आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, September 23, 2012

समाजवादाचे भूत मानगुटीवर बसलेले पं. नेहरू आणि समाजवादी विचारसरणीचा परिणाम !

१. सनातन धर्म-संस्कृतीपेक्षा चीन हिंदुस्थानात आल्यास देशाचे नुकसान होणार नाही, अशी श्रद्धा असणारे नेहरू !
    हिंदुस्थानची राज्यघटना आणि शासन समाजवादी, लोकशाही स्वरूपाचे आहे. लोकशाही आणि समाजवाद (socialism) हे दोघे एकत्र कसे असू शकतील ? पंडित नेहरूंना भारताला समाजवादी वळण द्यायचे आहे. समाजवाद, साम्यवाद याकडे त्यांचा कल आहे. सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे नाव काढले की, ते आणि त्यांच्या गुंडांच्या डोळ्यांतून आग बाहेर पडते अन् कानशिले थाडथाड उडतात.
     चीन तिबेट घेतांना आमच्या तिन्ही दलांचे सरसेनापती (बहुधा ते जनरल थिमय्या असावे) नेहरूंना म्हणाले, ``पहाता पहाता आम्ही चीनची नाकेबंदी करतो. तिबेट जर चीनने घेतला, तर हिदुस्थानला चीनपासून फार मोठा धोका आहे.’’ नेहरू नकार देत उद्गारले, ‘‘हिंदुस्थानात सनातन धर्म संस्कृती येण्यापेक्षा चीन आला, तर हिंदुस्थानची फार काही हानी होणार नाही.’’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)
२. साम्यवाद्यांनी शांती आणि प्रेम यांचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षण देऊन यंत्रासारखा नवा मानव निर्माण करणे
१. लेनिनने देव नाकारला. आई-वडिलांना रतिमात्र मूल्य दिले नाही. शांतीचा अन् प्रेमाचा रतिमात्र गंध नसलेले शिक्षणच दिले. लेनिनने शासनाचे शिक्षणाचे तसे धोरणच जाहीर केले.
२. या साम्यवाद्यांनी देव नाकारला, आत्मा नाकारला. नैतिक मूल्ये अव्हेरली, त्याग नाकारला आणि या भौतिकवादी शासनाने नवा यंत्रासारखा मानव निर्माण केला.
३. दीर्घकाळच्या साम्यवादी शासनप्रणालीचे दुष्परिणाम भयंकर मृत्यू आणि गुलामगिरी आहेत, हे एका रशियन पंडिताच्या लक्षात येणे
    अनेक वर्षांपर्यंत ही वाटचाल केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेता रशियन पंडीत अलेक्झांडर सोलेनित्झ (Alexander Solzhenitsys) याने वस्तूस्थिती ओळखली आणि तो मोठ्या दुःखाने सांगतो, ``दीर्घकालीन साम्यवादी प्रणालीच्या शासनामुळे आम्ही इंद्रियजन्य सुख आणि ऐषाराम यांची पूजा करणारे गुलाम झालो. आम्ही जडाचे पुजारी झालो, वस्तूचे पुजारी झालो. उत्पादनाचे पुजारी झालो. आज आम्ही आमची अस्मिताच गमावली. आम्ही हे भयंकर साम्यवादी  शासन स्वीकारले. त्याचे मूल्य आम्हाला भयंकर मृत्यू आणि गुलामगिरीच्या रूपाने द्यावे लागते अन् आम्ही ते दिलेले आहे. हे साम्यवादाच्या पशुजीवनाचे ओझे, जे आमच्यावर जन्मतःच लादले गेले, ते फेकून द्यायला आम्ही समर्थ होऊ का ?’’ 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक `सनातन चिंतन’, ६.११.२००८)
४. हिंदुस्थानला समाजवादाने दरिद्री बनविले !
    कोलोरॉडोचे विल्यम आर्मस्ट्राँग हे ज्येष्ठ सिनेटर सांगतात, ``हिंदुस्थानात इतकी निसर्ग संपत्ती आहे की, तो देश सर्व जगाला धान्य पुरवू शकतो. लोकसंख्येचे प्रमाणही तसे जास्त नाही. हिंदुस्थान दरिद्री कसा ? समाजवादाने हिंदुस्थानला दरिद्री बनविले. त्यांचे शब्द असे, ‘‘भारताची लोकसंख्या वाजवीपेक्षा जास्त नसून समाजवाद देशाला दरिद्री करत आहे.’’ (The population of India is not in excess. The socialism is keeping the country poor.'') पुढे ते सांगतात, ``जपान, सिंगापूर, हाँगकाँग हे असे देश आहेत की, जिथे कोळसा आणि शेतीजमीन अशी कोणतीही निसर्गसंपत्ती नसतांना अतीदाट लोकसंख्येचे भरण-पोषण करतात; कारण ते देश आधुनिक समाजवादापासून मुक्त आहेत.’ (Japan, Singapore and Hongkong etc. are countries without almost no natural resources in terms of coal and farmland, support a very heavy densities of population, because they are free from modern Socialism.)
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.६.२००८)

No comments:

Post a Comment