आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, October 26, 2013

ऋषिस्मृति


पर्जन्यमापनासाठी आपण आज जशी साधने वापरतो, तशी पूर्वी काही योजना होती. सृष्टीज्ञानाच्या नानाविध शाखांवर ग्रंथलेखन करणारे ६ व्या शतकातील महान शास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी पुढील प्रयोग सांगितला आहे. (बृहद्संहिता २३/२) एक अरत्नी मानाचे, म्हणजे १८ इंच व्यासाचे एक कुंड ठेवायचे. त्या कुंडाला ‘मागधमान म्हणतात. हे कुंड आंब्याच्या झाडाचे करतात. हे कुंड १२ अंगुले, म्हणजे ९ इंच उंच, लांब आणि रुंद असे असते.
 चाणक्यानेदेखील त्याच्या ग्रंथात विशिष्ट ढगांची माहिती दिली आहे. ढगांचे प्रकार, पाऊस पाडणारे ढग, सूर्य, गुरु आणि शुक्र यांचे स्थान अन् गती यांवरून कोणते ढग वर्षाव करतील, ते दिले आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात १४३ प्रकारच्या ढगांचा निर्देश आहे. त्यांतील तीन प्रकारचे ढग हत्तीच्या सोंडेसारखे आणि मुसळधार पावसाचा वर्षाव सतत ७ दिवसांपर्यंत करतात. ८० प्रकारचे ढग केवळ सिंचन करतात आणि ६० प्रकारचे ढग केवळ सूर्यप्रकाशातच प्रकटतात.  
यांच्या बृहत्संहितेतील २१ ते २८ या अध्यायांत वर्षाकालाविषयी शास्त्रीय माहिती आहे. प्रारंभी वराहमिहिर म्हणतात, ‘अन्न हे वर्षाकालावर अवलंबून असून ते जगताचा प्राण आहे. त्यासाठी वर्षाकालाविषयी प्रयत्नपूर्वक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी काही महिने मेघ उत्पन्न होण्याची प्रक्रिया चालू होते. तिला ‘गर्भधारणा म्हणतात. चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रांत प्रविष्ट झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात गर्भधारणेची लक्षणे स्पष्ट दिसतात. गर्भधारणेनंतर साडे सहा महिन्यांनी प्रसव होतो, म्हणजे मेघ जलवर्षाव करतात. (बृहद्संहिता २१-७) उत्तर किंवा पूर्व दिशांकडून शीतल वायू, निर्मळ आकाश, विविध रंगांचे ढग, मंद मेघगर्जना आणि पक्ष्यांचा मधुर ध्वनी अशी गर्भपुष्टीची लक्षणे आचार्य वराहमिहिराने सांगितली आहेत. 
विपुल वृष्टी करणारे मेघ कोणते आणि ते कसे असतात, हे वराहमिहिर यांनी बृहद्संहितेत सांगितले आहे. त्याने आवर्तमेघ, संवर्तमेघ, पुष्करमेघ आणि द्रोणमेघ, असे मेघाचे चार प्रकार सांगितले.
१. आवर्तमेघ : हे एखाद्या विशिष्ट स्थळी वृष्टी करतात.
२. संवर्तमेघ : हे सर्वत्र वृष्टी करतात.
३. पुष्करमेघ : हे अल्पवृष्टी करतात.
४. द्रोणमेघ : हे अती विपुलवृष्टी करतात.
    उल्कापात, अग्नीपात, धुलीवर्षाव, भूकंप व इंद्रधनुष, असे उत्पात आणि ते दिसले, तर ‘गर्भाचा उपघात होतो, असे त्याने बृहद्संहितेत सांगितले आहे. (बृहद्संहिता २१/ २५-२७)
    वराहमिहिराने पावसाच्या संदर्भात एक प्रयोग सांगितला आहे. आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षात चंद्राने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की, एक ब्राह्मण गावाच्या उत्तरेला वा पूर्वेला जात असे. तो तीन दिवस उपवास करून विराट श्रीविष्णूची प्रार्थना करीत असे. तो जमिनीवर ग्रह-नक्षत्रांच्या आकृत्या काढून श्रीविष्णूची पूजा करीत असे. नंतर चार दिशांना चार कलश मांडून ठेवीत असे. उत्तरेचा कलश श्रावण महिन्याचे, पूर्वेचा कलश भाद्रपद महिन्याचे, दक्षिणेचा कलश आश्‍विन महिन्याचे आणि पश्‍चिमेचा कलश कार्तिक महिन्याचे प्रतीक होत. जो कलश पाण्याने भरून जाईल, त्या महिन्यात हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडेल, असे समजले जायचे. हे संकेत खरे ठरायचे आणि अशा पुरुषांचा समाजात नेहमी गौरव होत असे.
ऋषिस्मृति - २, आचार्य वराहमिहिर, प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)

Sunday, October 6, 2013

सनातन हिंदु धर्म हा काही Religion नाही !


हे जे काही इस्लाम (Religion), ख्रिश्‍चन (Religion) आहेत, ते आपल्या धर्मप्रसाराकरता अत्याचारी आणि आक्रमक होतात, तसेच खून अन् हत्याकांडे करतात; परंतु 'धर्म हा हत्याकांडे करतो, आततायी असू शकतो', असा पुसटता गंधही हिंदूंना सहन होत नाही.
     परम श्रेष्ठ मूल्य असलेल्या हिंदु धर्माला खच्ची करण्याकरीता ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अनुवाद करून 'जसे इस्लाम, ख्रिश्‍चन धर्म, तसाच हिंदु धर्म आहे', असे प्रतिपादन पाश्‍चात्त्यांनी केले. उन्नत आशय असलेला हिंदु धर्म बलवान झाला, तर हिंदु धर्मही आपल्या धर्मप्रसाराकरता इतर धर्माचा विध्वंस करील, जगातल्या इतर धर्मियांची हत्याकांडे करील आणि आपला धर्म प्रस्थापित करील, अशी आधुनिकांना भीती वाटते; म्हणून हिंदु धर्माचा उत्कर्ष कधी होऊच नये, असे त्यांना वाटते; म्हणून 'इस्लाम रिलिजन', 'ख्रिश्‍चन रिलिजन', असे जे काही आहेत, त्या धर्माच्या (रिलिजनच्या) ओळीत ते हिंदु धर्माला बसवतात. ‘रिलिजन' म्हणजे ‘धर्म' असा अर्थ सहेतूक त्यांनी दिला. वास्तविक हिंदु धर्म तसा कधीच नाही, नव्हता आणि असूही शकत नाही.

हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे लिखाण करणारे पाश्‍चात्त्य !
    हिंदु धर्माला आक्रमक, आततायी ठरवण्याकरता नाना प्रकारचे उपाय या पाश्‍चात्त्यांनी योजिले. त्याच्याकरता त्यांनी (मनमानी, खोटा) इतिहास लिहिला. 'हिंदूंनी बौद्धांवर आक्रमणे केली, हिंदूंनी बौद्धांची हत्याकांडे केलीत, हिंदूंनी बौद्धांचे आश्रम जाळून टाकलेत', अशा प्रकारचा नवा खोटा मध्ययुगीन इतिहास लिहिला. विशेष असे की, आमचा जो मध्ययुगीन इतिहास आहे, हा सगळा पाश्‍चात्त्यांनी लिहिला आहे. आजही ते हिंदूंना आक्रमक, आततायी, हत्याकांडे करायला मागेपुढे न पहाणारा हे ठरवण्याकरता नाना क्लृप्त्या योजित आहेत आणि करतही आहेत.
     आज जे काही चालले आहे ते असे. हिंदु हा आक्रमक, आततायी आहे, गोडसेवादी, मनुवादी आहे, हे ठरवण्याकरता ते आकांडतांडव करत आहेत. त्या उद्दिष्टाकरता ते एकही संधी जाऊ देत नाही. काही केले, तरी त्यांना काही पुरावे सापडत नाहीत; कारण हिंदु धर्म हा काही धर्म नाही.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.३.२०११)

Tuesday, October 1, 2013

श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण


टीका : जिवंत पिता, लौकिक पितामह, प्रपितामह प्रभुतींचा सत्कार करणे हेच श्राद्ध !
- आर्य समाजाचे संस्थापक दयानंद स्वामी 
खंडण 
अ. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होत असणे : जीवित पिता, पितामह यांचा सत्कार म्हणजे श्राद्ध, यासाठी स्वामी दयानंद मनूच्या ज्या श्‍लोकांचा संदर्भ देतात, त्यातून उलट हेच स्पष्ट केले आहे की, पिता जीवित असतांना त्याचे श्राद्ध होऊच शकत नाही. श्राद्ध हे मृत व्यक्तीचेच होते.
आ. धर्मशास्त्रात श्राद्ध केल्यामुळे होत असलेले परिणाम : पृथ्वीवर (दक्षिण दिशेला भूमी उकरून तिथे दर्भ पसरवून तीन पिंड ठेवायचे) तीन पिंड दान केले की, नरकस्थित पितरांचा उद्धार होतो. पुत्राने हरप्रयत्नाने मृत पित्याचे श्राद्ध करावे. त्यांचे नाव आणि गोत्र विधीवत् उच्चारून पिंडदानादी करण्याने त्यांना हव्य-कव्याची प्राप्ती होते. यामुळे त्यांच्या अतृप्त वासना पूर्ण झाल्याने ते तृप्तात्मे साहजिकच त्या कुटुंबाला त्रास देत नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना गती मिळून ते पुढील लोकात जातात. श्राद्ध केल्याने त्याचे परिणाम चांगले होतात, हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
    यामुळे आर्य समाजी दयानंद आणि आधुनिक यांचे वरील वक्तव्य चुकीचे आहे, हे दिसून येते; कारण तसे असते, तर श्राद्धात जे मोठे विधी-विधान आहे, त्याची काय आवश्यकता राहिली असती ?
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंबर २००८ आणि जानेवारी २००९)

(म्हणे) संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करा ! 
साधक : गुरुदेव, बिहार शासनाचे उपमुख्यमंत्री धार्मिक आणि हिंदु धर्म अन् संस्कृतीचे मोठे अभिमानी आहेत. प्रत्यक्षात तसे संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान त्यांनी चालू केले आहे. विदेशातील हिंदूंकरता व्ही.डी.ओ. कॉन्फरन्सिंगद्वारे पिंडदान करण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी घोषित केले आहे की, आमच्या पर्यटन विभागाने विदेशात रहाणार्याक हिंदूंकरता गतवर्षापासून संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदानाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विदेशात सर्वत्र स्वागत होत आहे. वर्णधर्म, जाती इत्यादींचे निर्मूलन करू पहाणार्या ईश्वराचे अधिष्ठान न मानणार्या, अंत्येष्ठी श्राद्धाचा प्रखर तिरस्कार करणार्या , ज्यांना श्राद्धविधी नष्ट करायचा आहे अशा नवहिंदुत्ववाद्यांनी ऑनलाईन पिंडदानाचे स्वागत केले आहे.
गुरुदेव : हे उलट्या खोपडीचे आमचेच आंग्लछायेचे हिंदू काय काय उपद्व्याप करतील कोण जाणे ? हे सगळे हिंदु समाजाचे कडवे शत्रू आहेत. लक्षावधी वर्षांपासून कोटी कोटी लोकांनी पितरांना मुक्ती देणार्या ‘गया या परमपवित्र क्षेत्री आता पितरमुक्तीकरता पिंडदान करायला येण्याची आवश्यकता नाही !
  पितरमुक्तीकरता पिंडदान करणार्या गया क्षेत्राचे महिमान, असे सगळे श्रुती-स्मृति पुराणांतून सर्वत्र आहे. लक्षावधी हिंदू पितरमुक्तीकरता प्रत्यक्ष गयेला येऊन पिंडदान करतात आणि पितरांचे आशीर्वाद घेतात. ज्यांना पिंडदान करायचे त्यांचे जे आप्त-स्वकीय आहेत, त्यांना प्रत्यक्ष गयेला येणे अपरिहार्य आहे. साक्षात भगवान रामप्रभु यांनी दशरथाची श्राद्धक्रिया प्रत्यक्ष गयेला येऊनच केली.
     शास्त्रप्रामाण्य हीच तर आम्हा हिंदु जीवनाची कवच कुंडले आहेत. शास्त्रमर्यादा उल्लंघणारा दांभिक आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान शास्त्रविरुद्ध ढोंग आहे. लक्षावधी वर्षांच्या आमच्या परंपरेवर आतंकवादापेक्षाही क्रूर आघात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून पिंडदान करणारा शास्त्र उल्लंघून कुकर्म करतो.
    यः शास्त्रकिधिमुत्सृज्य कर्तते कामकारतः ।
     न स सिद्धिमकाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोनक २३
अर्थ : अशा स्वैराचारी मानवाला सुख, यश आणि परलोक तर नाहीच नाही. अशा दांभिकांना मी (भगवान) सर्प, विंचू, वाघादी क्रूर योनीत घालतो.
भगवान सांगतात,.....
    तानहं द्विषतः क्रुरान्संसारेषु नराधमान् ।
    क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्केक योनिषु ॥ - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोपक १९
अर्थ : त्या द्वेष आणि क्रूर कर्मे करणार्या् पापी नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीत टाकतो.
     ही जी आधुनिक तांत्रिक पद्धत (technology) आहे, ती आतंकवादापेक्षाही क्रूर आणि दुर्दैवी अशी अवदसा आहे. (Every advance in technology is the greatest misfortune.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १६.१२.२०१०)