आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, November 24, 2013

हिंदु संस्कृती

रामराज्य परिषदेचे संस्थापक प.पू. करपात्रीस्वामी हे पहाटे तीन वाजता उठून प्रातर्विधी उरकत. दंतधावन केल्यावर ते विहिरीच्या गार पाण्याने स्नान करत. नंतर त्यांचे नित्य उपासनेचे कर्म करत. सायंकाळी ५ वाजता ते भोजन करत. त्यांचा ब्रह्मचारी शिष्य स्नान करून सोवळ्यात त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा. हाताने दळलेल्या गव्हाची पोळी, भात, मुगाच्या डाळीचे वरण, लिंबू, आले, गायीचे दूध आणि तूप. मीठ, मिरची, तिखट, साखर वर्ज्य ! ते अन्न कोळशाच्या शेगडीवर शिजवायचे. रात्री निजतांना ते गायीचे दूध घ्यायचे ! जेवणात फळे असायची. रासायनिक खतांचे धान्य आणि भाज्या वर्ज्य असत. रॉकेल किंवा गॅसवर शिजवलेले अन्नही वर्ज्य ! जेवणाच्या आधी ते पाण्याचा एक थेंबही तोंडात टाकत नसत. ते अखंड प्रवासात असायचे. त्यांच्या चारचाकी वाहनामध्ये कोळसे, शेगडी, गंगाजल, पूजासाहित्य अशी सर्व सामुग्रींची सिद्धता असायची. अखेरच्या श्‍वासापर्ंयत त्यांच्या नित्यकर्मात, योगक्षेमात रतीमात्र अंतर पडले नाही. हा त्यांचा दिनक्रम अखंड ६० वर्षें अव्याहत चालू होता. त्यांना कधी रोग (आजार) किंवा  दुखणे झाले नाही, त्यामुळे डॉक्टरकडे जावे लागले नाही ! शास्त्रकार सांगतात त्याप्रमाणे आहाराचे, खाण्यापिण्याचे नियम आणि धर्मशास्त्रानुसार आहार त्यांनी कठोरपणे अन् कटाक्षाने अखेरच्या श्‍वासापर्ंयत सांभाळला.
  

 आमचे प्राध्यापक मित्र सांगतात, ही अंधश्रद्धा आहे.

  • या अंधश्रद्धेच्या थयथयाटाने जग हादरले आहे. सावध होत आहे. आमच्या सनातन धर्माकडे हे सुसंस्कृत (sophisticated)  वैज्ञानिक प्रगत जग खेचले जात आहे. आम्ही मात्र डोळे उघडायला सिद्ध नाही.
  • आधुनिक जागतिक समाजाची आज कोठेही श्रद्धा नाही, कोणतेही तत्त्व नाही, आलो कोठून, जाणार कोठे यांचा त्यांना पत्ता नाही. अशाही परिस्थितीत स्वत:ला 'प्रगत' म्हणवणारा समाज, आम्हां हिंदूंना 'सनातनी' अशी शिवी देतो. 

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ( साप्ताहिक सनातन चिंतन, १५.०४.२०१३)

No comments:

Post a Comment