आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Wednesday, February 13, 2013

धर्मग्रंथांची व्युत्पत्ती, तसेच निर्मिती काळाविषयी केलेला अपप्रचार आणि त्यावरील खंडण भाग - १


म्हणे, धर्मग्रंथ हे कलियुगात लिहिले गेले !

अयोग्य विचार
१. काही धर्मग्रंथांच्या रचनाकाळाच्या संदर्भातील एक मत
अ. वैदिक संहिता, ब्राह्मणग्रंथ अन् काही उपनिषदे (खि.पू. ४००० ते खि.पू. १०००)

आ. काही उपनिषदे, निरुक्त (खि.पू. ८०० ते खि.पू. ५००)

इ. प्रमुख श्रौतसूत्रे आणि काही गृह्यसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ४००)

ई. धर्मसूत्रे, गृह्यसूत्रे, पाणिनीची व्याकरणसूत्रे (खि.पू. ६०० ते खि.पू. ३००)

उ. जैमिनीचे पूर्वमीमांसासूत्र (खि.पू. ५०० ते खि.पू. २००)

ऊ. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पतंजलीचे महाभाष्य (खि.पू. ३०० ते खि.पू. १००)

ए. मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति (खि.पू. २०० ते इ.स. ३००)

ऐ. नारदस्मृति, काही पुराणे (इ.स. १०० ते इ.स. ४००)

ओ. इतर स्मृती आणि काही पुराणे (इ.स. ६०० ते इ.स. ९००)

२. स्मृतींच्या रचनाकाळाच्या संदर्भातील दुसरे मत
अ. गौतम, आपस्तंब, बौधायन धर्मसूत्रे आणि मनुस्मृति (सनपूर्व ६०० ते इ.स. १००)

आ. याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादींच्या स्मृती (इ.स. १०० ते इ.स. २००)

इ. इतर स्मृती (इ.स. २०० ते इ.स. ८००)

ई. स्मृतीवरच्या टीका आणि निबंध या स्वरूपाची ग्रंथरचना (इ.स. ८०० ते इ.स. १८००)

टीप - कंसातील वर्षे ही संबंधित ग्रंथांच्या रचनेचा कालखंड दर्शवतात.

         ऐतिहासिक दृष्टीने सर्व स्मृतिकार हे कलियुगातीलच आहेत; पण निबंधकारांनी त्या सर्वांना कलियुगाच्या पूर्वीचे ठरवले आहे.

खंडण
१. वेदोऽखिलो धर्ममूलम् । - मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ८

अर्थ : वेदातून सनातन धर्म प्रगटला. (सर्व वेद हे धर्माचे मूळ आहे.)

२. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै । - श्वेताश्वतरोपनिषद्, अध्याय ६, वाक्य १८

अर्थ : परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त असा उत्पन्न करतो आणि प्रसिद्ध आत्मा त्या हिरण्यगर्भाला ऋग्वेदादी महत् शास्त्रे देतो.

         `जो ब्रह्मदेवाला उत्पन्न करून वेद प्रदान करतो, त्याला मी शरण जातो. म्हणजे वेदांचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभी होते. भगवत्पाद शंकर सांगतात, सर्व सृष्टी वेदापासून झाली. सृष्टीच्या आद्यतत्त्वात वेद आहेत. प्राचीन शास्त्रातील कल्पकाळ परिगणन पाहिले, तर सृष्टी उत्पन्न होऊन ४२,०३,३५,९९,९९४ वर्षे झाली आहेत. ‘संपूर्ण वेदराशी (कारण वेद पर्वताप्रमाणे असून अनंत आहेत.) सृष्टीच्या प्रारंभी अस्तित्वात आला’, हा आमचा सिद्धांत आहे. व्यासांनी द्वापराच्या अंती वेदांची कांडे केली, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे विभाग केले आहेत. द्वापरयुगाचा अंत म्हणजे आजच्या कलियुगाचा प्रारंभ अदमासे ५०५० वर्षांपूर्वी झाला. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे विभाग ५,००० वर्षांपूर्वी झाले आहेत.’

टीका
         `याज्ञवल्क्यांनी वेदांनंतर खिलभाग रचला.' - आधुनिक

खंडण
         खिलभाग वेदांनंतर रचला इत्यादी खोटे असणे आणि याज्ञवल्क्यांना सूर्याच्या आशीर्वादाने खिल अन् उत्तरभाग यांसह वेद प्राप्त होणे : ‘महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट विवरण आहे,

         प्रतिष्ठास्यति ते वेदः सखिलः सोत्तरो द्विज ।

         कृत्स्नं शतपथं चैव प्रणेष्यसि द्विजर्षभ ।। - महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३०६, श्लोक १०

अर्थ : हे द्विजश्रेष्ठ याज्ञवल्क्य, खिल आणि उत्तरभाग यांसह वेद तुझ्यात प्रतिष्ठित होतील आणि हे द्विजा ! तू संपूर्ण शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे प्रवचन करशील.

         याज्ञवल्क्याच्या तीव्र तपस्येने संतुष्ट होऊन भगवान सूर्यनारायण त्यांना म्हणाले, ``तुझ्या शरिरात वाणी होऊन
श्री सरस्वती प्रवेश करील.’’ त्याप्रमाणे त्यांनी वेदवाणी सरस्वतीला याज्ञवल्क्यामध्ये प्रविष्ट व्हायला प्रेरित केले. तेव्हा याज्ञवल्क्याने आपले मुख उघडले. इथे स्पष्ट आहे की, याज्ञवल्क्याने भगवान भास्कराच्या कृपेने खिल भागासह वेद प्राप्त केले. अशा प्रकारे शंभर अध्याय असलेल्या ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाचे प्रथम प्रवचन याज्ञवल्क्याने केले. महाभारतात हा सर्व प्रसंग आहे. भगवान भास्कराच्या कृपाप्रसादाने याज्ञवल्क्याने शुक्र यजुर्वेदाच्या १५ शाखा प्राप्त करून घेतल्या.’ यामुळे खिलभाग नंतर रचला इत्यादी विधाने खोटी आहेत.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, February 2, 2013

गोवंशरक्षण!

तिलं न धान्यं पशवो न गावः ।’ म्हणजे ‘तीळ हे धान्य नव्हे आणि गाय काही पशू नाही’, ही ज्वलंत भावना वा श्रद्धा चळवळ करणार्‍यांच्या अंतःकरणात आहे का ? चळवळी करणार्‍यांत चळवळ करणार्‍यांचा अभिमान किती क्षीण असतो. त्यामुळे त्या चळवळीशी त्याचे जीवन एकरूप होऊ शकत नाही; म्हणून ती चळवळ पहाता पहाता क्षीण होते. नष्ट होते ! ‘संपूर्ण भारतात, गोहत्याबंदी घोषित न झाली, तर मी ११.९.१९७६ या दिवसापासून आमरण उपवास करीन.’ सर्वोदयाचे मुखपत्र ‘मैत्री’मधून गोहत्या बंदी संदर्भात कडक लेख येऊ लागले आहेत. इंदिरा गांधी विनोबांना भेटायला आल्या आणि विनोबांनी आमरण उपोषणाचा निर्णय मागे घेतला !’

१८५७ चा उठाव किंवा क्रांतीयुद्धाच्या वेळी काडतुसाला गायीची चरबी लावल्याने काडतुसाचे बंद दाताने काढावे लागतात, ही वार्ता सैनिकांत पसरल्यावर ‘इंग्रज आपणाला बाटविणार असून धर्म बुडवत आहेत’, या श्रद्धेने सर्व सैनिक पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिशांना ‘देमाय धरणी ठाय’ केले. १८५७ च्या युद्धाआधी ४ हिंदी शिपायांमागे १ इंग्रज शिपाई असे प्रमाण होते; परंतु ब्रिटिशांना इतकी धास्ती वाटू लागली की, त्यांचा हिंदी शिपायांवरील विश्वासच उडून गेला आणि त्यांनी दोन हिंदी शिपायांमागे १ इंग्रजी शिपाई असे प्रमाण ठेवले.      गोवध बंदी चळवळीने पुन्हा एकदा १८८० ते १८९० या काळात असंतोषाचा भडका उडाला. हिंदू भयंकर प्रक्षुब्ध झाले. उत्तर, मध्य आणि  पश्चिम भारतात लोकक्षोभाला आवर घालणे ब्रिटिशांना जमत नव्हते. १८५७ - ५८ या उठावाच्या वेळी लोकक्षोभाची जी काही तीव्रता व स्फोटकता होती, त्यापेक्षाही अधिक ज्वाळा उफाळत होत्या. ब्रिटिशांच्या भारतातील मंत्र्यांनाच धडकी भरली. त्यांनी महाराणी व्हिक्टोरियाला कळविले, `ही चळवळ वस्तुतः ब्रिटिशांच्या विरोधात आहे. मुसलमान समाजानेही हे ओळखले आहे. हिंदूंना गोहत्या नको असेल, तर आपणही गाय मारायची नाही’, असे मुसलमानांनी जाहीर सभांमधून घोषित केले.
 ('India : The Transfer of Power' या तिसर्‍या खंडात हा सर्व वृत्तांत विस्ताराने दिला आहे.)
 
मुसलमानांना हिंदूंविरुद्ध फोडल्याशिवाय ब्रिटिशांना हिंदुस्थानावर राज्य करता येणार नाही. आताच दोन लाखांच्या जवळपास खडी इंग्रज फौज आहे. इतका खर्च व मनुष्यबळ आपल्याला हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी उपयोगात आणणे असंभव आहे. हिंदुस्थान सोडून आपल्याला जावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले. हिंदु समाज आणि संस्कृती ही रानटी असून इंग्रजी संस्कृतीच एकमेव हिंदूंची तारणहार आहे. गाय हा पशू असून रानटी हिंदू गायीलाच ‘देव’ मानतात.
 
राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक यांना हाताशी धरून हिंदु समाज व संस्कृती यांचा कणा (गाय) मोडण्यास इंग्रजांनी प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी मुसलमानांना पेटविले. त्यांनी गोहत्या चालू केली. ब्रिटिशांना राज्य करण्यासाठी मुसलमानांचा हुकुमी पत्ता मिळाला. पुढे एका नेत्याने ब्रिटिशांना पाठिंबा देऊन दलित समाजाचा दुसरा हुकुमी पत्ता मिळवला आणि हिंदुस्थानवरची आपली पकड घट्ट केली.
 
आज दुर्दैवाने आम्ही ‘गाय’ हा हिंदुस्थानचा कणाच मोडून टाकला. आता पुरुषार्थहीन, क्लिंब असा हिंदु समाज किडा, मुंगीसारखा न जगला तर नवलच.
 
Civil Disobedience and Indian Tradition या धर्म पाल यांच्या ग्रंथात वरील विषयाची पुराव्यानिशी माहिती आहे.
१८५७ : ‘गाईच्या चरबीचा वापर केलेली काडतुसे वापरली; म्हणून हिंदुस्थानी सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले.

सध्याची स्थिती
१. १९४८ मध्ये भारताची राज्यघटना अमलात आली. संपूर्ण हिंदु समाजाइतका नादान समाज पृथ्वीच्या पाठीवर कुणी पाहिला आहे का ? स्थानात गोहत्या बंदी करावी, असे `कलम' आहे. आजवर गोहत्या बंदी झाली नाही. 

२. महाराष्ट्र शासनाने विधीमंडळाने १९९५ मध्ये गोवध बंदीचा कायदा संमत केला आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीकरिता पाठवला. आजपर्यंत तो तसाच धूळ खात आहे. १४ वर्षे होऊन गेल्यानंतरही कायद्याला राष्ट्रपतींची संमतीच नाही. त्यामुळे अजून गोहत्या बंदीचा कायदा नाही.
 
३. केंद्र सरकारने गोहत्या बंदीसंबंधी काहीही केले नाही. केंद्र आणि राज्य शासन गोहत्या बंदीचा कायदा करण्याला नाखूष आहेत. इथे मुसलमानांचे तुष्टीकरण तर आहेच, शिवाय केंद्र आणि राज्य शासनाला गोमांसापासून प्रचंड पैसा मिळतो. प्रचंड प्रमाणात डॉलर्स, युरो, रियाल, दिनार अशा स्वरूपात धन प्राप्त होते. शासनाला केवळ पैसा हवा आहे.हिंदूंचे काही सोयरसुतक नाही.
 
४. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी गोहत्या बंदी कायदा केला. तिथेही गोहत्या होतेच.हिंदुस्थानच्या अनेक राज्यांत गोवध बंदीचा कायदा असूनही गोवध सर्रास चालू आहे. तेव्हा गोवध बंदी नसलेल्या केरळ, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत गोहननाच्या संदर्भात काय सांगावे ?
 
५. ज्या राज्यात गोवध बंदी आहे, त्या राज्यातून मुसलमान जिथे बंदी नाही, त्या राज्यात ट्रक भरभरून गायी आणतात. तिथे गायींच्या कत्तली करतात. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सहस्रो गायी आणतात आणि अन्य नगरातील मोठी गावे, मुंबईतील मुसलमान बहुल भागात कत्तली करतात. नागपूरला एका भागात उघड उघड घराघरांतून मुसलमान गोहत्या करतात. कत्तलखान्याच्या व्यतिरिक्त नागपूर, दिल्ली, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा मोठ्या शहरांतून आणि ग्रामीण भागांतून मुसलमानबहुल स्थानांतून घराघरातून मोठ्या प्रमाणावर उघड उघड कत्तल होते.
 
६. हैद्राबादचा कत्तलखाना मुंबईजवळील देवनारच्या कत्तलखान्यासारखाच प्रचंड आहे. आशिया खंडातले हे दोन्ही कत्तलखाने अद्ययावत असून सर्वांत मोठे कत्तलखाने आहेत.
 
७. खानदेशातील नडोंजा या गावी प्रतिदिन ४०० गायींची कत्तल होते. सहस्रो गोमांसाने भरलेले ट्रक मुंबईत येतात. येथून विदेशात गोमांसाची निर्यात होते. कुवेत, अरब राष्ट्रे, मलेशिया, इजिप्त, मध्य आशियातील देशांना लाखो टन गोमांस विकले जाते.
 
८. मानखुर्द येथे दोन ट्रकमध्ये खच्चून भरलेले सहा टन गोमांस पोलिसांनी जप्त केले. सहा टन गोमांस म्हणजे या सैतानांनी किती गाई मारल्या असतील ?
 
९. बकरी ईद जवळ आली की, महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गाई, बैल, वासरे यांची चोरटी तस्करी होते. मुसलमान बकरी ईदला गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात.हिंदुस्थानात मुसलमान हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायींच्या मुद्दाम कत्तली करतात. 
 
१०. बकरी ईदच्या दिवशी मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान-सहान गावातही गाई-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. सरकार खाटकांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही. कायद्याने गोहत्या बंदी जिथे आहे, तिथेही पोलिसांच्या डोळ्यांसमोर गल्ल्यांमध्ये गोमांसाचा बाजार चालू असतो.
 
११. ५ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या Agriculture Organization ने भारतातल्या पशूंच्या कत्तलीची आकडेवारी दिली. त्यात एकाच वर्षात १ कोटी ६० लक्ष ७० सहस्र गाई-वासरांची कत्तल झाल्याची नोंद आहे. आज वर्षाला अडीच कोटींच्या जवळपास गाई-वासरांची कत्तल होते.
 
१२. एका वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुमार सांगतात, ‘‘अमेरिका आणि युरोप मधील गोमांसविक्री करणार्‍या (जसे फास्ट फूड) बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारत सरकारला भारतभर मांसविक्रीची मोठी योजना दिली आहे. भारताला एक प्रकारे सक्तीने मांसाहारी करण्याची ती योजना आहे. भारत सरकारने ती स्वीकारली. त्यांच्या नियोजनाखाली त्या योजना आता राबवल्या जात आहेत. गोहत्या बंदीची गोष्ट आज फार दूरची असून आता सरकारच गोहत्येच्या विविध योजना राबवील.
 
गाय ही आम्हा हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात ४ सहस्र कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.’
 
१३. ‘आधुनिकांचा बौद्धिक दहशतवाद प्रत्यक्ष पिस्तुल घेऊन मारण्यापेक्षाही महाभयंकर आहे. हे आधुनिक निधर्मी लोक गायी आणि वासरे यांच्या दुर्दशेवर अश्रू ढाळतात. ते गाई वा वासरे यांची दुर्दशा दूर व्हावी; म्हणून अश्रू ढाळत नसून त्यांना समाप्त करून त्याद्वारे डॉलर्स मिळवण्याकरिता आनंदाश्रू ढाळत आहेत.’

 - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (गाय न कटे’ या ग्रंथामधून तसेच साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१.२०१०)