड़ दिया है और इसे एकांत में ले गए हैं . स्पष्ट है कि यह गोपी और कोई नहीं, राधा जी ही थी | श्लोक में "आराधितो" शब्द में राधा नाम छिपा है

Sunday, March 24, 2013

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने...


१. परदेशातील वेदांताच्या झंझावाती प्रचाराने धर्मांतराला आळा बसणे !
    ‘स्वामी विवेकानंदांच्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी संस्कृती यांचा प्रभाव, खिश्चन धर्मगुरूंचे बुद्धीभेद करणारे डावपेच, तशा प्रकारचे वाङ्मय, यांमुळे हिंदू धर्म अन् संस्कृती अत्यंत हीन, अमानुष, दयनीय आणि रानटी आहे, असा हीनगंड भारतातील श्रेष्ठ लोकांत जोपासला गेला. पुष्कळशा हिंदूंनी बाप्तिस्माच घेतला असता आणि त्यांचे खिश्चनीकरण झाले असते. स्वामी विवेकानंदाच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने त्याला आळा बसला, यात संशय नाही.’
२. जगाला आत्मिक ऐक्याचा संदेश देणे आणि तरुणांमध्ये नवचेतना निर्माण करणे
    खिस्ताब्द १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेमध्ये त्यांनी आत्मिक ऐक्याचा संदेश जगाला दिला. भारताच्या आत्मिक प्रगतीसह ऐहिक प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये नवचेतना आणि उत्साह निर्माण होण्यास साहाय्य झाले.
३. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करणे
    सततची परकीय आक्रमणे, अनाचार, लूटमार, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसा या सर्वांमुळे हिंदु समाज आक्रांत झाला होता. समाजात निर्माण झालेले औदासीन्य आणि पराभूत मानसिकता यांतून हिंदु समाजाला बाहेर काढण्यासाठी रामकृष्णांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी आसेतुहिमाचल प्रवास केला. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदुस्थान यांचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले.
४. ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना
    आपल्या गुरूंचा ‘स्नेहयुक्त बंधुभाव आणि आत्मिक ऐक्य’ हा संदेश जगाला देता यावा, यासाठी स्वामी विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली अन् हिंदु धर्माचे खरे स्वरूप जगाला उलगडून दाखवले. या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून श्री रामकृष्ण परमहंसांचा संदेश जगात पोहोचवण्याचे स्वामी विवेकानंदांनी आरंभलेले कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८ सप्टेंबर २००६, अंक ३७)

Sunday, March 3, 2013

योगी व्हा !


योगावर अनेक ग्रंथ असतातच; तुम्ही नवे काय सांगणार ? 
  • 'मी' जे अनुभवतो तेच सांगतो . माझी प्रतितीच सांगतो .
  • योग (युज) जोडणे , एक संग होणे . एकरसाणे . एकात्म होणे . एक होणे.
  • 'योग' एक करतो तो योग! योग म्हणजे एकाग्रता, एकचित्त, सहसंवेदना. योग म्हणजे आध्यात्मिक संवेदन. योग ही कला आहे. जीवन प्रसन्न, शांत, सुखमय, परमात्म्याशी एक करणारी गुरुकिल्ली आहे.
  • योग जीवाला मन आणि अहंकारापासून अलग करतो. योग व्यक्तीला साक्षीत्व देतो आणि मग मन आणि इंद्रियांचा तो स्वामी होतो. अहंकराचा प्रभू होतो. मन, इंद्रिये आणि अहंकारादि नियंत्रणाखाली ठेवू शकतो. आणि अखेरीस आत्मा परमात्म्याशी जोडतो. जीवास शिव बनवतो. साधक परमात्माच होतो .
माणसाने शक्ती संपादन करायची म्हणजे नेमके काय करायचे? शक्तीची उपासना? कोणती?  कशी? भारत आज दुबळा बनला आहे. त्याला शक्तीशाली कसे बनवायचे? शक्ती संपादायची? कोणती शक्ती?
  • क्षात्रशक्ती - military power ही तर विकसित करायचीच. ही एकच एक शक्ती नाही. आणखी एक शक्ती आहे ती 'ब्रह्मशक्ती !' जशी 'क्षात्रतेज' शक्ती आहे तशी 'ब्रह्मतेज' शक्ती आहेच. ब्रह्मतेज ब्रह्यवर्चसाने, भगवत्तेने, परमात्मदृष्टीने प्रगति ! योगसाधनेने चित्तवृत्ती निर्मल होते, एकाग्र होते आणि मग निराकार होते. समाधी अवस्था हेच ब्राह्मतेज !
  • भगवंताची  योगाची वाट चालायची? तितकी बुद्धी , तितके मनोधैर्य, साहस नसेल तर त्याचे चरण धरा, समर्पण करा. वाटचाल करीत जा. हळूहळू त्याच्या कृपेने धैर्य येते. साहस येते. बळ येते. उणीवा भरून निघतात. (अकूतोभय) निर्भय होतो .
  • विचार करण्याची क्षमता हीच शक्ती ! योगसाधनेने ती क्षमता येते. परिणत प्रज्ञा प्राप्त होते. साधारणत: माणसाला विचार करताच येत नाही . He is incapable of thinking as flying . 'ऊडून जा ' म्हटले तर ते जसे अशक्य, तसच विचार करणेही. त्रिकोणाचा चौकोन बनवणे, वाळूच्या दोरीने आकाश बांधणे तसेच विचार करणे असंभाव्य, अशक्य, विचार करणे म्हणजे चित्ताची एकाग्रता, अव्यग्रता, मनाच्या पलीकडे पलीकडच्या स्तरावर सतत राहण्याची क्षमता. समत्वात राहणे, समत्य सांभाळणे हीच शक्ती. वृत्तीशून्य अवस्था! निराकार आणि ब्रह्माकार स्थिती हीच शक्ती.
  • चित्त एकाग्र करण्याची क्षमता नसणे, हीच दुर्बलता. विचार करण्याची क्षमताच गमावली आहे. इच्छाही नाही. कारण त्याकरता श्रम करावे लागतात. म्हणून तर अध:पतनाच्या गर्तेत खोल खोल तो पडतो आहे.
  • आज सगळे योग-भोग हवे तर आहे, पण फुकट! त्याकरता मोबदला द्यायची तयारी नाही. एकाग्रतेविना, विचाराविना ज्ञान-आत्मा-परमात्मा हवा आहे. साधानेविना सिद्धी  हवी आहे. श्रमाविना, कष्टाविना फळ हवे आहे. ते शक्य नाही. अशाने आळस वाढेल. तमोगुण बळावेल आणि तो हेच जीवन नव्हे, तर जन्म जन्म पशुयोनीत भटकवील. योगाची (म्हणजे शक्तीची) आत्मशक्तीची उपासना न कराल तर शक्ती तुमचा त्याग करील. केवळ भक्तीचंच साधन, नामस्मरणाचं साधन करतो, तिथे काही नेम नकोत.
  •  साधन नको, कष्ट नकोत. त्यांनी काय साधणार? योगाविना, समाधीविना आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान आणि आत्मशक्ती नसेल तर भक्ती काय करणार ? तिला थारा कसा मिळेल? अशाने माणूस संकुचित बनेल, क्षुद्र होईल. क्षुद्र अंत:करणात परमात्मा कसा राहील? भक्ती कशी राहू शकेल ?
  •  लक्षावधी शिष्य काय करायचे ? मेंढरे आहते ती! बुध्दिमान, अहंकारमुक्त, भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणारे, निमित्त बनणारे दहा असले तरी ते दुनिया बदलून टाकतील. 
योगसाधनेला  प्राणायामाची अत्यंत आवश्यकता आहे का ? प्राणायामाविना योगसाधना होऊ शकते का ?
  • प्राणायामाविनाही योगसाधना होऊ शकते, हे खरे. पण प्राणायामाने योगसाधनेला विलक्षण वेगाने गति होते, हेही खरे. 
  • अलिकडचे महायोगी अरविंदांची गोष्ट आहे.प्राणायमानेच ते योगसाधनेला प्रारंभ करतात. सकाळी संध्याकाळी तीन तास. किमान रोज ५/६ तास प्राणायमाचा नेम असतो. अरविंद घोषांनीही काही वर्षे सतत सकाळ संध्याकाळ सहा सहा तास प्राणायाम साधना केलेली होती. प्राणायमाने त्यांची मति विलक्षण वाढते. प्राणायामाआधी ते महिन्याला जेमतेम २०० ओळी कविता लिहीत. स्फुरलेले जरी त्याच क्षणी न लिहीले तरी ते स्मरणांत असे. स्मृति अशी तेजोमय होती की  हवे त्या वेळी ते त्या ओळी स्मरणात आणु शकत आणि लिहू शकत.

"अभिमंत्रित विभूति, मंत्र, तीर्थ, भगवंतावरची श्रद्धा रोग बरे करू शकते का? ही अंधश्रध्दा. आजच्या विज्ञानाच्या युगात औषध न घेता मंत्र, तीर्थ, विभूतीने रोग जातात, म्हणजे हा खुळेपणा आहे. हे सगळे बंद केले पाहिजे."

  • "खरे आहे. कुणी विभुति द्यावी. तीर्थ द्यावे रोगावर! रोग्याने ते औषध न घेता घ्यावे! सगळी अद्यावत वैज्ञानिक चिकित्सा उपलब्ध असतानाही असा समज असूच नये. आजच्या युगांत.
  • पण कुणी जर रोगावरचा उपचार म्हणून भगवंतावरच्या श्रद्धा हाच उपचार, त्याचे तीर्थ, विभूति हाच उपचार करीत असेल, तर त्याच्यवर बंदी घालणे हेही गैरच .कुणी कुणाला का रोकावं? समाजाला कसलाही त्रास न होता जर कुणी काही श्रद्धेने करीत असेल, तर त्याला प्रतिबंध का करावा? तसा अटकाव करणारा समाजच चुकीचा असेल!
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Wednesday, February 13, 2013

धर्मग्रंथांची व्युत्पत्ती, तसेच निर्मिती काळाविषयी केलेला अपप्रचार आणि त्यावरील खंडण भाग - १


म्हणे, धर्मग्रंथ हे कलियुगात लिहिले गेले !

अयोग्य विचार
१. काही धर्मग्रंथांच्या रचनाकाळाच्या संदर्भातील एक मत
अ. वैदिक संहिता, ब्राह्मणग्रंथ अन् काही उपनिषदे (खि.पू. ४००० ते खि.पू. १०००)

आ. काही उपनिषदे, निरुक्त (खि.पू. ८०० ते खि.पू. ५००)

इ. प्रमुख श्रौतसूत्रे आणि काही गृह्यसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ४००)

ई. धर्मसूत्रे, गृह्यसूत्रे, पाणिनीची व्याकरणसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ३००)

उ. जैमिनीचे पूर्वमीमांसासूत्र (खि.पू. ५०० ते खि.पू. २००)

ऊ. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य (खि.पू. ३०० ते खि.पू. १००)

ए. मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति (खि.पू. २०० ते इ.स. ३००)

ऐ. नारदस्मृति, काही पुराणे (इ.स. १०० ते इ.स. ४००)

ओ. इतर स्मृती आणि काही पुराणे (इ.स. ६०० ते इ.स. ९००)

२. स्मृतींच्या रचनाकाळाच्या संदर्भातील दुसरे मत
अ. गौतम, आपस्तंब, बौधायन धर्मसूत्रे आणि मनुस्मृति (सनपूर्व ६०० ते इ.स. १००)

आ. याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादींच्या स्मृती (इ.स. १०० ते इ.स. २००)

इ. इतर स्मृती (इ.स. २०० ते इ.स. ८००)

ई. स्मृतीवरच्या टीका आणि निबंध या स्वरूपाची ग्रंथरचना (इ.स. ८०० ते इ.स. १८००)

टीप - कंसातील वर्षे ही संबंधित ग्रंथांच्या रचनेचा कालखंड दर्शवतात.

         ऐतिहासिक दृष्टीने सर्व स्मृतिकार हे कलियुगातीलच आहेत; पण निबंधकारांनी त्या सर्वांना कलियुगाच्या पूर्वीचे ठरवले आहे.

खंडण
१. वेदोऽखिलो धर्ममूलम् । - मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८

अर्थ : वेदातून सनातन धर्म प्रगटला. (सर्व वेद हे धर्माचे मूळ आहे.)

२. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । - श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १८

अर्थ : परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त असा उत्पन्न करतो आणि प्रसिद्ध आत्मा त्या हिरण्यगर्भाला ऋग्वेदादी महत् शास्त्रे देतो.

         `जो ब्रह्मदेवाला उत्पन्न करून वेद प्रदान करतो, त्याला मी शरण जातो. म्हणजे वेदांचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभी होते. भगवत्पाद शंकर सांगतात, सर्व सृष्टी वेदापासून झाली. सृष्टीच्या आद्यतत्त्वात वेद आहेत. प्राचीन शास्त्रातील कल्पकाळ परिगणन पाहिले, तर सृष्टी उत्पन्न होऊन ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. ‘संपूर्ण वेदराशी (कारण वेद पर्वताप्रमाणे असून अनंत आहेत.) सृष्टीच्या प्रारंभी अस्तित्वात आला’, हा आमचा सिद्धांत आहे. व्यासांनी द्वापराच्या अंती वेदांची कांडे केली, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे विभाग केले आहेत. द्वापरयुगाचा अंत म्हणजे आजच्या कलियुगाचा प्रारंभ अदमासे ५०५० वर्षांपूर्वी झाला. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे विभाग ५,००० वर्षांपूर्वी झाले आहेत.’

टीका
         `याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला.' - आधुनिक

खंडण
         खिलभाग वेदांनंतर रचला इत्यादी खोटे असणे आणि याज्ञवल्क्यांना सूर्याच्या आशीर्वादाने खिल अन् उत्तरभाग यांसह वेद प्राप्त होणे : ‘महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट विवरण आहे,

         प्रतिष्ठास्यति ते वेदः सखिलः सोत्तरो द्विज ।

         कृत्स्नं शतपथं चैव प्रणेष्यसि द्विजर्षभ ।। - महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३०६, श्लोक १०

अर्थ : हे द्विजश्रेष्ठ याज्ञवल्क्य, खिल आणि उत्तरभाग यांसह वेद तुझ्यात प्रतिष्ठित होतील आणि हे द्विजा ! तू संपूर्ण शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे प्रवचन करशील.

         याज्ञवल्क्याच्या तीव्र तपस्येने संतुष्ट होऊन भगवान सूर्यनारायण त्यांना म्हणाले, ``तुझ्या शरिरात वाणी होऊन
श्री सरस्वती प्रवेश करील.’’ त्याप्रमाणे त्यांनी वेदवाणी सरस्वतीला याज्ञवल्क्यामध्ये प्रविष्ट व्हायला प्रेरित केले. तेव्हा याज्ञवल्क्याने आपले मुख उघडले. इथे स्पष्ट आहे की, याज्ञवल्क्याने भगवान भास्कराच्या कृपेने खिल भागासह वेद प्राप्त केले. अशा प्रकारे शंभर अध्याय असलेल्या ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाचे प्रथम प्रवचन याज्ञवल्क्याने केले. महाभारतात हा सर्व प्रसंग आहे. भगवान भास्कराच्या कृपाप्रसादाने याज्ञवल्क्याने शुक्र यजुर्वेदाच्या १५ शाखा प्राप्त करून घेतल्या.’ यामुळे खिलभाग नंतर रचला इत्यादी विधाने खोटी आहेत.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, February 2, 2013

गोवंशरक्षण!

तिलं न धान्यं पशवो न गावः ।’ म्हणजे ‘तीळ हे धान्य नव्हे आणि गाय काही पशू नाही’, ही ज्वलंत भावना वा श्रद्धा चळवळ करणार्‍यांच्या अंतःकरणात आहे का ? चळवळी करणार्‍यांत चळवळ करणार्‍यांचा अभिमान किती क्षीण असतो. त्यामुळे त्या चळवळीशी त्याचे जीवन एकरूप होऊ शकत नाही; म्हणून ती चळवळ पहाता पहाता क्षीण होते. नष्ट होते ! ‘संपूर्ण भारतात, गोहत्याबंदी घोषित न झाली, तर मी ११.९.१९७६ या दिवसापासून आमरण उपवास करीन.’ सर्वोदयाचे मुखपत्र ‘मैत्री’मधून गोहत्या बंदी संदर्भात कडक लेख येऊ लागले आहेत. इंदिरा गांधी विनोबांना भेटायला आल्या आणि विनोबांनी आमरण उपोषणाचा निर्णय मागे घेतला !’

१८५७ चा उठाव किंवा क्रांतीयुद्धाच्या वेळी काडतुसाला गायीची चरबी लावल्याने काडतुसाचे बंद दाताने काढावे लागतात, ही वार्ता सैनिकांत पसरल्यावर ‘इंग्रज आपणाला बाटविणार असून धर्म बुडवत आहेत’, या श्रद्धेने सर्व सैनिक पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिशांना ‘देमाय धरणी ठाय’ केले. १८५७ च्या युद्धाआधी ४ हिंदी शिपायांमागे १ इंग्रज शिपाई असे प्रमाण होते; परंतु ब्रिटिशांना इतकी धास्ती वाटू लागली की, त्यांचा हिंदी शिपायांवरील विश्वासच उडून गेला आणि त्यांनी दोन हिंदी शिपायांमागे १ इंग्रजी शिपाई असे प्रमाण ठेवले.      गोवध बंदी चळवळीने पुन्हा एकदा १८८० ते १८९० या काळात असंतोषाचा भडका उडाला. हिंदू भयंकर प्रक्षुब्ध झाले. उत्तर, मध्य आणि  पश्चिम भारतात लोकक्षोभाला आवर घालणे ब्रिटिशांना जमत नव्हते. १८५७ - ५८ या उठावाच्या वेळी लोकक्षोभाची जी काही तीव्रता व स्फोटकता होती, त्यापेक्षाही अधिक ज्वाळा उफाळत होत्या. ब्रिटिशांच्या भारतातील मंत्र्यांनाच धडकी भरली. त्यांनी महाराणी व्हिक्टोरियाला कळविले, `ही चळवळ वस्तुतः ब्रिटिशांच्या विरोधात आहे. मुसलमान समाजानेही हे ओळखले आहे. हिंदूंना गोहत्या नको असेल, तर आपणही गाय मारायची नाही’, असे मुसलमानांनी जाहीर सभांमधून घोषित केले.
 ('India : The Transfer of Power' या तिसर्‍या खंडात हा सर्व वृत्तांत विस्ताराने दिला आहे.)
 
मुसलमानांना हिंदूंविरुद्ध फोडल्याशिवाय ब्रिटिशांना हिंदुस्थानावर राज्य करता येणार नाही. आताच दोन लाखांच्या जवळपास खडी इंग्रज फौज आहे. इतका खर्च व मनुष्यबळ आपल्याला हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी उपयोगात आणणे असंभव आहे. हिंदुस्थान सोडून आपल्याला जावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले. हिंदु समाज आणि संस्कृती ही रानटी असून इंग्रजी संस्कृतीच एकमेव हिंदूंची तारणहार आहे. गाय हा पशू असून रानटी हिंदू गायीलाच ‘देव’ मानतात.
 
राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक यांना हाताशी धरून हिंदु समाज व संस्कृती यांचा कणा (गाय) मोडण्यास इंग्रजांनी प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी मुसलमानांना पेटविले. त्यांनी गोहत्या चालू केली. ब्रिटिशांना राज्य करण्यासाठी मुसलमानांचा हुकुमी पत्ता मिळाला. पुढे एका नेत्याने ब्रिटिशांना पाठिंबा देऊन दलित समाजाचा दुसरा हुकुमी पत्ता मिळवला आणि हिंदुस्थानवरची आपली पकड घट्ट केली.
 
आज दुर्दैवाने आम्ही ‘गाय’ हा हिंदुस्थानचा कणाच मोडून टाकला. आता पुरुषार्थहीन, क्लिंब असा हिंदु समाज किडा, मुंगीसारखा न जगला तर नवलच.
 
Civil Disobedience and Indian Tradition या धर्म पाल यांच्या ग्रंथात वरील विषयाची पुराव्यानिशी माहिती आहे.
१८५७ : ‘गाईच्या चरबीचा वापर केलेली काडतुसे वापरली; म्हणून हिंदुस्थानी सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले.

सध्याची स्थिती
१. १९४८ मध्ये भारताची राज्यघटना अमलात आली. संपूर्ण हिंदु समाजाइतका नादान समाज पृथ्वीच्या पाठीवर कुणी पाहिला आहे का ? स्थानात गोहत्या बंदी करावी, असे `कलम' आहे. आजवर गोहत्या बंदी झाली नाही. 

२. महाराष्ट्र शासनाने विधीमंडळाने १९९५ मध्ये गोवध बंदीचा कायदा संमत केला आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीकरिता पाठवला. आजपर्यंत तो तसाच धूळ खात आहे. १४ वर्षे होऊन गेल्यानंतरही कायद्याला राष्ट्रपतींची संमतीच नाही. त्यामुळे अजून गोहत्या बंदीचा कायदा नाही.
 
३. केंद्र सरकारने गोहत्या बंदीसंबंधी काहीही केले नाही. केंद्र आणि राज्य शासन गोहत्या बंदीचा कायदा करण्याला नाखूष आहेत. इथे मुसलमानांचे तुष्टीकरण तर आहेच, शिवाय केंद्र आणि राज्य शासनाला गोमांसापासून प्रचंड पैसा मिळतो. प्रचंड प्रमाणात डॉलर्स, युरो, रियाल, दिनार अशा स्वरूपात धन प्राप्त होते. शासनाला केवळ पैसा हवा आहे.हिंदूंचे काही सोयरसुतक नाही.
 
४. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी गोहत्या बंदी कायदा केला. तिथेही गोहत्या होतेच.हिंदुस्थानच्या अनेक राज्यांत गोवध बंदीचा कायदा असूनही गोवध सर्रास चालू आहे. तेव्हा गोवध बंदी नसलेल्या केरळ, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत गोहननाच्या संदर्भात काय सांगावे ?
 
५. ज्या राज्यात गोवध बंदी आहे, त्या राज्यातून मुसलमान जिथे बंदी नाही, त्या राज्यात ट्रक भरभरून गायी आणतात. तिथे गायींच्या कत्तली करतात. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सहस्रो गायी आणतात आणि अन्य नगरातील मोठी गावे, मुंबईतील मुसलमान बहुल भागात कत्तली करतात. नागपूरला एका भागात उघड उघड घराघरांतून मुसलमान गोहत्या करतात. कत्तलखान्याच्या व्यतिरिक्त नागपूर, दिल्ली, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा मोठ्या शहरांतून आणि ग्रामीण भागांतून मुसलमानबहुल स्थानांतून घराघरातून मोठ्या प्रमाणावर उघड उघड कत्तल होते.
 
६. हैद्राबादचा कत्तलखाना मुंबईजवळील देवनारच्या कत्तलखान्यासारखाच प्रचंड आहे. आशिया खंडातले हे दोन्ही कत्तलखाने अद्ययावत असून सर्वांत मोठे कत्तलखाने आहेत.
 
७. खानदेशातील नडोंजा या गावी प्रतिदिन ४०० गायींची कत्तल होते. सहस्रो गोमांसाने भरलेले ट्रक मुंबईत येतात. येथून विदेशात गोमांसाची निर्यात होते. कुवेत, अरब राष्ट्रे, मलेशिया, इजिप्त, मध्य आशियातील देशांना लाखो टन गोमांस विकले जाते.
 
८. मानखुर्द येथे दोन ट्रकमध्ये खच्चून भरलेले सहा टन गोमांस पोलिसांनी जप्त केले. सहा टन गोमांस म्हणजे या सैतानांनी किती गाई मारल्या असतील ?
 
९. बकरी ईद जवळ आली की, महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गाई, बैल, वासरे यांची चोरटी तस्करी होते. मुसलमान बकरी ईदला गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात.हिंदुस्थानात मुसलमान हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायींच्या मुद्दाम कत्तली करतात. 
 
१०. बकरी ईदच्या दिवशी मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान-सहान गावातही गाई-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. सरकार खाटकांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही. कायद्याने गोहत्या बंदी जिथे आहे, तिथेही पोलिसांच्या डोळ्यांसमोर गल्ल्यांमध्ये गोमांसाचा बाजार चालू असतो.
 
११. ५ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या Agriculture Organization ने भारतातल्या पशूंच्या कत्तलीची आकडेवारी दिली. त्यात एकाच वर्षात १ कोटी ६० लक्ष ७० सहस्र गाई-वासरांची कत्तल झाल्याची नोंद आहे. आज वर्षाला अडीच कोटींच्या जवळपास गाई-वासरांची कत्तल होते.
 
१२. एका वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुमार सांगतात, ‘‘अमेरिका आणि युरोप मधील गोमांसविक्री करणार्‍या (जसे फास्ट फूड) बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारत सरकारला भारतभर मांसविक्रीची मोठी योजना दिली आहे. भारताला एक प्रकारे सक्तीने मांसाहारी करण्याची ती योजना आहे. भारत सरकारने ती स्वीकारली. त्यांच्या नियोजनाखाली त्या योजना आता राबवल्या जात आहेत. गोहत्या बंदीची गोष्ट आज फार दूरची असून आता सरकारच गोहत्येच्या विविध योजना राबवील.
 
गाय ही आम्हा हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात ४ सहस्र कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.’
 
१३. ‘आधुनिकांचा बौद्धिक दहशतवाद प्रत्यक्ष पिस्तुल घेऊन मारण्यापेक्षाही महाभयंकर आहे. हे आधुनिक निधर्मी लोक गायी आणि वासरे यांच्या दुर्दशेवर अश्रू ढाळतात. ते गाई वा वासरे यांची दुर्दशा दूर व्हावी; म्हणून अश्रू ढाळत नसून त्यांना समाप्त करून त्याद्वारे डॉलर्स मिळवण्याकरिता आनंदाश्रू ढाळत आहेत.’

 - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (गाय न कटे’ या ग्रंथामधून तसेच साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१.२०१०)